Maharashtra Breaking News LIVE Updates: CM फडणवीसांनी बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं - रोहित पवार
Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील ठळक घडामोडींचा थेट आढावा एका क्लिकवर
Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यात मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. सोमवारपासून नागपूरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकारणातील प्रत्येक घडामोडींचा आढावा या लाइव्बब्लॉगच्या माध्यमातून घेऊया.
Latest Updates
आता बातमी एका अपूर्ण लढ्याची...
ज्येष्ठ आंदोलनकर्त्या सुनंदा मोकाशी यांनी मंबईत अखेरचा श्वास घेतला. आझाद मैदान परिसरातील झोपडीत त्यांचा मृतदेह आढळला. गेल्या अनेक वर्षांपासून त्या आझाद मैदानात आंदोलन करत होत्या. निराधारांच्या मानधानासाठी त्या एकहाती लढाई लढत होत्या. यासाठी वर्षाचे 12 महिने त्या आझाद मैदानातच ठाण मांडून होत्या. पांढरी साडी आणि हातातील पिशवीत अनेक कागदपत्रं एवढाच त्यांचा लवाजमा असायचा. या त्यांच्या लढ्यात त्यांना आश्वासनं तर अनेक मिळाली. मात्र त्यांच्या लढ्याला न्याय मिळू शकला नाही. अखेर निराधारांसाठीचा त्यांचा लढा अपूर्ण राहिला.मुंबईतील अदानी स्मार्ट मीटरला शिवसेना UBT ने विरोध केलाय. या स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात भरमसाट वाढ होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. यामुळे नागरिकांचा होणारा विरोध लक्षात घेता अदानींसोबत हा स्मार्ट मीटरचा करार रद्द करावा. अशी मागणी शिवसेना UBT चे आमदार अजय चौधरी यांनी विधानसभेत केलीय.
Maharashtra Breaking News LIVE Updates : देशातील सोयाबीनचे दर घसरले
केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्क वाढवून देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या दरात सुधारणा होईल,अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय बाजारात तेल महागल्याने देशातील सोयाबीनचे दर घसरलेत...सध्या वाशिम जिल्ह्यात सोयाबीनचे दर सरासरी 4 हजार प्रति क्विंटलवर आलेत.. दुसरीकडे, किरकोळ बाजारात सोयाबीन तेलाचे दर 138 ते 140 रुपये प्रति लिटरवर कायम आहेत, ज्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहक दोघेही अडचणीत आलेत... शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वसूल करणे कठीण जात असताना ग्राहकांना तेल महागल्याने खर्चाचा बोजा सहन करावा लागतोय. त्यामुळे शेतकरी संघटनांनी सरकारने बाजार नियंत्रणासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केलीये.
Maharashtra Breaking News LIVE Updates : 'मारहाणीचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन कुणाला दाखवला?'
बीडचे तरुण सरपंच संतोष देशमुख यांना जिवघेणी मारहाण करत असतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन तो कोणाला तरी दाखवण्यात आला. त्या संबंधितावरही खुनाचं कलम लावलं पाहिजे अशी मागणी, आमदार सुरेश धस यांनी केली आहे. या प्रकरणातले आरोपी फरार असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. या निर्घृण हत्येच्या कसून चौकशीची मागणी धस यांनी केलीये.
Maharashtra Breaking News LIVE Updates : 'स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार द्यावा'
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा केलीये. केंद्र सरकारला स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यास काय अडचण आहे. असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय.
Maharashtra Breaking News LIVE Updates : खातेवाटपाबाबत उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका
उद्धव ठाकरेंनी खातेवाटपाबाबत नव्या सरकारवर टीका केलीय...मंत्रिमंडळ विस्तार झाला मात्र अद्याप खातेवाटप झालेलं नाही, अधिवेशनात काय सुरू आहे काहीच कळत नाही...आम्ही प्रश्न उपस्थित करतो मात्र कोणताही नेता कोणत्याही प्रश्नावर उत्तर देतोय...याला काहीच अर्थ नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय
Maharashtra Breaking News LIVE Updates : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील व्हिडिओ समोर आलाय.. प्रकरणातील एक आरोपी आणि पीएसआय यांच्यात भेट झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय. केजमधील एका हॉटेलमध्ये दोघेही भेटल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.. आरोपी सुदर्शन घुले आणि पीएसआय राजेश पाटील यांची भेट सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालीये...
