Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on January 08 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर
Latest Updates
आंध्रातील तिरुपतीमध्ये चेंगराचेंगरीत 4 जणांचा मृत्यू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील तिरुपतीमधील विष्णू निवासम इथे चेंगराचेंगरीत चौघांचा मृत्यू झाला. वैकुंठ द्वार दर्शन टोकन वितरणादरम्यान चेंगराचेंगरी झाली. यात चार जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेची माहिती घेऊन, जखमींवर उपचारांबाबत अधिका-यांशी फोनवरून चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्याचे आणि जखमींना चांगले उपचार मिळावेत यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
कागदी आणि प्लास्टिक कपच्या वापरावर बंदी येणार
Prakash Abitkar : आता काचेच्या कपातच चहा मिळणार!...कागदी आणि प्लास्टिक कपच्या वापरावर बंदी येणार..आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे संकेत...आरोग्याला धोका निर्माण होणा-या वस्तू न वापरण्याचं नागरिकांना आवाहन..आरोग्य आणि, पर्यावरण विभागामार्फत पेपर, प्लास्टिक कप बंदीबाबत जनजागृती केली जाणार असल्याची प्रकाश आबिटकरांची माहिती
बातमीचा व्हिडीओ पाहा-
बुलढाण्यात विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार
Buldhana : शासकीय वसतिगृहेदेखील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आलं आहे..बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील पेठ येथील शासकीय वसतिगृहात एका १३ वर्षीय विद्यार्थ्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आलाय.. वसतिगृह अधीक्षकानेच हे घृणास्पद कृत्य केल्याचे उघड झाल्याने खळबळ उडालीये... याप्रकरणी अमडापूर पोलिसांनी आरोपीला गजाआड केल असून त्याच्यावर गुन्हे दाखल करून आरोपीला अटक केलीये..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
परळी तालुक्यात वर्षभरात सापडले 109 मृतदेह
Parli : बीड जिल्ह्यात गुन्हेगारी वाढल्याची जोरदार चर्चा सुरू असताना परळी मधून एक धक्कादायक बातमी पुढं आली आहे...परळी तालुक्यत गेल्या वर्षभरात 109 मृतदेह पोलिसांना आढळून आले आहेत..या सगळ्यांची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद आहे, यात आत्महत्या केलेले, बेवारस मृतदेह आढळलेले,अपघातात मृत्यू झालेले मृतदेह असतात मात्र एक तालुक्यत इतका मोठा आकडा भुवया उंचावणार आहे.. पोलिसांचया माहितीनुसार परळीत वर्षभरात अवघे 5 खून झाले आहेत..त्यामुळं हा आलेला आकडा हा पोलीस तपासाचा भाग आहे मात्र फक्त परळी तालुक्यत इतके मृतदेह आढळून येणे धक्कादायक आहे..मागील वर्षभरात परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 66 मृतदेह आढळून आले त्यापैकी 64 मृतदेहाची ओळख पटली तर 2 मृतदेहाची ओळख पटली नाहीय तर परळी शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये एकूण 17 मृतदेह आढळले सर्वांची ओळख पटली. तर परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत 26 मृतदेह आढळले त्यातील 21 मृत देहाची ओळख पटवण्यात आली तर 4 मृत देहाची ओळख पटली नाही, तीनही पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील वर्षभरात 109 मृतदेह शहर आणि परिसरात आढळून आले आहेत. दर 3 दिवसांनी 1 अशी मृतदेह सापडल्याची सरासरी आहे.. या सगळ्याचा तपास जेमतेम होऊन प्रकरण फाईल बंद झाल्याचं सांगण्यात येताय..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
पुण्यातील IT कंपनीतील तरुणीची हत्या प्रकरण, अद्दल घडवण्यासाठी कृष्णाचा तरुणीवर हल्ला
