Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Mon, 01 Jul 2024-10:12 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 01 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  •  प्रज्ञा राजीव सातवांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर

     

    Pradnya Satav : प्रज्ञा राजीव सातव यांना काँग्रेसकडून उमेदवारी...विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार जाहीर...माजी आमदार प्रज्ञा सातव यांना पुन्हा संधी

  • 'स्वत:ला हिंदू समजणारे हिंसा करता', राहुल गांधींची मोदींवर टीका

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rahul Gandhi : हिंदूंवरून संसदेमध्ये खडाजंगी पहायला मिळाली....विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत अहिंसेचा देश असल्याचं म्हणत...पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना जे स्वत:ला हिंदु समजतात ते हिंसा, द्वेष परवणं आणि असत्य गोष्टी करताहेत, असा टोला लगावला...तर संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक बोलणं गंभीर असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर केला...त्याला राहुल गांधींनी पलटवार करताना नरेंद्र मोदी, भाजप आणि आरएसएस संपूर्ण हिंदू समाज नसल्याचं म्हटलंय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • मिलिंद नार्वेकरांना विधान परिषदेचं तिकीट 

     

    Milind Narvekar : मिलिंद नार्वेकरांना विधान परिषदेचं तिकीट मिळालंय...नार्वेकर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार...उद्या विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरणार

  • पेपरफुटीविरोधात कायदा कधी आणणार?-रोहित पवार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rohit Pawar on NEET Exam : राज्यात अनेक परीक्षा भरतीमध्ये पेपरफुटी होत असल्याने गैरप्रकार टाळण्यासाठी पेपरफुटीविरोधात कायदा आणा अशी मागणी रोहित पवारांनी केली...तसंच पेपरफुटीविरोधात कायदा कधी आणणार असा सवाल रोहित पवारांनी विचारला...यावर फडणवीसांनी उत्तर दिलेय...पेपरफुटीबाबत नरेटिव्ह पसवण्याचा प्रयत्न होतोय...पेपरफुटीविरोधात याच अधिवेशनात कायदा आणणार अशी माहिती फडणवीसांनी दिली..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'गट 'क'च्या रिक्तपदांची भरती MPSC तर्फे', देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Devendra Fadnavis : राज्य सरकारच्या वतीनं गट कच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया MPSC तर्फे करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय...गट कच्या जागा टप्प्या टप्प्यानं एमपीएससीकडे वर्ग केल्या जाणार आहेत...नोकरभरती परीक्षांमधील गैरप्रकाराचा हा विषय गंभीर आहे...मात्र, अडीच वर्षात पारदर्क्षीपणे 1 लाख नोक-या दिल्याची माहिती फडणवीसांनी दिलीय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'घाटकोपर होर्डिंगप्रकरणी चौकशी करणार का?', आमदार राम कदमांचा सवाल

     

    Ram Kadam on Uddhav Thackeray : घाटकोपर होर्डिंग प्रकरणात चौकशी करण्याची वेळ आल्यास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची चौकशी सरकार करणार का? असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी केला...तर प्रसिद्धी पाहिजे तर उद्धव ठाकरेंचं नाव घ्या ही महाराष्ट्रातील राजकारण्यांची गरज झाल्याची टीका ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी केलीये..

  • विधान परिषदेवर पंकजा मुंडेंना उमेदवारी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pankaja Munde : भाजपनं अखेर पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केलीये...पंकजा मुंडेंसह योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना विधापरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आलीये....

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • Maharashtra Breaking News LIVE: अग्निवीर योजनेचा सरकारला फायदा काय? राहुल गांधींचा सवाल 

    अग्निवीर योजनेचा सरकारला फायदा काय? अग्निवीरांना सरकार जवान समजत नाही. अग्निवीराला शहिदाचा दर्जा का नाही? राहुल गांधी यांचा भाजपप्रणित सरकारवर घणाघात. लोकसभेत राहुल गांधी यांच्या वक्तव्यानं गदारोळ. दिशाभूल करू नका म्हणत अमित शाह यांनी प्रत्युत्तर देऊनही राहुल गांधी यांनी भाजपवर टीका करणं सुरूच ठेवलं. 