Maharashtra Breaking News LIVE Updates : देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंनी घेतली भेट
नागपूरमध्ये अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीसांना भेटायला उद्धव ठाकरे त्यांच्या कार्यालयात पोहोचले. तिथे दोघांमध्ये काही काळ चर्चा झाली.
बातमी सविस्तर वाचा - उद्धव ठाकरे - फडणवीसांमध्ये 6-7 मिनिटं चर्चा, भेटीनंतर ठाकरे म्हणाले, 'महाराष्ट्रात सुसंस्कृत...'
Maharashtra Breaking News LIVE Updates : उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट
नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु असून आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमागील कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचीदेखील भेट घेतली आहे.
Maharashtra Breaking News LIVE Updates : 'निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट आहे का?'
वन नेशन वन इलेक्शन या मुद्द्यावरून वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रीया दिलीय. लोकसभा निवडणूक वेगळ्या मुद्यावर असते आणि विधानसभेच्या निवडणुकीचे मुद्दे वेगळे असतात. त्यामुळे स्थानिक पक्षांवर नक्कीच याचा परिणाम होईल असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय.
Maharashtra Breaking News LIVE Updates : 'केंद्रीय निवडणूक आयोग संपवण्याचा घाट'
एक देश एक निवडणुकीवर संजय राऊतांनी आक्षेप घेतलाय. 'देशात अघोषित हुकुमशाही लादण्याचा त्यांचा प्रयत्न असल्यांचं संजय राऊतांनी म्हटलंय. केंद्रीय निवडणूक आयोग संपवण्याचा हा घाट असल्याची टीकाही राऊतांनी केलीय.
Maharashtra Breaking News LIVE Updates: वन नेशन वन इलेक्शन विधेयक लोकसभेत मांडले. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक मांडले
खासदारांनी केलं मतदान
विधेयकाला समर्थन - 269
विधेयकाला विरोध - 198
Maharashtra Breaking News LIVE Updates : TMT तील कर्मचारी बेमुदत संपावर
ठाणे परिहवन सेवेच्या 1 हजार पेक्षा अधिक चालक आणि कर्मचा-यांनी बेमुदत संप पुकारलायं. पगार वाढ, दंड आकारण्याच्या विरोधात कर्मचा-यांनी बेमुदत संप पुकारला. त्यामुळे चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांचे हाल झालेत. तर मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा ही इशारा कर्मचा-यांनी दिलायं.
Maharashtra Breaking News LIVE Updates: विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक 19 डिसेंबरला होणार
विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक 19 डिसेंबरला होणार. विधान परिषदेत घोषणा. 18 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख
Maharashtra Breaking News LIVE Updates:खाते वाटप झालेले नाही मग अधिवेशन काय टाईमपास म्हणून सुरु आहे का ? उद्धव ठाकरेंचा सवाल
Maharashtra Breaking News LIVE Updates: एक देश, एक निवडणूकबाबत मतदान होणार
एक देश, एक निवडणूकबाबत मतदान घेण्यात येणार आहे. पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक मशीनने मतदान होईल. मतदानाला काहीच वेळात सुरुवात होईल
Maharashtra Breaking News LIVE Updates: गंमत म्हणून अधिवेशन घेतलं जातंय: उद्धव ठाकरे
शिवसेनेकडून 'एक देश, एक निवडणूक' विधेयकाचं समर्थन
श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेमध्ये 'एक देश, एक निवडणूक' विधेयकाचं समर्थन केलं. "शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या वतीने मी या विधेयकाचं समर्थन करतो. गेल्या काही महिन्यांपासून जेव्हा सुधारणा होते तेव्हा विरोधकांना ते असंवैधानिक वाटते. ते केवळ विरोधच करतात," असं श्रीकांत शिंदे म्हणाले. श्रीकांत शिंदे बोलताना सभागृहात मोठा गोंधळ झाल्याचं दिसून आलं. "विरोधी पक्ष 6 महिन्यांपासून प्रत्येक गोष्टीला असंवैधानिक म्हणतात," असा टोला श्रीकांत शिंदेंनी लगावला.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेवरुन विधानसभेत राडा
उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत राज्यपालांवरुन केलेल्या विधानाला सत्ताधाऱ्यांनी विरोध केला. अखेर जाधव यांनी केलेले विधान कामकाजातून काढून टाकण्यात आलं.
