Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Tue, 24 Sep 2024-10:21 pm,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 24 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • अक्षय शिंदेच्या वडिलांनी हायकोर्टात धाव

     

    Akshay Shinde Encounter Case : बदलापूरचा आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. एन्काऊंटर बनावट असल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केलाय. तसंच आपल्या जिवालाही धोका असल्याचं त्यांनी हायकोर्टाला सांगितलं.. यासाठी पोलीस संरक्षणाची मागणी त्यांनी केलीये. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर त्यांनी ही भूमिका मांडली. त्यावर तुम्ही रितसर याचिका दाखल करा आम्ही तुमचं म्हणणं ऐकून घेऊन असं न्यायमूर्तींनी स्पष्ट केलं. त्यामुळे अक्षयच्या वडिलांकडून उद्याच यासंदर्भात याचिका दाखल होण्याची शक्यता आहे. 

  • अक्षय शिंदेचा मृतदेह उद्या नातेवाईक ताब्यात घेणार

     

    Akshay Shinde Encounter Case : बदलापूरचा आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन मुंब्रा पोलीस कळव्यामध्ये पोहोचले. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अक्षय शिंदेचा मृतदेह ठेवलाय. अक्षय शिंदेचा मृतदेह त्याचे नातेवाईक उद्या सकाळी 11 वाजता ताब्यात घेतील. त्यानंतर त्याच्यावर बदलापूरमध्ये अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिलीये. दरम्यान मुंबईतील जे जे रुग्णालयात पोस्टमार्टेमची प्रक्रिया दुपारी पूर्ण झाली. जे जे मधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून पोस्टमार्टेम करण्यात आलं. त्यावेळी त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आलं. तसंच अक्षय शिंदेचे फिंगर प्रिंट्सही घेण्यात आले. पोस्टमार्टेम झाल्यानंतर मुंब्रा पोलीस त्याचा मृतदेह घेऊन कळव्यात पोहोचले. 

  • अक्षय शिंदेचा मृत्यू अति रक्तस्त्रावानं

     

    Akshay Shinde Encounter Case :अक्षय शिंदेचा मृत्यू अती रक्तस्त्रावाने... शवविच्छेदन अहवालात झाला उलगडा...अक्षय शिंदेच्या डोक्याला एक गोळी लागल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद...प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांना सुपूर्द...7 तास सुरू होत शवविच्छेदन...संपूर्ण प्रक्रियेचं करण्यात आली व्हिडिओग्राफी..5 डॉक्टरच्या पॅनलने केलं शवविच्छेद

  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची दिल्लीवारी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची दिल्लीवारी...आज रात्री पटोले दिल्लीला जाणार...दिल्लीत विधानसभा जागावाटपावर चर्चा होणार..मविआ जागावाटपात काँग्रेसचा 110-115 जागांवर दावा 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • महायुतीला विदर्भात 45चं टार्गेट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Amit Shah : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीनं कंबर कसलीय.. प्रत्येक बूथवर 10 टक्के मतं वाढवा अशा सूचना,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागपुरात भाजप पदाधिका-यांना केल्या. विदर्भातील 45 जागांचं टार्गेट कार्यकर्त्यांना शाहांनी दिलंय.. बूथवर जावून काम करावं लागणार, कार्यकर्त्यांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही, अशा कानपिचक्याही त्यांनी यावेळी दिल्या. कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आपापसात वाद करु नये.. अंतर्गत गटबाजी संपवण्याचा महत्त्वाचा कानमंत्र अमित शहांनी दिला.. अमित शाह आजपासून 2 दिवस महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत.. तर नागपूरची बैठक प्रत्येक भाजप कार्यकर्त्यासाठी विजयाची नांदी असल्याची प्रतिक्रिया, राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी दिली.

     

  • मीनल खतगावकर नांदेडच्या नायगाव मतदारसंघातून इच्छुक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Meenal Khatgaonkar : नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस नेत्या डॉक्टर मीनल खतगावकरांनी पक्षाकडं विधानसभेची अधिकृत उमेदवारी मागितली. मीनल खतगावकर नांदेडच्या नायगाव विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यांचा विश्वासूनं त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल केलाय. यावेळी, उमेदवारीसाठी असणारी पक्षनिधी म्हणून 10 हजार रुपये अर्जासमवेत भरले आहेत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • 'आरोपीसाठी श्रद्धांजली सभा आयोजित करतील', श्रीकांत शिंदेंची टीका