  • विधानपरिषदेसाठी भाजपकडून 5 उमेदवार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या 11 जागांपैकी 5 जागांवर भाजप आपले उमेदवार देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यात भाजपकडून एका अपक्ष उमेदवाराला उमेदवारी देण्यात येईल अशी माहिती मिळतेय. महायुतीत घटत पक्ष म्हणून सन्मान दिला पाहिजे अशी भूमिका महादेव जानकर यांनी आधीच मांडलीय. विधान परिषद किंव्हा राज्यसभेत स्थान दिले पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट बोलून दाखवलं होतं.मात्र विधान परिषदेसाठी अजून महादेव जानकर यांच्याशी महायुतीनं संपर्क साधलेला नाही अशी माहिती मिळतेय. आज-उद्यामध्ये जाहीर होणा-या विधानपरिषदेच्या उमेदवारांच्या यादीत महादेव जानकरांचं नाव असणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • विधानपरिषदेच्या जागांवरुन शिंदेंची डोकेदुखी वाढणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या जागांवरुन एकनाथ शिंदेंची डोकदुखी वाढण्याची शक्यताय...दोन जागांसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी झालीय...संजय मोरे, मनिषा कायंदे, भावना गवळी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने हे विधान परिषदेसाठी इच्छूक आहेत...लोकसभेत उमेदवारी नाकारलेल्यांची विधानपरिषदेत पुनर्वसन करण्याची आग्रही मागणी करण्यात आलीय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • येऊरमध्ये अवैध बारवर कारवाईला सुरुवात

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Thane Mahaplika Action : येऊरमध्ये अवैध बारची बातमी झी 24 तासवर दाखवताच कारवाईला वेग आलाय...ठाणे महापालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आलीय...जितेंद्र आव्हाड यांनी येऊरमध्ये अवैध बार सुरू असल्याचा आरोप केला होता...त्यानंतर या कारवाईला वेग आलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पुण्यात झिकाचा धोका वाढला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Zika Virus : एरंडवणे भागातील एका गर्भवतीला झिकाचा संसर्ग झाल्याचे समोर आलंय. या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचं आरोग्य विभागानं स्पष्ट केलंय. मात्र, तिच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जाणारे. शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या आता 5 वर गेलीय. आरोग्य विभागानं नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • ताडोबात 30 सप्टेंबरपर्यंत नो एंट्री

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Tadoba : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर भागात आजपासून पर्यटन बंद करण्यात आलंय. दरवर्षी 1 जुलैपासून 30 सप्टेंबरपर्यंत पावसामुळे पर्यटन बंद ठेवलं जातं. वन्यजीवांच्या प्रजनन काळात कुठलाही व्यत्यय येऊ नये, तसंच पावसामुळे रस्ता वाहनं जाण्याच्या स्थितीत नसल्याने प्रकल्पाचं गाभा क्षेत्र बंद ठेवलं जातं. शेवटच्या दिवशी सोनम वाघीण आणि तिच्या 3 बछड्यांनी पर्यटकांना दर्शन दिलं. वन्यजीव छायाचित्रकार श्रीपाद पिंपळापुरे यांनी आपल्या कॅमेरात ही दृश्यं चित्रित केली

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • Pune Car Accident Update : पुणे कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर येतेय...आरोपीच्या सुटकेविरोधात पुणे पोलीस सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहेत...पुणे पोलीस हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहेत..राज्य सरकारने त्यासाठी परवानगी दिली असून पुणे पोलीस लवकरच सुप्रीम कोर्टात त्यासाठी याचिका दाखल करणार आहेत...त्याचबरोबर या अल्पवयीन मुलाकडून घडलेला गुन्हा गंभीर असल्याने त्याच्यावर सज्ञान म्हणून खटला चालवण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत...सुप्रीम कोर्टाने पुणे पोलिसांची मागणी मान्य केल्यास त्या अल्पवयीन मुलाची पुन्हा बाल निरीक्षणगृहात रवानगी होऊ शकते...

