Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Fri, 10 Jan 2025-4:16 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on January 10 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • सर्व जातीच्या सफाई कामगारांना घरं मिळणार.. औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Safai Kamgar will get Houses : सर्व जातीच्या सफाई कामगारांना वारसा हक्काने घरं मिळणार असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा निर्णय दिलाय... लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसांना घरं मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.. म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी ही माहिती दिलीये...तसेच वाल्मिकी, रुखी, मेहतर आणि अनुसूचित जाती वगळता इतर जातींना वारसा हक्काने नोकरी देण्यास स्थगिती देण्यात आली आहे...त्याचबरोबर मराठा, ओबीसी आणि इतर जातींच्या वारसांना हक्काची घरे मिळणार असल्याचा मोठा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने दिलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • जळगावमध्ये गोळीबाराच्या घटना वाढल्या

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Bhusawal Firing : गोळीबाराच्या घटनेनं जळगाव जिल्हा हादरलाय.. जळगाव जिल्ह्यात सलग दुस-या दिवशी गोळीबार झालाय. चाळीसगावनंतर आता भुसावळमध्ये तरुणावर गोळीबार करण्यात आला.. चहाच्या दुकानात या तरुणावर आरोपीनं 5 राऊंड फायर केले..  यात एक तरुण गंभीर जखमी झालाय. त्याला रुग्णआलयात दाखल करण्यात आलं असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राज्यात दारु महागण्याची शक्यता

     

    State Liquor Price : राज्यात दारु महागण्याची शक्यता आहे.. राज्य उत्पादन शुक्ल विभाकाकडून महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी  दारुवरील कर वाढवण्याचा विचार सरकार करत आहे.. यासाठी गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आलीये. ही समिती मद्य निर्मिती धोरण, उत्पादन शुल्क आणि कर संकलन वाढीचा अभ्यास करुन अहवाल सादर करणार आहे. त्यासाठी या समितीला दोन महिन्यांची मुदत देण्यात आलीये. 

  • नांदेडच्या बिलोलीमध्ये बापलेकाचा करुण अंत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nanded Suicide : कपडे, वह्या आणि पुस्तकांसाठी पैसे न मिळाल्यानं दहावीत शिकणा-या विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केलीय. मुलाच्या मृत्यूचं दु:ख सहन न झाल्यानं वडिलानं मुलाचा मृतदेह खाली उतरवून त्याच दोरीनं गळफास घेतलीय. -हदय पिळवटणारी ही घटना बिलोलीच्या मिनकी या गावात घडलीय. ओमकार पैलवार हा उदगीरच्या शाळेत शिकत होता. सुट्या असल्याने तो गावी आला होता. कपडे आणि वह्या-पुस्तकं घेण्यासाठी त्यानं वडिलांकडे हट्ट केला. पण दोन एकर शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या वडिलांकडे पैसे नव्हते. दोन दिवसात घेऊन देतो म्हणून वडील त्याला समजावून सांगत होते. पैसे न मिळाल्यानं मुलांनं शेतात जाऊन गळफास घेतला. या घटनेमुळं गावावर शोककळा पसरलीय. 

    बातमी पाहा - वह्या, पुस्तकं न मिळाल्याने दहावीच्या विद्यार्थ्यानं स्वतःला संपवलं; तिथेच बापाने सोडला जीव

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुलींच्या शिक्षणबाबत सुप्रीम कोर्टाचं मत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Girl Education : मुलीला तिच्या शिक्षणासाठी वडिलांकडून आर्थिक सहाय्य मिळवण्याचा कायदेशीर हक्क आहे, असं स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टानं दिलीय. न्यायमूर्ती सूर्या कांत आणि उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने 2 जानेवारीला एका विवाहित वादाच्या प्रकरणात असं म्हटलंय. एक दाम्पत्याची मुलगी आयर्लंडमध्ये शिक्षण घेत होती. मुलीने तिच्या वडिलांकडून 43 लाख रुपये घेतले. मात्र हे पैसे पोटगीचा भाग होता. मुलीला तिच्या शिक्षणाचा हक्क आहे आणि यासाठी वडिलांना तिच्या शिक्षणासाठी निधी पुरवण्यास बंधनकारक ठरवता येईल

