State Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 07 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Latest Updates
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक
State Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची बैठक उद्या होणार आहे. मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात उद्या मंत्रिमंडळाची बैठक होईल. उद्या दुपारी साडेचार वाजता ही बैठक होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच आचारसंहिता लागू होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा धडाका सध्या महायुती सरकारकडून सुरु आहे. त्यामुळे उद्या होणा-या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय महत्त्वाचे निर्णय सरकार जाहीर करणार याकडे लक्ष लागलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
12 आमदारांबाबत याचिकेवरील सुनावणी संपली, हायकोर्टानं निकाल राखून ठेवला
Hearing on petition of 12 MLA : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या याचिकेवरची सुनावणी संपली असून, मुंबई हायकोर्टानं निकाल राखून ठेवला आहे. या प्रकरणी 23 ऑक्टोबरला हायकोर्ट निकाल देणार आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झालाय. दरम्यान निर्णय लागत नाही तोपर्यंत आमदारांच्या नियुक्त्या करता येणार नाहीत असं मागच्या सुनावणीत कोर्टानं स्पष्ट केलं होतं. तर आज झालेल्या सुनावणीतही कोर्टानं त्याचा पुनरुच्चार केला.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
शिक्षकांच्या मागणीसाठी सत्यजीत तांबेंच्या नेतृत्वात उपोषण
Satyajeet Tambe Andolan : शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आजी माजी आमदार आक्रमक.. आमदार सत्यजित तांबेंच्या नेतृत्वात मंत्रालयातील गांधी पुतळ्याजवळ उपोषण.. सत्याजीत तांबेंसोबत किशोर दराडे, किरण सरनाईक यांची उपस्थिती.. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीनियुक्त व नंतर झालेल्या 26 हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे.. अनुदानावर असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांना प्रचलित प्रमाणे पुढील टप्पा अनुदान देणे आणि त्रुटीमुळे समान टप्पा देण्याची मागणी.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
मुंबईत मविआच्या बैठकीला सुरुवात, जागावाटपासंदर्भात अंतिम चर्चा
Mumbai MVA Meeting : मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात.. जागावाटपासंदर्भात मविआ नेत्यांची बैठक.. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशमधील जागांबाबत अंतिम चर्चा.. -- मविआ नेत्यांसोबत भाजप आमदार लक्ष्मण पवारही ट्रायडंटमध्ये.. बैठकीसाठी नाना पटोले, संजय राऊत, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे,अनिल देशमुख उपस्थित.
'गणपतीचं विसर्जन केल्यानंतर उंदीर मामा राहिला', उत्तम जानकरांची दत्तात्रय भरणेंवर टीका
Uttam Jankar on Dutta Bharne : बारामतीत शरद पवारांनी दीड दिवसांचा गणपती बसवला होता. आता गणपती विसर्जन केलं. मात्र उंदीर मामा राहिला, अशी टीका उत्तम जानकरांनी दत्ता भरणेंवर नाव न घेता केलीय. इंदापूरच्या सभेत जानकरांनी भरणेंना टोला लगावला.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
'सुप्रिया सुळेंच्या विजयात अदृश्य सहभाग',हर्षवर्धन पाटलांचा गौप्यस्फोट
Harshvardhan Patil on Supriya Sule : 'लोकसभेत सुप्रिया सुळेंच्या विजयात अदृश्य सहभाग... इंदापूरच्या सभेत हर्षवर्धन पाटलांचा गौप्यस्फोट..3 वेळा खासदार झाल्या तेव्हाही सहभाग होता-पाटील...शरद पवार पक्ष प्रवेशावेळी हर्षवर्धन पाटलांचं विधान...पवार देतील ती जबाबदारी पार पाडणार-हर्षवर्धन पाटील
नागपुरात मनोरुग्णाकडून 2 जणांची हत्या
Nagpur Murder : नागपूर रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक सातवर एका मनोरूग्णाने तिथल्या लोकांवर हल्ला केला आहे. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. दोन गंभीर जखमी आहेत. मनोरुग्ण व्यक्ती लोकांच्या डोक्यावर वार करू लागला. रेल्वेच्या रुळाच्या लाकडी राफटरनं त्यानं हल्ला केला. यात तामिळनाडूच्या गणेश कुमार डी यांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या मृतकाची ओळख अद्याप पटलेली नाही... पळून जाणाऱ्या आरोपीला कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावर आरोपीचा पाठलाग करून आरोपीला पकडले...जयराम रामअवतार केवट आरोपीचे नाव
बातमीचा व्हिडीओ पाहा-
टाटा उद्योगसमुहाचे प्रमुख रतन टाटा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
Ratan Tata : टाटा उद्योगसमुहाचे प्रमुख रतन टाटा यांना ब्रीच कँडी रूग्णालयात केले दाखल...रतन टाटा यांच्यावर करण्यात येत आहेत उपचार...अस्वस्थ असल्याने रुग्णालयात दाखल...कमी रक्तदाबाचा त्रास असल्यानं रुग्णालयात दाखल
हर्षवर्धन पाटील यांच्या हाती 'तुतारी'
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हाती घेतलीय.. इंदापुरात हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश केलाय.. भव्यदिव्य सोहळ्यात हर्षवर्धन पाटलांनी पक्षात प्रवेश केलाय.. यावेळी शरदचंद्र पवार पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते..
