Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on January 09 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Latest Updates
आकाचा आकाही अडचणीत येणार.. धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
Suresh Dhas on Aaka : पैठणच्या सभेतून सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत... खंडणीसाठी वाल्मिकनं फोन केला असेल तर आकाही अडचणीत येईल असं सुरेश धस यांनी म्हटलंय.. तसेच परळीतील वाढत्या गुन्हेगारीला आकाचा आका जबाबदार असल्याचं सांगत अप्रत्यक्षपणे मुंडेंवरच निशाणा साधलाय..तर याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र धनंजय मुंडेंचा बचाव केल्याचं दिसतंय...सीआयडी, पोलीस चौकशीत दोषी आढळले तर धनंजय मुंडेंवर कारवाई करू... असं अजित पवारांनी म्हटलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
मुन्नी हा राष्ट्रवादीतील पुरुष नेता- सुरेश धस
Suresh Dhas & Ajit Pawar on Munni : पैठणमधील सभेनंतर बीड हत्याकांडाचा संदर्भ देत, भाजप आमदार सुरेश धस यांनी मुन्नीचा पुनरुच्चार केला. यावर बोलताना सुरेश धस यांनी ही मुन्नी राष्ट्रवादी पक्षातली असल्याचं सांगितलं. सोबतच मुन्नी असा आपण उल्लेख केला असला तरी ही मुन्नी राष्ट्रवादी पक्षातील पुरुष नेता असल्याचा खुलासा सुरेश धस यांनी केला. यावर अजित पवरांना विचारलं असता, त्यांनी याबाबत धस यांनाच विचारा असं उत्तर दिलं.
बेळगावात कानडी संघटनेची अरेरावी
Belgaon Kanadi Andolan : मराठी भाषिक बेळगावात कानडी संघटनेची अरेरावी पाहायला मिळाली. कानडी संघटनेनं बेळगाव महापालिकेत घुसून गोंधळ घातला.. बेळगाव महापालिका बरखास्त करण्याची मागणी त्यांनी केली. बेळगावात 'जय महाराष्ट्र' म्हटलाने कानडींना पोटशूळ उठल्याचं पाहायला मिळालं.. जय महाराष्ट्र म्हटल्याने शिवेंद्रराजेंविरोधात कानडी संघटनेनं घोषणाबाजी केली.
राज्यपाल नियुक्त आमदार नियुक्तीची याचिका फेटाळली
Case of Governor-appointed MLA : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रकरणात महायुती सरकारला मोठा दिलासा.. राज्यपाल नियुक्त आमदार नियुक्तीची याचिका फेटाळली.. मुंबई हायकोर्टाने फेटाळली याचिका.. सुनील मोदी यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली.
पाप झाकायला धनंजय मुंडेंकडून ओबीसीचा आधार - मनोज जरांगे
Jarange on Dhananjay Munde : मनोज जरांगे यांनी पैठणमधल्या सभेतून धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. आपण कोणत्याच जातीला दुखावलं नाही. उलट आपलं पाप झाकण्यासाठी आता धनंजय मुंडे ओबीसीचा आधार घेत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला. खून, पाप करणार तुम्ही आणि नंतर बचावसाठी ओबीसीला ओढणार का असा सवाल यावेळी जरांगेंनी केला. तर 25 जानेवारीच्या मराठा आरक्षणासाठी उपोषणानंतर धनंजय मुंडेंना कायदेशीर लढा देणार असल्याचंही यावेली जरांगे म्हणाले.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
परळीचे पोलीस आकाच्या इशाऱ्यावर सगळं गोळा करतात- सुरेश धस
Suresh Dhas : संभाजीनगरच्या पैठणमध्ये आयोजित आक्रोश मोर्चामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बीड हत्याकांडप्रकरणी पुन्हा एकदा आक्रमक आघाडी उघडली. परळीचे पोलीस आकाच्या इशा-यावर सगळं गोळा करतात. यांच्या हप्त्यामुळे अनेक कंपनया सोडून गेल्याचा आरोप धस यांनी केला. तसंच याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असून, वाल्मिक कराडनं मोठी संपत्ती जमवली आहे आणि आता हे सगळे प्रकरण ईडीच्या दरबारात गेल्याचं धस यांनी सांगितलं.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
मंत्रालयात आलेली अलिशान लँबॉर्गिनी कार स्काय लाईन कमर्शियल ट्रस्टची?
Mumbai Mantralay : बुधवारी मंत्रालयात अलिशान लँबॉर्गिनी कार आल्याने सर्वांच्या भुवया उंचवल्या.... ही कार स्काय लाईन कमर्शियल ट्रस्टची असल्याची माहिती आहे. भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटण्यासाठी या कारमधून कोणी तरी आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश करायचा असेल तर तासंतास वाट बघावी लागते मात्र या अलिशान कारला काल चेक न करताच मंत्रालयात थेट सोडण्यात आलं. विशेष म्हणजे या कारच्या काचा या काळ्या रंगाच्या होत्या. त्यामुळे कारमध्ये कोण होत याची अधिकची माहिती मिळू शकली नाही. मात्र ही अलिशान कार मंत्र्यांचा ताफा ज्या ठिकाणी उभा राहतो त्या ठिकाणी थांबल्याने सर्वांच्या नजरा या अलिशान कारकडे होत्या....
