Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Wed, 19 Jun 2024-10:29 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 19 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • 'मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांचे 12 वाजले', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन म्हणणा-यांचे बारा वाजले...अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता फडणवीसांवर निशाणा साधला...त्याचबरोबर नडायला निघाले होते, त्यांनी नाडा सांभाळावा अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी जेपी नड्डा यांना इशारा दिलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट पाठिंबा', उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Uddhav Thackeray on Raj Thackeray : शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचं नाव न घेता खिल्ली उडवलीय.. मला विरोध करण्यासाठी काहींनी उघड म्हणजे बिनशर्ट पाठिंबा दिला.. अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केलाय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • इंदापूरमध्ये कारनं मुलाला चिरडलं

     

    Indapur Accident : इंदापूरमध्ये सायकल चालवणा-या दहा वर्षाचा मुलाचा कारच्या धडकेत मृत्यू झालाय.. उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली... या अपघाताचा थरार अंगावर काटा आणणारा आहे.. मुलाच्या अंगावरून पुढील आणि मागील चाक गेल्याचं स्पष्ट दिसतंय.. भिगवण पोलीस स्टेशनमध्ये अजूनही या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही...

  • मनोज जरांगे पुन्हा एकदा राज्यव्यापी दौरा करणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Manoj Jarange : जरांगे पुन्हा एकदा राज्यव्यापी दौरा करणार आहेत.. जरांगेंचा हा राज्यव्यापी दौरा पाच टप्प्यात पार पडेल.. 6 जुलैला हिंगोलीपासून रॅलीला सुरुवात होईल.. पहिल्या टप्प्यात 6 जुलै ते 13 जुलै या दरम्यान जरांगे दौरा करतील... तेव्हा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पुन्हा एकदा राज्य ढवळून काढणार आहेत..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'महायुतीत अजित पवारांना बळीचा बकरा करणार',रोहित पवारांचा भाजपवर आरोप

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rohit Pawar on Ajit Pawar  : महायुतीत तिसरा पर्याय उपलब्ध करण्यासाठी अजित पवारांना बळीचा बकरा करण्यात येत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय...यासंदर्भात त्यांनी ट्विट केलंय...मविआ विरोधात दुरंगी लढतीत पराभव होतो म्हणून तिरंगी लढतीसाठी भाजपचे प्रयत्न असल्याचंही त्यांनी म्हटलंय...आरएसएसच्या मुखपत्रातून आधी अजित पवारांवर आरोप झाले आणि पुढे काहीतरी करून अजितदादांना वेगळं होण्यास भाग पाडायचं ही रणनीती चाणक्यांनी दिल्लीत मांडल्याची चर्चा असल्याचंही रोहित पवार म्हणालेत...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • दिल्लीतील भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत नाराजी- सूत्र

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Delhi BJP Meeting : दिल्लीतील कालच्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सोशल मीडियातील प्रचारासंदर्भात देखील चर्चा झाली...सोशल मीडियात भाजपविरोधात केलेल्या प्रचाराला उत्तर देण्यात राज्यातील नेते कमी पडल्याची चर्चा झाली अशी माहिती सूत्रांनी दिलीय...विरोधकांकडून जे मुद्दे सोशल माध्यमांमध्ये मांडले गेलेत, त्याला उत्तर देण्यात भाजप कमी पडल्याची देखील चर्चा झाल्याची माहिती मिळतेय...येत्या काळात निवडणुका तोंडावर असताना सोशल मीडियातून देखील विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देण्यावर चर्चा झालीय...यामुळे आता भाजपकडून आगामी काळात विरोधकांना प्रत्युत्तर देण्याच्या दृष्टीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर वाढवला जाणार आहे...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'राज्य सरकार हातात कसं येत नाही मी बघतो', शरद पवारांचं सूचक वक्तव्य

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sharad Pawar : आज केंद्र आणि राज्य सरकार आमच्या हातात नाही. मात्र उद्या निवडणुका येतील, तेव्हा राज्य सरकार कसं हातात येत नाही ते मी बघतो, असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय. बारामतीच्या नीरावागजमध्ये जाहिर सभेत त्यांनी हे विधान केलंय. तसंच राज्य सरकार हातात आलं तर ही दुखणी दुरुस्त करायला वेळ लागणार नाही, असा टोलाही त्यांनी सत्ताधा-यांना लगावलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'नारायण राणे भ्रष्ट मार्गाने जिंकले', ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Uddhav Thackeray Group on Narayan Rane : नारायण राणे भ्रष्ट मार्गाने निवडून आले....शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा आरोप...कारवाई करण्याबाबत निवडणूक आयोगाकडे वकीलामार्फत शिवसेना उद्धव ठाकरे गटाची तक्रार 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • बारामतीकर वहिवाट विसरले नाहीत - शरद पवार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Baramati Sharad Pawar : यावेळेला बारामतीकर आपली वहिवाट विसरले नाहीत. बारामतीकर घ्यायचा तो निकाल घेतात, असा टोला शरद पवारांनी अजित पवारांना लगावलाय. बारामतीच्या दौ-यावर असताना शरद पवारांनी हे वक्तव्य केलंय. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचा पराभव केल्यानंतर शरद पवारांनी अजित पवारांवर ही खोचक टीका केलीय. दरम्यान तुमच्या मतदारसंघाचे नाव नवीन खासदार गाजवल्याशिवाय राहणार नाहीत, तुम्हाला त्याच समाधान मिळेल, असंही पवारांनी सांगितलं. तर पवारांच्या बारामती दौ-यामुळे विधानसभेला आमच्या यशावर काही परिणाम होईल असं वाटत नसल्याचं सुनील तटकरेंनी म्हटलंय

