Maharashtra Breaking News Today LIVE Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार? पाहा आजच्या दिवसातील सर्व लहानमोठ्या घडामोडींच्या अपडेट एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: आज किंवा उद्या नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता. निवडणूक आयोगाच्या अधिका-यांची माहिती.15व्या विधानसभेची अधिसूचना राज्यपालांकडून जारी. आता उत्सुकता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार यासंबंधीच्या नावाची.... पाहा दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
Latest Updates
मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला काय पाहुयात...
फॉर्म्युला क्रमांक-1
शिवसेना 1 वर्ष राष्ट्रवादी 1 वर्ष आणि भाजपला 3 वर्ष अशी मुख्यमंत्रिपदाची वाटणी होऊ शकते
फॉर्म्युला क्रमांक-2
भाजपला 5 वर्ष मुख्यमंत्रिपद शिवसेना आणि राष्ट्रवादीला महत्वाची खाती अशीही सत्तापदांची विभागणी होऊ शकते
फॉर्म्युला क्रमांक-3
भाजपला 2.5 वर्ष मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला 15 महिने शिवसेनेला 15 महिने मुख्यमंत्रिपद मिळू शकते.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत आज रात्रीच शिक्कामोर्तब
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत आज रात्रीच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला पोहोचले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीला जाणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीये. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत रात्री बैठक होणार असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर आज रात्रीच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल
देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. आधी फडणवीस ओम बिर्ला यांच्या वैयक्तिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेणार आहेत. रात्री त्यांची अमित शाहांसोबत बैठक होणार आहे. त्यात महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेबाबत दोन्ही नेत्यांची चर्चा होणार आहे.
अमित शाह उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता
निरीक्षक म्हणून अमित शाह उद्याच मुंबईत येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित शाहांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा होणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे. अमित शाह स्वतः महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेत लक्ष घालणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
भास्कर जाधवांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेतेपदी निवड
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनियुक्त आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत विधीमंडळ गटनेतेपदी भास्कर जाधव यांची निवड करण्यात आलीये. प्रतोपपदी सुनील प्रभू यांची पुन्हा एकदा वर्णी लागलीये. तर विधीमंडळ नेतेपदी आदित्य ठाकरे यांची एकमतानं निवड करण्यात आलीये. दरम्यान विधानसभा गटनेतेपदी आदित्य ठाकरे असावेत अशी माझी इच्छा होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी आपली निवड केल्याचं भास्कर जाधव म्हणाले.
मंत्रिपद मिळावं अशी इच्छा : अर्जुन खोतकर
आपण 8 टर्म आमदार झालो आहे. त्यामुळे आता आपल्याला मंत्रिपद मिळावं अशी इच्छा असल्याचं शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी बोलून दाखवलं आहे.
ठाकरे गटाच्या पराभूत झालेल्या उमेदवारांची उद्या मातोश्रीवर बैठक
ठाकरे गटाच्या पराभूत झालेल्या उमेदवारांची उद्या दुपारी 12.30 वाजता मातोश्रीवर बैठक. पराभूत उमेदवारांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार. आज विजयी उमेदवारांची मातोश्रीवर बैठक पार पडली.
...तर उद्धव ठाकरेंचे 2 आमदार शिल्लक राहतील, चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर शिवसेना ठाकरे गटाचे 20 आमदार त्यांना पुरून उरतील असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे की, आता त्यांचे 20 आमदार आहेत त्यामधील फक्त 2 शिल्लक राहतील आणि बाकीचे 18 गायब होतील.
भाजपचे नवे मिशन, महापालिका इलेक्शन
महाराष्ट्र जिंकल्यानंतर स्थानिक निवडणुकांकडे लक्ष लागले आहे. विधानसभा इतकेच बळ महापालिका, नगरपालिकासाठी लावणार. चंद्रशेखर बावनकुळेंकडून पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना सूचना.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे. आता पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यामध्ये रात्री बैठक होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच होणार सुनावणी. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्या सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.
