भारतात भयानक थंडी! काश्मिरमधील प्रसिद्ध धबधबा गोठला

काश्मिरमधील गोठलेला धबधबा पाहून पर्यटक अचंबित होत आहेत. 

| Dec 16, 2024, 15:59 PM IST

Kashmir Frozen waterfall : भारतात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडली आहे. काश्मिरमध्ये पारा मायनस 5.9 अंशावर गेला आहे. तुफान बर्फवृष्टीसह येथे हाड गोठवणारी थंडी पडली आहे. काश्मिरमधील प्रसिद्ध धबधबा देखील गोठला आहे. यामुळे  हा धबधा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना वेगळाच अनुभव मिळत आहे. 

1/7

जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे हवामानात बदल होत आहे.. पर्वतांवर झालेल्या हिमवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमध्ये थंडी वाढली आहे. 

2/7

पांढ-या शुभ्र बर्फाने झाकलेली झाड, डोंगर, घरं काश्मिरच्या सौंदर्यात आणखी भर टाकत आहेत.

3/7

काश्मिरमधील रस्त्यावर बर्फाची पांढरीशुभ्र चादर पसरलीये. हे मनमोहक दृश्य पर्यटकांनाही आकर्षित करतंय.

4/7

ड्रंग धबधबा गोठल्याने पर्यटकांना या धबधब्याचे वेगळेच रुप पहायला मिळत आहे. 

5/7

गुलमर्गच्या लोकप्रिय हिल स्टेशनपासून काही किलोमीटर अंतरावर असले ड्रंग धबधबा काश्मिरमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. 

6/7

उत्तर काश्मीरच्या तंगमार्ग येथील ड्रंग धबधबा गोठला आहे. यामुळे सर्व काही स्तब्ध झाले आहे. 

7/7

काश्मिरमध्ये सध्या तुफान बर्फवृष्टी होत आहे. येथे पर्टकांची गर्दी पहायला मिळत आहे.