Akola Jai Malokar Case : मनसे पदाधिकारी जय मालोकार यांच्या मृत्यूला वेगळं वळण

Wed, 18 Sep 2024-6:41 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 18 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • जय मालोकार यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Akola Jai Malokar Case : आमदार अमोल मिटकरींच्या गाडी तोडफोड प्रकरणानंतर मृत्यू झालेले मनसे पदाधिकारी जय मालोकार यांचा मृत्यूला वेगळं वळण लागलं आहे. जय मालोकार यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला आहे. सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं, मात्र आता याला वेगळं वळण मिळाल्यानं खळबळ उडाली आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • राहुल गांधींबाबत वादग्रस्त विधानाप्रकरणी अनिल बोंडेंविरोधात गुन्हा दाखल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    FIR Against Anil Bonde : अमरावतीतील भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात बोंडेंविरोधात गुन्हा दाखल झालाय. राहुल गांधी यांच्या जिभेला चटके द्यावेत असं वादग्रस्त विधान अनिल बोंडे यांनी केलं होतं. त्यामुळे आक्रमक झालेल्या काँग्रेसनं बोंडेंवर कारवाईची मागणी करत, अमरावती पोलीस आयुक्तालयात थेट आयुक्तांच्या दालनात आंदोलन केलं होतं. त्यानंतर बोंडेंवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • केंद्रीय कॅबिनेटकडून एक देश,एक निवडणूक विधेयकाला मान्यता- वैष्णव

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    One Nation One Election Report : केंद्रीय कॅबिनेटने एक देश एक निवडणुकीचा प्रस्ताव आज स्वीकारल्याचं मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं... निवडणुकीसाठी होणारा खर्च, पोलीस बळाचा वेळ हे सर्व टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणालेत... दोन टप्प्यात हे लागू होणार असल्याचंही ते म्हणालेत... एका टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा तर दुसऱ्या टप्प्यात पहिल्या निवडणुकीनंतर 100 दिवसात ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद यासह इतर निवडणुका होतील असंही वैष्णव म्हणालेत... दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • 'शरद पवार सुप्रिया सुळेंनाच CM करणार', चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

     

    Chandrashekhar Bawankule on Sharad Pawar : शरद पवारांनी सुप्रिया सुळेंनाच मुख्यमंत्री करण्याची योजना आखली असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय. इतकंच नाही तर विश्वसनीय सुत्रांकडून मला ही माहिती मिळाली असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं... 

  • नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळले

     

    Nashik : नाशिक शहरात एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडालीये... आई वडिलांसह मुलीचा मृतदेह आढळून आल्यानं नाशिक शहर हादरलंय... मूळचे गौळणे गावचे मात्र पाथर्डी फाटा परिसरात हे सहाणे कुटुंब राहत होतं.. मात्र मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.. 

  • नाशिकमधील द्राक्ष बागायतदार अडचणीत

     

    Nashik Grape Growers : व्यापा-यांच्या फसवणुकीमुळे नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्ष बागायतदार शेतक-यांना तब्बल 500 कोटी रुपयांचं नुकसान झालंय.... गेल्या 2 दशकांपासून हा प्रश्न अद्याप सुटलेला नाहीये..... 

  • नागपुरात महायुतीत बंडखोरी?

     

    Abbha Pandey : पूर्व नागपुरात भाजपची डोकेदुखी वाढलीये.. भाजपसाठी सुरक्षित मानल्या जाणा-या पूर्व नागपुर मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आभा पांडे यांनी दावा केलाय.. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारालाही त्यांनी सुरुवात केलीये.. आता अजित पवारांनी सांगीतलं तरी माघार घेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलाय.. त्यामुळे या मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता आहे

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'सुप्रिया, रश्मी ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी सक्षम', वर्षा गायकवाडांचं वक्तव्य

     

    Varsha Gaikwad : महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली तर आनंद होईल असं मोठं विधान काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केलंय.. मविआत मुख्यमंत्रीपदसाठी अनेक महिला सक्षम आहेत.. सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांच्यासह काँग्रेसमध्येही काही महिला मुख्यमंत्री पदासाठी सक्षम असल्याचा दावाही त्यांनी केलाय..