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • भुजबळांना शिवसेनेत घेणार नाही - संजय राऊत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Raut On Chagan Bhujbal : भुजबळांबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट केलीय... भुजबळांशी शिवसेनेचा कोणताही राजकीय संवाद झालेला नाही...भुजबळांनी वेगळी भूमिका स्वीकारली असून, त्यांच्या भूमिकेशी शिवसेनेची भूमिका मेळ खात नाही...त्यामुळे भुजबळांना शिवसेनेत घेणार नसल्याचं राऊतांनी स्पष्ट केलंय...भुजबळांना ठाकरे गटाचा कोणताही नेता भेटला नसून, त्यांच्याची कोणतीही चर्चा झाली नाहीये...तसंच भुजबळ शिवसेनेत राहिले असते तर मुख्यमंत्री झाले असतं असं राऊतांनी म्हटलंय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • युगेंद्र पवारांच्या निवडणुकीतील एंट्रीचे शरद पवारांकडून संकेत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sharad Pawar On Yugendra Pawar : शरद पवारांनी युगेंद्र पवारांच्या बारामती निवडणुकीतील एन्ट्रीचे संकेत दिलेत. ते बारामतीतील सांगवीमध्ये बोलत होते. नवीन पिढीमार्फत गावात विकास कसा होईल याचा प्रश्न सोडवण्यावर भर देण्याची जबाबदारी आमची असल्याचं पवार म्हणालेत. यावेळी बोलताना त्यांनी अजित पवारांवरही टीका केली.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • नरहळी झिरवळांना परतीचे वेध?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Narhari Zirwal : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नरहरी झिरवाळ यांनी संदीप गुळवेंना जाहीर पाठिंबा दिलाय..झिरवाळांनी सर्व कार्यकर्त्यांना संदीप गुळवे यांचं काम करण्याच्या सूचना दिल्यात. संदीप गुळवे ठाकरे गटाचे शिक्षक मतदार संघाचे उमेदवार आहेत. झिरवाळ यांच्या वाढदिवसानिमित्त संदीप गुळवे यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी झिरवाळ यांनी गुळवेंना जाहीर पाठींबा दिला आहे. .

