Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Mon, 23 Sep 2024-12:07 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 23 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • काँग्रेस नेते सुनील केदार यांना धक्का

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nagpur Sunil Kedar : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांचे अपील सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फेटाळलं आहे. त्यामुळे बँक घोटाळ्यातीली रक्कम आरोपींकडून वसूल करण्याची प्रक्रिया यामुळे पुढे जाणार असल्याची माहिती आहे.. सहकार कायद्यातील कलम 88 अन्वये घोटाळ्याची रक्कम आरोपींकडून वसूल करण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू करण्यात आली होती... त्या विरोधात केदार यांनी सहकार मंत्री या नात्याने दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर अपील केले होते..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सिनेट निवडणूक अराजकीय झाल्या पाहिजे - आशिष शेलार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ashish Shelar On Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुका अराजकीय झाल्या पाहिजे, अशी भूमिका भाजप नेते आशिष शेलारांनी मांडलीय. उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार मालकाचे हित जोपासणारे आहेत, असा हल्लाबोलही शेलारांनी केलाय. निवडणुकीत राजकीय झेंडा नको. यासंदर्भात कुलगुरुंकडं विनंती करणार असल्याचं शेलार म्हणाले.

     

  • डोंबिवलीत वरुण सरदेसाईंचे बॅनर चर्चेत

     

    Dombivli Varun Sardesai : शिवसेना ठाकरे पक्षातील युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने डोंबिवलीतील स्टेशन परिसरात वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आलेत. या बॅनरवर सरदेसाई यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख करण्यात आलाय.... वरूण सरदेसाई हे मुळचे डोंबिवलीकर असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षाकडून वरूण डोंबिवलीतून विधानसभा लढवणार का? अशी चर्चा सर्वत्र होऊ लागलीय. 

  • बारामतीत 'बॅनर वॉर'

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Baramati Ajit Pawar : बारामतीत बॅनर वॉर सुरू झालंय.. रविवारी सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर शहरात लागले होते त्यातच आता आज अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आलेत.. ईद-ए-मिलाद निमित्तानं अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावण्यात आलेत.. त्यामुळे अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावण्यात आल्यानं शहरात पुन्हा बॅनर वॉर सुरू झाल्याचं बोललं जातंय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • बुद्धिबळ ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Chess Olympiad 2024 : बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2024 मध्ये 97 वर्षांच्या इतिहासात भारताने सुवर्णपदक जिंकलंय..मेन्स आणि वुमेन्स टीम इव्हेंटमध्ये भारताने सुवर्णपदकाला गवसणी घातलीये... भारतीय खेळाडू डी. गुकेश याने अंतिम फेरीत उत्तम कामगिरी करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलंय..त्याने  अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाचा पराभव केलाय.. पंतप्रधान मोदींनीही ट्विट करून डी. गुकेशचं कौतुक केलंय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंना सूचक सल्ला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Raigad : सुनील तटकरेंनी कर्जत विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा केला, या दाव्याला उत्तर देताना कोणी कुठेही दावा करू नये. आम्ही वरिष्ठ एकत्र बसून तोडगा काढू असा सूचक सल्ला गोगावलेंनी तटकरेंना दिलाय. त्याच वेळी गोगावले यांनी रायगडमधील महायुतीचं जागावाटपही जाहीर करून टाकलं. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • भंडाऱ्यातील 3 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Bhandara Villege : साकोली तालुक्यातील देवरी, सायगाव आणि सानगाव या गट ग्रामपंचायतीनं आगामी निवडणुकीवर बहिष्कार घातलाय.. तसा ठरावचं या ग्रामपंचायतीन केलाय..  गावांचा विकास झाला नाही. पक्के रस्ते नसल्यानं निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय. भावी मुख्यमंत्री म्हणून नाना पटोले यांच्याकडे पाहिलं जातंय.. असं असतांना त्यांच्या साकोली मतदार संघातच विकास होत नाही तर इतर भागाचा विकास कसा होणार असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय..  एकिकडे देश अमृत महोत्सव साजरा करतोय व सानगाव येथे जाण्यासाठी अजूनही पक्का रस्ताच नाही... गावात जाण्यासाठी अजूनही बस नाहीये.. पक्के रस्ते नसल्यानं पावसाळ्यात तर ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागतेय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • नाना पटोलेंना मुख्यमंत्रिपद मिळावं - विकास ठाकरे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nagpur Vikas Thackeray : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना मुख्यमंत्रिपद मिळालं नाही तर ते पद हिसकावून घेऊ, असं विधान काँग्रेस नेते विकास ठाकरेंनी केलंय. पटोलेंनी लोकसभा निवडणुकीत चांगले निर्णय घेतले. त्यांनी मेहनत घेतली. त्यामुळे आज काँग्रेसला अच्छे दिन आलेत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद मिळावं असं विकास ठाकरे म्हणालेत. तर कार्यकर्त्यांची मागणी ही स्वाभाविक आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिलीय. दरम्यानं विकास ठाकरेंच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • हायकोर्टाच्या नव्या संकुलाचं आज भूमिपूजन