निवडणुकीच्या निकालाबाबत चर्चा झाली, पवारांच्या भेटीनंतर दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया
आज शरद पवार साहेबांशी भेट झाली. सदस्य म्हणून आम्ही उपस्थित होते. राजकीय काहीही चर्चा झालेली नाही. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत चर्चा झाली असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
आरक्षण द्या, अन्यथा राज्यात फिरु देणार नाही : मनोज जरांगे
पूर्वीही महायुतीचंच सरकार होतं आणि आताही महायुतीचंच सरकार आलंय. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाहीतर महायुतीच्या नेत्यांचं राज्यात फिरणं अवघड करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. त्याचबरोबर सरकार स्थापन झाल्यानंतर उपोषणाला सुरूवात होणार असल्याचंही मनोज जरांगे म्हणाले.
मी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही : नाना पटोले
मी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. नाना पटोले यांची माहिती. राज्यातील निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीबाबत दिल्लीत पटोलेंची खरगेंशी चर्चा.
दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला
अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवार यांच्या भेटीसाठी वाय.बी. चव्हाण सेंटर येथे दाखल झाले आहेत. वाय.बी. सेंटर येथे आज शरद पवारांनी नवर्निर्वाचित आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी शरद पवार देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत.
नव्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग
नव्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंगला सुरवात. संजय शिरसाठ, भरत गोगावले आणि अब्दुल सत्तार एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहचले. मंत्रीपद मिळवण्यासाठी इतर इच्छुक आमदारही एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
आदित्य ठाकरेंवर मोठी जबाबदारी
विधानसभा निवडणुकीनंतर भास्कर जाधव यांच्यावर गटनेतापदाची जबाबदारी तर, सुनील प्रभू प्रतोत. आदित्य ठाकरेंवर विधिमंडळ नेतेपदाची जबाबदारी.
काँग्रेस हायकमांडच्या आदेशानंतर अमित देशमुख मुंबईकडे रवाना
काँग्रेस हायकमांडच्या आदेशानंतर अमित देशमुख तातडीने मुंबईकडे रवाना. नाना पटोलेंच्या राजीनाम्याच्या चर्चेनंतर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अमित देशमुख यांकडे येण्याची शक्यता.
पक्षाकडून दिलेली जबाबदारी पार पाडणार : विजय वडेट्टीवार
नाना पटोलेंनी हायकमांडकडे मांडलेल्या भूमिकेबाबत माहिती नाही. मात्र, पक्षाकडून दिलेली जबाबदारी पार पाडणार. पक्ष जो आदेश देईल तो मान्य. नेतृत्व बदलावर विजय वडेट्टीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेसने नाना पटोलेंचा राजीनामा घ्यावा- आशिष देशमुख
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसने नाना पटोलेंचा राजीनामा घ्यावा, असं वक्तव्य भाजप नेते डॉ. आशिष देशमुख यांनी केलंय. तर ते पुढे म्हणाले की, पटोले राजीनामा देतील असं वाटत नाही, असं ते म्हणाले. तर 'देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे. फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ही जनतेची इच्छा', असंही ते यावेळी म्हणाले.
'या' तारखेला होणार शपथविधी? सूत्रांची माहिती
राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी 28 किंवा 29 नोव्हेंबर रोजी होण्याची दाट शक्यता असल्याचं वृत्त सूत्रांनी दिलं आहे.
पवार कुटुंबीयांमध्ये कौटुंबिक करार झाला होता- राम शिंदे
कर्जत जामखेडमधील पराभवानंतर राम शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. पवार कुटुंबात करार झाल्याचं म्हणताना, 'मला हे आधीपासूनच माहिती होत पण आज अजित पवार यांनी स्वतः सांगितलं. त्यांचं ठरलं होतं. कर्जत जामखेड मध्ये अजित पवार येणार नाहीत आणि बारामतीत रोहित पवार जाणार नाहीत, राष्ट्रवादीत दोन गट पडले आता या फुतीवर देखील संशय आहे. मी अजित पवार यांना अनेक वेळा सांगितलं की माझ्या मतदारसंघात सभा घ्या ( त्यांनी दादांचे केलेलं msg दाखवले). अजित पवार यांनी युती धर्म पाळला नाही' असं ते म्हणाले. आपण एक सामान्य कर्तकर्ता असून, आपल्याविरोधात कट रचला गेल्याचं ते म्हणाले.
विदर्भातून मंत्रिपदासाठी दावेदार कोण?
