Maharashtra Breaking News LIVE Updates: आशिष शेलार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल

Wed, 08 Jan 2025-9:11 pm,

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स एकाच क्लिकवर जाणून घ्या...

Latest Updates

  • आशिष शेलार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल

    सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखल

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    सकाळीच शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यातच मनसे बैठकीत मुंबई महानगर पालिका निवडणुकीत आपण भाजपाबरोबर जावे अशी इच्छा अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती.

    त्यामुळे शेलार यांच्या या दोन्ही बैठका म्हणजे राज ठाकरेंसोबत व आता फडवणीस यांच्यासोबत ही भाजप व मनसे युतीची नांदी तर नाही ना ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे  

  • अशा माणसाला वाचविण्यासाठी..., जितेंद्र आव्हांडांचं वाल्मिक कराडवर पोस्ट

    हभप वाल्मिक अण्णा कराड याच्यावर फक्त 22  गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 7 गुन्हे हे भादंवि 307 चे आहेत. कलम 307  मुंबईच्या भाषेत हाफ मर्डर म्हणून ओळखला जातो. ज्या दुखापतीमुळे मृत्यू होऊ शकतो, अशी दुखापत! जर या 22 गुन्ह्यांची व्यवस्थित चौकशी केली तर आणखी धागेदोरे मिळतील आणि अजून 220 गुन्हे दाखल होतील. असे असूनही या थोर माणसाला कधीही तडीपारीची नोटीस नाही, त्यावर कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई नाही . अगदी हा पोलीस स्टेशनला गेला तर पोलीसच उठून उभे रहायचे. परळी विधानसभा मतदारसंघातील सगळेच इन्स्पेक्टर याच्या हाताखालील गुलामच होते अन् वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हे सर्व माहित होते. 307 सारखे गंभीर गुन्हे ज्या माणसावर आहेत; तो माणूस रक्तपिपासू झालेलाच असतो. अशा माणसाला वाचविण्यासाठी सरकारमधील काही माणसे प्रयत्न करत असतील तर धन्य आहे !

  • वाल्मिक कराड खंडणी प्रकरणात मोठी अपडेट

    खंडणी प्रकरणात पोलिसांनी आरोपी विष्णू चाटे याचे काही व्हॉईस सॅम्पल पोलिसांनी तपास करण्यासाठी घेतले आहेत. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    विष्णू चाटेचा मोबाईल पोलिसांना सापडला नाहीये. त्याचा तपास सध्या सुरू आहे. 

    तपास प्रक्रियेत मदत होण्यासाठी आता विष्णू चाटेचे काही व्हॉईस सॅम्पल घेण्यात आले आहेत आणि आज उशिरा आता वाल्मिक कराडचे सुद्धा व्हॉईस सॅम्पल घेतले जाणार आहेत. 

    पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्यास दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी विष्णू चाटेचे हे व्हॉईस सॅम्पल सीआयडीकडून घेण्यात आले आहेत. 

    यातून आता कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून किती खंडणी मागितली, त्यांच्यात नेमके काय बोलणे झाले, याचा उलगडा या सगळ्यातून होऊ शकतो.

  • अजित पवार- अमित शहा यांच्यातील बैठक संपली

    अजित पवार, प्रफुल पटेल आणि अमित शहा यांच्यातील बैठक संपली

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     जवळपास एक तास चालली बैठक 

    बैठकीमध्ये राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती 

    धनंजय मुंडे यांच्याबाबतही बैठकीत चर्चा झाली सूत्रांची माहिती

  • गृह विभागाने गठित केली SIT; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

    - बांगलादेशी आणि रोहिंग्यांना मालेगावात जन्म प्रमाणपत्र देण्याच्या प्रकरणी गृह विभागाने एसआयटी गठीत केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहेत. किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी आवाज उठवला होता. डीआयजी नाशिक यांच्या अध्यक्षतेत एसआयटीची स्थापना करण्यात आली. एसआयटीमध्ये नाशिक विभागीय सहआयुक्त, अतिरिक्त जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक या चार सदस्यांचा समावेश आहे. चौकशी करून अहवाल देण्यासह शिफारसी करण्यास सुद्धा सांगितले आहे. 

  • पुण्यात तरुणीवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी 

    पुणे  - आयटी कंपनीच्या पार्किंग मध्ये तरुणीवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    आरोपी कृष्णा कनोजा याला कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी

    किती आणि कोणाच्या पैशावर वाद झालाय याचा तपास करण्यासाठी येरवडा पोलिसांनी न्यायालयाकडे सात दिवसांची पोलीस कोटींची मागणी केली होती 

    मात्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे

  • आगामी 15 दिवसांत संघटनेमधे मोठे बदल दिसतील - शरद पवार

    शरद पवारांचे युवकांच्या बैठकीत भाष्य 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत जाणार असल्याबाबतच्या बातम्या केवळ अफवा 

    आपण जे सोबत येतील त्यांना घेऊन सत्तेत जाण्यापेक्षा लढणं पसंद करणार 

    आगामी 15 दिवसांत संघटनेमधे मोठे बदल आपल्याला पाहिला मिळतील

    1999 साली जी आपली परिस्थिती होती तीच आता निर्माण झाली आहे. आता माझ्याकडे देण्यासाठी काही नाही आणि गमावण्यासाठी देखील काही नाही 

    आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणूनच सामोरे जाणार

  • मुंबईत मनसे व भाजप युती संदर्भात चर्चा 

    - राज ठाकरेंच्या भेटीनंतर आशिष शेलारांची संघ पदाधिकाऱ्यांसोबत भेट

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    - भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत पार पडली बैठक

    - मुंबईत मनसे व भाजप युती संदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती

  • खासदार अमर काळे यांचा मोठा दावा

    सोनिया दुहान यांच्याकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 7 खासदारांना संपर्क साधण्यात आला. विरोधात काय करणार, आमच्या पक्षात या अशी चर्चा आमच्या खासदारांसोबत केली. सुप्रिया सुळे यांना मही जेव्हा सांगितलं तेव्हा त्या फक्त हसल्या. आमच्याशी संपर्क केला जातोय ही माहिती त्यांना आधीपासून होती असा दावा अमर काळे यांनी केला आहे. 