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai High Court New Building : उच्च न्यायालयाच्या नव्या संकुलाचं आज भूमिपूजन होणारेय. वांद्रे पूर्व इथल्या शासकीय वसाहतीमधील जमिनीवर उच्च न्यायालयाच्या नव्या नियोजित संकुलाची आज पायाभरणी होणारेय.. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या प्रमुख उपस्थितीत नव्या संकुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणारेय. नव्या इमारतीत न्यायालयीन खोल्या, न्यायाधीश आणि नोंदणी कर्मचाऱ्यांसाठी चेंबर्स, वकील चेंबर्स, सभागृह, ग्रंथालय याबरोबरच बँकिंग सुविधा, वैद्यकीय सुविधा, कॅफेटेरिया, कार पार्किंग, संग्रहालय अशा विविध सोयीसुविधा उपलब्ध असतील. त्याचबरोबर दिव्यांगांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा या इमारतीत असतील.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • इम्तियाज जलील यांची संभाजीनगर ते मुंबई तिरंगा रॅली

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sambhajinagar Imtiyaz Jaleel : आम्ही मुंबईला जाणारच, आम्हाला कोणी रोखू शकत नाही अशी ठाम भूमिका, MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी संभाजीनगरमध्ये मांडली. आज ते संभाजीनगर ते मुंबई तिरंगा रॅली काढणारेत.  मुस्लीम धर्मगुरूंबाबत वादग्रस्त विधानं करणा-यांवर कारवाई करावी या मागणीसाठी आपण मुंबईला जात असल्याचं इम्तियाज जलील यांनी सांगितलं. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • मराठा समाजाकडून लातूर, धाराशिव, नांदेड बंदची हाक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Latur, Dharashiv, Nanded Close : मनोज जरांगेंचं जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरूच आहे. उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. जरांगेंच्या समर्थनार्थ आज लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्हा बंदची हाक देण्यात आलीय. सकल मराठा समाजानं हा बंद पुकारलाय. मराठा आरक्षण, सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि हैदराबाद गॅझट लागू करण्याच्या मागणीसाठी जरांगेंचं उपोषण सुरूये. जरांगेंच्या मागण्या मान्य करून उपोषण सोडवावं, अशी मागणी सकल मराठा समाजानं केलीय. जरांगेंना समर्थन देण्यासाठी लातूर, धाराशिव आणि नांदेड बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व विभाग बंद राहणार आहे. तिन्ही जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, बाजार समिती, मार्केट हे सर्व बंद ठेवण्यात येणार आहे

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rain Alert : राज्यात आठवडाभर विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय.. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर असणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.. ऐन सुगीत पाऊस पडणार असल्यानं शेतीसाठी नुकसानकारक आहे. त्यामुळे खरिबातील शेतमालाचं नुकसान होण्याचा अंदाज आहे.. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानं पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.. 

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link