Pune Crime : पुण्यातील आयटी कंपनीतील तरुणी हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे....वडिलांच्या आजारपणाचं कारण सांगून तरुणीनं विश्वासघात केला होता असा दावा आरोपी कृष्णानं केलाय....आपल्याला तिला मारायचं नव्हतं तर अद्दल घडवायची होती असं कृष्णानं सांगितलंय.... विश्वासघात झाल्याची भावनान मनात ठेवून कृष्णानं तिच्यावर हल्ला केला....वडील आजारी असल्याचं सांगून त्या तरुणीनं वेळोवेळी आपल्याकडे पैसे मागितल्याचं कृष्णानं सांगितलं... प्रत्यक्षात तिच्या वडिलांना कुठलाही आजार नसल्याचं लक्षात आल्यावर कृष्णानं तिला अद्दल घडवायचं ठरवलं... हे दोघेही पुण्यात एकाच आयटी कंपनीमध्ये काम करत होते...वडिलांच्या आजारपणाचं कारण सांगत तिनं सुमारे 4 लाख रुपये उकळल्याचं कृष्णानं पोलिसांना सांगितलं....कृष्णा जेव्हा तिच्या गावी गेला तिचे वडील ठणठणीत असल्याचं पाहून त्याला मोठा धक्का बसला होता...सत्य समजल्यावर कृष्णाने तिच्याकडे पैसे परत करण्याचा तगादा लावला. यातून त्यांच्यात अनेक वेळा वादही झाले होते.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचे प्रकरण, नाशिक डीआयजींच्या अध्यक्षतेत SITची स्थापना
Malegaon : रोहिंग्यांना मालेगावात जन्म प्रमाणपत्र देण्याचे प्रकरण...गृह विभागाने गठित केली SIT...नाशिक डीआयजींच्या अध्यक्षतेत SITची स्थापना...SITमध्ये नाशिक विभागीय सहआयुक्त, अतिरिक्त जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक या चार सदस्यांचा समावेश...चौकशी अहवालसह शिफारसी करण्याच्या सूचना
बातमीचा व्हिडीओ पाहा-
पुण्यात शाळेत चेंजिंग रुममध्ये मोबाईलने मुलींचं रेकॉर्डिंग
Pune : पुण्यातील शाळेत चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग केल्याचा प्रकार उघड झालाय....पुण्यातील पाषाण भागातील नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आलाय...शाळेतील शिपायानेच हे व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याचे उघड झालंय...शाळेतील शिपाई तुषार सरोदे याला पोलिसांनी अटक केली आहे....शाळेतील किचन रूममध्ये ड्रेस चेंज करायला आलेल्या विद्यार्थिनींचे व्हिडिओ तो रेकॉर्ड करत होता....याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
बातमीचा व्हिडीओ पाहा-
पुण्यात अर्धवट जळलेल्या मृतदेहाचे कुत्र्यांनी तोडले लचके
Pune Dog : अर्धवट जळलेल्या मृतदेहाचे कुत्र्यांनी लचके तोडल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडलाय. पुण्यतील वैकुंठ स्मशानभूमीतली ही घटना आहे. इथल्या गॅसदाहिनीत मृतदेहांची नीट विल्हेवाट लागत नसल्याचं समोर आलंय. सामाजिक कार्यकर्ते अभिजीत बारवकर यांनी या संतापजनक घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सादर केले. तसंच या प्रकरणातील संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पुणे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
'राष्ट्रवादी SP सत्तेत जाणार असल्याच्या अफवा', शरद पवारांची भूमिका
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत जाणार असल्याबाबतच्या बातम्या केवळ अफवा असल्याचं शरद पवारांनी मुंबईत पक्षाच्या बैठकीत सांगितलं.... जे सोबत येतील त्यांना घेऊन सत्तेत जाण्यापेक्षा लढण पसंद करणार असल्याचं ते म्हणाले...आगामी 15 दिवसांत संघटनेमध्ये मोठे बदल पाहायला मिळतील.... 1999 साली आपली जी परिस्थिती होती तीच आता निर्माण झाली आहे....आता आपल्याकडे देण्यासाठी काही नाही आणि गमावण्यासाठी देखील काही नसल्याचं पवारांनी सांगितलं....आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणूनच सामोरं जाणार असल्याचं ते म्हणाले.
अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर नितेश राणे?