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मालाडच्या आईस्क्रीममधील मानवी बोटाचं पुणे कनेक्शन?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Finger Found In Ice cream : मुंबईत आईस्क्रिममध्ये सापडलेल्या मानवी बोटाचं पुणे कनेक्शन उघड होण्याची शक्यता आहे.. पोलीस तपासादरम्यान पुण्यातील आईस्क्रिमच्या कारखान्यात काम करणारा एक कर्मचारी जखमी असल्याचं आढळून आलंय.. या कर्मचा-याच्या हाताला दुखापत झालीये.. त्यामुळे आईस्क्रिममध्ये सापडलेलं बोट याच कर्मचा-याचं असल्याचा संशय मुंबई पोलिसांना आहे... आता पोलीस या जखमी कर्मचा-याची DNA तपासणी करणार आहेत.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • नीट प्रकरणी कारवाई झाली पाहिजे - सुप्रीम कोर्ट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    NEET Exam : NEET परीक्षेत थोडाही निष्काळजीपणा झाला तर कठोर करवाई झाली पाहिजे, असं सुप्रीम कोर्टानं NTA आणि केंद्र सरकारला सुनावलंय. NEET परीक्षा घोटाळा प्रकरणी सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. यावर सुनावणी करताना कोर्टानं  NTA आणि केंद्र सरकारवर ताशेरे ओढलेत. परीक्षेतील निष्काळजीपणा खपवून घेऊ नका, असं कोर्टानं म्हटलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • इंडिगो विमानाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Indigo Flight Threat : इंडिगोच्या विमानाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आलीय. इंडिगोचं विमान रात्री चन्नईहून मुंबईकडं निघालं असताना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळाली. यामुळे मोठा गोंधळ उडाला. अखेर मुंबई विमानतळावर या विमानाचं  सुरक्षित लॅडिंग करण्यात आलं. त्यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षित उतरवून विमानाची तपासणी करण्यात आली. या धमकीबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • 3 हजार 749 तलाठी नियुक्तीच्या प्रतीक्षेत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Talathi : राज्यातील तलाठी पदाच्या नियुक्तीवरून गोंधळ निर्माण झालाय. राज्य सरकारनं 3 हजार 749 तलाठ्यांची निवड केलीय. मात्र त्यांची नेमणूक अद्यापही झालेली नाहीये. त्यामुळे सरकारला विद्यार्थ्यांच्या तलाठी पदाच्या नियुक्तीचा विसर पडलाय का? असा प्रश्न उपस्थित होतोय. एक वर्ष उलटलं तलाठी पदाची जाहिरात येऊन त्यानंतर स्पर्धा परीक्षा घेऊन. जानेवारी महिन्यात निकालही लागला. त्यानंतर परीक्षार्थींची निवड होऊन कागदपत्रांची पडताळणी देखील झाली. मात्र अजूनही तलाठी पदाची नियुक्ती झालेली नाही. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पाणीपुरीतून 80 जणांना विषबाधा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Jalgaon : जळगावातील चोपड्यामध्ये 80 जणांना विषबाधा झालीये.. यात लहान मुलांचाही समावेश आहे.. पाणीपुरी खाल्ल्यानं या सर्वांना विषबाधा झालीये.. चोपडा तालुक्यातील पिंप्री, चांदसणी, कमळगाव इथल्या ग्रामस्थांचा यात समावेश आहे.. पाणीपुरी खाल्ल्यानंतर या सर्वांना पोटदुखी, उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरु झाला.. यातील 30 रुग्णांन चोपड्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं..तर इतरांना जळगावातील रुग्णालयात उपचासाठी पाठवण्यात आलं.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • एनडीएचे अनेक खासदार संपर्कात -राहुल गांधी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rahul Gandhi On NDA : NDAचे अनेक खासदार आमच्या संपर्कात असून, सरकारमध्ये असंतोषाचं वातावरण आहे...छोट्याश्या चुकीमुळे एनडीए सरकार कोसळू शकतं असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलाय...केंद्रात युतीचे सरकार परत आल्याने हे सरकार फार काळ टिकणार नाही...2024 मध्ये अपेक्षेप्रमाणे निकाल भाजपच्या बाजूने लागलेला नाही...त्यामुळे पूर्ण बहुमताऐवजी भाजपला मित्रपक्षांचा पाठिंबा मागावा लागलाय...अशा स्थितीत एनडीए सरकारला पुढे जाण्यासाठी अनेक संघर्षांचा सामना करावा लागेल...असा दावा राहुल गांधींनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलाय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पाकिस्तानचा क्रिकेटर हॅरिस रौफचा राडा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pakistan Haris Rauf : पाकिस्तान टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर पडला. भारत आणि अमेरिकेकडून पराभव झाल्यानं पाकिस्तानी क्रिकेट चाहते चांगलेच संतापलेत. अशाच एका क्रिकेट चाहत्यासोबत पाकिस्तानचा स्टार बॉलर हॅरिस रौफनं वाद घातलाय. रौफ आपल्या पत्नीसोबत जात असताना एका पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यानं शेरेबाजी केली. त्यामुळे संतापलेला हॅरिस पत्नीचा हात झटकून क्रिकेट चाहत्याच्या अंगावर धावून गेला. यावेळी दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. अजूबाजूच्या लोकांनी मध्यस्ती केल्यानं वाद मिटला. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

    बातमीचा व्हिडिओ पाहा - 

  • मुंबई महापालिकेचं कार्यालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    BMC : मुंबई महापालिकेच्या कार्यालयात धमकीचा ईमेल आल्याने खळबळ उडालीय...मुंबई महापालिकेचं कार्यालय उडवून देऊ अशी धमकी आलीय...या धमकीनंतर पोलिसांनी बीएमसीच्या मुख्यालयात जाऊन तपास केला...मात्र, काहीही संशयास्पद आढळलं नाही...या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून, धमकी देणा-या अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जातोय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • शिवसेना शिंदे गटाचा आज वर्धापन दिन

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Shivsena Foundation Day : एकनाथ शिंदेंची शिवसेना हा आपला वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहे...शिंदे यांची शिवसेना वरळी डोम येथे शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन साजरा करणार आहे. वरळी डोम येथे मोठे शक्तीप्रदर्शन वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिंदेंच्या शिवसेनेकडून केलं जाईल. सायंकाळी पाच वाजता या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे लक्ष आहे...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Shivsena Foundation Day : शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन आज साजरा होणारेय...यानिमित्ताने मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा संध्याकाळी 6.30 वाजता पार पडणार आहे...या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणारेय. उद्धव ठाकरे शिवसैनिकांना कोणता संदेश देतात आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात तसंच आगामी विधानसभा निवडणुकीवर कोणतं भाष्य करतात, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. या सोहळयाला शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या सर्व नेत्यांची प्रमुख उपस्थिती असेल. याचसोबत नवनिर्वाचित खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, विभागप्रमुख, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि शिवसैनिक सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहणारेत...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link