Ajit Pawar on Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना अजितदादांचा वादा

Mon, 22 Jul 2024-8:50 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 22 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • बहिणींनो आता विधानसभेला लक्षात ठेवा, नाहीतर लाडकी बहीण योजना बंद पडेल- अजित पवार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ajit Pawar on Ladki Bahin Yojna : बहिणींनो आता विधानसभेला लक्षात ठेवा, नाहीतर लाडकी बहीण योजना बंद पडेल असं महत्त्वाचं विधान अजित पवारांनी पारनेरमध्ये केलंय.. अजितदादांचा वादा आहे ही योजना बंद पडू देणार नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्याच उमेदवारांना तुम्हाला निवडून आणावं लागेल असं आवाहनही अजित पवारांनी केलंय. तसंच मुलींना 100 टक्के मोफत शिक्षण तर शेतकर्‍यांना मोफत वीज देण्याचं आश्वासनही अजित पवारांनी दिलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाचा लाखो मराठा विद्यार्थ्यांना लाभ

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    CM Shinde accepted Jaranges demand : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंची मागणी मान्य केलीय.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निर्णयाने लाखो मराठा विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.. 2024-2025 या वर्षासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सरकारने वाढवली आहे.. अर्ज केल्यापासून सहा महिन्यांपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आलीय.. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना 6 महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळालाय.

     

  • मनोरमा खेडकर यांना न्यायालयीन कोठडी, जामीन अर्ज दाखल

     

    Manorama Khedkar Update : मनोरमा खेडकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.. शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवत धमकवल्याच्या प्रकरणी न्यायालयीन कोठडी. मनोरमा खेडकर यांची रवानगी आता येरवडा जेलमध्ये होणार. न्यायालयीन कोठडी मिळताच मनोरामा खेडकर यांनी जामीन अर्ज केला दाखल. 

  • मराठा-ओबीसी वादावर शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड चर्चा- सूत्र

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sharad Pawar - CM Shinde Meet : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवारांमधील बैठक संपली.. सह्याद्री अतिथीगृहावर पवार-शिंदेंमध्ये तासभर चर्चा.. विधानसभेआधी जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवारांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. येत्या काही दिवसांत पुन्हा सर्वपक्षीय बैठक होणार. विरोधकांनाही निमंत्रण देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांना आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय..
    जातीय सलोखा कायम ठेवण्यासठी आगामी सर्वपक्षीय बैठकीला शरद पवारांचा हिरवा कंदिल मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
    सर्व विषयांवरील चर्चा संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार या दोघांमध्येच मराठा-ओबीसी वादावर बंद दाराआड चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • कावड यात्रेत नेमप्लेट लावण्याच्या निर्णयास स्थगिती

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Kavad Yatra : उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला सुप्रीम कोर्टानं मोठा झटका दिलाय. कावड यात्रेतील मार्गावर असलेल्या दुकानांवरील नेमप्लेटसंदर्भात सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार, योगी सरकारनं खाद्यपदार्थ आणि दुकानदारांच्या नावासंदर्भातील निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिलीय. या निर्णयाला राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनीही कडाडून विरोध केला होता. सुप्रीम कोर्टानं उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड सरकारला नोटीसही जारी केलीय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा - वर्षा गायकवाड

     

    Delhi Varsha Gaikwad : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केलीय. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा तिढा अजूनही कायम आहे. यासंदर्भात वर्षा गायकवाड यांनी आज लोकसभेत मुद्दा उपस्थित केला. मराठी भाषा प्राचीन असून तिचे वय 2 हजार वर्षांपूर्वीच आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा, असं त्यांनी म्हटलंय.

