Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Sun, 29 Sep 2024-11:26 am,

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 29 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • 'एकनाथ शिंदेंनी दसरा मेळावा गुजरातमध्ये घ्यावा', संजय राऊतांची टीका

     

    Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी दसरा मेळावा गुजरातमध्ये घ्यावा-राऊत...संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल...शिंदेंचा पक्ष गुजरातमधून चालतो-संजय राऊत.. 'अदानी, मोदी, शाहांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा'

  • यंदा एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा आझाद मैदानावर?

     

    Eknath Shinde : गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही शिंदे शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होण्याची शक्यता...मुंबई महानगरपालिकेकडे शिंदे शिवसेना पक्षाचा अर्ज दाखल...बिकेसी मैदान, आझाद मैदान आणि शिवाजी पार्कसाठी अर्ज दाखल..गेल्या वर्षी शिवाजी पार्क मैदानाची परवानगी नाकारलेली.. यंदाही शिवाजी पार्क ठाकरे शिवसेना पक्षाला मिळण्याची शक्यता असून शिंदे गट आझाद मैदानावर दसरा मेळावा घेण्याच्या तयारीत आहेत

  • 'रोहित पवारांनी कधीही पदाची मागणी केली नाही', शरद पवारांचं वक्तव्य

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sharad Pawar on Rohit Pawar : शरद पवारांनी कर्जतचे आमदार रोहित पवारांचं तोंडभरून कौतुक केलंय. रोहित पवारांनी कधीही पदाची मागणी केली नाही. रोहितला मंत्री करावं ही जनतेची मागणी आहे. त्यांनी आतापर्यंत तुमच्यासाठी काम केलं. मात्र यापुढं ते महाराष्ट्रासाठी चांगलं काम करेल, असं सूचक विधान शरद पवारांनी केलंय.
    पवारांच्या या विधानानंतर रोहित पवारांवर मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा रंगतेय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • मुंबईतील 2 जागा शरद पवार NCPला-सूत्र

     

    Mahavikas Aghadi : मुंबईतील 36 जागांपैकी शरद पवार पक्षाला च्या वाट्याला 2 जागा - सूत्र...अणुशक्ती नगर आणि घाटकोपर पूर्व या दोन जागा शरद पवार पक्षाला सोडण्यात आल्याची सूत्रांची माहिती... मुंबईतील 5 जागांसाठी पवार गटाने केली होती मागणी-सूत्र...सध्या या दोन मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू- सूत्र
     

  • सोलापूर विमानतळाचं आज उद्घाटन 

     

    Solapur Airport Inauguration : सोलापूर विमानतळाचं आज उद्घाटन होणारेय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीतून ऑनलाईन पद्धतीने हे उद्घाटन होणारेय. विमानतळावर एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली. तसेच 80 जणांना निमंत्रण देण्यात आलंय. दरम्यान, 26 सप्टेंबरला पुण्यातून मोदींच्या हस्ते हे उद्घाटन होणार होतं. पावसामुळे दौरा रद्द झाल्यानं उद्घाटनही लांबणीवर पडलं होतं. मात्र आज उद्घाटन होणार असल्यानं सोलापूरकरांची प्रतीक्षा आता संपलीय.

     

  • शेतकऱ्यांसाठी खूशखबर !, गैर बासमती तांदळाला निर्यात शुल्कातून सूट

     

    Basmati Rice : दिवाळी सणाच्या तोंडावर शेतक-यांसाठी केंद्र सरकानं आनंदाची बातमी दिलीये.. केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाला निर्यात शुल्कातून सूट दिलीये.. उकडा तांदळावरील कर 10 टक्क्यांनी कमी केलाय... बासमती तांदळावरील निर्यातमूल्य हटवल्यानंतर 15 दिवसांतच तांदळाच्या निर्यात शुल्कात कपात करण्यात आलीये..ब्राऊन राईस वरील निर्यात शुल्कातही 10 टक्के कपात करण्यात आलीये..आतापर्यंत ब्राऊन राईस तसेच गैरबासमती पांढ-या तांदळावर 20 टक्के निर्यात शुल्क आकारलं जात होतं.. मात्र शुक्रवारवासून हे निर्यात शुल्क कमी करण्यात आलंय. यामुळे शेतक-यांचा मोठा फायदा होणार आहे. 

  • मनोज जरांगे दसरा मेळावा घेणार?

     

    Manoj Jarange : जरांगे आता नारायण गडावरती दसरा मेळावा घेण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती मिळतेय. या मेळाव्याच्या तयारी साठी आज नारायणगडावर बैठक होत असल्याची माहितीही सुत्रांनी दिलीय. बीड जिल्ह्यातील मराठा बांधव आज नारायण गडावर दुपारी दोन वाजता बैठक घेणारेत या बैठकीत दसरा मेळाव्याचं नियोजन आणि तयारीसाठी चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय. दसरा मेळाव्यातून मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीअगोदर काय भूमिका घेणार हे जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

  • पुण्यात ड्रग्जचा सुळसुळाट

     

    Pune Drugs :पुण्यात ड्रग्जचा सुळसुळाट...कोंढवा परिसरात 14 लाखांचं एमडी ड्रग्ज जप्त...ड्रग्ज विकणा-या दोघांना अटक...झहीर खान आणि अदनान शेख अशी आरोपींची नावे...अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

  • उद्धव ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

     

    Uddhav Thackeray : ठाकरे पक्षाची विदर्भात मोर्चेबांधणी...उद्धव ठाकरे आज नागपूर दौ-यावर...पूर्व विदर्भातील पदाधिका-यांसोबत बैठका...कळमेश्वरमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं होणार अनावरण

  • पुणे मेट्रोचं आज उद्घाटन, शिवाजीनगर कोर्ट-स्वारगेट भूमिगत मेट्रो

     

    Pune Metro today Inauguration  : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण तसंच पायाभरणी कार्यक्रम होणारेय. तब्बल 11हजार 200 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे हे प्रकल्प आहेत. यामध्ये पंतप्रधान मोदी आज पुणे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो मार्गाचं उद्घाटन करतील. तसंच सोलापूर विमानतळाचंही ते उद्घाटन करणारेत. तर संभाजीनगरमधील बिडकीन औद्योगिक क्षेत्राचं त्यांच्या हस्ते लोकार्पण होणारेय. दिल्लीतून ऑनलाईन पद्धतीने मोदी हे लोकार्पण होणारेय. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पुण्यात उपस्थित राहणार आहेत.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link