बातमीचा व्हिडीओ पाहा -
बुलढाण्यातील पाण्यात नायट्रेटसारखा विषारी घटक
Buldhana : बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती प्रकरणात आता मोठी अपडेट हाती येत आहे... बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगावातील आणि खातखेड येथील पाण्यात नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आलाय.. तर पाण्याची टीडीएसची पातळीही मोठ्या प्रमाणात वाढलीये.. पाण्याच्या तपासणीत ही धक्कादायक बाब उघडकीस आलीये... गावकऱ्यांसाठी हे पाणी वापरणं विष ठरतंय.. खारपाण पट्ट्यातील या गावात पिण्याची पाण्याची वेगळी सोय केलेली आहे, मात्र वापरण्याच्या पाण्यात नाइट्रेट सारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळल्याने हे पाणी वापरण्यायोग्य देखील नसल्याचं धक्कादायक वात्सव समोर आल आहे... पाणी तपासणीचा अहवाल झी 24 तासच्या हाती लागलंय
चाळीसगावमध्ये अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार
Jalgaon Firing : जळगावच्या चाळीसगावात अज्ञात व्यक्तीनं दगडफेक करून हवेत गोळीबार केला. बाळू मोरे हत्या प्रकरणातला संशयित आरोपी सुमित भोसलेच्या घरासमोर हा गोळीबार झाला. दहशतीसाठी पूर्व वैमनस्यातून हा गोळीबार केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपीच्या घराची झडती घेतली आणि हत्यारं तसंच जिवंत काडतुसं जप्त केली.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
मालेगावातील बाल रुग्णालयात रुग्णांची गर्दी
Malegaon : मालेगावातील बाल रुग्णालयांमध्ये रूग्णांची गर्दी झालीय.. वातावरणातल्या बदलामुळे सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णसंख्येत वाढ झालीये. दूषित पाण्यामुळेही मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. HMP व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढलीय.. दरम्यान, यासाठी यंत्रणा सज्ज आहे, असं आरोग्य अधिका-यांनी सांगितलंय. मात्र लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असा सल्लाही वैद्यकीय अधिका-यांनी दिलाय....
शिंदे सरकारमध्ये काही गोष्टी चुकीच्या - गणेश नाईक
Ganesh Naik : महायुती सरकारचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, त्यांची इच्छा नसताना काही गोष्टी चुकीच्या घडल्या, असं नाईक म्हणाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोरच गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंबाबत हे विधान केलं आहे. त्यावेळी चुकीच्या गोष्टी शिंदेंनाही सांगितल्या पण काही गोष्टी नजरेला चांगल्या दिसत नसतानाही सोडून द्याव्या लागतात, असंही नाईक म्हणाले. मात्र आता परिस्थिती बदलली आहे, असं नाईकांनी सांगितलं. नाईकांच्या या विधानावर आता शिवसेनेचे नेते काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
बापलेकीला सोडून या... ही भाषा अमानुष - संजय राऊत
Mumbai Sanjay Raut : राष्ट्रवादी आमदारांना ऑफर मिळल्याच्या चर्चेवर खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.. 'बापलेकीला सोडून आमच्याकडे या' ही भाषा वापरणं म्हणजे अमानुष आहे अशी टीका राऊतांनी केलीय. इतकंच नाही तर जर खासदारांना ऑफर आली आणि जर ते सोडून गेले...तर ते रावणाचे, कंसाचे वंशज ठरतील असंही राऊत म्हणालेत
रोना विल्सन, सुधीर ढवळेंना जामीन मंजूर
Rona Wilson & Sudhir Dhavle : रोना विल्सन आणि सुधीर ढवळेंना हायकोर्टानं दिलासा दिलाया.. भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी दोघांनाही हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय. प्रत्येकी १ लाखाच्या जामिनावर दोघांची सुटका करण्यात आलीये... मात्र दर सोमवारी विशेष NIA कोर्टात त्यांना हजेरी लावण्याची अट घालण्यात आलीये. तसंच दोघांनाही मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाच्या परवानगीशीवाय मुंबईबाहेर जाता येणार नाही.. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी हे दोघेही गेल्या 6 वर्षांपासून तुरुंगात होते.. प्रलंबित खटला लवकर निकाली लागण्याची चिन्ह नाहीत त्यामुळे दोघेही जामीनास पात्र असल्याचं न्यायालयानं म्हटलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार?
