Maharashtra Breaking News LIVE Updates: शिवसेनेला नगरविकास आणि पर्यटन खातं मिळणार - सूत्र

Wed, 18 Dec 2024-4:12 pm,

Maharashtra Breaking News LIVE Updates: विधानसभेच्या हिवाळी अधिवेशानातील तिसऱ्या दिवसाच्या घडामोडींबरोबरच राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा एकाच क्लिकवर...

Latest Updates

  • विधानपरिषद सभापती निवडणुकीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज ?

    राम शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हजर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र होते गैरहजर

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    उपसभापती निलम गो-हे यांना सभापती करण्यासाठी एकनाथ शिंदे होते प्रयत्नशील

    परंतु भाजपने राम शिंदे यांचे नाव घोषित केल्यामुळं एकनाथ शिंदे नाराज झाल्याची माहिती

  • अधिवेशनाचा कालावधी वाढणार नाही

    - कामकाज सल्लागार समितीची बैठक संपली

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    - अधिवेशनाचा कालावधी वाढणार नाही

    - हिवाळी अधिवेशन २१ डिसेंबरलाच गुंडाळले जाणार

    - विदर्भ व मराठवाड्यावर २ दिवस विशेष चर्चा घेण्याचा प्रस्ताव विरोधकांनी दिला

    - सत्ताधाऱ्यांकडून याच कालावधीत चर्चा घडवण्याचे आश्वासन

  • शिवसेनेला नगरविकास आणि पर्यटन खातं मिळणार - सूत्र

    खातेवाटपात शिवसेनेला नगरविकास आणि पर्यटन ही अतिरिक्त खाती मिळणार

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    या दोन खात्यांच्या बदल्यात परंतु उत्पादन शुल्क खाते मात्र शिवसेनेला सोडावे लागल्याची माहिती

    शिवसेनेकडे असलेली इतर खाती मात्र कायम राहणार

    सुत्रांची माहिती

  • आपल्याला पेटून उठवायचं आहे - छगन भुजबळ

    मला अनेक ठिकाणाहून फोन येत आहेत. आमचा तालुका, जिल्हा, राज्यात या असं सांगत आहेत. लासलगावमध्ये आपलं कोणीतरी गेल्यासारखी अवकळा पसरली आहे. आपल्याला पेटून उठवायचं आहे, पण पेटायचं नाही. निषेध करताना आपल्याला संयम पाळायचा आहे असं आवाहन छगन भुजबळ यांना नाशिकमध्ये केलं आहे.  

  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण: शरद पवार बीडला जाणार

    21 डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार बीड दौऱ्यावर जाणार आहे. शरद पवार मस्साजोगचे सरपंच मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. हा मुद्दा विधानसभेत आणि लोकसभेतही विरोधकांनी मुद्दा उचलला होता.

  • नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग विरोधात सांगलीत शेतकरी रस्त्यावर; लाल दिव्याच्या गाड्या फोडण्याचा इशारा

    नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी सांगलीमध्ये आज सामाजिक संघटनांनी एकत्रित येत नागपूर रत्नागिरी महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. अंकली येथील रत्नागिरी नागपूर महामार्गावर शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी सुमारे एक तास ठिय्या मारत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे रत्नागिरी- नागपूर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकां ताब्यात घेत महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला. दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांवर अन्यायकारक असणारा नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अन्यथा या पुढील काळात सांगली जिल्ह्यामध्ये महायुतीच्या मंत्र्यांना फिरू देणार नाही, प्रसंगी त्यांच्या लाल दिव्याच्या गाड्या फोडू असा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.

  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण: पोलिसांना मोठं यश; खरं कारण समोर येणार? 

    बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या अटकेमुळे अटकेत असलेल्या आरोपींची संख्या चारवर पोहोचली आहे. विष्णू चाटे हा हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी आहे. विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. विष्णू चाटेच्या अटकेमुळे या प्रकरणात बरीच धक्कादायक माहिती समोर येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

  • फडणवीसांच्या विनंतीला मान देऊन महाविकास आघाडीचा मोठा निर्णय

    भाजपाचे आमदार राम शिंदे यांचा विधान परिषदेच्या सभापतीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीकडून सभापतीपद निवडणुकीसाठी अर्ज भरला जाणार नाहीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक बिनविरोध करण्याची महाविकास आघाडीकडे विनंती केल्याची माहिती समोर येत आहे.

  • दिल्लीत मोठी घडामोड! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला

    हिवाळी अधिवेशनानिमित्त दिल्लीत असलेले राज्यसभा खासदार शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले आहेत. शरद पवार हे दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संम्मेलनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी गेल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वीही पवारांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन मोदींना निमंत्रण पाठवण्यात आलं असून ते उद्घाटन समारंभाला नक्की येतील असा विश्वास व्यक्त केलेला.

  • 'योग्यवेळ आल्यावर...'; भुजबळांच्या नाराजीवर पक्षाची पहिली प्रतिक्रिया

    ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्यासंदर्भात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पहिली अधिकृत प्रतिक्रिया नोंदवली आहे. "योग्यवेळ आल्यावर भुजबळांची भेट घेणार" असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी सांगितलं आहे. "भुजबळांना मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे", असंही तटकरे म्हणाले. "भुजबळांची भेट घेऊन सविस्तर चर्चा आम्ही करणार आहोत", असंही तटकरेंनी सांगितलं. 

  • अजित पवार विधानभवनाकडे रवाना

    उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या नागपूरमधील 'विजयगड' निवासस्थानातून विधानभवनाकडे रवाना झाले आहेत. अजित पवार आज विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभागी होणार आहेत. अजित पवार घराबाहेर पडले तेव्हा त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांचा मोठा गराडा दिसून आला.

  • अजित पवार घेणार भुजबळांची भेट; नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु

    ओबीसी नेते छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हालचाल सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लवकरच छगन भुजबळांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. भेटीची तारीख अद्याप ठरली नाही मात्र तिन्ही नेते नाशिकमध्ये जाऊन भुजबळांची भेट घेण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • विधानसभा अध्यक्षपदानंतर भाजपाच्या हाती लागणार आणखी एक मोठं पद?

    विधानसभेनंतर विधान परिषदेचं अध्यक्षपदही भाजपकडेच राहणार असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपा महायुतीतर्फे राम शिंदे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सकाळी 10 वाजता राम शिंदे अर्ज भरणार आहेत. विधान परिषद सभापतीपदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. सभापती निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. सभागृहातील पक्षीय बलाबलात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. महायुतीकडे 35 जागांचं बळ असून महाविकास आघाडीकडे केवळ 17 जागा असल्याने ही निवडणूक बिनविरोध होईल असं सांगितलं जात आहे. 

  • अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अजित पवार कामकाजात होणार सहभागी 

    हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अजित पवार कामकाजात सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

  • पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

    पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर अज्ञात वाहनांच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला आहे. रात्रीच्या सुमारास मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वडगाव मावळच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. माहिती समजताच घटनास्थळी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृत बिबट्याचे शरीर हे फॉरेस्ट विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

  • भीमा-कोरेगाव प्रकरणात आज सुनावणी; प्रकाश आंबेडकर लावणार हजेरी

    भीमा कोरेगाव प्रकरणात आज आयोगासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीला प्रकाश आंबेडकर हजर राहणार आहेत. भीमा कोरेगाव इथं झालेल्या दंगलीची चौकशी भीमा कोरेगाव आयोगासमोर होत आहे. या प्रकरणात साक्षही नोंदवण्यात आल्या आहेत. आज प्रकाश आंबेडकर 11 वाजता आयोगात हजर राहणार असून त्यानंतर माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