'उद्धव ठाकरेंनी कोकणातील नेतृत्व संपवलं',रामदास कदमांची टीका
Ramdas Kadam On Uddhav Thackeray : शिवसेनेसाठी अनेक मराठी लोकांनी आपलं रक्त सांडलं. अनेक शिवसैनिकांच्या पत्नींचे कुंकू पुसले गेल्यात. मात्र त्याची माहिती उद्धव ठाकरेंना नसल्याची टीका रामदास कदमांनी पुन्हा केलीय.. कोकणी माणसांनी शिवसेना वाढवली आणि मोठी केलीय..मात्र त्याच कोकणातील नेतृत्व संपवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केल्याचा आरोप रामदास कदमांनी केकलाय.. ते रत्नागिरीतील कार्यक्रमात बोलत होते..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
दूध उत्पादक शेतकऱ्यांना खूशखबर !, गाईच्या दुधाला प्रती लीटर 5 रुपये अनुदान
Cow Milk Producer : धाराशिवमध्ये गाईच्या दुधाला शासनाने प्रती लीटर 5 रूपये अनुदान योजना लागू केलीय... जिल्ह्यातील एकूण 43 दुध प्रकल्पाचा यामध्ये सामावेश आहे.... या प्रकल्पाच्या अंतर्गत येणा-या दुध संकलन केंद्र आणि दुध पुरवठा करणारे दूध उत्पादक शेतकरी सभासद यांच्या खात्यावर आता प्रती लीटर 5 रुयये अनुदान जमा करण्यात येणारेय... लवकरच अनुदानाचे पैसे शेतक-यांच्या खात्यावर जमा होईल...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
पुण्यातील सामूहिक अत्याचार प्रकरण, आरोपींची माहिती देणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस
Pune Crime : पुण्यातील बोपदेव घाटात सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणा-याला दहा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं. आरोपीची माहिती देणाऱ्याला पुणे पोलिसांकडून हे बक्षीस देण्यात येणारेय. आरोपींचा शोध घेण्यासाठी AI तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येतेय. पोलिसांनी आत्तापर्यंत बोपदेव घाट परिसरात गेलेल्या तीन हजार मोबाइलधारकांची माहिती संकलित केली असून 200हून अधिक सराईतांचीही चौकशी करण्यात येणारेय. तसंच सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात येतंय. आरोपी बोपदेव घाटातून सासवडकडे गेल्याचा संशय आहे. मात्र आरोपींपर्यंत पोलीस अजूनही पोहोचू शकलेलं नाही
बातमीचा व्हिडीओ पाहा-
'8 दिवसात मविआचं जागावाटप होईल',जयंत पाटलांची माहिती
Jayant Patil On MVA Seat Sharing Formula : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय येत्या 8 दिवसात होईल,अशी माहिती जयंत पाटील यांनी दिलीय......सरकारमध्ये बसलेले लोक, ज्या पद्धतीने भेट वस्तू वाटतायत...ते पाहता दिवाळी सुखाची होणार असल्याचा. मिश्कील टोलाही त्यांनी लगावलाय...सांगलीच्या शिराळ्यातील शिवस्वराज्य यात्रेत पाटील बोलत होते.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
'राष्ट्रवादीमधील सर्वोच्चपद जयंत पाटलांना मिळणार', अमोल कोल्हेंचं मोठं विधान
Amol Kolhe On Jayant Patil : खासदार अमोल कोल्हेंनी मोठं विधान केलंय....शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील सर्वोच्चपद जयंत पाटील यांना मिळणार असल्याचं मोठं विधान अमोल कोल्हेंनी केलंय.. सांगलीतील सर्व उमेदवार निवडून आणा असं आवाहनही त्यांनी केलंय.. सांगलीतील शिराळ्यात शिवस्वराज्य यात्रेत अमोल कोल्हे बोलत होते..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
मुंबईतील भुयारी मेट्रो आजपासून धावणार