Maharashtra Breaking News LIVE Updates: रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपकडून कारणे दाखवा नोटीस
रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपकडून कारणे दाखवा नोटीस. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम केल्याचा ठपका. भाजपचे कार्यालय सचिवांकडून मोहिते पाटलांना नोटीस. सात दिवसांत लेखी स्वरुपात स्पष्टीकरण देण्याचे आदेश
Maharashtra Breaking News LIVE Updates: उद्धव ठाकरे एक वाजता पत्रकार परिषद घेणार
Maharashtra Breaking News LIVE Updates: वन नेशन वन इलेक्शनशी संबंधित विधेयक लोकसभेत सादर
वन नेशन वन इलेक्शनशी संबंधित विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले असून कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक मांडले. संविधानाचे 129 वे दुरुस्ती विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक 2024 सादर करण्यात आले
Maharashtra Breaking News LIVE Updates: प्रश्न मंत्रिपदाचा नाही, अवहेलनेचा आहे; भुजबळांनी बोलवून दाखवली खंत
Maharashtra Breaking News LIVE Updates: 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसणार
25 जानेवारीपासून मनोज जरांगे अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसणार आहेत. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही घोषणा केली आहे.
Maharashtra Breaking News LIVE Updates: बीड हत्याकांडाचे विधानसभेत पडसाद
बीड हत्या कांडाचे पडसाद विधानसभेत उमटले आहेत. आमदार संदीप क्षीरसागर आणि भाजपच्या आमदार नमिता मुंडदा यांनी मुद्दा उपस्थित केला होता. वाल्मिक कराड हा व्यक्ती आहे हा क्रिमिनल माणूस आहे, त्याला 2 बॉडीगार्ड कसे मिळतात? खंडणी प्रकारांत त्याच्यावर गुन्हा दाखल आहे पण इतर बाबतीत त्याचा समावेश का नाही? अधिवेशन संपेपर्यंत वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर बीडमध्ये मोठा मोर्चा काढू, असा इशारा संदीप क्षीरसागर यांनी दिला आहे. तर, नमिता मुंदडा यांनी संतोष देशमुखच्या हत्येतील मुख्य माणूस फरार आहे. आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी नमिता मुंदडा यांनी मोठी मागणी केली आहे.
Maharashtra Breaking News LIVE Updates: परभणीचा मुद्दा काँग्रेसकडून उपस्थित
परभणीची घटना अतिशय निंदनीय आहे. परभणीच्या प्रकरणामध्ये सुनियोजित कट होता असा वास येतो आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे नितीन राऊत यांनी उपस्थित केला आहे.
Maharashtra Breaking News LIVE Updates: विधानसभेच्या कामकाजाला सुरूवात
Maharashtra Breaking News LIVE Updates: विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीआधी शिवसेना आमदारांची बैठक
विधान परिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीच्या आधी शिवसेना आमदारांची बैठक. विधानभवनात सर्व शिवसेना आमदारांना दहा वाजता उपस्थित राहण्याचे आदेश. आज उद्धव ठाकरे देखील विधान परिषदेत उपस्थित राहणार असल्याने विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. त्यामुळे पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी तसेच काही महत्त्वाचे मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी बोलवली आमदारांची बैठक
Maharashtra Breaking News LIVE Updates: ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेकडे की भाजपकडे ?
