Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Wed, 02 Oct 2024-3:52 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 02 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • 'आधी आरक्षण मग आचारसंहिता',मनोज जरांगेंचा इशारा

     

    Manoj Jarange : मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लावता सरकारनं आचारसंहिता लागू करू नये ,असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिलाय. फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं,मला राजकारणात येण्याचं स्वारस्य नाही,असं स्पष्टीकरणंही जरांगेंनी दिलंय. मराठ्यांना डावलून सरकार निवडणुका घेऊ शकत नाही,असंही जरांगे यांनी म्हटलंय. मराठ्यांना आरक्षण न मिळाल्यास मराठ्यांनी भाजपमधून बाहेर पडावं,असा सल्लाही जरांगेंनी दिलाय 

  • 'जनता महायुतीला हद्दपार करेल', रोहित पवारांचा टोला

     

    Rohit Pawar : अमित शाहांच्या स्वबळाच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात स्वाभिमान असेल तर ते योग्य निर्णय घेतील,असा टोला रोहित पवार यांनी लगावलाय. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी जनता महायुतीला हद्दपार करेल,असा विश्वासही रोहित यांनी व्यक्त केलाय. 

  • Amit Shah : अमित शाहांसोबत एकनाथ शिंदेंची बैठक झालीय. या बैठकीत महायुतीचं सरकार आणू अशी ग्वाही अमित शाहांना एकनाथ शिंदेंनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. तसेच जागावाटप लवकर जाहीर करण्याची विनंतीही शिंदेंनी अमित शाहांकडे केलीय..लोकसभेप्रमाणे विधानसभेत जागावाटप आणि उमेदवार घोषित करण्यास उशीर नको अशीही विनंती त्यांनी अमित शाहांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शिवसेनेला कोणत्या जागा हव्या आहेत याची सविस्तर माहिती शिंदेंनी शांहाना दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. तसेच मतभेद विसरून कुटुंबाप्रमाणे निवडणूक एकत्र लढा असा सल्ला शाहांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • विद्यार्थिनीवर शिक्षकाने केला बलात्कार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Chandrapur Crime : चंद्रपुरातील कोरपनामध्ये 12 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीवर शिक्षकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी आरोपीला अकोल्यातून अटक करण्यात आलीय... तर आरोपीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय... आरोपी कॉन्व्हेंट शाळेत शिक्षक असून, युवक काँग्रेसचा कोरपना शहर अध्यक्षही आहे..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पुण्यात भाजप बैठकीत राडा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune : पुण्यात भाजपच्या बैठकीत राडा झालाय. खडकवासला मतदारसंघात आमदार भीमराव तापकीर, इच्छुक नगरसेवक प्रसन्न जगताप आणि भाजप नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांच्यात उमेदवारीवरून खडाजंगी झाली. भाषणाच्या मुद्द्यावरून या तिघांमध्ये वाद निर्माण झाला. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • आरक्षण प्रश्न सोडवा मग आचारसंहिता लावा - मनोज जरांगे

     

    Manoj Jarange On Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लावता सरकारनं आचारसंहिता लागू करू नये ,असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिलाय.  फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं,मला राजकारणात येण्याचं स्वारस्य नाही,असं स्पष्टीकरणंही जरांगेंनी दिलंय. मराठ्यांना डावलून सरकार निवडणुका घेऊ शकत नाही,असंही जरांगे यांनी म्हटलंय. मराठ्यांना आरक्षण न मिळाल्यास मराठ्यांनी भाजपमधून बाहेर पडावं,असा सल्लाही जरांगेंनी दिलाय.

  • उमेदवार निवडीसाठी भाजपचा लिफाफा पॅटर्न

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    BJP Candidate Selection : विधानसभा निवडणुसाठी भाजपचा एक नवा लिफाफा पॅटर्न सुरू करण्यात आलाय. बिहार आणि गोवा पॅटर्ननुसार यंदाचे विधानसभा उमेदवार ठरणार असल्याची माहिती आहे. भाजपचे निरीक्षक प्रत्येक मतदारसंघात जाऊन इच्छुकांच्या भेटी तसेच पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून कोण उमेदवार असायला हवा याची माहिती घेतली जाईल त्यानंतर ज्या नेत्याच्या नावाला पसंती देण्यात आली त्यांचं नाव बंद लिफाप्यात वरिष्ठांना सादर केलं जाणार आहे... 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात आयोगाची स्थापना