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पावसानं दडी मारल्यानं जून महिना कोरडाच

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Monsoon Update : यंदा मान्सून लवकरच दाखल झाल्याने देशभरात उत्साहाचे वातावरण होते...मात्र, पावसाच्या पहिल्याच महिन्यात जूनमध्ये त्याच्या प्रवासात खंड पडल्याने या उत्साहावर पाणी फिरलंय...पाऊसतुटीमुळे चिंता निर्माण झालीय...जून महिन्यात पूर्ण देशात सरासरीपेक्षा 11 टक्के कमी पाऊस झालाय...जूनमध्ये या महिन्याच्या दीर्घकालीन सरासरीच्या 93 ते108 टक्के पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात होती...मात्र, पावसाने ओढ दिल्याने सर्व भिस्त जुलै आणि ऑगस्टवरच आहे...जूनमधील पाऊसमानानुसार देशातील 49 टक्के जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट आहे...राज्यात जूनमधील सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला असला तरी मुंबईत मात्र, सुमारे 35 टक्के तूट आहे...त्यामुळे मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट कायम आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Lonavala Bhushi Dam : भुशी डॅम बॅक वॉटरफॉल घटनेतील आणखी एक व्हिडिओ समोर आलाय...धबधब्यात 10 जण अडकल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसतंय...धबधब्यात अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने सगळेजण एकमेकांना पकडून आपला जीव वाचण्याचा प्रयत्न करत होते...बाहेरील काही नागरिकांनीही यांना वाचवण्याचा प्रयत्न केला...मात्र, पाण्याच्या प्रवाहासमोर हे सगळे टीकू शकले नाहीत...त्यामुळे सगळेजण वाहून गेले...यात पाच जणांना वाचवण्यात यश आलं...मात्र, 5 जण वाहून गेले...यातील तिघांचा मृतदेह हाती लागलाय...तर दोघांचा शोध सुरू आहे...भारतीय नौदलाच्या गोताखोरांच्या पथकाकडून शोध आणि बचाव मोहीम सुरू आहे...आतापर्यंत तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, दोघांचा शोध सुरू आहे...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • संसदेचं अधिवेशन वादळी ठरणार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sansad Adhiveshan : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही NEETवरून गोंधळाची स्थिती कायम राहण्याची शक्यताय. NEET पेपरफुटी प्रकरणासह महागाई आणि इतर प्रश्न विरोधकांच्या अजेंड्यावर असणारेत. त्यामुळे आज विरोधक सरकारला धारेवर धरणाची शक्यताय. तर विरोधकांना उत्तर देण्यासाठी सत्ताधा-यांनीही रणनीती आखलीय. त्यामुळे आज दोन्ही सभागृह वादळी ठरण्याची शक्यताय. विरोधी पक्षनेते राहुल गांधीही आज संसदेत आवाज उठवतील. तर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देतील.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • देशात 3 नवे फौजदारी कायदे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    India New Law : भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कायद्याची भाषा मोठ्या प्रमाणात बदलणारेय. आजपासून 3 ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे हद्दपार होणारेत. त्याजागी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे 3 नवे कायदे अमलात येतायत. यापुढे सर्व फौजदारी गुन्हे नोंदवण्यापासून ते त्यांचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया नव्या संहितांनुसार राबविली जाणारेय. नव्या कायद्यांत तीन वर्षांच्या कालावधीत संपूर्ण न्यायप्रक्रिया पूर्ण करण्याची तरतूद आहे. कायद्याच्या 35 कलमांमध्ये न्यायप्रक्रियेसाठी वेळेचं बंधन दिलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • व्यावसायिक गॅस सिलेंडर दरात 30 रुपयांनी कपात

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Commercial Gas Cylinder : व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आलीय. 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये 30 रुपयांनी स्वस्त झालाय. मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • शिक्षक, पदवीधर मतदारसंघाचा आज निकाल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Teacher And Graduate Constituency Election : विधान परिषदेच्या 4 जागांचा आज निकाल लागणाराय...शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष आहे...मुंबई, कोकण मतदारसंघात अनिल परब, किरण शेलार, डावखरेंची प्रतिष्ठा पणाला लागलीय...तर नाशिकमध्ये संदीप गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये कोण बाजी मारणार? याचीच उत्सुकता सर्वांना आहे...सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झालीय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अधिवेशनाचा आजचा दिवस वादळी ठरणार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Vidhansabha Adhiveshan : विधान परिषदेच्या 4 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज असल्यानं, त्याचे पडसाद राज्य सरकारच्या पावसाळी विधीमंडळ अधिवेशनात आज पाहायला मिळतील. तर दोन्ही सभागृहांत लक्षवेधी, तसंच प्रश्नोत्तरं या नियमित कामकाजासोबतच, विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरही चर्चा होईल. तसंच मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची लक्षवेधी विधानसभेत मांडली जाणार असून, विरोधक यावर आक्रमक झालेले पहायला मिळतील. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link