Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Sun, 06 Oct 2024-11:22 am,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 06 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • चेंबूरमध्ये घराला भीषण आग, 7 जणांचा होरपळून मृत्यू

     

    Mumbai Fire : मुंबईतील चेंबूरमध्ये एका दुमजली इमारतीला भीषण आग लागली... सिद्धार्थ कॉलनीत ही दुर्घटना घडली. या आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 7 वर्षांच्या मुलीचा आणि 10 वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवत घरातील लोकांना बाहेर काढलं. जखमींना राजावाडी रुग्णालताय दाखल करण्यात आलं. मात्र त्यातील सात जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. दिव्यामुळे ही आग लागल्याचा  प्राथमिक अंदाज आहे.. 

  • राज्यातील बाजार समितीत्या उद्या बंद राहणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    State Bajar Samiti Close : राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पुणे येथे राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी पदाधिकाऱ्यांचे म्हणून ऐकून न घेता काढता पाय घेतला. त्यामुळे मंत्री सत्तार तसेच शासनाच्या निषेधार्थ राज्यभरातील सर्व बाजार समिती सोमवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय . महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती संघांना याबाबत पत्रक जारी केलंय. नाशिक जिल्ह्यातील सर्व कांदा बाजार समिती बंद राहणार आहेत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पुण्यात भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune : पुण्यात भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यताये. कसबा विधानसभा जागेसाठी शहराध्यक्ष धीरज घाटे आणि पोटनिवडणुकीतील उमेदवार हेमंत रासने यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. यात आता कुणाल टिळकांनीही उडी घेतलीय. त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिलेत. नवरात्रीचे नवसंकल्प नावाने कसबा विधानसभेत टिळकांकडून कॅम्पेनिंग सुरू करण्यात आलंय. कुणाल टिळक कसबा विधानसभेच्या माजी आमदार दिवंगत नेत्या मुक्ता टिळकांचा मुलगा आहे. बॅनरबाजीच्या माध्यमातून कुणाल टिळकांनी विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे संकेत दिलेत. त्यामुळे भाजपसमोर तिढा वाढण्याची शक्यताये.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • हर्षवर्धन पाटील उद्या शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Indapur Harshwardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांचा उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहे. इंदापुरात त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे..  शरद पवार यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील पक्षात करणार प्रवेश करणार आहे. त्यानंतर शरद पवार यांची सभा होणार आहे.. सकाळी दहा वाजता पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी भाजपला मोठा धक्का दिलाय.. दत्ता भरणेंविरोधात विरोधात हर्षवर्धन पाटील यांना शरद पवार उमेदवार म्हणून घोषित करण्याची शक्यता आहे..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुंबईत उन्हाच्या झळा आणखी वाढणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Temprature : मुंबईकर सध्या उकाड्यापासून हैराण झाले. सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत उन्हाच्या झळा बसत आहेत.  उकाड्यातून सुटका होणे दूरच, उलट तो वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. मुंबईत पुढील 3–4 दिवस कमाल तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यताये. तसेच पावसाच्या हलक्या सरीदेखील कोसळण्याची शक्यताये.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • आमदार राजकुमार पटेल सोडणार कडूंची साथ?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Amravati Rajkumar Patel : प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांचा एकुलता एक आमदार कडूंची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल उद्या धारणीमध्ये कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी जोरदार बॅनरबाजी केलीय. या बॅनरवरून प्रहार संघटनेचं चिन्ह आणि बच्चू कडूंचा फोट गायब आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो छापण्यात आलाय. त्यामुळे राजकुमार पटेल एकनाथ शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगतेय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सोलापुरात तोतया IAS अधिकाऱ्याला अटक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Solapur : सोलापुरात तोतया उपजिल्हाधिका-याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. त्यानं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीचं आमिष दाखवून 3 जणांची 40 लाख रुपयांची फसवणूक केली. लातूरमध्ये 12वी पास झाल्यानंतर पवन पांढरेनं कामधंदा करण्यासाठी अक्कलकोटमध्ये मावशीकडे आला होता. नातेवाईकांना UPSC परीक्षा पास झालोय आणि सध्या सोलापुरात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असल्याची खोटी माहिती दिली. अक्कलकोट पोलिसांनी कारवाई करत पवन पांढरेला अटक केली. त्याच्याकडं भारत सरकारच्या कार्मिक एवं प्रशिक्षण विभागाचं ओळखपत्रही आढळलं. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