राज्य मंत्रिमंडळाच्या नव्या विस्तारात ठाणे जिल्ह्याला तीन मंत्रिपदे मिळाली आहेत. त्यात दोन शिंदेसेनेकडे आणि एक भाजपला मिळाली आहे. भाजपने गणेश नाईक यांना मंत्रिपद देऊन शिंदेसेनेला शह देण्याची खेळी खेळली आहे. शिंदे आणि नाईक यांच्यातील राजकीय संघर्ष सतत ताणलेला असून, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भाजपकडे जातो की शिंदेसेनेकडे, यावरून उत्सुकता आहे
Maharashtra Breaking News LIVE Updates: भाजपचे सात पदाधिकारी सहा वर्षासाठी पक्षातून निष्कासित
विधानसभेमध्ये अकोला पश्चिमचे भाजप उमेदवार विजय अग्रवाल यांचा पराभव झाला राज्यात आणि जिल्ह्यात महायुतीची लाट असूनही भाजपचा उमेदवाराचा या ठिकाणी पराभव झाला... भाजपने यानंतर पराभवाचं मंथन करत पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या सात पदाधिकाऱ्यांचा शोध लावून त्यांना सहा वर्षासाठी पक्षातून निष्कासित केलं आहे. यामध्ये भाजपच्या माजी महिला महापौर अश्विनी हातवळणे त्यांचे पती प्रतुल हातवळणे , माजी नगरसेवक हरिभाऊ काळे , आशिष पवित्रकार , गिरीश गोखले यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
Maharashtra Breaking News LIVE Updates: 'भुजबळांनी जरांगेंच्या विरोधात टोकाची भूमिका घेतली'
भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेतली होती. आमची इच्छा होती त्यांनी ही टोकाची भूमिका घेऊ नये. त्यांना ती टोकाची भूमिका घ्यायला लावली. ज्यांनी ती घ्यायला लागली त्यांनी आता त्यांना वाऱ्यावर सोडलं. त्यांचा पुरेपूर वापर त्या काळात झाला, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Maharashtra Breaking News LIVE Updates: अमरावतीत अवैध नायलॉन मांजा विक्रेत्याविरुद्ध कारवाई
अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या रविनगर भागात अवैध नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. या करवाईत एकाला ताब्यात घेत त्याच्याकडून 36 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. राजापेठचे ठाणेदार पुनीत कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली ही करवाई करण्यात आली. दरम्यान मांजाविरुद्ध शहरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली असून शहराच्या विविध भागातून मांजा जप्त करण्यात येत आहे. तसेच मांजा ने दुखापती झाल्याच्या ही घटना उघडकीस येत आहे.
Maharashtra Breaking News LIVE Updates: अष्टविनायक महामार्गावर भिषण अपघात विद्यार्थांचा मृत्यू
पुण्याच्या शिरूर तालुक्यातील मलठण कवठे दरम्यान अष्टविनायक महामार्गावर दहावी शिकणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थांचा आज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुर्दैवीरित्या मृत्यू झालाय, दिगंबर शिंदे असं मुलाचे नाव असून दिगंबर शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना भरधान वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहणाने त्याला चिरडल्याने यातच त्याचा मृत्यू झालाय, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जातीय
Maharashtra Breaking News LIVE Updates: छगन भुजबळ मोठा निर्णय घेणार?
छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर ते नाराज असल्याचे समोर आले आहे. नागपूरयेथून थेट नाशिकच्या भुजबळ फार्म या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. भुजबळ सकाळपासून नाशिकच्या भुजबळ फार्मवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. या भेटीनंतर छगन भुजबळ काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. समता परिषदेच्या सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलणार आणि मग ठरवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Maharashtra Breaking News LIVE Updates: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबतची सुनावणी आज
सर्वोच्च न्यायालयात आज राष्ट्रवादी काँग्रेस्या पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे.
Maharashtra Breaking News LIVE Updates: देवेंद्र फडणवीस सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज काही महत्त्वाची विधेयके सरकारकडून सभागृहात सादर केली जाऊ शकतात. यात मुख्यत्वे जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किमान तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्याच्या विधेयकासह इतर काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील आज विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार आहेत. त्यामुळे आज विरोधकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असेल.
Maharashtra Breaking News LIVE Updates: आज होणार विधान परिषद सभापती पदाचा निर्णय
2 वर्षांपासून रिक्त असलेले परिषदेच्या सभापती पदाच्या निवडीबाबत आज कार्यक्रम जाहीर होणार. विधानसभेच्या पाठोपाठ आता परिषदेतही भाजप सभापती पदावर दावा करण्याची शक्यता. तर शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा.
Maharashtra Breaking News LIVE Updates: वन नेशन, वन इलेक्शन बिल लोकसभेत सादर होणार?
आज वन नेशन, वन इलेक्शन बिल लोकसभेत सादर होणार आहे. शिवसेना खासदारांना त्या साठी व्हीप बजावण्यात आला असून शिवसेनेचे सर्व खासदार आज एनडीए अलायन्ससाठी संसदेत उपस्थित राहणार. शिवसेनेचे लोकसभेचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी हा व्हीप जारी केला आहे