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Akshay Shinde Encounter Update : अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी सरकारकडून आयोग स्थापना करण्यात आलीय.. अलहाबाद हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना झालीय.. आयोग अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी करणार आहे.. राज्य सरकारकडून निवृत्त न्यायामूर्तीचा एक सदस्यीय आयोग स्थापन करण्यात आलाय.. आयोग तीन महिन्यात अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा अहवाल सरकारला सादर करणार आहे.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सुनील केदार विधानसभा निवडणूक रिंगणातून बाहेर?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nagpur Sunil Kedar : काँग्रेस नेते सुनील केदार यंदा विधानसभा निवडणूक लढू शकणार की नाही?असा सवाल निर्माण झालाय...कारण, नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यात पाच वर्षाची शिक्षा झाल्यानंतर निवडणूक कायद्याप्रमाणे आमदारकी गमावली. सुनील केदार यांना आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांना मिळालेल्या शिक्षेला न्यायालयाची स्थगिती मिळणं गरजेचं होतं. मात्र, ३० सप्टेंबरच्या विहित मुदतीत सुनील केदार यांनी नागपूरच्या सत्र न्यायालयात शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भात आवश्यक अर्ज केला नसल्याचं समोर आलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट - लक्ष्मण हाके

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Laxman Hake On OBC Reservation : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केलाय. हैदराबाद गॅझेट,सातारा,बाम्बे गॅझेटद्वारे तसेच बोगस कुणबी प्रमाणपत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ओबीसी आरक्षण संपवत असल्याची टीका लक्ष्मण हाकेंनी केलीय. ओबीसींना शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाची मोठी गरज असल्यानं ओबीसी नेत्यांनी पुढे येण्याचं आवाहन हाकेंनी केलंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पीए निवडणुकीच्या रिंगणात

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Chief Minister Eknath Shinde PA In Election : नांदेडमध्ये महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळतेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पीए बालाजी खतगावकर निवडणूक रिंगणात उतरलेत. त्यांनी मुखेड विधानसभेवर दावा करत थेट भाजपचे विद्यमान आमदार तुषार राठोड यांना आव्हान दिलंय. खतगावकरांनी मुखेडमधून निवडणूक लढण्याची घोषणा केलीय. मुखेडमधून परिवर्तन रॅली काढत त्यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केलीये. यावेळी महायुतीला उमेदवार निवडून येणं महत्त्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • Ramesh Chennithala & Nana Patole : 2024 साली मविआचं सरकार येणार असल्याचा विश्वास काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केलाय.. अमित शाहांनीही मविआचं सरकार येणार असल्याचं मान्य केल्याचंही चेन्नीथला म्हणालेत... तर मविआचं जागावाटप जवळपास ठरलं असल्याचं नाना पटोले म्हणालेत.. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून संभाजीराजे आक्रमक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sambhajiraje Facebook Post : अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून संभाजीराजेंनी आक्रमक भूमिका घेत शिवप्रेमींना आवाहन केलंय . येत्या सहा तारखेला सकाळी 11 वाजता मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ येण्याचं आवाहन संभाजीराजेंनी केलंय. 24 डिसेंबर 2016 रोजी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात शिवस्मारकाचे जलपूजन करण्यात आलं होतं.  या स्मारकासाठी कोट्यवधी रुपये खर्च देखील केल्याचं सरकारी दफ्तरी नोंद आहे. मात्र,स्मारकाच्या कामाला अद्याप सुरूवात देखील न झाल्यानं शिवप्रेमी नाराज आहेत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • नवरात्रीत अधिकाधिक जागा घोषित करु - विजय वडेट्टीवार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nagpur Vijay Wadettiwar : जागावाटपात आम्ही खूप पुढे गेलोय. नवरात्रीत अधिकाधिक जागा आम्ही घोषित करू, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी दिलीये. तर यासंदर्भात  8,9,10 ऑक्टोबरला सलग बैठक होणार असल्याची माहिती वडेट्टीवारांनी दिलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पुण्यात हेलिकॉप्टर अपघातात 3 जणांचा मृत्यू

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Helicoptar Accident : पुण्यात खासगी हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झालाय. बावधन परिसरात ही घटना घडली. दाट धुक्यामुळं हे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती आहे. सकाळी पावणे सातच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात हेलिकॉप्टरमधील दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा मृत्यू झालाय. त्यांचे मृतदेह रेस्क्यू करण्यात यश आलं असून डीजीसीएकडून पुढची चौकशी केली जातेय. ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून उड्डाण केल्यानंतर हा अपघात झाला. 

