Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्र विधानसभेला धडक देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते नागपूरला रवाना
Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील राजकीय वर्तुळापासून जिल्ह्याजिल्ह्यापर्यंतच्या सर्व लहानमोठ्या घडामोडी... एका क्लिकवर
Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता पुढं नेमक्या कोणत्या घडामोडी घडणार, राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधक यांची पुढची चाल काय असणार याकडे सर्वांचच लक्ष राहील. याशिवाय राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमकं काय घडतंय यासंदर्भातील सर्व लहानमोठ्या अपडेट आणि महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर....
Latest Updates
महाराष्ट्र विधानसभेला धडक देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते नागपूरला रवाना
महाराष्ट्र विधानसभेला धडक देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते नागपूरला रवाना झाले आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सीमा प्रश्नावर जनजागृती करणार आहेत. शहर समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील यांच्या नेतृत्वाखालील 40 जणांचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे. बेळगाव सीमा प्रश्नावर महाराष्ट्र सरकारने कठोर भूमिका घ्यावी, कर्नाटक सरकारच्या अन्यायातून सीमा बांधवांना मुक्त करण्याची मागणी करणार आहेत.
नागपूरमध्ये विधिमंडळावर विदर्भ विकलांग संघर्ष समितीचा मोर्चा
नागपूरमध्ये विधिमंडळावर विदर्भ विकलांग संघर्ष समितीचा मोर्चा येऊन धडकला आहे. टेकडी लाईन वर येऊन हा मोर्चा रोखण्यात आला आहे. यावेळी मोर्चेकरी-आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक झाली.संजय गांधी निराधार योजनेचा लाभ 6000 प्रतिमाह द्यावा, दिव्यांगाना व्यवसायासाठी अर्थसहाय्य देण्याच्या योजनेतील 45 वर्ष अट रद्द करण्यात यावी...हा लाभ दर तीन वर्षांनी यावा,या मागण्या त्यांनी केल्या आहेत.
कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांच्या आकडा वाढला
कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांच्या आकडा वाढला आहे. अपघातातील मृतांचा आकडा आठ वर गेला आहे. फजलू शेख नावाच्या जखमी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू होते.अपघातात आत्ता पर्यंत आठ जणांचा मृत्यू तर ४१ जखमी झाले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी पाच वाजता राज ठाकरे मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.राज ठाकरे दोन दिवस पुणे दौऱ्यावर असतील. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
पद्मसिंह पाटील यांच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली.डॉक्टर पद्मसिंह पाटील यांची गुडघ्याची शस्त्रक्रिया झाल्याची त्यांचे चिरंजीव आणि भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून तब्येतीच्या कारणास्तव डॉक्टर पद्मसिंह पाटील मुंबईतच आहेत. डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली असून पाटील पुढील दोन ते तीन दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, असे सांगण्यात आले आहे.
धुळे शहरात एसटी बसवर दगडफेक
परभणीच्या घटनेचे पडसाद धुळे शहरात उमटले आहेत. धुळे शहरात एसटी बस वर दगडफेक झाली आहे. नाशिक शहादा या बस वरती दगडफेक झाली असून प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आहेत. आज्ञात पाच ते आठ जणांकडून दगडफेक झाल्याचा दावा चालकाने केला आहे.
कलाविश्वाचा ताल चुकला-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली
भारतीय अभिजात संगीताचा समृध्द खजिना सातासमुद्रापार दोन्ही हातांनी उधळणारे प्रतिभावान संगीतकार आणि तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे जाणे, संपूर्ण तालविश्वाचाच ताल चुकवणारे आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उस्ताद झाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
एकनाथ शिंदेंवर आरोप करणाऱ्याला 50 हजारचा दंड
महाराष्ट्र सरकारने अदानी पॉवरला वीज पुरवठ्यासाठी दिलेले कंत्राट हा "घोटाळा" होता असा आरोप करत याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच कंत्राट देताना माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भ्रष्ट कारभारात गुंतले होते, असाही आरोप रिट याचिकाकर्त्याने केला होता. या याचिकाकर्त्यावर मुंबई हायकोर्टाने 50,000 रुपये दंड रुपये ठोठावला आहे.