नागपूर
चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल, कृष्णा खोपडेचंद्रपूर
सुधीर मुनगंटीवार, बंटी भांगडीयागडचिरोली
धर्मरावबाबा आत्राम, अहेरी
अकोला
रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळेयवतमाळ
अशोक उइके, संजय राठोडअमरावती
रवी राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसडभंडारा
नरेंद्र भोंडेकर, परिणय फुकेबुलडाणा
संजय कुटे, जळगाव जामोदभारताच्या सागरी हद्दीत मोठा ड्रग्ज साठा जप्त
भारताच्या सागरी हद्दीत मोठा ड्रग्ज साठा जप्त. भारतीय तटरक्षक दलाने अंदमानमध्ये पाच टन ड्रग्ज जप्त केल्याची माहिती.
आपल्या विरोधात नियोजित कट रचला- राम शिंदे
निवडणुकीत आपल्या विरोधात नियोजित कट रचला, असं म्हणत कटात अजित पवारांचा सहभाग असल्याचा संशय राम शिंदेंनी केला.
रोहित पवार स्वत:ला सीएम समजत असल्याचीही टीका त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केली.महायुतीला राजकीय संकटात आणणाऱ्यांना... शिंदे- फडणवीस बैठकीत मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर रविवारी रात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास एक तास बैठक पार पडली. सूत्रांच्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी पोहोचले होते. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली, सोबतच दोघांनी आपल्या पक्षातील संभाव्य मंत्री यांच्यावर चर्चा केली. गेल्या मंत्रिमंडळात ज्या आमदारांनी महायुतीमध्ये तेढ निर्माण केले आणि महायुतीला राजकीय संकटात आणलं त्यांना मंत्रिमंडळातून लांब ठेवण्याचा निर्णय झाला आहे.
ऐतिहासिक विजयानंतर भाजपची आज महत्त्वपूर्ण बैठक
ऐतिहासिक विजयानंतर भाजपची आज महत्त्वपूर्ण बैठक. भाजपच्या निवडणूक संचालन समितीची दुपारी महत्वाची बैठक. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. प्रदेश मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी काय बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
नव्या खासदारांना बोलू दिलं जात नाही, असं हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेबाहेर माध्यमांशी संवाद साधतांना मोदींनी स्पष्ट करत नाराजीचा सूर आळवला. काही विरोधी पक्ष जबबादारीनं काम करतात, पण काहींच्या कामावर मात्र मोदींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जनतेनं सातत्यानं ज्यांना नाकारलं आहे ते मात्र लोकशाहीच्या भावनांचा अनादर करतात. मी आशा करतो की आमच्या नव्या साथीदारांना संसदेत बोलण्याची संधी मिळेल. सर्व पक्षांमध्ये नवे चेहरे आहेत. त्यांच्याकडे नवे विचार, नव्या कल्पना आहेत. आज सारं जग आशेच्या नजरेनं भारताकडे पाहत आहे, त्यामुळं आम्ही संसदेच्या वेळेचा उपयोग भारताप्रती वाढलेल्या आकर्षणाला आणखी बळ देण्याच्या हेतूनं खर्ची घालू, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत पराभवची नैतिक जबाबदारी म्हणून काँग्रेस नेते नाना पटोले मल्लिकार्जुन खरगे यांना भेटून आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतील. त्याआधी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाही भेटण्याची शक्यता.
20 वर्षांनंतर काँग्रेसला अकोला जिल्ह्यात मिळाला आमदार
सर्वाधिक उत्कंठावर्धक निकाल लागलाय तो अकोला पश्चिम मतदारसंघात. जिल्ह्याचच नव्हे तर संपूर्ण विदर्भाच लक्ष या निकालाकडे होतं. अकोला पश्चिम मतदारसंघात भाजपने माजी महापौर विजय अग्रवाल यांना उमेदवारी दिली,त्यांना उमेदवारी दिल्याने भाजपमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आणि याचाच फटका भाजपला बसलाय.. विधानसभेत अकोल्यातून गेल्या दोन दशकांपासून गायब झालेली काँग्रेसने ''' कम बॅक ''' केलंय. अकोला जिल्ह्याला बाळापूर मतदार संघातून 1999 - 2004 या काळात लक्ष्मणराव तायडे यांच्या स्वरूपात काँग्रेसला शेवटचे आमदार मिळाले होते..तर आता 2024 महणजेच 20 वर्षा नंतर काँग्रेसला जिल्ह्यात आमदार मिळालाय. काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण यांनी अवघ्या 1283 मतांनी विजय मिळविला. तर ''एक है तो सेफ है'' चा नारा काँग्रेससाठी याठिकाणी फायद्याचा ठरला असल्याचं काँग्रेसच्या विजयी उमेदवारने म्हटलं आहे.