    बातमी पाहा - पुण्यात हेलिकॉप्टर कोसळलं! तिघांचा मृत्यू; 'या' नेत्याला आणण्यासाठी मुंबईत येताना अपघात

  • भामट्याकडून बनावट कोर्ट तयार करुन फसवणूक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Fake Court : बनावट सर्वोच्च न्यायालय, बोगस सरन्यायाधीश अन् खोटा निकाल यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही.. पण ते खरं आहे.. बनावट सुप्रीम कोर्ट तयार करून भामट्यांनी एस. पी. ओसवाल यांना तब्बल 7 कोटींचा गंडा घातलाय.. ओसवाल यांच्यावर आधार कार्डचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे.. त्याचाच फायदा भामट्यांनी घेतला.. ओसवाल यांना स्काईप कॉल करून त्यांच्याविरोधात सुनावणी सुरू असल्याचं भामट्यांनी भासवलं. त्यासाठी खोटं सुप्रीम कोर्ट तयार करण्यात आलं... तसेच बनावट सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हेही दाखवण्यात आलेत.. कोर्टात सुनावणी सुरू असल्याचा विश्वास त्यानंतर ओसवाल यांना बसला.. भामट्यांनी सुनावणी झाल्यानंतर ओसवाल यांच्याविरोधात ऑर्डर पास केली आणि त्यांना बँक खात्यात 7 कोटी रुपये भरण्यास सांगितलंय.. पोलिसांनी याप्रकरणी आता दोघांना अटक केलीय... तर 5 कोटी रुपये भामट्यांकडून हस्तगत करण्यात आलेत.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Chandrapur : चंद्रपुरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आलाय.... पावसाचा जोर ओसरल्यामुळे, व्याघ्र प्रकल्प खुला केलाय.. त्यामुळे पुन्हा एकदा ताडोबात  पर्यटकांची रेलचेल सुरू होईल... स्थानिक लोकांच्या रोजगाराला आणि अर्थव्यवस्थेलाही  मोठी चालना मिळणारेय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सांगलीत आजी-माजी खासदारांमध्ये जुंपली

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sangli : सांगलीत आजी-माजी खासदारांची चांगलीच जुपली. विशाल पाटील रंग बदलणारा सरडा आहे, अशी टीका माजी खासदार संजयकाका पाटलांनी केलीय. विशाल पाटील अपघाताने झालेला खासदार असल्याचं संजयकाकांनी म्हटलं. तर दुसरीकडे विद्यमान खासदार विशाल पाटलांनीही संजयकाकांवर पलटवार केलाय. लोकसभेत पराभूत झाल्यानं ते वैफल्यग्रस्त काका बनलेत, अशी टीका विशाल पाटलांनी केलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पूरग्रस्त राज्यांना केंद्राकडून मदत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Flood Help : पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या निधीतून महाराष्ट्राला 1492 कोटी रुपये मिळालेत. निधी वाटपात सहाय्य मिळालेल्या 14 राज्यांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक सहाय्य मिळालंय.. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानलेत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • महाविकासआघाडीची आज महत्त्वाची बैठक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai MVA Meeting : महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक होणारेय. विधानसभा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्यानं मविआचं बैठकीचं सत्र अजूनही सुरूच आहे. त्यामुळे आज दुपारी 2 वाजता पुन्हा महत्त्वाची बैठक पार पडणारेय. बैठकीत जागावाटपाचा मुद्दा विदर्भावर येऊन थांबलाय. यावर तोडगा काढण्यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक होणारेय. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्ष दोघांनी दावा केलेल्या जागांवरचा तिढा अजून सुटलेला नाही. विदर्भातील जास्तीत जास्त जागा लढण्यावर काँग्रेस ठाम आहे. तर ठाकरे गटानंही विदर्भातील काही जागांवर दावा केलाय. त्यामुळे चर्चेचं गु-हाळ विदर्भाच्या मुद्द्यावर अडकलंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये खलबतं

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Amit Shah And Devendra Fadanvis Meeting : सागर बंगल्यावर काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. दोघांमध्ये जवळपास दीड तासाहून अधिक काळ चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री फडवणीस आणि अजित पवार यांच्यात जागा वाटपासंदर्भात ज्या काही बैठका झाल्या त्याचा आढावा अमित शहा यांनी यावेळी घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. भाजप अंदाजे किती जागा लढवू शकते या विषयी दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा झाल्याची माहितीही सूत्रांकडून मिळतेय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link