Fridge च्या आत हे बटण 10 वर्षांपेक्षा जास्त टिकवणार तुमचं फ्रीज, अगदी नव्यासारखाच चालेल

आज आम्ही तुम्हाला एक भन्नाट ट्रिक सांगणार आहोत. त्याचा वापर करुन तुम्ही विजेचं बीलदेखील वाचवू शकणार आहात.

| Sep 16, 2024, 14:31 PM IST

Fridge Safety Tips: आज आम्ही तुम्हाला एक भन्नाट ट्रिक सांगणार आहोत. त्याचा वापर करुन तुम्ही विजेचं बीलदेखील वाचवू शकणार आहात.

1/8

Fridge च्या आत हे बटण 10 वर्षांपेक्षा जास्त टिकवणार तुमचं फ्रीज, अगदी नव्यासारखाच चालेल

Fridge Safety Tips refrigerator defrost button How to use

Fridge Safety Tips: आजकाल फ्रिज प्रत्येकांच्या घरात असतो. शहर असो किंवा गाव फ्रीज हा आता अविभाज्य घटक आहे. जेवण ताजं ठेवण्यासाठी फ्रीजचा वापर केला जातो. 

2/8

Fridge Safety Tips refrigerator defrost button How to use

घरांमध्ये अधिक करुन सिंगल डोअर फ्रीजच असतात. पण या फ्रीजमध्ये एक विशेष बटण असते. अनेकांना फ्रीजमधील या बटणाबद्दल माहिती नसते. पण हे बटण खूप उपयोगी असते. 

3/8

Fridge Safety Tips refrigerator defrost button How to use

 फ्रीजमध्ये असलेले हे बटण खूप फायदेशीर आहे. पण त्याचा योग्य वापर करता आला पाहिजे. या बटणाचे नाव Defrost Button असं आहे. 

4/8

Fridge Safety Tips refrigerator defrost button How to use

जेव्हा फ्रीजमध्ये बर्फ जमा होतो तेव्हा फ्रीजर थंड ठेवण्यासाठी फ्रीजला जास्त मेहनत घ्यावी लागते. हे बर्फ एकप्रकारे insulatorच काम करते. फ्रीजर थंड ठेवण्यासाठी जास्त वीज लागते. डिफ्रॉस्ट केल्याने हा अतिरिक्त बर्फ कमी होतो. ज्यामुळं फ्रीजरला कमी मेहनत करावी लागते आणि वीजही कमी लागते. 

5/8

Fridge Safety Tips refrigerator defrost button How to use

फ्रीजरमध्ये साचलेला बर्फाचा मोठा थर फ्रीजच्या मोटारवर जास्त दबाव टाकतो. त्यामुळं मोटर खराब होऊ शकते. डिफ्रॉस्ट केल्याने फ्रीजरच्या मोटरवरील दबाव कमी होतो आणि फ्रीजचे आयुर्मानही वाढते. 

6/8

Fridge Safety Tips refrigerator defrost button How to use

बर्फाचा थर हटवल्याने फ्रीजमधील थंड हवा समान पद्धतीने सगळीकडे पसरते. त्यामुळं त्यातील पदार्थ थंड ठेवण्यास मदत मिळते. मात्र, जेव्हा बर्फाचा थर साचतो तेव्हा थंड हवा योग्यरितीने पोहोचत नाही. त्यामुळं फ्रीजरमधील काही भाग थंड व काही भाग गरम राहतो.

7/8

Fridge Safety Tips refrigerator defrost button How to use

बर्फाचा थर हटवल्याने फ्रीजरमध्ये जास्त जागादेखील उरते. त्यामुळं तुम्ही जास्त सामान फ्रीजमध्ये ठेवू शकतात. 

8/8

Fridge Safety Tips refrigerator defrost button How to use

डिफ्रॉस्ट करताना तुम्ही फ्रीजच्या आतूनही साफ करु शकता. बर्फ वितळल्यामुळं साचलेले पाणीदेखील तुम्ही बाहेर काढून साफ करु शकता. त्यामुळं फ्रीजर साफदेखील राहिल आणि जेवणदेखील सुरक्षित राहिल.