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंड दोघांनाही मिळालं मंत्रीपद पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनाही मंत्री पद मिळालेले आहेत त्यामुळे आता त्यांचे कार्यकर्ते पालकमंत्री व्हावं यासाठी मागणी करताना दिसत आहेत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांचीही समर्थक आपापला नेता पालकमंत्री व्हावा यासाठी बोलताना दिसत आहेत बीड जिल्ह्याचे राजकारनात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे मागील काही वर्ष एकमेकांच्या विरोधात होते मात्र आता त्यांच्या मनोमिलना नंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनाही कॅबिनेट मंत्री पद मिळाले त्यामुळे आपला नेता हा पालकमंत्री झाला पाहिजे अशी मागणी कार्यकर्ते करताना दिसत आहेत.
महायुती मधील तिन्ही पक्षातील तुटक समन्वयांवर विजय शिवतारे नाराज
मंत्रीपद न मिळाल्यामुळे विजय शिवतारे नाराज. विधानभवनात सही करून पुरंदरला निघून जाणार असं केलं स्पष्ट. नाराजी व्यक्त करण्यासाठी अधिवेशनात थांबणार नाही असं म्हणत महायुती मधील तिन्ही पक्षातील तुटक समन्वयांवर विजय शिवतारेंनी व्यक्त केली नाराजी.
मंत्रिमंडळात जयंत पाटील यांची वर्णी?
मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरीही मंत्रिमंडळाची एक जागा शिल्लक आहे. त्याच जागेवरती जयंत पाटील येतील, असा विश्वास विधानपरिषदेतील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केला.
सिद्धिविनायकासंदर्भातील कोणत्या प्रस्तावाला मंजुरी?
तुकडा बंदी कायद्याच उल्लंघन करुन ज्यांनी बांधकाम केल आहे. यावेळी रेडीरेकनरच्या 25 टक्के रक्कम घेतली जात होती. ही आता 5 टक्के घेतली जात असल्याच विधेयक विधानसभेत मांडण्यात आलं आहे. प्राचीन स्मारक व अवशेष संदर्भातील विधेयकही यावेळी मांडण्यात आलं. हिवाळी अधिवेशनादरम्यान, सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था तरतुदीत बदल करण्याचा प्रस्ताव मंजूर. सिद्धिविनायक मंदिर न्यासावर आता 3 वर्षांऐवजी 5 वर्षे नियुक्ती करण्याचा प्रस्ताव. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुरुवातीच्या सत्रानंतर विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब.
मोठी बातमी! जोतिबा मंदिर धोक्यात...
कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे वाडी रत्नागिरी इथल्या डोंगराच्या पायथ्याशी बेकायदेशीर उत्खनन करण्यात आल आहे. बेकायदेशीर उत्खननामुळे डोंगराचा परिसर त्याचबरोबर मंदिराला धोका निर्माण झाला असल्याची तक्रार कोल्हापुरातील प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेने केली आहे. यासंदर्भात संस्थेने रीतसर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल घेतल्यानंतर जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी सुरू असलेले बेकायदेशीर उत्खनन थांबविण्यात आले आहे . असे असले तरी बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या कोणत्याही घटकांवर अद्याप कारवाई करण्यात आलेले नाही. त्यामुळेच प्रशासनाचे अधिकारीच या पाठीमागे आहेत का असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
छगन भुजबळांची नाराजी कशी दूर होणार?