पराभवाचं खापर एका व्य़क्तिवर फोडता येत नाही- संजय राऊत
पराभवाचं खापर एका व्य़क्तिवर फोडता येत नाही. अपयशाची कारणं शोधली पाहिजे. हा पराभव व्यक्तिगत एका पक्षाचा नाही. विरोधक ज्या पद्धतीनं निवडणूक लढण्यासाठी उतरले होते ती मी योग्य पद्धत मानत नाही. आम्ही तीन पक्ष मिळून निवडणूक लढलो, हे महाविकासआघाडीचं अपयश आहे. आता दिल्ली ठरवेल तोच मुख्यमंत्री महाराष्ट्राला द्यावं लागेल, असं संजय राऊस सोमवारी पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले.
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे पदाधिकाऱ्यांची काय रणनिती?
विधानसभेच्या पराभवानंतर राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मुंबईतील पदाधिकारी आणि पराभूत उमेदवारांची बैठक. नितीन सरदेसाई, माऊली थोरवे, महेंद्र भानुशाली, प्रदीप वाघमारे हे या बैठकीसाठी उपस्थित.
सीएम पदाच्या फॉर्म्युलाविषयी अजित पवार म्हणाले...
'काही नाही, आम्ही तिघं बसू आणि ठरवू', इतक्या मोजक्या शब्दांत अजित पवार यांनी कराडमध्ये बोलताना सीएम पदाच्या फॉर्म्युलाविषयी वक्तव्य केलं. राज्याला मजबूत आणि स्थिर सरकार देऊ असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.
माझे ते काका आहेत म्हणून...; काकांपुढे नतमस्तक होणाऱ्या रोहित पवारांची प्रतिक्रिया
'माझे ते काका आहेत म्हणून मी पाया पडलो. विचारांमध्ये भिन्नता आहे पण शेवटी जी काही संस्कृती आहे. एक वडिलधारी व्यक्ती आणि माझ्या 2019 च्या निवडणुकीत त्यांनी मला मदत केली होती. त्यामुळे काका असल्यामुळं शेवटी संस्कृती असल्यामुळं पाया पडणं ही जबाबदारी आहे. ही (कराडची) जी भूमी आहे, तिथं भेदभाव करून चालत नाही, इथं संस्कृती पाळणं महत्त्वाचं आहे आणि आम्ही ती पाळतो', असं रोहित पवार म्हणाले.
प्रीतीसंगमावर 'दादा'गिरी
कराडमध्ये प्रीतीसंगमावर अजित पवार आणि रोहित पवारांची भेट. 'माझी सभा झाली असती तर काय झालं असतं...' असा टोला अजित पवारांनी रोहित पवारांना लगावला. यावेळी दर्शन घे काकाचं असं म्हणताच काकाच्या पाया पडत अर्थात अजित पवार यांच्यापुढं नतमस्तक होत रोहित पवारांनी वरिष्ठांचा आशीर्वाद घेतला. पण, 'थोडक्यात वाचला...' असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांना टोलाही लगावल्याचं पाहायला मिळालं.
आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन
आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होत असून, यामध्ये वक्फ बोर्ड विधेयक, गौतम अदानींवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अधिवेशनात आज 16 विधेयकं सादर होण्याची शक्यता असून यामध्ये अदानींच्या मुद्द्यावरूनदेखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
दिल्लीतून ठरणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री
सूत्रांच्या माहितीनुसार राज्यात सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचालींना वेग आला असून, महायुतीचे नेते दिल्लीतील वरिष्ठांशी बोलण्याची शक्यता आहे. दिल्लीतील चर्चेनंतर सीएम, डीसीएमचा निर्णय होणार असून, शपथविधीची तारीखही दिल्लीतील बैठकीनंतरच निश्चित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पटोले कसेबसे निवडून आले, थोरात, पृथ्वीराज सगळे साफ झाले - अशोक चव्हाण
'ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी केले. मुलीच्या विजयानंतर मुदखेड मध्ये आयोजित एका आभार सभेत चव्हाण यांनी हे वक्तव्य केले. लातूरमध्ये एक पडला दुसरा निसटता निसटता आला, महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे भोकरच्या नावाने बोंबलून निघणारे प्रदेशाध्यक्ष दिडशे मतांनी कसेबसे निवडून आले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात सगळे साफ झाले', असे अशोक चव्हाण म्हणाले.