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पुण्यात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune : पुण्यात जामिनावर सुटलेल्या एका गुंडाची चक्क रॅली काढण्यात आली.. दहशत पसरवण्यासाठी या रॅलीचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हारयल करण्यात आला.. ही रॅली म्हणजे अक्षरशः हैदोस होता. त्याचे समर्थक मर्डर करायचाय मर्डर करायचा अशा घोषणा देत होते.. त्यामुळे पुण्यामध्ये पोलिसांचा काही वचक आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालाय.. दरम्यान हा व्हिडियो सोशल मिडावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी 9 जणांना अटक केलीय... मात्र पोलिसांची ही कारवाई म्हणजे वरातीमागून घोडे अशीच म्हणता येईल.. या घटनेच्या आदल्या दिवशी पोलीस आयुक्तांनी एका जाहीर कार्यक्रमात पुण्यातील गुंडांना दम भरला होता. मात्र त्याचाही या गुंडांवर काहीच परिणाम झालेला दिसत नाहीये.. त्यामुळे गुंडांना पोलिसांचा वचक उरला नाही असं चित्र सध्या पुण्यात दिसतंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • हत्याकांडात वापरलेल्या कारची तपासणी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Beed Walmik Karad : खंडणी आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वापरण्यात आलेल्या गाड्या केज पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आल्यात. वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांनी या गाड्या वापरल्या आहेत. 31 डिसेंबरला वाल्मिक कराड स्वतःहून पुण्यात सीआयडी कार्यालयात एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून शरण आला होता. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एक काळ्या रंगाची कार वापरण्यात आली होती. तर विष्णू चाटेनं वापरलेली कारही पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आलीय. फॉरेन्सिक टीमकडून या कारची चौकशी सुरू आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • कोल्हापुरात तिघांची दुकानात घुसून तोडफोड

     

    Kolhapur : दुकान मालकानं मुलाला हटकलं म्हणून सराईत गुन्हेगार ऋत्विक साठे याच्यासह यश माने आणि मंथन यांच्यासह चार ते पाच तरुण दुकानात आले आणि वादाला सुरुवात झाली. पाच ते दहा मिनिटं वाद घालून गेल्यानंतर पुन्हा काही वेळा यश माने ,ऋत्विक साठे आणि मंथन हे तिघेजण कोयता आणि एडके घेऊन दुकानात घुसले. दुकानदाराला जिवे मारण्याची धमकी देत त्यांनी कोयता आणि एडक्याने दुकानातील बरण्या फोडल्या..पुन्हा बघून घेण्याची धमकी देऊन तिघे निघून गेले. या घटनेने नंतर घाबरलेल्या चौधरी यांनी पोलीसात तक्रार केली. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू.. 

  • बदलापूरमध्ये रिक्षाचालकांची मनमानी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Badlapur : बदलापुरात रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराविरोधात प्रवासी संतप्त झालेत.. रिक्षाचालकांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक 5 रुपयांची भाडेवाढ केलीये.. पेट्रोल, CNGमध्ये कोणतीही वाढ झाली नसताना अचान झालेल्या या भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे. दरम्यान ही भाडेवाढ बेकायदेशीर असल्याचं RTOनं स्पष्ट केलंय.. अशा प्रकारे जादा भाडे आकारणा-या रिक्षाचालकांची तक्रार करण्याचा सल्ला RTO अधिका-यांनी दिलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • गोट्या गीतेची वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ पोस्ट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Gotya Gite On Walmik Karad : वाल्मिक कराडचे समर्थक आता सोशल मीडियावर त्याच्या समर्थनार्थ पोस्ट करत असल्याचं समोर आलंय.. बीडच्या गोट्या गीतेनं अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर टाकलीय.. यात अण्णा माझे दैवत, सदैव सोबत अशी एक रील  इन्टावर टाकली आहे.  ती प्रचंड व्हायरल झाली आहे.  गोट्या गीतेवर बीडमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. काही गंभीर गुन्हेही गोट्यावर दाखल आहेत.. पुण्यातही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.. गोट्या गीते हा परळीतील नंदागौळ इथला रहिवाशी आहे..गोट्या गीते धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याच्या जवळचा आहे का असा सवाल जितेंद्र आव्हाड  यांनी विचारलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा मविआला घरचा आहेर

     

    Vijay Wadettiwar : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी मविआला घरचा आहेर दिलाय.. जागावाटपात घातलेल्या घोळाचा फटका बसल्याचं वडेट्टीवार म्हणालेत.. जागावाटपचा घोळ दोन दिवसात संपला असता तर प्रचार आणि प्लॅनिंगसाठी वेळ मिळाला असता असं वडेट्टीवार म्हणालेत. अप्रत्यक्षपणे त्यांनी नाना पटोले आणि संजय राऊतांना यासाठी जबाबदार धरलंय... तर राऊतानीही यावर उत्तर देताना काँग्रेसवर खापर फोडलंय..  यामुळे काँग्रेस आणि शिवसेना UBTयांच्यातील या आरोप प्रत्यारोपांवरुन मविआत वादाची ठिणगी पडलीये.. 