  • हसन मुश्रीफ, अदिती तटकरेंबरोबरच शशिकांत शिंदेंनी घेतली अजित पवारांची भेट

    मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री अदिती तटकरे, शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस असून पहिल्या दोन दिवसांमध्ये अजित पवार कामकाजात सहभागी झाले नाहीत. आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवारांच्या विजयगढ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

  • मंत्री हसन मुश्रीफ अजित पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या 'विजयगड' निवासस्थानी दाखल

    नागपूरमधील घडामोडींना वेग आल्याचं चित्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पाहायला मिळत आहे. आज सकाळी अजित पवारांच्या नागपूर येथील 'विजयगड' या निवासस्थानी मंत्री हसन मुश्रीफ, पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट घेण्यासाठी गर्दी केली आहे.

  • अजित पवार आज तरी सभागृहात येणार का?

    राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पहिले दोन दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुणाच्याही गाठीभेटी घेतल्या नाहीत, शिवाय ते सभागृहात देखील अनुपस्थित होते. त्यामुळे अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी तरी अजित पवार सभागृहात येतील का? याकडे लक्ष लागलेल आहे. 

  • लोणावळ्यात चेन स्नॅचिंग! घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

    लोणावळा येथे चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. लोणावळ्यातील बापदेव रोड परिसरात मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास वॉकसाठी जाणाऱ्या महिलेचं मंगळसूत्र चोरून नेण्यात आले. दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी पीडित महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढले. या महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र चोरटे असफल झाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली झाले. सर्रासपणे लोणावळ्यात सुरू असलेल्या या चेन स्नॅचिंग घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोणावळ्यात पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी आता नागरिकांमधून होऊ लागली आहे.

  • जालना : जरांगेंचा सातव्यांदा आमरण उपोषणाचा इशारा; 25 जानेवारीपासून...

    मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगे यांनी पुन्हा सामूहिक आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. येणाऱ्या 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथे सामूहिक आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिलाय. या उपोषणादरम्यान महाराष्ट्रातील मराठ्यांनी इतर कुठेही उपोषण न करता याच उपोषणात येऊन सहभागी व्हावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. ज्यांना उपोषणात बसायचं नाही त्यांनी या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी 25 जानेवारी रोजी अंतरवालीत यावं असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.

  • पैशाच्या पाऊस पाडण्याच्या प्रकरणात पोलिसांकडूनच जादूटोणाविरोधी फिर्याद

    पैशाच्या पाऊस पाडण्याच्या प्रकरणात सरकार तर्फे पोलिसांनी 'महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा अधिनियम 2013' नुसार गुन्हा दाखल केला आहे. धुळे पोलिसांनी पुढाकार घेत अंधश्रद्धा दूर करण्यासाठी पहिल्यांदाच अशा पद्धतीने गुन्हा दाखल केला आहे. मध्यप्रदेश राज्यातील खंडवा येथील तिघांना धुळे जिल्ह्यातील सांगावी परिसरात पैशाचा पाऊस पाडल्याच अमिष दाखवण्यात आलं होतं. या ठिकाणी या तिघांची लूट करण्यात आली होती. त्यांना मारहाणी करण्यात आले होती. या घटनेमध्ये गोळीबार ही झाला होता. त्यानंतर जखमी मांत्रिकावरती धुळे येथे उपचार सुरू असून, या प्रकरणी पोलिसांनी मुख्य गुन्ह्यासोबत जादूटोणा अधिनियम 2013 नुसार गुन्हा दाखला केला आहे. पोलीस स्वतःच या गुन्हामध्ये फिर्यादी झालेले आहेत.

  • बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : पाच आरोपींना पोलिस कोठडी

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या पाच आरोपींकडे फरार आरोपी आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रांची चौकशी करायची असल्याचे सांगत पोलिसांनी त्यांचा ताबा मागितला. त्यानुसार विशेष न्यायालयानेही त्या पाच आरोपींना 20 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. फरार आरोपी शुभमन लोणकर याचा भाऊ प्रवीण लोणकर, भागवत सिंग, अक्षदीप सिंग, सलमान वोहरा आणि सुमीत वाघ अशी या पाच आरोपींची नावे आहेत. ते सर्व न्यायालयीन कोठडीत असल्याने पोलिसांनी न्यायालयाकडून त्यांचा ताबा मागितला. शुभमन लोणकरच्या ठावठिकाण्याबाबत चौकशी करायची असल्याने पोलिसांनी प्रवीण लोणकरची पोलिस कोठडी मागितली. तर उर्वरित आरोपींकडे शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्याबाबत आणि आर्थिक मदतीबाबत तपास करायचा असल्याने त्यांचा ताबा मागितला. बचावपक्षाच्या वकिलांनी या सर्व आरोपींची पोलिस कोठडी मागण्यासाठी कोणतीही नवी कारणे पोलिसांकडे नसल्याचा युक्तिवाद न्यायालयात केला. प्रवीण लोणकर मकोकाअंतर्गत कबुलीजबाब देण्यास तयार नाही, असा युक्तिवाद वकिलांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पाच आरोपींना 20 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

  • 'घड्याळा'चा फैसला नवीन वर्षात होणार, सुप्रीम कोर्टातील सुनावणी 7 जानेवारीपर्यंत लांबणीवर

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि 'घड्याळ' चिन्हासंबंधी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. मंगळवारी हे प्रकरण सुनावणीसाठी द्विसदस्यीय खंडपीठापुढे सूचिबद्ध करण्यात आले होते. मात्र वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नाही. त्यानंतर पुढील सुनावणी 7 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष व 'घड्याळ' चिन्हाचा फैसला आता नवीन वर्षात होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीत न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन केले, असा दावा करीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अलीकडेच प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी लक्षवेधी ठरणार आहे.

  • यंदाचा नाताळ थंडीशिवाय! उद्यापासून पुन्हा तापमान वाढणार

    महाराष्ट्रात 19 डिसेंबरपासून पुढील 10 दिवस कमाल आणि किमान तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरवर्षी नाताळला जाणवणारी तीव्र थंडी या वर्षी जाणवण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली. मात्र, वर्षाअखेरीस म्हणजे 29 डिसेंबरपासून हळूहळू थंडीत वाढ होऊन नववर्षात पुन्हा थंडीची अपेक्षा करता येईल, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात थंडीची लाट किंवा थंडीची लाटसदृश्य स्थिती जाणवणाऱ्या ठिकाणांचे पहाटे साडेपाचचे किमान तापमान 5 ते 15 अंशांपर्यंत नोंदविण्यात आले आहे. सध्या महाराष्ट्रात भागानुसार कमी- अधिक प्रमाणात जाणवत असलेली थंडी आज टिकून राहील. नंतर तापमानात वाढ होईल, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.

  • भुजबळांचे आज शक्तिप्रदर्शन! काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष

    सकाळी अकरा वाजता छगन भुजबळ यांची संघर्ष सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा नाशिकच्या जेजुरकर मळा येथे आयोजित करण्यात आली असून सभेच्या मंचावर भुजबळ नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने भुजबळ नाराज असल्याने ते नेमकं कोणाला आणि कसं लक्ष्य करणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.

  • विधान परिषदेच्या सभापती निवडीसाठी आज दाखल होणार अर्ज

    विधान परिषदेच्या सभापती निवडीसाठी आज अर्ज दाखल करण्यात येतील. भाजपकडून प्राध्यापक आमदार राम शिंदेंना उमेदवार देण्यात आल्याने शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

  • विधिमंडळ अधिवेशन कामकाजाचा तिसरा दिवस वादळी ठरणार

    विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातील सरपंचाच्या हत्येसह परभणीतील घटनेवरून विरोधक आक्रमक झाले असून या संदर्भात आज सभागृहात स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून चर्चा होणार आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link