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Shrikant Shinde : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावरून खासदार श्रीकांत शिंदेनी विरोधकांवर सडकून टीका केलीये...विरोधक रेलरोको करून बदलापूर घटनेतील आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी करत होते. मात्र आता आरोपीचा मृत्यू झाल्यावर विरोधकांना सुतक का लागतंय? काही दिवसांनी हेच विरोधक त्याची श्रद्धांजली सभाही आयोजित करतील असा घणाघात श्रीकांत शिंदेंनी विरोधकांवर केलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • अक्षय शिंदे इन्काऊंटर प्रकरण, CIDचं पथक मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल

     

    Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदे इन्काऊंटर प्रकरणाचा तपास करण्यासाठी CIDचं पथक मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल..  CIDकडून इन्काउंटर प्रकरणाचा तपास सुरु

  • 'CMसोबत एन्काऊंटर स्पेशालिस्ट फिरतात', संजय राऊतांचा आरोप

     

    Sanjay Raut vs Naresh Mhaske : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसबोत जामिनावर सुटलेले निवृत्त एन्कऊंटर स्पेशालिस्ट फिरतात त्यांची या प्रकरणात भूमिका काय? असा सवाल संजय राऊतांनी केलाय. असे अनेक पोलीस जखमी झालेले बघितलेत, अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिलीय. तर राऊतांची ही भूमिका दुटप्पी आहे, अशी टीका खासदार नरेश म्हस्केंनी केलीय.

  • नागपूरच्या शंकरनगरमध्ये मेट्रो बंद पडली

     

    Nagpur Metro : नागपूरच्या शंकरनगर मेट्रो स्टेशनजवळ मेट्रो बंद पडली..शंकर नगरकडून सीताबर्डीकडे जाणाऱ्या मार्गावर काही तांत्रिक कारणांमुळे मेट्रो बंद पडली...बंद पडलेल्या मेट्रोमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलेय.. aqua मार्गावरील मेट्रो सेवा विस्कळीत झाली असून उशिराने धावत आहे

  • अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा तपास CIDकडे

     

    Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदे एन्काऊटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे...सीआयडी अधिक्षक, नवी मुंबई हे तपासाचे प्रमुख असणार...सीआयडीचे पथक आजच ठाण्यात दाखल होणार...अक्षय शिंदेबाबत दोन स्तरावर चौकशी हईल- सीआयडी चौकशी व न्यायालयीन चौकशी

  • 'अक्षय शिंदेला संपवून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न', सुषमा अंधारेंचा आरोप

     

    Sushma Andhare : बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेला संपवून हे प्रकरण संपवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असा जोरदार हल्लाबोल ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केला. अक्षय शिंदे गतीमंद होता, असं बदलापूर पोलिसांनीच सांगितलं होतं तर मग त्याने चपळाईनं गोळीबार कसा केला, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. एन्काऊंटर करणारे संजय शिंदे यांची कारकीर्द वादग्रस्त आहे, असंही अंधारेंनी म्हटलं आहे. 

  • Sanjay Shinde Vs Naresh Mhaske : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसबोत जामिनावर सुटलेले निवृत्त एन्कऊंटर स्पेशालिस्ट फिरतात त्यांची या प्रकरणात भूमिका काय? असा सवाल संजय राऊतांनी केलाय. असे अनेक पोलीस जखमी झालेले बघितलेत, अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिलीय. तर राऊतांची ही भूमिका दुटप्पी आहे, अशी टीका खासदार नरेश म्हस्केंनी केलीय.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा 

  • शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी हालचाली

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Shivaji Maharaj Statue : मालवणमधील राजकोट किल्ल्यावर शिवाजी  महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्यात.. राजकोट किल्ला येथे नव्याने शिवपुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने 20 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.  सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा प्रक्रिया काढण्यात आलीय... किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळ्यानंतर संतप्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सरकारनं शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्यात..

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • सरकारला कुणाला वाचवायचं आहे ? - सुषमा अंधारे

     

    Sushma Andhare : बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेला संपवून हे प्रकरण संपवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असा जोरदार हल्लाबोल ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केला. अक्षय शिंदे गतीमंद होता, असं बदलापूर पोलिसांनीच सांगितलं होतं तर मग त्याने चपळाईनं गोळीबार कसा केला, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. एन्काऊंटर करणारे संजय शिंदे यांची कारकीर्द वादग्रस्त आहे, असंही अंधारेंनी म्हटलं आहे. 

  • अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर झाला का? - संजय शिरसाट

     

    Sanjay Shirsat On Encounter : आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलंय.. आरोपी अक्षय शिंदेचं एन्काऊंटर झालं का? पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या का? याची चौकशी व्हावी असं संजय शिरसाट म्हणालेत.. विरोधकांनी याचं राजकारण करू नये असंही संजय शिरसाट म्हणालेत...

