PHOTO : सर्वात बोल्ड फॅशनेबल राणी! हिरेजडीत सँडल, सिंधिया कुटुंबासोबतचं लग्न मोडून केलं लव्ह मॅरेज, 'या' साडीचा भारतात आणला ट्रेंड
तिच्या काळातील सर्वात बोल्ड आणि फॅशनेबल असणारी ही राणी होती. सिंधिया कुटुंबासोबतचं लग्न मोडून ती घरातून पळून जाऊन लव्ह मॅरेज केलं. सँडलमध्ये कोट्यवधींचं हिरे आणि मोती जडले आहेत. ती राणी कोण होती माहितीये का?
1/11
2/11
महाराणी इंदिरा देवी यांना कपडे घालण्याची खूप आवड होती. परदेशी फॅशनच्याही ती सतत संपर्कात असायची. मात्र राणीला जुगाराचे व्यसन होते. अनेक हॉलिवूड तारे राणीचे चांगले मित्र होते, त्यापैकी बरेच जण तिच्या पार्ट्यांमध्ये झळकायचे. ज्या इटालियन कंपनीला त्यांनी शूजच्या 100 जोड्यांची ऑर्डर दिली होती. त्याचं नाव साल्वाटोर फेरोगामो होते. ही कंपनी 20 व्या शतकातील सर्वात प्रसिद्ध डिझायनर कंपनी मानली जात होती. आजही या कंपनीचे जगभर आलिशान शोरूम आहेत.
3/11
इटलीचे साल्वाटोर फेरागामो हे त्यांच्या आवडत्या पाश्चात्य डिझायनर्सपैकी एक होते. साल्वाटोरने आपल्या आत्मचरित्रात लिहिलंय की, एकदा राणीने आपल्या कंपनीला शूज बनवण्याची ऑर्डर दिली, त्यातील एक ऑर्डर म्हणजे सँडल बनवण्याची होती. ज्यामध्ये हिरे आणि मोती जडलेले होते. त्यांना हे हिरे आणि मोती फक्त त्याच्या संग्रहासाठी हवे होते. त्यामुळे त्यांनी या ऑर्डरसोबत हिरे-मोतीही पाठवले होते.
4/11
5/11
महाराणी इंदिरा देवी यांचा जन्म 1892 तर मृत्यू 1868 मध्ये झाला. त्या 76 वर्षे जगल्या. नंतर, महाराणा जितेंद्र नारायण यांच्या मृत्यूनंतर, त्या देखील कूचबिहार राज्याची रीजेंट बनल्या. कारण त्यांचा मुलगा त्यावेळी लहान होता. राणी इंदिराजींच्या लग्नाची कथाही रंजक आहे. बडोद्यातील गायकवाड घराण्यातील इंदिराजींचे बालपणातच ग्वाल्हेरचे भावी राजा माधोराव सिंधिया यांच्याशी लग्न ठरलं होतं. दरम्यान, 1911 मध्ये त्या धाकट्या भावासोबत दिल्ली दरबारात गेल्या होत्या. जिथे त्यांची भेट कूचबिहारच्या तत्कालीन महाराजाचा धाकटा भाऊ जितेंद्रशी झाली. काही दिवसातच त्या त्यांच्या प्रेमात पडल्या आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
6/11
इंदिराजींना हे माहीत होते की जर त्यांच्या आई-वडिलांना हे कळलं तर ते रागावतील. कारण ग्वाल्हेर आणि बडोद्याच्या सिंधिया राज्यकर्त्यांमधील राजकीय संबंध बिघडतील. त्यावेळी ग्वाल्हेर राजघराणे देशातील उच्चभ्रू राजघराण्यांपैकी एक होतं. लग्न मोडणे म्हणजे मोठा वाद निर्माण करणारा होता. जितेंद्र हा महाराजांचा धाकटा भाऊ असल्याने त्याला राजा होण्याची शक्यता नव्हती.
7/11
मग इंदिरा देवींनी स्वतः हिंमत दाखवून लग्न मोडलं. त्यावेळी 18 वर्षांच्या राजकुमारीचं असं कृत्य हे अकल्पनीयच होतं. तिने तिच्या मंगेतराला पत्र लिहिलं की तिला त्याच्याशी लग्न करायचं नाही. यानंतर बडोद्यातील इंदिराजींच्या वडिलांना ग्वाल्हेरच्या महाराजांचा एक ओळीचा तार आला, राजकन्येच्या पत्राचा अर्थ काय आहे?
8/11
इंदिरादेवींच्या आई-वडिलांना आपल्या मुलीचा हेतू कळल्यावर धक्काच बसला. शिवाय ग्वाल्हेरचे महाराज या बाबतीत अतिशय सभ्यपणे वागले. त्यानंतर त्यांनी इंदिराजींच्या आई-वडिलांना एक पत्र लिहिलं की, त्यांची परिस्थिती समजू शकतो, त्याखाली त्यांनी 'तुमचा मुलगा' लिहून स्वाक्षरी केली. मात्र, आपल्या मुलीच्या या कृत्याने पालकांना मोठा धक्का बसला होता.
9/11
इंदिराजींच्या आई-वडिलांनी ग्वाल्हेरच्या राजघराण्यातील तिची लग्ने मोडणे कसे तरी मान्य केलं, पण जितेंद्रशी त्यांच्या मुलीने लग्न करणे त्यांना अजिबात मान्य नव्हत. कारण त्याची प्रतिमा प्लेबॉय अशी होती. त्यांनी जितेंद्रला आपल्या मुलीपासून दूर राहण्याचा इशारा दिला. पण हे सर्व होऊ शकलं नाही कारण जितेंद्र आणि इंदिरा यांनी एकमेकांशी लग्न करण्याचं ठरवलं होतं.
10/11