Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Sat, 21 Sep 2024-6:11 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 21 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • पुण्यातील लोहगाव विमानतळाचे नामकरण होणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Lohgaon Airport will be renamed : पुण्यातील नुतनीकृत लोहगाव विमानतळाचे नामकरण जगद्गुरु संत तुकाराम महाराज विमानतळ असे करणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलीय. यासंदर्भातील प्रस्तावाला कॅबिनेटमध्ये मंजुरी देणार आणि त्यानंतर मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवणार, अशी माहितीही फडणवीसांनी दिलीय.
     

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक उद्याच होणार, मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

     

    Mumbai University Senate Election :  मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक उद्याच होणार...मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय...युवासेनेच्या याचिकेवर हायकोर्टाचा निकाल

  • 'सोयाबीन, कापसाला भाव द्या', देवेंद्र फडणवीसांची मागणी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Devendra Fadnavis : सोयाबीन आणि कापसाची हमीभावा पेक्षा जास्त दरानं खरेदी होणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिलीय.. .सोयाबीन आणि कापसाला अधिक दर मिळावा यासाठी होणाऱ्या कच्च्या तेलावरील ट्युटी वाढवा अशी मागणी फडणवीसांनी मोदींकडे केलीय.. यंदाच्या हंगामात सोयाबीन आणि कापसाची खरेदी हमीभावापेक्षा जास्त दरानं होईल असं वचनच फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींच्या साक्षीनं शेतकऱ्यांना दिलंय..आमच्या सरकारनं शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतल्याचं फडणवीस म्हणालते.. वर्ध्यात विविध विकास कामांचं भूमिपजून मोदींच्या हस्ते पार पडलं यावेळी फडणवीस बोलत होते..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • महायुतीतील तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mahayuti : महायुतीतील तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका...शिवसेनेकडून स्टँडिंग उमेदवारांना प्रथम संधी .. शिवसेनेकडून 100 ते 121 जागांची मागणी असल्याची सूत्रांची माहिती...शिवसेना उमेदवार निवडीत भाजपचा हस्तक्षेप नसणार असल्याची सूत्रांची माहिती.. सप्टेंबर अखेरपर्यंत जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचा महायुतीचा मानस...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • मविआच्या बैठकीत रस्सीखेच?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maha Vikas Aghadi Seat Allotment : जागावाटपाबाबत मुंबईतली मविआची महत्त्वाची बैठक संपली..आजच्या मविआच्या बैठकीत विदर्भातील विधानसभांच्या जागांवर चर्चा झाली....मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली... मविआची आतापर्यंत 200 विधानसभांच्या जागांवर चर्चा झाली..

     

  • जागावाटपाबाबत तिन्ही पक्षात समन्वय - संजय राऊत

     

    Sanjay Raut On Seat Shairng : जागावाटपाबाबत तिन्ही पक्षात कमालीचा समन्वय आहे. 100,  84, 04 असा कोणताही फॉर्म्युला ठरला नाही, असा खुलासा खासदार राऊतांनी केलाय.. जागावाटपावरील अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहनही राऊतांनी केलंय.

  • शिंदे, फडणवीसांविरोधात उमेदवार देणार - बच्चू कडू

     

    Bacchu Kadu : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांविरोधात उमेदवार उभे करून राज्यात 288 जागांवर निवडणुका लढवणार, अशी माहिती तिस-या आघाडीचे नेते आमदार बच्चू कडूंनी दिलीय. राज्यात तिस-या आघाडीचाच मुख्यमंत्री होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. 

  • मराठा समाजाला आरक्षण द्या - मनोज जरांगे

     

    Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण द्या.राजकारणाशी आम्हाला देणंघेणं नसल्याचा पुनरुच्चार जरांगेंनी केलाय.. अंतरवाली सराटीतल आमरण उपोषणाचा जरांगे यांचा आजचा पाचवा दिवस आहे.. यावेळी बोलतांना त्यांनी धनगर आणि मराठ्यांमध्ये काही लोकं भांडणं लावत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.. दरम्यान रात्री जरांगेंनी उपचार घेतलेत

  • अमित ठाकरेंची मुंबई विद्यापीठावर टीका

     

    Amit Thackeray : मुंबई सिनेटच्या निवडणुका स्थगित झाल्यानं मनसे नेते अमित ठाकरेंनीही त्यावर टीका केलीय.. मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले असल्याची टीका अमित ठाकरेंनी केलीय.. मुंबई विद्यापीठ प्रशासनाला लवकरच निवडणुकीचा चालवलेला हा खेळ बंद करण्याची सद्बुद्धी येवो, अशी अपेक्षा अमित ठाकरेंनी केलीय.. 

  • सिनेट निवडणुका घेण्याची सरकारमध्ये हिंमत नाही - संजय राऊत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Raut : मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यानं खासदार संजय राऊतांनी संताप व्यक्त केलाय. सिनेटच नव्हे तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेण्याची सरकारमध्ये हिंमत नाही, अशा शब्दांत संजय राऊतांचा सरकारवर निशाणा साधलाय. यावेळी त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंवर हल्लाबोल केला.

     

  • नितीन गडकरींचा राजकारणातील घराणेशाहीवर प्रहार

     

    Nitin Gadkari : नितीन गडकरींनी राजकारणातील घराणेशाहीवर प्रहार केलाय. सध्याचे राजकीय नेते बायको आणि पोरांना तिकीट मागतात. लोकांनी अशा घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर हे राजकारणी एका मिनिटात सरळ होतील, अशी रोखठोक प्रतिक्रिया गडकरींनी दिलीय.

