Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Wed, 25 Sep 2024-10:52 am,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 25 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • मेट्रो - 3 मार्गिका लवकरच सुरू होणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Metro-3 : मेट्रो 3 मार्गिकेतील आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा लवकरच मुंबईकरांसाठी खुला करण्यात येणार आहे...  मुंबईच्या वाहतुकीच्या दृष्टीने हा मेट्रो मार्ग महत्त्वाचा ठरेल...   लाखो प्रवाशांना दळण वळणाच्या उत्तमोत्तम सोयीसुविधा आणि सुलभता ही या मेट्रोमुळे उपल्ब्ध होईल...  तर आरे येथे एक ग्रेड टर्मिनस स्टेशन उभारण्यात आलंय... या मेट्रोचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे ही मेट्रो  मोटरमन शिवाय धावणार आहे... तसेच मेट्रोच्या स्थानकांवर इंडिकेटर, एक्सलेटर, CCTV यांसारख्या सुविधा असणार आहे.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अमित शाहांचा आज नाशिक आणि कोल्हापूर दौरा

     

    Amit Shah : अमित शाहांच्या महाराष्ट्र दौ-याचा दुसरा दिवस आहे. आज अमित शाह नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. दुपारी पावणेतीन वाजता अमित शाह नाशिकमध्ये येणार आहे. त्यांची डेमोक्रेसी हॉटेलमध्ये बैठक होणार आहे.. नाशिक विभागाच्या 47 जागांचा अमित शाहा आढावा घेणार आहे.. तर त्यानंतर संध्याकाळी अमित शाहा कोल्हापुरात बैठक घेणार आहे.. पश्चिम महाराष्ट्र विभागीय पदाधिकाऱ्यांची अमित शाहा बैठक घेणार आहे.. 

  • मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट

     

    Pune Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौ-यावर  येणार आहेत.. मोदींच्या हस्ते पुण्यात विविध विकासकामांचं भूमिपूजन होणार आहे. तसंच सभाही आयोजित करण्यात आलीये.. मात्र मोदीच्या उद्याच्या दौ-यावर पावसाचं सावट आहे.. कारण हवामान खात्याकडून पुण्यात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय... त्यामुळे मोदींच्या सभेसाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे...

  • राज्यातील प्राथमिक शिक्षकांचं सामूहिक रजा आंदोलन

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Primary School : राज्यातील प्राथमिक शिक्षकांनी आज एक दिवसाचं सामूहिक रजा आंदोलन पुकारलंय. त्यामुळे राज्यातील सुमारे 40 हजार प्राथमिक शाळा बंद राहणार आहेत.. राज्यात सुधारीत शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतलीये... याला राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केलाय. ही अंमलबजावणी सुरू झाल्यास राज्याच्या ग्रामीण भागातील 1 लाख 85 हजार विद्यार्थी आणि 29 हजाराहून अधिक शिक्षकांचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाने हे दोन्ही निर्णय रद्द करावेत यासाठी राज्यभरातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्यात. या संदर्भात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली मात्र कुठलाच ठोस निर्णय शासनाने घेतला नाही. त्यामुळे सर्व शिक्षक आंदोलनात उतरलेत..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मराठवाड्यातील 30 जागा महायुती जिंकणार -अमित शाह

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sambhajinagar Amit Shah : मराठवाड्यातील 30 जागा महायुती जिंकेल असा विश्वास अमित शाहांनी व्यक्त केलाय... संभाजीनगरमध्ये भाजपची बैठक झाली यावेळी अमित शाहांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय. तुम्ही कोणतीही चिंता करू नका, सर्व चिंता नेत्यांवर सोडू आणि तुम्ही कामाला लागा असं अमित शाहा म्हणाले तसेच 10 टक्के मतदान वाढवण्याच्या सूचना अमित शाहांनी कार्यकर्त्यांना दिल्यात. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या घटस्फोटाची चर्चा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Urmila Matondkar : अभिनेत्री उर्मिला मांतोडकर लवकरच घटस्फोट घेणार असल्याची जोरदार चर्चा होतेय.  लग्नाच्या आठ वर्षानंतर उर्मिला मातोंडकरने पती मोहसिन अख्तर मीरपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. अद्याप उर्मिला मातोंडकरने याबाबत अधिकृतपणे जाहीर केलं नसलं तरीही सुत्रांच्या माहितीनूसार मुंबईतल्या न्यायालयात उर्मिलाने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलाय. 4 फेब्रुवारी 2016 ला उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तर मीरचं लग्न झालं.  उर्मिला मातोंडकर मोहसिनपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. 

    बातमी पाहा - उर्मिला मातोंडकरचा घटस्फोटासाठी अर्ज, परस्पर सहमती नाही...

  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर भाजप आमदाराचं अजब विधान

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Vijay Wadettiwar Video Tweet : 'लाडकी बहीण योजना ही महिलांच्या मतांसाठी केलेला जुगाड आहे, असं अजब विधान भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांनी केलंय.. आमदार टेकचंद सावरकरांच्या या विधानाचा व्हिडिओ विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट केलाय.. तर अखेर महायुतीची भानगड पुढे आली असं म्हणत वडेट्टीवारांनी सरकारवर टीका केलीये.... 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पुण्यात धरणक्षेत्रात 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा

     

    Pune Rain : पुण्यात पुढील चार दिवसात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.. पुण्यातील चारही प्रमुख धरणं आधीच भरलीत.. त्यामुळे अतिवृष्टीमुळे या धरणांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

  • राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rain Alert : राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय, तर नाशिक, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केलाय.उर्वरित महाराष्ट्राला यलो अलर्ट दिलाय.वादळी वारे, मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय... कालपासून मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link