राज्याच्या मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील नेते छगन भुजबळ यांची नाराजी स्पष्टपणे दिसत आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु होण्याआधी भुजबळांनी थेट शब्दांत प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्यामुळे आता त्यांची नाराजी नेमकी कशी दूर होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
महाराष्ट्रातल्या जनतेला हे सरकार काय देणार हेच सरकारला माहीत नाही- भास्कर जाधव
नागपूरमधील हिवाळी अधिवेशनापूर्वी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत नक्की महाराष्ट्रातल्या जनतेला हे सरकार काय देणार हेच सरकारला माहीत नाही असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं. ते म्हणाले, 'कारण असं आहे की तुम्ही संपूर्णपणे जर कार्यक्रम पत्रिका बघितली तर त्याच्यामध्ये मंगळवार, गुरुवार हे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा करावी लागते वीस विधेयकं आहेत. वीस विधेयकांच्यावर तुम्ही चर्चा कधी करणार आणि वीस विधेयकांच्या चर्चा तुम्ही करणार त्यानंतर नवीन सदस्यांचा परिचय मंत्रिमंडळाचा कालच विस्तार झाला नवीन मंत्र्यांचा परिचय, शोक प्रस्ताव अशा प्रकारचे विषय जर बघता या विदर्भामध्ये केवळ पाच दिवसांचा किंवा सहा दिवसांचा अधिवेशन घेऊन नेमकं विदर्भाच्या पदरामध्ये हे सरकार काय टाकणार?'
शपथविधी आणि छगन भुजबळ यांच्याविषयी काय बोलले हसन मुश्रीफ?
'काल मी मंत्रीपदाची शपथ घेतली त्याचा मला आणि माझ्या मतदारसंघात आनंद आहे. पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी दाखवली ती मी उत्तमरीत्या पार पाडेन', असं मुश्रीफ म्हणाले. छगन भुजबळ यांच्या नाराजीविषयी वक्तव्य करताना 'भुजबळ साहेब वरिष्ठ नेते आम्ही सगळे त्यांना भेटून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू . आमच्या वरिष्ठांनी त्यांच्याबद्दल काय करायचं हे ठरवलं असेल असं मला वाटतं', असं हसन मुश्रीफ म्हणाले.
राज्य सरकार बिनखात्याचं सरकार- संजय राऊत
राज्य सरकार बिनखात्याचं सरकार, कुणाचं खातं कुठलं काहीही पत्ता लागत नाही असं म्हणत राजकारण कर्माची फळं भोगावी लागतात अशा शब्दांत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
नाशिक, निफाड गारडलं...
नाशकात पुन्हा वाढली थंडी. आज नाशकात 9.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. थंडी पासून बचावासाठी शोकट्याचा आधार. तर, निफाड मध्ये थंडीचा पारा घसरला. 5.6 अंश सेल्सिअसवर पोहोचला पारा. येवला, लासलगाव परिसरात देखील थंडीची हुडहुडी. नागरिकांकडून थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर तसेच शेकोट्यांचा आधार.
नाशिक, निफाड गारडलं...
नाशकात पुन्हा वाढली थंडी. आज नाशकात 9.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. थंडी पासून बचावासाठी शोकट्याचा आधार. तर, निफाड मध्ये थंडीचा पारा घसरला. 5.6 अंश सेल्सिअसवर पोहोचला पारा. येवला, लासलगाव परिसरात देखील थंडीची हुडहुडी. नागरिकांकडून थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर तसेच शेकोट्यांचा आधार.
भाजीपाल्याचे दर घटले
कांदा, टोमॅटो, फ्लॉवर, शेवग्याच्या दरात 0 ते 15 टक्क्यांनी घट झालीये. घाऊक बाजारात अचानक आवक वाढल्याने दर कमी झालेत. पुण्यातील मार्केट यार्डमध्ये परराज्यातून 90 ट्रक आणि स्थानिक भागातून 40 टेम्पो आवक झालीय. मार्केट यार्डमधील आवक वाढल्याने दर कमी करण्यात आलेत.
PMPLच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता
PMPLच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता. 706 कोटींचा तोटा भरून काढण्यासाठी दरवाढ केली जाणार असल्याची माहिती. निर्णयाआधीच नागरिकांचा कडाडून विरोध.