  • उद्या आमदार अपात्रताप्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता 

     

    MLA Disqualification Case : आमदार अपात्रता प्रकरणी आजही सुनावणी होणार नाही...आज देखील प्रकरण नंबर १ ऐकलं जाणार असल्याने यावर सुनावणी होणार नाही..उद्या या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता

  • 'भाजपचा मुख्यमंत्री होणार असेल तर फडणवीसच', गिरीश महाजनांचं वक्तव्य

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Girish Mahajan on Devendra Fadnavis : भाजपचा मुख्यमंत्री होणार असेल तर देवेंद्र फडणवीसच असलील असं गिरीश महाजन म्हणालेत.. आमच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी एकच चेहरा आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस.. मात्र अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असं महाजन म्हणालेत.. मात्र आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्रजीच आहेत असं ते म्हणालेत.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • आमदार संजय गायकवाडांविरोधात दिल्ली पोलिसात तक्रार

     

    Sanjay Gaikwad on  Rahul Gandhi : आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केलीय.. राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काँग्रेसनं दिल्लीतील तुघलक रोड पोलिसात तक्रार दिलीय... केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू तरविंदर मारवाह यांच्यासह संजय गायकवाडांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय.. काँग्रेस नेते अजय माकन यांनी पोलिसात तक्रार दिलीय.. 

  • शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत आज  सुनावणी 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    MLA Disqualification Case : शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबतची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पार पडणार आहे.... ठाकरे आणि शरद पवारांचे वकील प्रकरण मेन्शन करणार असल्याची माहिती आहे... त्यानंतर आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी पार पडणार असल्याची माहिती आहे..... त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी निकाल लागणार का याची उत्सुकता लागली आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Union Cabinet Meeting Today  : केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक...पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक...सकाळी साडेदहा वाजता बैठकीचं आयोजन...बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार याकडे लक्ष 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • 'राहुल गांधींच्या जिभेला चटके द्यावे', खासदार अनिल बोडेंचं वादग्रस्त विधान

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Anil bonde on Rahul Gandhi : राहुल गांधींबाबत संजय गायकवाड यांच्यानंतर आता अनिल बोंडेंनी वादग्रस्त विधान केलंय राहुल गांधींची जीभ छाटू नये, त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवे असं खासदार अनिल बोंडे म्हणालते.. त्यामुळे आता त्यांच्या या विधानामुळे पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.

     

  • विदर्भात मविआतील जागावाटप निश्चित- सूत्र

     

    Maha Vikas Aghadi Seat Allotment : महाविकास आघाडीत विदर्भातील 50 टक्क्यांपेक्षा जास्त जागावाटप निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 32 जागांवर महाविकास आघाडीमध्ये एकमत झालंय. उर्वरित 30 जागांवर एकापेक्षा जास्त पक्षांनी दावा केल्यामुळे त्याच्यावर चर्चा सुरुय. तर 29 जागांवर एकाच पक्षाने दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

  • मुंबईत अजित पवार पक्षाची आज बैठक

     

    Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीचा स्ट्राईक रेटचा मुद्दा महायुतीत समोर आल्यानं आता अजित पवारांनी सावध भूमिका घेतल्याचं दिसतंय... विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आज मुंबईत बैठक होतेय... बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत.. आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट महायुतीत 80 जागा लढवण्यावर आग्रही असल्याची माहिती सूत्रानं दिलीय.. जागा वाटपाबाबत महायुतीत झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आमदारांसोबत चर्चा करणार आहेत. आमदारांकडून त्यांच्या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणारेय. प्रत्येक मतदारसंघाची परिस्थिती अजित पवार जाणून घेणार असल्याची माहितीही सूत्रानं दिलीय. तर अजित पवार गटाला 40 जागा मिळतील, प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिलीय. 