Baramati Sharad Pawar & Ajit Pawar : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच आता शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार असल्याची चर्चा आहे..16 जानेवारीला शरद पवार आणि अजित पवारांच्या हस्ते बारामतीत कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे.. या निमित्ताने हे दोन्ही पवार एकत्र येण्याची शक्यता आहे. या संदर्भातील एक पोस्ट रोहित पवार यांनी सोशल माध्यमामध्ये प्रसारित केलीये.. दरम्यान या कार्यक्रमाला राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे,राज्याच्या पर्यावरण व पशू संवर्धनमंत्री पंकजा मुंडे, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे,कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
शरद पवारांकडून संघाच्या कामाचं कौतुक
Sharad Pawar On RSS : शरद पवारांकडून संघाच्या प्रचाराचं कौतुक करण्यात आलंय... विधानसभा निवडणुकीत संघाकडून करण्यात आलेल्या प्रचाराचं शरद पवारांनी कौतुक केलंय..विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल त्यात संघाच्या कामाचा मोठा वाटा असल्याची कबुलीच शरद पवारांनी दिलीय... राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक मुंबईत पार पडतेय.. त्या बैठकीत शरद पवारांनी संघाच्या कामाचं कौतुक केलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
9 एकरावरील ऊस आगीत जळून खाक
Solapur Sugacane Fire : दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडीत 9 एकर उसाच्या शेताला अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळतेय. या आगीत नऊ एकरावरचा ऊस जळून खाक झाला. तोडणीला आलेला ऊस जळून खाक झाल्याने शेतक-याचं मोठं नुकसान झालं.
महड आणि महाडच्या स्पेलिंगमुळे पर्यटकांचा गोंधळ
Google Map Problem : कोकणातील वरदविनायकाच्या दर्शनाला येणा-या भाविकांना गुगल मॅपमुळे मनस्ताप सहन करावा लागलाय... त्याचं झालं असं, महाड आणि महड या दोन्ही शहरांची इंग्रजी स्पेलिंग सारखीच आहे.. त्यामुळे गुगल मॅपचा आधार घेऊन महडला निघालेले अनेक भाविक महडपासून सुमारे 100 किलोमीटर दूर असलेल्या महाडला पोहोचलेत... महाडला आल्यावर वरदविनायक गणेश मंदिर कुठे आहे असा प्रश्न भाविकांनी स्थानिकांना विचारला... आणि उत्तर ऐकून डोक्यावर हात मारून घेतात.... दोन शहरांच्या सारख्याच स्पेलिंगमुळे गुगल मॅपचाही गोंधळ होतो आणि पर्यटकांची दिशाभूल होते... गेल्या काही दिवसात गुगल मॅपमुळे अनेकांचा रस्ता चुकला आणि त्यांना मनस्ताप सहन करावा लागल्याच्या घटना समोर आल्यात..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
'इंडिया आघाडी'त काँग्रेस एकाकी
Delhi Assembly Elections 2025 : दिल्ली विधानसभेसाठी इंडिया आघाडीत काँग्रेस एकाकी पडल्याचं चित्र आहे.. कारण दिल्ली विधानसभेसाठी आपला ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांनी पाठिंबा दिलाय.. त्यामुळे काँग्रेसला दिल्ली विधानसभेसाठी मित्र पक्षाची साथ मिळणार नाहीये.. दिल्ली विधानसभा निवडणूक आप आणि काँग्रेसनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मित्र पक्षानं आपला पाठिंबा दिलाय.. त्यातच इंडिया आघाडी लोकसभेसाठी होती असं अखिलेश यादव यांनी म्हटल्यानं चर्चांना उधाण आलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
एक राज्य, एक नोंदणी संकल्पना राबवणार
Chief Minister Devendra Fadanvis : आता तुम्हाला कोणत्याही कार्यालयातून दस्त नोंदणी करता येणार आहे.. राज्यातील कोणत्याही भागातील नागरिकांना कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयातून दस्त नोंदणी करता येणार आहे.. त्यासाठी एक राज्य एक नोंदणी संकल्पाना राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय... घरबसल्या नागरिकांना दस्त नोंदणी करण्यासाठी महसूल विषयक काही दस्त नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबविण्यात येणार. पासपोर्ट कार्यालयाप्रमाणे भूमी अभिलेख विभागातील सर्व सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रथम टप्प्यात ३० कार्यालयांमध्ये भू प्रमाण केंद्र सुरू करण्यात येणार..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू
Tirupati Temple Stampede : आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी झालीये.. यात आतापर्यंत 6 भाविकांचा मृत्यू झालाय... यात एका महिलेचाही समावेश आहे.. वैकुंठद्वार दर्शनासाठी असलेल्या पास केंद्रावर ही चेंगराचेंगरी झाली.. हजारो भाविक वैकुंठ द्वार दर्शनाच्या टोकन मिळवण्यासाठी तिरुपतीच्या विविध पास केंद्रांवर रांगेत उभे होते. या दरम्यान भाविकांना बैरागी पट्टीडा पार्क येथे पास घेण्यासाठी रांगेत उभं राहण्यास सांगितलं गेलं तेव्हा ही चेंगराचेंगरी झाली..
बातमीचा व्हिडीओ पाहा -