यशोमती ठाकूर यांच्यावर सर्वसामान्य माणसाचा रोष होता- राजेश वानखेडे
माजी मंत्री आणि काँग्रेसच्या फायर ब्रँड नेत्या यशोमती ठाकूर यांचा भाजपच्या राजेश वानखडे यांनी पराभव करत यशोमती ठाकूर यांना धक्का दिला विजयानंतर आमदार राजेश वानखडे यांनी प्रतिक्रिया देत यशोमती ठाकूर यांच्यावर टीका केली माझ्यासमोर पैशाच आव्हान होत फक्त पैशाचा जो चिखल केला त्या चिखलात कमळ फुललं यशोमती ठाकूर यांच्यावर सर्वसामान्य माणसाचा रोष होता त्यांनी कुठल्याही प्रकारे विकास काम केले नाही युवकांना रोजगार दिला नाही कौंडन्यापूर, वलगाव व मोझरी विकास आराखड्याचा बट्ट्याबोळ केल्याचा आरोप नवनिर्वाचित आमदार राजेश वानखडे यांनी केला आहे.
भाजपाचा अनोखा विजयी जल्लोष
धुळे शहर विधानसभेत भाजपचे उमेदवार अनुप अग्रवाल विक्रीमि मताधिक्याने निवडून आल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह अजूनही ओसंडून वाहत आहे. धुळे शहरातील साक्री रोड परिसरामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने विजय उत्सव साजरा केला. या ठिकाणी एमआयएमचा निवडणूक चिन्ह असलेले मोठी पतंग तयार करण्यात आले होती. या पतंग वर पतंग कटली असे लिहिण्यात आलेलं होतं. ही भली मोठी पतंग फाडत त्यातून अनुप अग्रवाल यांची प्रतिमा घेत नगरसेविका बाहेर पडल्या. त्यावेळेस भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला. विशेष म्हणजे यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक देखील उपस्थित होते. एम आय एम चे आमदार फारुक शहा यांना पराभूत करत अनुप अग्रवाल या ठिकाणी विजयी झालेले आहेत.
मुख्यमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदेंचं लक्षवेधी वक्तव्य...
मुख्यमंत्रिपदाबाबत एकनाथ शिंदेंनी सूचक वक्तव्य केलंय.. काल मुंबईत शिवसेनेच्या विजयी आमदारांची बैठक पार पडली.. या बैठकीत सर्व आमदारांनी एकनाथ शिंदेंना तुम्हीच मुख्यमंत्री व्हा अशी मागणी केली.. यावर एकनाथ शिंदे 'काम सुरू आहे' असं म्हणाले आणि त्यांच्या या वक्तव्यानं अनेकांच्या नजरा वळल्या.
पिंपरी चिंचवड पोलीसांकडून 55 किलो गांजा जप्त
पिंपरी चिंचवड पोलीसांकडून 55 किलो गांजा जप्त करण्यात आलाय. वाहनांची तपासणी करत असताना एक संशयित कार आढळून आली . दरम्यान कारची तपासणी केल्यानंतर 55 किलो गांजा आढळला. धुळ्याहून विक्रीसाठी हा गांजा आणला जात होता. याप्रकरणी आरोपी नूर मोहम्मद पिंजारीला पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक करण्यात आली.
अंबरनाथ एमआयडीसीत मोठा स्फोट
अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील रसिनो फार्मा कंपनीत रविवारी रात्री मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीत कंपनीतील प्लँट ऑपरेटर गंभीर जखमी झालाय. स्फोट झाला, तेव्हा कंपनीत 10 ते 12 कामगार काम करत असल्याची माहिती त्यानं दिलीये.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही
26 तारखेपूर्वी नवीन सरकार अस्तित्वात येणं किंवी नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणं बंधनकारक नसल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती. विधामंडळातील सूत्रांच्या माहितीनुसार विद्यमान विधानसभेची मुदत 26 तारखेला संपत असल्याने राज्यात मध्यरात्री 12 नंतर राष्ट्रपती राजवट लागेल ही धारणा चुकीची. 26 तारखेपूर्वी नवीन सरकार अस्तित्वात येणं किंवी नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणं बंधनकारक नाही असंही सूत्रांनी स्पष्ट केलं.
एकनाथ शिंदेंवर मोठी जबबादारी...