Nitesh Rane : अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर नितेश राणे?...काही दहशतवाद्यांकडून हिंदू नेत्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न...हिंदू नेत्यांची हिट लिस्ट तयार केल्याची सोशल मीडियावर माहिती...व्हायरल यादीमध्ये मंत्री नितेश राणेंच्या नावाचा समावेश...उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्याही नावाचा यादीत उल्लेख... केंद्रीय गृह मंत्रालयानं प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याची माहिती
बातमीचा व्हिडीओ पाहा-
फोन केले नाहीत तर ते लोक पार्लेमेंटमध्ये भेटले- जितेंद्र आव्हाड
Jitendra Awhad : राष्ट्रवादीच्या फोडाफोडीवर आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिलीय. फोन केले नाहीत तर ते लोक पार्लेमेंटमध्ये भेटले, या आमच्याकडे. बापाला आणि मुलीला सोडून या....असं म्हणतायत
बातमीचा व्हिडीओ पाहा-
राष्ट्रवादीत खासदार फोडाफोडीचा खेळ?
NCP : राष्ट्रवादीत खासदार फोडाफोडीचा खेळ? सुरू झाल्याची माहिती आहे.. कारण शरद पवारांना सोडण्यासाठी खासदारांना फोन?...'बापलेकीला सोडून अजितदादांकडे या'...राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पवारांच्या खासदारांना फोन आल्याची माहिती...खासदारांना फोन आल्यामुळे सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे..
भंडा-यातील तुमसरमध्ये वाघिणीची शिकार
Bhandara Tiger : भंडारा जिल्ह्यातील तुमसरमध्ये एका वाघिणीची शिकार करुन तिच्या शरिराचे चार तुकडे करुन जंगलात फेकून देण्यात आलेत.. तुमसरच्या झंडेरिया इथल्या जंगलात ही घटना घडलीये.. याप्रकरणी वनविभाग आणि पोलिसांनी तिघांना अटक केलीये.. वनविभागाच्या पथकाला गस्त घालाना तीन पुलिया तलावाजवळ वाघिणीच्या शरिराचे मान,धडाचे दोन तुकडे,शेपटीचा एक भाग असे अवयव सापडले.. याअगोदर 8 दिवसांपूर्वीच तुमसर वन विभागाच्या लेंडेझरी परिसरात वाघ मृतावस्थेत आढळला होता, त्यानंतर 8 दिवसांतच आणखी एका वाघाचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
तुळजाभवानी गाभाऱ्यातील शिळांना तडे
Tuljabhawani Temple : तुळजाभवानीच्या मुख्य गाभा-यातील प्राचिन शिळांना तडे गेल्याची धक्कादायक बाब समोर आलीये..गाभा-याच्या संवर्धनाच्या वेळी गाभा-यातील चार शिळांना तडे गेल्याचं महंत तुकोजी बुवा यांनी निदर्शनास आणून दिली.. तडे गेलेल्या या शिळांचे स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार असून रडारद्वारे त्यांची तपासणी केली जाणार आहे. या तपासणीनंतर प्रशासन शिळा बदलण्याचा निर्णय घेणार असल्याचं पुरातत्व विभागानं सांगितलंय.