  • आरोपीचा मेडिकल रिपोर्ट जाहीर करावा - प्रकाश आंबेडकर

     

    Prakash Ambedkar : शासनानं आरोपीचा मेडिकल रिपोर्ट जाहीर करावा, अशी मागणी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलीय. तसंच आरोपीला गोळी कुठे लागली होती, याची खरी माहिती जनतेसमोर आणा, असंही आंबेडकरांनी म्हटलंय. अक्षय शिंदेगोळीबाराप्रकरणी आंबेडकरांनी ही प्रतिक्रिया दिलीये. 

  • राज्यात पोलीस सुरक्षित आहेत का? - सुप्रिया सुळे

     

    Supriya Sule : आरोपीचे दोन्ही हात बांधले असताना त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला?, असा सवाल सुप्रिया सुळेंनी केलाय. पोलिसांची बंदुक घेऊन आरोपीने पोलिसांना जखमी केलं, यावरून मला पोलिसांची काळजी वाटते, अशी प्रतिक्रिया सुळेंनी दिलीये. तसंच महाराष्ट्रात पोलीस सुरक्षित आहेत का? याचं उत्तर गृहमंत्र्यांनी द्यावं असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.

  • आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

     

    Aaditya Thackeray Tweet : बदलापूर एन्काऊंटरच्या घटनेनंतर आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. बदलापूर शाळेचं विश्वस्त कुठं आहे? सरकार त्यांना का पाठिशी घालतंय?' असा सवाल आदित्य ठाकरेंनी एक्स या सोशल मीडियावरून केलाय. शाळेचं विश्वस्त हे भाजपशी संबंधीत असल्याचा आरोपही आदित्य यांनी केलाय.

  • आशिष शेलारांना प्रिया दत्त यांचं आव्हान?

     

    Priya Dutt : मुंबई उत्तर मध्यच्या माजी खासदार प्रिया दत्त वांद्रे पश्चिममधून लढण्याची शक्यता आहे. प्रिया दत्त यांनी निवडणूक लढवावी असा वर्षा गायकवाड यांचा आग्रह असल्याची चर्चा आहे. वर्षा गायकवाड यांनी नुकतीच प्रिया दत्त यांची भेट घेतलीय. भाजपचे आशिष शेलार वांद्रे प्रश्चिमचे विद्यमान आमदार आहेत. प्रिया दत्त निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास शेलार विरुद्ध प्रिया दत्त सामना रंगण्याची शक्यता आहे. 

  • पंढरपूरमध्ये धनगर समाजाची आज बैठक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pandharpur : पंढरपुरात आज धनगर समाजाची बैठक पार पडणारेय. आरक्षणासाठी पुकारलेल्या उपोषणाचा आज 16 वा दिवस आहे.  धनगर आणि धनगड हे एकच आहेत. यासंदर्भात 7 दिवसांमध्ये अध्यादेश काढू, असं आश्वासन राज्य सरकारनं दिलं होतं. तर खिलारे कुटुंबाचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार होतं.  होते. ही मुदत संपलीय. सरकारनं याबाबत निर्णय घेतला नाही. यापार्श्वभूमीवर आज बैठक होणारेय. या बैठकीतून पुढील भूमिका स्पष्ट केली जाणारेय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • एन्काऊंटर प्रकरणातील व्हॅनची फॉरेन्सिक टीमकडून तपासणी

     

    Akshay Shinde : ज्या पोलीस व्हॅनमध्ये अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला होता. त्या व्हॅनचा तपासणी केली जातेय. फॉरेन्सिक टीमकडून ही तपासणी सुरुये. पोलिसांनी स्वंरक्षणात अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केलाय. ही व्हॅन सध्या ठाण्यामध्ये आहे. तिची तपासणी केली जातेय. 

