Railway Job: रेझ्युमे करा अपडेट, कोकण रेल्वेत भरतीला झालीय सुरुवात; 50 हजारपर्यंत मिळेल पगार!

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे.

| Sep 16, 2024, 13:58 PM IST

 Railway Job: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे.

1/9

Railway Job: रेझ्युमे करा अपडेट, कोकण रेल्वेत भरतीला झालीय सुरुवात; 50 हजारपर्यंत मिळेल पगार!

Konkan Railway Recruitment 2024 loco pilot station master Job Marathi News

Konkan Railway Job: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. या अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 50 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. या नोकरीच्या अर्ज प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

2/9

पदांचा तपशील

Konkan Railway Recruitment 2024 loco pilot station master Job Marathi News

कोकण रेल्वे भरती अंतर्गत एकूण 190 पदे भरली जाणार आहेत. वरिष्ठ विभाग अभियंता, तंत्रज्ञ, असिस्टंट लोको पायलट, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, कमर्शियल पर्यवेक्षक, ट्रॅक मेंटेनर आणि पॉइंट मॅन या पदांचा समावेश आहे. 

3/9

कोण करु शकतं अर्ज?

Konkan Railway Recruitment 2024 loco pilot station master Job Marathi News

या पदांसाठी फक्त गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील मूळ रहिवासी अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांनी आपली जमीन गमावली आहे किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य जे कोकण रेल्वेचे कर्मचारी आहेत ते देखील फॉर्म भरू शकतात.

4/9

शेवटची तारीख काय?

Konkan Railway Recruitment 2024 loco pilot station master Job Marathi News

16 सप्टेंबर 2024 पासून सुरू अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 6 ऑक्टोबर 2024  रोजी रात्री 11:59 पर्यंत फॉर्म भरता येईल. असे असले तरी उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नये आणि वेळेआधी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

5/9

कोण करु शकतो अर्ज?

Konkan Railway Recruitment 2024 loco pilot station master Job Marathi News

वरिष्ठ विभाग अभियंता इलेक्ट्रिकल या पदासाठी, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकलमधील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे तंत्रज्ञ पदासाठी संबंधित क्षेत्रातील आयटीआय डिप्लोमा असलेले मॅट्रिक उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे, सर्व पदांसाठी अर्ज करण्याची शैक्षणिक पात्रता वेगळी आहे.

6/9

वयोमर्यादा

Konkan Railway Recruitment 2024 loco pilot station master Job Marathi News

18 ते 36 वयोगटातील उमेदवार या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. 1 ऑगस्ट 2024 पासून वयाची गणना केली जाईल आणि आरक्षित प्रवर्गाला सरकारी नियमांनुसार वयात सवलत मिळेल.

7/9

निवड कशी होईल?

Konkan Railway Recruitment 2024 loco pilot station master Job Marathi News

या पदांवरील निवडीसाठी उमेदवारांना प्रथम लेखी परीक्षा द्यावी लागेल. यानंतर रिक्त पदानुसार अॅप्टीट्यूड टेस्ट होईल. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी केली जाईल. काही पदांसाठी शारीरिक कार्यक्षमता चाचणीही द्यावी लागेल. पहिला टप्पा पार केल्यानंतरच उमेदवार पुढच्या टप्प्यात जातील आणि सर्व टप्पे पार केल्यानंतरच निवड अंतिम होईल.

8/9

अर्ज शुल्क

Konkan Railway Recruitment 2024 loco pilot station master Job Marathi News

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 885 रुपये शुल्क भरावे लागेल. राखीव प्रवर्ग आणि महिला उमेदवारांना देखील शुल्क भरावे लागेल परंतु CBT मध्ये हजर झाल्यानंतर त्यांची संपूर्ण फी परत केली जाईल.

9/9

पगार किती?

Konkan Railway Recruitment 2024 loco pilot station master Job Marathi News

उमेदवारांना त्यांच्या पदानुसार पगार दिला जाणार आहे. सिनीअर सेक्शन इंजीनिअरला पदासाठी वेतन 49 हजार रुपये प्रति महिना पगार दिला जाईल.तंत्रज्ञ पदासाठी 19 हजार 900 रुपये पगार आहे. स्टेशन मास्टर पदाचा पगार 35 हजार 400 रुपये आहे. त्याचप्रमाणे गुड्स ट्रेन मॅनेजर पदाचा पगार 29 हजार 200 रुपये इतका पगार आहे.