  • नागपूरकरांची पावसामुळं उडाली दैना

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nagpur Rain : नागपूरकरांना शनिवारी झालेल्या पावसाचा चांगलाच फटका बसला. महापालिका प्रशासनाचा निष्क्रिय कारभार, नालेसफाई आणि पावसाळ्याच्या तयारीचा अभाव यामुळे शहरात अनेक ठिकाणी तलावाचे स्वरूप आले होतं... अनेक ठिकाणी घरात पाणी शिरलं. दरम्यान इथल्या नागरिकांनी महापालिकेच्या कारभाराबाबत आणि सिमेंटच्या रस्त्यांची उंची वाढवल्याबाबत रोष व्यक्त केलाय. याबाबत आता लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आलीये...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • देवेंद्र फडणवीसांची ईडी चौकशी लावा - संजय राऊत

     

    Sanjay Raut On Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अटक करा आणि ईडी चौकशी लावा अशी मागणी संजय राऊतांनी केलीय...विधान परिषद निवडणुकीत मविआचे 20 आमदार फोडले असे फडणवीस म्हणतात, त्यांनी आमदारांना किती पैसे दिले याची अमित शाहांनी चौकशी करावी असं राऊतांनी म्हटलंय...कालच फडणवीसांनी मविआचा फुगा फुटला असून, विधान परिषद निवडणुकीत त्यांचे 20 आमदार कधी फुटले ते कळलं नाही असं विधान केलं होतं...त्यावर राऊतांनी पलटवार केलाय...

  • मुख्यमंत्रिपदावर शिंदेंचाच दावा असेल - नरेश म्हस्के

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Delhi Naresh Mhaske : महायुतीत पुढील निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात लढवल्या जातील आणि पुढील 15 वर्षे शिंदेच नेतृत्त्व करतील असा दावा खासदार नरेश म्हस्केंनी केलाय...मुख्यमंत्रीही शिंदेंच असतील असं मोठं विधान नरेश म्हस्केंनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • पिंपरीत कारची पादचारी महिलेला धडक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pimpri Hit And Run : पिंपरी-चिंचवडमध्ये हिट अँड रनच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीय. पिंपरी गावात कारनं पादचारी महिलेला धडक देऊन पसार झाल्याचं सीसीटीव्ही समोर आलंय.रविवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडलीय. कार चालकानं जाणीवपूर्वक महिलेला धडक दिल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय. महिलेला धडक देऊन कार चालक फरार झालाय. अज्ञात कार चालकाला विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरूय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा  - 

  • मुलुंडमध्ये हिट अँड रन

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mulund Hit And Run : मुंबईतील मुलुंडमध्ये हिट अँड रनची घटना समोर आलीय...ऑडी कारने दोन रिक्षांना धडक दिलीय...दोन रिक्षांना धडक देऊन ऑडी कार चालक फरार झालाय...यात रिक्षा चालक आणि दोन प्रवासी जखमी झालेयत...रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर आहे...अपघातात रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय...मुलुंड पोलिसांनी गाडी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा 

  • आरक्षण OBCतून द्यायची की नाही सांगा?- मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Manoj Jarange : ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही हे तुम्ही सांगा...असा सवाल मनोज जरांगेंनी फडणवीसांना विचारलाय...आरक्षण द्या आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू...आरक्षण नाही दिलं तर आम्हाला सरकार बनवावं लागेल असा इशाराही जरांगेंनी दिलाय...कालच फडणवीसांनी आरक्षणाबाबत मविआने भूमिका स्पष्ट करावी असं म्हटलं होतं...त्यावर जरांगेंनी उत्तर दिलंय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • Ajit Pawar Camp On Kavad Yatra : कावड यात्रेबाबत उत्तर प्रदेश सरकारनं काढलेल्या आदेशाला एनडीए आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं विरोध केलाय. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल आयोजित केलेल्या बैठकीमध्ये पक्षानं या आदेशाला विरोध केलाय. अजित पवार यांच्यासोबत चिराग पासवान आणि जयंत चौधरी या मित्र पक्षांनीही या आदेशाला विरोध केलाय. आज संसदेमध्ये या प्रश्नावरुन गोंधळ होण्याची शक्यताय. त्यामुळे विरोधकांसोबत मित्र पक्षाच्या विरोधामुळे संसदेत सरकारची कोंडी होण्याची शक्यताय. यात्रेच्या मार्गावर असणा-या हॉटेल आणि दुकानदारांनी त्यांची नावे ठळकपणे लिहावीत असा आदेश उत्तर प्रदेश सरकारनं काढलाय. यामुळे मुस्लिम आणि हिंदू धर्मातील काही जातीच्या हॉटेलमध्ये भाविक जाणार नाही अशी भिती व्यक्त केली जातेय. त्यामुळे या निर्णयाला विरोध होतोय. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Raut On Devendra Fadanvis : फडणवीसांच्या ठोकून काढा या विधानावर राऊतांनी हल्लाबोल चढवलाय...ठोकून काढा म्हणजे काय...? गृहमंत्री गुंडांची भाषा वापरतायत....गृहमंत्रिपदाचा राजीनामा देऊन ठोकशाहीची भाषा करून दाखवा...आणि दम असेल तर ईडी, सीबीआय बाजूला ठेवून मैदानात या असं आव्हान राऊतांनी दिलंय...कालच फडणवीसांना कार्यकर्त्यांना कानमंत्र देताना विरोधकांना उत्तर देताना आदेशाची वाट पाहू नका...मैदानात उतरून ठोकून काढा असा आदेश दिला...त्यावरून राऊतांनी समाचार घेतलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • बांग्लादेशातील हिंसेचा व्यावसायिकांना फटका