  • बदलापूर प्रकरणातील पोलिसांना बक्षीस जाहीर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Akshay Shinde : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणातील पोलिसांना शर्मिला ठाकरेंनी 51 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय, अशी माहिती मनसे नेते अविनाश जाधवांनी केलीय. दोन पोलिसांना प्रत्येकी 51 हजारांचं बक्षीस दिलं जाणारेय. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज ठाकरेदेखील या जखमी पोलिसांची भेट घेणार असल्याची माहितीही जाधवांनी दिलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादात उंदीर?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Siddhivinayak Temple : आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील बालाजी मंदिरातील लाडूंमध्ये जनावरांची चरबी असल्याचा आऱोप झाल्यानंतर आता सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादावरही प्रश्न उपस्थित होताय. कारण मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादात उंदराचे पिल्ले सापडल्याचा आऱोप होतोय.. तसा व्हिडीओ सध्या व्हायरलं होतोय... त्यामुळे सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या शुद्धतेवर प्रश्चिचिन्ह निर्माण झालंय.. मात्र दुसरीकडे सिद्धीविनायक प्रशासनानं आरोप फेटाळलेत. मंदिरातील प्रसाद शुद्ध असल्याचा दावा मंदिर प्रशासनाकडून करण्यात येतोय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • नरहरी झिरवाळांचा आंदोलनाचा इशारा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Narhari Zirwal : नरहरी झिरवाळांनी आता थेट सरकारलाच इशारा दिलाया. धनगर समाजासाठी एका दिवसांत दोन बैठका घेतल्या जातात मात्र आदिवासी समाजाला अंधारात ठेउन सरकार निर्णय घेतंय, असा आरोप झिरवाळांनी सरकारवर केलाय. कायदा-सुव्यवस्था बिघडू नये हे आम्हीच का समजून घ्यायचं? असा सवालही झिरवाळांनी केलाय. आता परवानगी मागू. परवानगी दिली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिलाय. दरम्यान, आदिवासी समाजाच्या आरक्षणासंदर्भात मुंबईत झालेल्या बैठकीत झिरवाळांनी ही आक्रमक भूमिका घेतली.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • डॉ. अजित रानडेंना हायकोर्टाकडून दिलासा कायम

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Dr. Ajit Ranade : पुण्याच्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अजित रानडेंना हायकोर्टानं दिलासा कायम ठेवलाय. रानडेंना कुलगुरू पदावरून न हटविण्याचे आणि त्यांच्या जागी अन्य कोणाचीही नियुक्ती न करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिलेत. या प्रकरणी आता 25 सप्टेंबरला सुनावणी होणारेय. दरम्यान, कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात रानडेंनी हायकोर्टात याचिका दाखल केलीय. त्यावर ही सुनावणी होणारेय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे... कोकण, विदर्भ, मराठवाड्यात तुफान पाऊस पडण्याचा अंदाज आहे.. बंगालच्या उपसागरात हवेची चक्रीय स्थिती निर्माण झालीय.. त्यामुळे राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.. पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे....

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुंबई विद्यापीठ सिनेटसाठी आज मतदान

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेटसाठी आज मतदान पार पडणार आहे.. सिनेटसाठी 28 उमेदवार रिंगणात असणार असल्याची माहिती आहे.. तर 27 सप्टेंबरला निकाल लागणार आहे.. ठाकरे गटाची युवासेना आणि अभाविपमध्ये थेट लढत होणार आहे... युवासेना आणि अभाविपाच्या प्रत्येकी 10 उमेदवारांमध्ये सामना रंगणार असल्याची माहिती आहे...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • महायुतीच्या जागावाटपाचा आज अंतिम निर्णय?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mahayuti Meeting : अमित शाहांच्या संभाजीनगर दौ-याच्या पार्श्वभूमीवर आज संभाजीनगरमध्ये दोन बैठका होणार आहे. पहिली बैठक ही भाजपच्या मतदारसंघ निहाय आढाव्याची असणार आहे. तर त्यानंतर दुसरी बैठक ही महायुतीची होणार आहे. अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे या बैठकीला हजर असणार आहेत. संध्याकाळी सव्वा सहाच्या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ,संभाजीनगरमध्ये दाखल होणार आहेत. आणि रमा हॉटेलमध्ये महत्त्वाच्या बैठका होणार आहेत. या बैठकीत महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यताय.

     

  • अमित शाह 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Amit Shah Maharashtra Tour : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. अमित शाहा आजपासून 2 दिवस महाराष्ट्रात असणार आहेत. यामध्ये आज ते नागपूर, संभाजीनगरमध्ये बैठका घेतील. तर उद्या नाशिक, कोल्हापूरमध्ये त्यांच्या बैठका असणार आहेत. लोकसभेत विदर्भातून कमी जागा मिळाल्या असल्यानं आगामी विधानसभा निवडणूक पाहता कार्यकर्त्यांना कान मंत्र तर काहींची कान उघडणी होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.  सुरेश भट सभागृहात होणा-या बैठकीत विदर्भातील 62 विधानसभा मतदारसंघातील पदाधिका-यांची पक्षसंघटनात्मक बैठक होणार आहे.1500 पदाधिकारी या बैठकीत असतील अशी माहिती आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link