दादरमध्ये शिवसेनेत 'सामना'
Mumbai Shivsena Vs Shivsena : बातमी मुंबईतून.. मनपा निवडणुकीआधीच दादरमध्ये दोन्ही शिवसेनेत सामना रंगल्याचं पाहायाला मिळालाय.. दादर फुलमार्केटमधील बॅनरवरुन माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि आमदार महेश सावंत यांच्यात वाद झाला...फुल मंडईतील बॅनर काढल्यानं समाधान सरवणकरांनी पालिका अधिका-याला जाब विचारला.. यावर उत्तर देताना आमदार महेश सावंत यांनीही सरवणकरांवर टीकेची झोड उठवली..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
बुलढाण्यात केस गळतीच्या आजाराचं थैमान
Buldhana Hair Loss : बुलढाण्यात केस गळतीच्या साथीनं थैमान घातलंय. केवळ 3 दिवसांमध्ये एक दोन नव्हे तर 30 जणांना टक्कल पडलंय. शेगाव तालुक्यातल्या बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावांतील नागरिकांना या साथीची लागण झालीय. 3 दिवसांत टक्कल पडल्यानं नागरिक घाबरलेत. आरोग्य विभागानं गावागावात जाऊन सर्वेक्षण सुरू केलंय. ही साथ नेमकी कशी पसरलीय, याबाबत माहिती मिळत नाही. त्याचा शोध घेतला जातोय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
फेसबुक आणि इन्स्टाग्राममध्ये बदल होणार
Facebook & Instagram : फेसबुक आणि इन्स्टाग्राममध्ये लवकरच मोठा बदल होणारेय. कंपनी आपला थर्ड-पार्टी फॅक्ट-चेकिंग प्रोग्राम बंद करत आहे. आता त्याच्या जागी 'कम्युनिटी नोट्स' नावाचा नवीन प्रोग्राम सुरू होणारेय, मेटा कंपनीचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी ही मोठी घोषणा केलीय. या नियमामुळे विशिष्ट विषयांवरचे निर्बंधही हटवले जाणारेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
Beed Police Suicide : बीड शहरातील पोलीस मुख्यालयावर कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने, मुख्यालयाच्या भिंतीलगत आवळ्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केलीय. आज सकाळी ही घटना उघड झालीय.अनंत मारोती इंगळे असं आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव आहे..दरम्यान पोलीस कर्मचारी अनंत इंगळे यांनी आत्महत्या का केली ? हेअद्याप अस्पष्ट असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे..
नितीन गडकरींकडून नव्या योजनेची घोषणा
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एका नव्या योजनेची घोषणा केलीय. या योजनेद्वारे रस्ते अपघातग्रस्तांना कॅशलेस उपचार मिळू शकणार आहेत. सात दिवसांपर्यंतच्या किंवा दीड लाखांपर्यंतचा उपचाराचा खर्च सरकार उचलणार असल्याचं नितीन गडकरींनी जाहीर केलंय. यासाठी 24 तासांच्या आत अपघाताची नोंद पोलिसांत देणं बंधनकारक असणारेय. तर हिट अँण्ड रन केसप्रकरणी पीडितांच्या कुटुंबीयांना 2 लाखापर्यंतची भरपाई जाहीर करण्यात आलीय.केंद्र आणि राज्यशासित प्रदेशांच्या परिवहन मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर गडकरींनी ही घोषणा केली
बातमीचा व्हिडीओ पाहा -
वाळू, राखेची गँग वाल्मिकनं तयार केली - सुरेश धस
Suresh Dhas On Walmik Karad : वाल्मिक कराड गंभीर प्रकरण असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय. वाल्मिकने वाळू, राखेची गँग तयार केलीय. या वाल्मिकच्या गँगवर मोक्का लावा अशी मागणी सुरेश धस यांनी केलीय. इतकंच नाही तर 2 दिवसात कराडचे सर्व पुरावे देणार असल्याचंही धस म्हणालेत. 'धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही असं म्हणत त्यांचा राजीनामा हा देवगिरी बंगल्यावरचे मंत्री घेतील असंही ते म्हणाले
बातमीचा व्हिडीओ पाहा -
हिंदुत्वासाठी राज ठाकरेंनी सोबत यावं - योगेश कदम
Yogesh Kadam On MNS : हिंदुत्त्वासाठी राज ठाकरेंनी सोबत यावं.. येणा-या महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीच्या सोबत राहावं असं मंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय.. मात्र एकनाथ शिंदे यांना दोष देणार असतील तर आम्ही ऐकणार नाही असं ते म्हणालेत.. मनसेमुळे विधानसभेत आमचे दोन उमेदवार पडल्याचंही ते यावेळी म्हणलेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
वाल्मिक कराडचा आज व्हॉईस सॅम्पल घेणार-सूत्र
Walmik Karad : मस्साजोग येथील पवनचक्की कंपनीतील खंडणी प्रकरणी कारवाईला वेग आलाय. या प्रकरमी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडचं आज व्हॉईस सॅम्पल घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. या प्रकरणातील दुसरा आरोपी विष्णू चाटे याच्या घराचीही आज झडती घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. त्यामुळे या प्रकरणात कोणती माहिती समोर येतीये याकडे सा-यांचं लक्ष लक्ष लागलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
मुंबईत आढळला HMPVचा पहिला रुग्ण?