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Bangladesh Protest Update : बांग्लादेशातील हिंसेचा भारतीय व्यावसायिकांना मोठा फटका बसलाय. बांग्लादेशात उसळलेल्या दंगलीमुळे संपूर्ण देशात कर्फ्यू लागू करण्यात आलाय. समुद्रीमार्ग आणि सर्व रस्ते बंद करण्यात आलेत. यामुळे भारतीय व्यापा-यांचं कोट्यवधींचं नुकसान झालंय. दोन्ही बाजूने माल वाहतूक बंद करण्यात आली. माल वाहून नेणारे शेकडो ट्रक सीमेवर अडकून पडलेत. यामुळे व्यापार ठप्प झालाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Central Railway : सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय...यामुळे कल्याण रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झालीय...आज आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने सकाळीच कामावर जाणा-यांचे हाल झालेयत...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पावसाची दडी, मराठवाड्याची चिंता वाढली

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sambhajinagar Jaikwadi Dam : मराठवाड्याची तहान भागविणा-या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा अवघा 4.13 टक्क्यांवर आलाय.यात पावसाळा सुरू होऊन दोन महिने होत आलेत तरीही चांगला पाऊस धरण क्षेत्रात आणि वरील भागात देखील झालेला नाही. त्यामुळे परिसरात पडणा-या पावसामुळे सध्या 196 क्युसेकनं आवक आहे. मात्र पाणीसाठ्यात वाढ होत नाही. तो पाणीसाठा केवळ 2 महिने पिण्यासाठी पुरेल एवढाच असल्याची माहिती पाटबंधारे विभागानं दिलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Manoj Jarange : जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. जालन्यात अंतरवाली सराटीत त्यांचं उपोषण सुरूये. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं आणि इतर मागण्यांसाठी जरांगेंनी उपोषण सुरू केलंय. त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असल्यानं त्यांची प्रकृती खालावत चाललीये. काल तीन वेळा डॉक्टरांनी जरांगेंची तपासणी केली. दरम्यान आतापर्यंत राज्य सरकारनं मराठा समाजाच्या कोणत्या मागण्या पूर्ण केल्यात, असा जरांगेंनी जाब विचारत अंतरवालीत येऊन चर्चा करण्याचं आव्हान दिलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • नागपुरात अतिवृष्टीमुळं 3 जणांचा बळी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nagpur : नागपूर शहरात अतिवृष्टीमुळे दोघांचा मृत्यू झाला तर एक जण बेपत्ता आहे. शनिवारी नागपूरमध्ये अतिवृष्टी झाली. त्यादरम्यान भरतवाडा, पूनापूर आणि बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत या घटना घडल्या. श्यामनगर पुनापूर भागातील भोजराज पटेल नावाची व्यक्ती नाल्याच्या बाजूने उभे होते. त्यांचा अचानक पाय घसरला आणि ते पाण्याच्या प्रवाहाने वाहत गेले. भरतवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील मोहनबाबा नगर परिसरात श्रावण तुलसीकर हा 12 वर्षाचा मुलगा नाल्याच्या बाजूने खेळत असतांना वाहत गेला. त्याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.तर बेलतरोडी ते बेसा जवळ  पूर पाहण्यासाठी गेलेली महिला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मोबाईल टॉवर कोसळून 3 घरांचं नुकसान