Mumbai Metro-3 opens today : मुंबईकरांचा भुयारी मेट्रोचा प्रवास आजपासून सुरू होत आहे. सकाळी 11 वाजता मुंबईतल पहिली भुयारी मेट्रो धावणारेय. कुलाबा-वांद्रे - सीप्झ भुयारी मेट्रो 3 या मार्गिकेतील आरे - BKC टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं. आजपासून हा टप्पा प्रवाशांसाठी सुरु होतोय. 1 दिवसासाठी आरे - BKC मेट्रो टप्पा सकाळी 11 ते रात्री साडे अकरा दरम्यान सुरू राहणारेय. तर मंगळवारपासून सकाळी साडे सहा ते रात्री साडे दहा या वेळेत आरे - BKC भुयारी मेट्रो सेवा उपलब्ध असणारेय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
राज ठाकरेंचा आज पुणे दौरा
Raj Thackeray : आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौ-यावर आहेत...राज ठाकरेंच्या नेतृत्वात पुण्यात बैठकांची मालिका असणारेय...मनसेच्या पश्चिम विभागाची बैठक सकाळी १० पासून सुरू होणारेय....पश्चिम विभागात असणाऱ्या सर्व जिल्ह्यातील मुख्य नेते, पदाधिकारी, उपस्थित राहणारेत...आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज महत्त्वाची बैठक असणारेय....दरम्यान दिल्लीत होणा-या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण राज ठाकरे यांच्या हस्ते आज होणारेय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
अजित पवार शिरुरमधून विधानसभा लढणार?
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार आगामी विधानसभा शिरूर मतदारसंघातून लढणार असल्याची माहिती सूत्रानं दिलीय. काही दिवासांपूर्वी अजित पवारांनी बारामतीतून निवडणूक न लढण्याचे संकेत दिले होते. जो उमेदवार देईन त्याला निवडणून द्या, असं आवाहनही त्यांनी एका सभेतून केलं होतं. त्यामुळे अजित पवार कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार? अशी चर्चा सुरू होती. अखेर अजित पवारांनी शिरूर मतदारसंघाची निवड केल्याची माहिती सूत्रानं दिलीय.
मुख्यमंत्री शिंदेंचा आज दिल्ली दौरा
CM Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज दिल्ली दौरा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.. अमित शाहांसोबत एकनाथ शिंदेंची बैठक होणार आहे.. या बैठकीत जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे.... तर देशातील 8 राज्यातील नक्षलग्रस्त भागाच्या मुख्यमंत्र्यांसोबत अमित शाहा चर्चा करणार आहे.. . 8 राज्य नक्षलग्रस्त भागाचा अहवाल अमित शाहांना देणार आहे
हर्षवर्धन पाटील आज तुतारी फुंकणार
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील आज शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. इंदारपुरात आज सकाळी 11 वाजता शरद पवारांच्या उपस्थित पक्षप्रवेश सोहळा पार पडणारेय. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटीलही उपस्थित राहणार आहेत. हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. त्यासाठी ते भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी शरद पवार पक्षात दाखल होत आहेत. आजच्या पक्षप्रवेश सोहळ्यात त्यांच्या उमेदवारीची घोषणा होऊ शकते. उमेदवारी जाहीर झाली तर इंदापुरातून दत्ता भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील अशी लढत रंगण्याची शक्यताये. सध्या इंदापूरमध्ये पक्षप्रवेश सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-