Mumbai HMPV Case : मुंबईत HMPVचा पहिला रुग्ण आढळून आल्याची माहिती सोमोर येतीये.. एका 6 महिन्याच्या बाळाला HMPVची लागण झाल्याची माहिती समोर येतीये.. या बाळावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.. मात्र आरोग्य विभागानं अद्याप याबाब कोणतिही अधिकृत माहिती दिलेली नाहीये..
अनोळखी व्यक्तीनं तरुणीचे केस कापले
Dadar Hair Cut : मुंबईत एका अनोळखी व्यक्तीनं एका तरुणीचे केस कापलेत.. मुंबईतील दादर या वर्दळीच्या रेल्वे स्थानकामध्ये ही घटना घडलीये.. पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकावरुन 19 वर्षांची तरुणी जात होती.. त्यावेळी आरोपीनं अचानक तिचे केस कापले.. तिकीट आरक्षण खिडकीजवळून जाताना अचानक तरुणीला काहीतरी टोचल्यासारखे जाणवलं.. मागे वळून पाहीलं असताना एक अनोळखी व्यक्ती पाठीवर बॅग घेऊन पळताना दिसला.. त्याच वेळी कापलेले केसही पडलेले दिसले.. यानंतर या मुलीनं पोलिसांत तक्रार दाखल केली.. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपीला चेंबूरमधून अटक केली..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर
Arun Gawali : कुख्यात डॉन अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर करण्यात आलीय. नागपूर खंडपीठाने संचित रजा याचिकेवर निर्णय देत 28 दिवसांची रजा मंजूर केलीय. अरुण गवळीने संचित रजा मिळवण्यासाठी कारागृह उपमहानिरीक्षकडे 18 ऑगस्ट 2024 अर्ज केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 14 ऑक्टोबर 2024 ला तो अर्ज नामंजूर करण्यात आला होता. या विरोधात अरुण गवळीने कोर्टात याचिका केली होतीय. यावर निर्णय देताना कोर्टानं 28 दिवसांची संचित रजा मंजूर केलीय. सध्या अरुण गवळी हा नागपूर कारागृहात आहे... लवकरच तो तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता आहे..
रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Raigad Crime : अल्पवयीन मुलीला घरात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात घडली. 11 वर्षांची ही पीडित मुलगी घराबाहेर सायकल चालवत असताना तिला आपल्या घरात बोलावून शेजारी राहणाऱ्या तरुणाने तिच्यावर अत्याचार केला. यानंतर पीडित मुलीला धमकावून वारंवार असले लज्जास्पद प्रकार केले गेल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली. या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पिडीत मुलीच्या नातेवाईकांना दमदाटी आणि धमकावल्या प्रकरणी मुख्य संशयित आरोपीसह त्याच्या दोन भावांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.. पीडीत मुलीचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
राष्ट्रवादी SP पक्षाची 2 दिवस आढावा बैठक
Mumbai NCP SP Meeting : राष्ट्रवादी SP पक्षाची दोन दिवसीय आढावा बैठक आजपासून होतेय. शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत ही बैठक होणार आहे. मुंबईतील YB सेंटर इथे सकाळी 10 वाजता बैठकीचं आयोजित करण्यात आलंय.. बैठकीला पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि आजी-माजी आमदार, खासदार, विधानसभेचे पराभूत उमेदवार तसेच जिल्हाध्यक्ष ,तालुका अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित राहणार. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षाची पुढची दिशा या बैठकीत ठरवली जाणार.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
थंडीमुळे पुन्हा एकदा मुंबईसह महाराष्ट्र गारठला
State Cold : थंडीमुळे पुन्हा एकदा मुंबईसह महाराष्ट्र गारठलाय. राज्यातील अनेक शहरांचं किमान तापमान १३ तर मुंबई महानगराचं तापमान १४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात आलंय शुक्रवारपर्यंत थंडीचा जोर कायम राहणार असून, शुक्रवारनंतर मात्र तापमानात वाढ होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. उत्तर भारतातील बर्फवृष्टीमुळे मुंबईसह राज्यभरातील गारठ्यात वाढ झालीय.