  • मुंबईत अजित पवार पक्षाची आज बैठक

     

    Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीचा स्ट्राईक रेटचा मुद्दा महायुतीत समोर आल्यानं आता अजित पवारांनी सावध भूमिका घेतल्याचं दिसतंय... विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आज मुंबईत बैठक होतेय... बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत.. आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट महायुतीत 80 जागा लढवण्यावर आग्रही असल्याची माहिती सूत्रानं दिलीय.. जागा वाटपाबाबत महायुतीत झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आमदारांसोबत चर्चा करणार आहेत. आमदारांकडून त्यांच्या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणारेय. प्रत्येक मतदारसंघाची परिस्थिती अजित पवार जाणून घेणार असल्याची माहितीही सूत्रानं दिलीय. तर अजित पवार गटाला 40 जागा मिळतील, प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिलीय. 

  • लालबाग राजाची विसर्जन मिरवणूक 20 तासांपासून सुरूच 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Lalbaugcha Raja Visarjan : लालबाग राजाची विसर्जन मिरवणूक सुरूच आहे...गेल्या 20 तासांपासून लालबागच्या राजाची...विसर्जन मिरवणूक सुरूच आहे...लालबागचा राजा गिरगाव चौपाटीत दाखल झाला..20 तासानंतरही भाविकांचा उत्साह सुरूच आहे..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • लेबनॉनमध्ये पेजरचा साखळी बॉम्ब स्फोट, 9 जणांचा मृत्यू

     

    Lebanon Blast : लेबनॉन तसंच सीरिया साखळी स्फोटांनी हादरून गेलं. 2 देशांत पेजरचे शेकडो स्फोट घडवण्यात आले. यामध्ये 9 जणांचा बळी गेला असून, तब्बल दोन हजार सातशेहून अधिक जण जखमी झालेत. मृतांमध्ये दहशतवादी संघटना हिजबुल्लाहच्या सदस्यांचाही समावेश आहे. तसंच एक मुलगीही ठार झाली असून, इराणचे राजदूत जखमी झाल्याचं सरकारी अधिका-यांनी सांगितलं. लेबनॉन तसंच सीरियाच्या काही भागांमध्ये पेजरद्वारे सलग स्फोट घडवले गेले. या घातपातप्रकरणी लेबनॉनच्या अधिका-यांनी इस्रायलवर संशय व्यक्त केलाय. इस्रायलनं रिमोट कंट्रोलच्या मदतीनं अत्याधुनिक पद्धतीनं स्फोट घडवल्याचा लेबनॉनचा आरोप आहे. यामुळे लेबनॉन सीमेवर तणाव वाढला असून, या प्रकरणी इस्रायलच्या लष्करानं कोणतीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. तर पेजर स्फोटात आपले 2 सदस्य ठार झाले असून इतर जण जखमी झाल्याची माहिती, हिजबुल्लाह दहशतवादी संघटनेच्या अधिका-यानं नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर दिली. 

  • अपात्रता प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

    शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची.. अपात्रता प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीआधी निकाल लागणार का याची उत्सुकता पाहायला मिळत आहे. 

  • राज ठाकरेंचा शैक्षणिक धोरणावर सवाल

    गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरू पदावरून डॉ. अजित रानडे यांना काढल्यानंतर राज ठाकरेंनी संतप्त प्रतिक्रीया दिली आहे. लोकांना अपमानित करणं हेच नवं शैक्षणिक धोरण आहे का असा सवाल राज ठाकरेंनी सरकारला विचारला आहे. 

     

  • मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस

    अंतरवाली सराटीत सहाव्यांदा जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगेंनी हे उपोषण सुरू केल आहे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे, सगे सोयरे अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करून अंमलबजावणी करावी, हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करण्याची मागणी जरांगेंनी केली आहे,  दरम्यान,मराठा आरक्षणाबाबत सरकार प्रामाणिक आहे. सरकारनं सहकार्याची भूमिका घेतल्यानंतर मराठा समाजानं देखील सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे,असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदें व्यक्त केल आहे. मुख्यमंत्र्यांना उत्तर देताना जरांगेंनी आता खडतर प्रवास सुरू झाल्याचं म्हटल आहे. त्याचबरोबर संधी दिली आता आरक्षणाची अंमलबजावणी करा असं आवाहनही जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link