  • राजकारणातील घराणेशाही नितीन गडककरींचा प्रहार

     

    Nitin Gadkari : नितीन गडकरींनी राजकारणातील घराणेशाहीवर प्रहार केलाय. सध्याचे राजकीय नेते बायको आणि पोरांना तिकीट मागतात. लोकांनी अशा घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर हे राजकारणी एका मिनिटात सरळ होतील, अशी रोखठोक प्रतिक्रिया गडकरींनी दिलीय.

  • राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची सुप्रीम कोर्टात याचिका

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Delhi : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुन्हा एकदा शरद पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली आहे. मात्र यामुळे आता राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टातील निकाल लागत नाही तोपर्यंत अजित पवार यांना नवीन चिन्ह द्या अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणात आता सुप्रीम कोर्ट का निर्णय देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    बातमी पाहा - ऐन विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांकडून अजित पवारांच्या पक्षाची कोंडी? सर्वोच्च न्यायलयात केली 'ही' मागणी

  • पुण्याहून सुटणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Railway : पुण्याहून सुटणाऱ्या रेल्वे रद्द करण्यात आल्यात.. दौंड ते मनमाड स्थानकांदरम्यान नॉन इंटरलॉकिंग चे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावर पुण्याहून धावणाऱ्या रेल्वे रद्द करण्यात आले आहेत.  23 सप्टेंबर पर्यंत पुण्याहून सुटणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्याचा परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर होणार असून प्रवाशांची अडचण होणार आहे. प्रवाशांनी गाड्यांचे नियोजन आणि वेळापत्रक बघूनच प्रवास करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सोलापूर ते पुणे थेट विमानसेवा सुरू होणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Solapur To Pune Flight Service : सोलापूरहुन पुण्याला येण्यासाठी थेट विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे सोलापूरहून पुण्याला अवघ्या 40 ते 45 मिनिटात पोहोचता येणार आहे. फ्लाय 91 या कंपनीमार्फत व्हायबिलिटी गॅप फंडिंग योजनेअंतर्गत ही सेवा सुरू केली जाणार आहे. हॅलो सोलापूर विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर सोलापूर मुंबई सेवा सुरू करण्याच्या आधी सोलापूर पुणे विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे.

     

  • वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील सूत्रधाराला अटक

     

    Pune : राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्याचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील सूत्रधाराला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आलंय.  प्रसाद बेल्हेकर असं या आरोपीचं नाव आहे... बेल्हेकरला न्यायालयात हजर केलं असता त्याला 24 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत... आंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली असून यात 2 अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.

  • सिनेट निवडणुकांवरुन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक

     

    Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका स्थगित केल्यावरुन आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षही आक्रमक झालाय.. पुन्हा एकदा लोकशाहीचा गळा घोटला गेला अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केलीय..  निवडणुकांना इतके घाबरलेले सत्ताधारी महाराष्ट्राने कधीच पाहिले नसतील असाही टोला लगावण्यात आलाय.. घाबरट सत्ताधाऱ्यांना इतकंच म्हणावसं वाटतं की, कोंबडं झाकलं तरी सूर्योदय व्हायचा तो होणारच असा सल्लाही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने दिलाय.

  • अभाविपचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा

     

    ABVP On Chief Minister Eknath Shinde : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आल्यावरुन आता राजकारण तापलंय.. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सिनेट निवडणुकीवर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय..राजकीय स्वार्थासाठी मुख्यमंत्र्यांनी निवडणूक पुढे ढकलल्याचा आरोप अभाविपने मुख्यमंत्र्यांवर केलाय.. अभाविपच्या कोकण प्रांताचे प्रदेशमंत्री संकल्प फळदेसाई यांनी हा आरोप केलाय. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीसाठी आता अभाविप राज्यपालांकडे दाद मागणार आहे.. अभाविपच्या कोकण प्रांताचे प्रदेशमंत्री संकल्प फळदेसाई यांनी हा आरोप केलाय.

  • मनोज जरांगेंचा पोलिसांवर आरोप

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Manoj Jarange On Police : मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवसा आहे.. रात्री त्यांना पुन्हा भोवळ आली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केलीय... तर रात्री जरांगेंनी शंभूराज देसाई यांच्याशी फोनवरून संवाद साधून पोलिसांकडून मराठा समाजाच्या लोकांना रोखलं जात असल्याचा आरोप केलाय.. लाखो मराठा बांधव आंतरवाली सराटीत भेटण्यासाठी येतायेत मात्र पोलिसांकडून त्यांना अडवलं जात असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. तसेच पोलीस जातीयवादी असून त्यांचं निलंबन करण्याची मागणी जरांगेंनी केलीय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी घेतले उपचार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली त्यामुळे त्यांना उपचार घेण्याची विनंती सरकारनं केलीय.. सरकारच्या विनंतीनंतर जरांगेंनी रात्री सलाईन घेऊन उपचार घेतलेय.. आज सरकार निर्णय घेणार असल्याचं आश्वासन मंत्री शंभुराज देसाई यांनी जरांगेंना त्यानंतर जरांगेंनी उपचार घेतलेय.. रात्री 2 वाजता जरागेंनी उपचार घेतल्यानं आंतरवाली सराटीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link