मंत्रिमंडळ विस्तारात 7 जिल्हे वंचित; राजकीय वर्तुळात नाराजीचा नवा अध्याय
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अमरावती,वाशिम व अकोला या जिल्ह्यांना मंत्रिपदापासून वंचित राहावे लागले आहे. तर नागपूर जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांसह तीन मंत्री. यवतमाळ मध्ये ही तीन मंत्री पद आलेय. तर वर्धा आणि बुलढाणा येथून एक मंत्रीपद मिळाल आहे. शिंदे मंत्रिमंडळात चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोली जिल्ह्यातून बावधर्मारावाबा आत्राम मंत्री होते.
दारू पिण्यासाठी दिलेल्या उसण्या 100 रूपयांसाठी मित्रानेच मित्राची केली हत्या
दारू पिण्यासाठी उसने दिलेल्या शंभर रुपयांची मागणी करत शिविगाळ केल्याचा राग मनात धरत मित्रानेच मित्राची डोक्यात दगड घालून निर्घृरपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे घडलाय, यात बाळू पोखरकर या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून याप्रकरणी राहुल गुळवे या आरोपीस नारायणगाव पोलिसांनी अटक केलीय, या प्रकरणाचा पुढिल तपास आता नारायणगाव पोलीस करत आहेत.
परभणीचा पारा खालावला
परभणीच तापमान 4.1 अंश सेसल्सिअसवर. या हिवाळ्यातील निच्चांकी तापमानाची नोंद. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागात झाली नोंद. मागील 5 दिवसापासून सतत होतेय तापमानात घट.
सत्ताधारी, विरोधकांमध्ये संघर्ष...
देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. काल नव्याने शपथविधी झालेल्या मंत्र्यांचा परिचय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सभागृहाच्या सदस्यांना करून देतील तर दुसरीकडे विरोधी पक्षाकडून सरकारच्या विरोधात आंदोलन देखील करण्यात येणार आहे माहिती सरकारचं भरभक्कम बहुमत आणि दुसऱ्या बाजूला विरोधकांची कमी झालेली संख्या या पार्श्वभूमीवर सरकार आणि विरोधकांमध्ये काय संघर्ष होतो ते पाहणं महत्त्वाचं असेल.
राज्यातील थंडीचा जोर वाढला
राज्यातील थंडीचा जोर वाढलाय. अनेक शहरांमध्ये पारा 10 ते 15 अंशांच्या पातळीवर खाली आलाय. निफाड तालुक्यात थंडीचा प्रचंड कडाका जाणवतोय. ओझरमध्ये रविवारी 3.8 अंश इतकं किमान तापमान नोंदलं. तर धुळ्याचा पारा 4 अंशांपर्यंत आलाय. मराठवाडा, विदर्भात किमान तापमानात लक्षणीय घट झालीय. येत्या काही दिवसांत थंडी नवीन विक्रम नोंदवेल आणि डिसेंबर महिना सर्वाधिक थंड महिना ठरू शकेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : काश्मीरमधील थंडीचा महाराष्ट्रावर कसा होतोय परिणाम? राज्याच्या कोणत्या भागांमध्ये गारठा आणखी वाढणार?
छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्याच्या निषेधार्थ ओबीसी संघटनेचं आंदोलन
छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्याच्या निषेधार्थ, नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या ओबीसी संघटनेनं आंदोलन केलं. नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं. तर मंत्रिमंडळात भुजबळांना स्थान न मिळाल्यानं त्यांचे समर्थक कमालीचे नाराज झाले. अनेक भुजबळ समर्थकांनी साहेब सांगतील तीच दिशा अशा आशयाचं स्टेटस त्यांच्या मोबाईलवर ठेवलंय.
आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होतंय..
आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत असून, नागपुरात आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अधिवेशनात 20 विधेयक मांडण्याची शक्यता असून महायुती सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन विविध मुद्यांवरून वादळी ठरण्याची शक्यता आहे. अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेक मुद्द्यांवरुन घेरण्याची शक्यता.