  • अमोल कोल्हेंचा शिवसेना UBT आणि काँग्रेसला टोला

     

    Amol Kolhe On Shivsena UBT & Congress : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अमोल कोल्हेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसवर टीका केलीये. काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही.. शिवसेना UBT अजून झोपेतून जागी व्हायला तयार नाही असा हल्लाबोल कोल्हेंनी केलाय.....

  • मुंबईतील प्रदूषणावरुन हायकोर्टानं राज्य सरकारला सुनावलं

     

    Mumbai Pollution : मुंबईत वाढत्या प्रदूषणाचा प्रश्नावरून हायकोर्टने प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि राज्य सरकारला फटकारलंय. मुंबईची हवा अत्यंत वाईट झालेली असून सरकारला याचे जराही गांभीर्य नाही प्रदूषण नियंत्रणाबाबत आम्ही वारंवार आदेश देऊनही सरकार अजून झोपलेलेच आहे अशा शब्दात न्यायमूर्ती यांनी प्रशासनावरती ताशे ओढलेत.. बांधकामं प्रदूषण वाढवणारी वाहनं आणि बेक-यांमधून निघणा-या धुरानं मुंबई गुदमरलीये. याचा फटका सर्वसामान्यांना बसतोय.. याबबात खंडपीठाने चिंता व्यक्त केलीये.. तसंच मुंबईची परिस्थीती दिल्लीसारखी होऊ देऊ नका असं ठणकावलंय.

  • भंडाऱ्यात एकाच नंबर प्लेटच्या 2 स्कूल बस

     

    Bhandara Same Number Plate Vehicle : भंडारा शहरात धक्कादायक वास्तव समोर आले एकाच नंबरच्या दोन स्कूल व्हॅन आपल्याला पाहायला मिळतंय... मात्र गेली अनेक महिन्यांपासून ह्या दोन्ही प्रायव्हेट स्कूल व्हॅन लहान चिमुकल्या मुलांना घेऊन रस्त्यावर धावत आहेत. मात्र शहरात दोन गाड्या एकच नंबर प्लेटच्या धावत असताना आरटीओ विभाग आरटीओ विभागाला याची माहिती नव्हती.. इतकच नाही तर या दोन्ही गॅस किट वर चालत असून संस्थाचालक खुलेआमपणे या प्रायव्हेट स्कूल व्हॅन मध्ये घरगुती गॅस भरला जातोय.. . हा सगळा प्रकार भंडारा शहरातील एसआरसी कॉन्व्हेंट स्कूल मध्ये खुलेआम सुरू आहे. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालं आहे. लहान मुलाच्या जीवाशी खेळ सुरू असताना प्रशासन आणि  आरटीओ विभागाचं दुर्लक्ष आहे... 

  • सरकार नवं वाहन खरेदी धोरण आणणार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    New Vehicle Regulation : वाहन खरेदीवर नियंत्रण आणण्याचा परिवहन विभाग विचार करीत आहे. जपानच्या धर्तीवर राज्यात एक नवीन धोरण राबवलं जाणारेय. वाढती वाहतूक कोंडी, रस्ते अपघात, वाहन उभे करण्यासाठी जागेचा अभाव, इंधनाचा अमर्याद वापर यावर निर्बंध आणण्यासाठी वाहन खरेदीवरच नियंत्रण आणण्याचा विचार सुरू आहे. यासाठी 100 दिवसांचा आराखडादेखील तयार करण्यात आलाय. या आराखड्यामध्ये नवीन धोरणाचा समावेश केलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Uddhav Thackeray Press Conference : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेणारेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्यातील पूर्ण झालेल्या कामाची माहिती पत्रकार परिषदेतून देणारेत. दुपारी साडेचार वाजता दादरच्या शिवाजी पार्क इथं पत्रकार परिषद घेणारेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे सचिव सुभाष देसाई हे या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणारेत. उद्धव ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेत राजकीय परिस्थितीवर भाष्य करणार का, याकडंही सर्वांचं लक्ष लागून आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • जालन्यात मराठा समाजाचा मोर्चा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Jalna Maratha Samaj Protest : संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी आज जालन्यात मराठा समाजाचा मोर्चा निघणार आहे.. सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरूवात होणार आहे.. छत्रपती संभाजी महाराज उद्यानापासून मोर्चाला सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयातपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे..  जालन्यातली  या मोर्चात हजारो मराठा बांधव सहभागी होणार आहे.. संतोष देशमुख यांचं कुटुंबीयही मोर्चात सहभागी होणार आहे तर दुसरीकडे  संभाजीराजे छत्रपती, मनोज जरांगे, सुरेश धस,संदीप क्षीरसागरही मोर्चात सहभागी होणार आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link