     

    Railway Mega block : देखभालदुरुस्ती आणि विविध अभियांत्रिकी कारणासाठी मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.. मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आलाय.

  •  ST च्या ताफ्यात लवकरच 5 हजार इलेक्ट्रिक बसेस

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    ST E-buses : ST च्या ताफ्यात लवकरच 5 हजार इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत.. या बसेस टप्प्याटप्प्याने येणार आहेत... यातील 100 बसेस दाखलही झाल्यात... ST महामंडळाचे अध्यक्ष आमदार भरत गोगावले यांनी याबाबत माहिती दिलीय... तसेच महामंडळ 2 हजार 200 डिझेल बसेसही खरेदी करणार आहे.. त्यामुळे प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळणारेय... तर राज्यातील बस स्थानकांच्या सुधारणेसाठी 110 कोटींची निविदा देण्यात आलीय... पुढील 4 दिवसात प्रसिद्ध होईल,  असं गोगावलेंनी यावेळी म्हटलंय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • संभाजीराजेंच्या नेतृत्वात पुणे ते गेट वे ऑफ इंडिया रॅली

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sambhajiraje Rally : चला अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला...अशी घोषणा देत संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्वात अरबी समुद्रात शोध घेतला जाणारे...आज संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्त्वात शिवभक्तांच्या उपस्थितीत पुण्यातून रॅली निघणार आहे.. त्यानंतर चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात येणारे असून गेट वे ऑफ इंडिया येथे ही रॅली पोहोचेल...त्यानंतर अरबी समुद्रात जावून शिवस्मारकाचा शोध घेण्यात येणार असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलंय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • रश्मी ठाकरे यांचा ठाणे दौरा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Thane Rashmi Thackeray : उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे ठाण्यातील देवीचं दर्शन घेणार आहे..  आज संध्याकाळी 4 वाजता त्या टेंभी नाक्यावरील दुर्गेश्वरी देवीचं दर्शन घेतील. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा रश्मी ठाकरे टेंभी नाक्याला जाऊन, दुर्गेश्वरी देवीचं दर्शन घेऊन आरती करतील. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याही मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहेत. आनंद दिघे यांनी 1978मध्ये टेंभी नाक्यावरील या नवरात्रौत्सवाची सुरुवात केली होती. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • लातूरमध्ये 30 ते 35 विद्यार्थिनींना विषबाधा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Latur Food Poisoning : लातूर शहरातील औसा रोडवर असलेल्या पुरणमल लाहोटी शासकीय मुलींच्या वस्तीगृहातील 30 ते 35 विद्यार्थिनींना विषबाधा झालीय. या वस्तीगृहात साडेतीनशेपेक्षा अधिक मुली राहतात. त्यातील जवळपास 170 मुलींना शासकीय रुग्णालयात हालवण्यात आलं. रात्री मुलींनी जेवण केल्यानंतर काही वेळातच मुलींना त्रास सुरू झाला. त्यानंतर तातडीने ही माहिती वस्तीगृह प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर शासकीय रुग्णालयाच्या 7 रुग्णवाहिका बोलावून जवळपास 170 मुलींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हालण्यात आले आहे. त्यातील 30 ते 35 जणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उर्वरित विद्यार्थ्यांना उपचार करून वस्तीगृहात परत पाठवण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून तीन रुग्णवाहिका वस्तीगृहा बाहेर स्टँड बाय ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी रुग्णालयात जात उपचारासाठी दाखल झालेल्या विद्यार्थिनींची विचारपूस केली.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link