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड. सर्वानुमते एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी निवड. उदय सामंतांनी मांडलेला ठराव एकमतानं मंजूर. मुंबईतील ताजलँड हॉटेलमध्ये शिवसेना आमदारांच्या बैठकीमध्ये एकमतानं निवड
तुळजापूरमध्ये राणाजगजीतसिंहांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
तुळजापूरमध्ये राणाजगजीतसिंहांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आलीय. बॅनरवर राणाजगजीतसिंह पाटील यांचा भावी पालकमंत्री असा उल्लेख आहे. राणाजगजीतसिंहांना मंत्रिपद मिळावं, यासाठी समर्थक मुंबईकेड रवाना झालेत. तर आमदार राणाजगजितसिंह पाटलांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केल्याची माहितीही सूत्राकडून मिळतेय.
खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता
देशात सर्वाधिक वापर होणाऱ्या पामतेल आयातीचे गणित बिघडल्याने त्याचा परिणाम अन्य खाद्यतेलांवर होऊन किमती वधारल्या आहेत. या वधारलेल्या किमतीची केंद्र सरकारने तातडीने दखल घेत 15 टक्के आर्द्रतायुक्त सोयाबीन खरेदीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे एकीकडे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होणार असताना, दुसरीकडे खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता आहे.
राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, CM पदासाठी फडणवीसांना संघाची पसंती
विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळवल्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पसंती मिळतेय. एकीकडे मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याबाबत सस्पेन्स कायम असताना भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी अनुकूल आहेत. महत्त्वाचं म्हणजे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्ण ताकतीनिशी भाजपाच्या मागे उभा होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत घसरलेला ग्राफ कमालीचा उंचावला अशी चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी तर वाढलीच. त्याचबरोबर भाजपाला घवघवीत यशही मिळालं .
महायुतीत मंत्रिपदासाठीच्या वाटपासाठी फॉर्म्युल्यावर चर्चा - सूत्र
महायुतीमध्ये सहा ते सात आमदारांच्या मागे एक मंत्रीपदं मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपचे सध्या 132 आमदार त्यामुळे फॉर्म्युल्यानुसार भाजपच्या वाट्याला 22-24 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता असून, शिवसेनेच्या 57 जागा आल्याने त्यांच्या वाट्याला 10-12 मंत्रिपदं येण्याचा अंदाज सूत्रांनी वर्तवली आहे. राष्ट्रवादी कांग्रेसला 41 जागा आल्याने त्यांच्या वाट्याला 8-10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता. महायुतीचे प्रमुख तिन्ही नेते बसून यावर चर्चा करणार असल्याचंही म्हटलं जात आहे.
महायुतीच्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार?
महायुतीच्या मंत्रिमंडळात समावेशासाठी अनेक दिग्गज उत्सुक. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या दिग्गजांना मंत्रिपदाचे वेध. शपथविधीदरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत अनेक मंत्री घेणार शपथ. भाजपचे मंत्री कोण असणार याची उत्सुकता कायम. शिवसेनेच्या वेटिंगवरील नेत्यांना भेटणार मुख्यमंत्री.
आजच्या तीन महत्त्वाच्या बातम्या
ज्यावर असेल आपली नजर. पहिली बातमी आहे मातोश्रीवरील बैठकीची. उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीवर विजयी आमदारांची बैठक बोलावलीये. या बैठकीत उद्धव ठाकरे विजयी आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. तर दुसरी बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीची. मुंबईतील वायबी सेंटरमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीमध्ये शरद पवार विजयी आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. तसंच निवडणुकीच्या निकालाबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे. संध्याकाळी 4 वाजता ही बैठक होणार आहे. तर तिसरी महत्त्वाची बैठक आहे इंडिया आघाडीची. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या दालनात ही बैठक होणार असून या बैठकीला इंडिया आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे घेऊन आक्रमक व्हायचं आणि विरोधी पक्षाची काय रणनीती असावी यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विजयी उमेदवारांची बैठक
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विजयी उमेदवारांची आज मुंबईतील Y B सेंटर इथं बैठक. तर अजित पवार कराड दौऱ्यावर यशवंतरा चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला करणार अभिवादन. तर, इंडिया आघाडीच्या नेत्यांची आज दिल्लीत बैठक. प्रमुख नेते राहणार उपस्थित. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर होणार चर्चा.