     

    Bhandup Mobile Tower Collapse : मुंबईतील भांडुपच्या रमाबाईनगरात मोबाईल टॉवर घरांवर कोसळल्याने 3 घरांचं नुकसान झालंय...मुसळधार पावसामुळे काल मोबाईल टॉवर कोसळला...मोबाईल टॉवर कोसळून घरांचं प्रचंड नुकसान झालंय...या दुर्घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही...

  • जो बायडेन यांची निवडणुकीतून माघार

     

    Joe Biden : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. चार महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, अशी विनंती डेमोक्रॅटीक पक्षाचे नेते आणि समर्थक करत होते. अखेर बायडेन यांनी माघार घेतली. अमेरिका आणि पक्षाच्या हितासाठी निवडणुकीतून माघार घेत असल्याचं बायडेन यांनी स्पष्ट केलंय. आता डेमोक्रॅटीक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार कोण? अशी चर्चा सुरू आहे. यात कमला हॅरिस यांचं नाव आघाडीवर आहे. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करणं बाकी असल्याचं बोललं जातंय.

  • सांगलीला पुराचा धोका

     

    Sangli Heavy Rain : मुसळधार पावसामुळे सांगली जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झालीय. वारणा, मोरणा नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झालीय. त्यामुळे वारणा नदीवरील मांगले-काखे, ऐतवडे खुर्द पूल पाण्याखाली गेलेत. त्यानंतर याठिकाणची वाहतूक ठप्प झालीय. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांना शिराळा तहसील प्रशासनाकडून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात.  जनावरांनाही स्थलांतर करण्याच्या सूचना गावात दवंडी देऊन देण्यात आल्यात.

  • कोल्हापूरच्या पश्चिम भागात पावसाचा जोर

     

    Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागात जोरादर पाऊस सुरुय. त्यामुळे पंचगंगा नदीसह वारणा, कृष्णा, भोगावती, वेदगंगा, दूधगंगा, घटप्रभा, कासारी नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडलंय. तर पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे सुरुय. सध्या पंचगंगा नदीची पाणीपातळी 38 फूट 7 इंचावर पोहचलीय. पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट इतकी आहे. तर धोका पातळी ही 43 फूट इतकी आहे. नदीची पाणी पातळी वाढत चालल्यानं कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्यायत. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन टीम, NDRF यांना देखील अलर्ट मोडवर ठेवलंय. जिल्हयातील 86 बंधारे पाण्याखाली गेले असून अनेक रस्त्यावर आता पाणी यायला सुरूवात झालीय.

  • रायगडमध्ये शाळा आणि कॉलेजला सुट्टी

     

    Raigad School & College : रायगड जिल्ह्यातल्या 4 तालुक्यात आज शाळांना सुट्टी देण्यात आलीय. महाड, पोलादपूर, माणगाव आणि कर्जत तालुक्यात आज शाळा, कॉलेजेस बंद असतील. रायगड जिल्ह्यात हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांनी सुट्टी जाहीर केलीय.

  • नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत शाळा आणि कॉलेजला सुट्टी

     

    Nagpur, Chandrapur, Gadchiroli School Close : विदर्भातील 3 जिल्ह्यात आज शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आलीय...नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत आज शाळा-कॉलेजला सुट्टी दिलीय...अतिवृष्टीच्या इशा-यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आलीय...चंद्रपुरात शाळा-कॉलेज, अंगणवाड्या आज बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिलेयत...तर गडचिरोलीत अतिवृष्टीचा इशारा आणि महामार्ग, राज्य मार्ग, जिल्हा मार्ग बंद असल्याची स्थिती बघता जिल्ह्यात सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टीची घोषणा करण्यात आलीय...

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link