  • अजित पवार हे पक्षाचे प्रमुख, मात्र...; रोहित पवारांचं सूचक विधान

    आमदार रोहित पवार यांनी शरद पवारांच्या पक्षातील खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याची ऑफर आल्याबद्दल भाष्य केलं आहे. "आमच्या आमदारांच्या बाबतीत संपर्क झाला असेल अशी माहिती नाही. दिल्लीत अधिवेशन सुरू असताना खासदारांना संपर्क केला अशी चर्चा आहे. पण आमचे खासदार कुठेही जाणार नाहीत. दादांच्या पक्षतील प्रमुख नेते पवार साहेबांचा आदर करत असावेत. पण तटकरे साहेबांबद्दल मला सांगता येणार नाही. सुनील तटकरे हे व्यक्तिगत भूमिका घेतात. प्रमुख अजित पवार आहेत पक्षाचे मात्र सुनील तटकरे यांचं पक्षात बरंच काही चालतं. प्रफुल्ल पटेल यांचंदेखील पक्षात चालते, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

  • तुळजाभवानीच्या मुख्य गाभाऱ्यातील 4 प्राचीन शिळांना तडे

    तुळजापूरमधील तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील प्राचीन शिळांना तडे गेल्याची माहिती समोर आली आहे. तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील चार शिळांना तडे गेल्याची माहिती गाभाऱ्याच्या संवर्धनावेळी धक्कादायक बाब समोर आली आहे. तुळजाभवानी देवीचे मुख्य महंत तुकोजी बुवा यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. तडे गेलेल्या शिळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. रडारद्वारे ही तपासणी केली जाणार आहे. तपासणीनंतर प्रशासन शिळा बदलण्याचा निर्णय घेणार आहेत. पुरातत्व विभागाचे अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या शिळांची पाहणी केली आहे.

  • कल्याणमध्ये शाळेतून घरी जणाऱ्या मायलेकीला डंपरने उडवले; दोघींचा जागीच मृत्यू

    कल्याणच्या आग्रा रोड रस्त्यावर श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिर चौकामध्ये अपघात झाला आहे. अपघातात एक महिला आणि तिच्या तीन वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे. शाळेतून घरी जात असताना रस्ता क्रॉसिंगच्या वेळी डंपरने मायलेकीला उडवले. महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या डंपरने धडक दिली. डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • बाळासाहेब थोरात तो अर्ज मागे घेणार

    विधानसभेत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पराभवाचं खापर इव्हीएमवर फोडत पडताळणीसाठी अर्ज केला होता. आता मात्र थोरातांनी आपला पडताळणी अर्ज मागे घेतला आहे. 14 मतदान केंद्रावरील पडताळणीसाठी थोरातांनी जमा केलेले 6 लाख 60 हजार रूपये त्यांना पुन्हा परत मिळणार आहेत. या अगोदर राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपूरे आणि कळमकर यांनीही आपला अर्ज मागे घेतला आहे.

  • संतोष देशमुख यांना न्याय मिळावा ही आमचीही मागणी, पण...; लक्ष्मण हाकेंचा इशारा

    ओबीसी समाजाची आंदोलन ही संतोष देशमुख यांच्या बाबत निघणाऱ्या मोर्चाला प्रतिउत्तर नाही. तर या मोर्चाच्या माध्यमातून जे आम्हाला टार्गेट करण्यात येत आहे, ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्यात येत आहे त्यासाठी आंदोलन असल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सांगितलं आहे.  संतोष देशमुख यांना न्याय मिळावा ही आमचीही मागणी आहे. मात्र याचं भांडवल करून कुणी राजकारण करू नये. अन्यथा आमचेही मोर्चे राज्यभर दिसतील असं लक्ष्मण हाके म्हणाले आहेत. 

  • बीडमध्ये पोलीस मुख्यालयातच कर्मचाऱ्याने स्वत:ला संपवलं

    बीड शहरातील पोलीस मुख्यालयावर कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने, मुख्यालयाच्या भिंतीलगत आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. अनंत मारोती इंगळे असं आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते केज तालुक्यातील कळंम आंबा येथे राहत होते. इंगळे यांनी आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नसून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

  • 45 वर्षांनंतर काँग्रेस मुख्यालयाचा पत्ता बदलणार; आता नवा Address...

    45 वर्षांनंतर दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाचा पत्ता बदलणार आहे. '9 ए कोटला रोड' हे आता काँग्रेसचं नवं मुख्यालय असणार आहे. 'इंदिरा गांधी भवन' अस नव्या मुख्यालयाचं नाव असणार आहे. 15 जानेवारीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या हस्ते नव्या मुख्यालयाचं उद्घाटन होणार आहे. 

  • राज्याचा महसूल वाढवण्यासाठी बावनकुळेंचा मास्टर प्लॅन; आज फडणवीसांसमोर करणार प्रेझंटेशन

    महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसत आहे. महसूल विभागाच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याचे आज सादरीकरण होणार आहे. दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे सादरीकरण केलं जाणार आहे. येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे याबाबत सविस्तर सूचना दिली जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विभागाचा सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

  • भाजपाच्या मोठ्या नेत्याने घेतली राज ठाकरेंची भेट

    सांस्कृतिक कार्य मंत्री आणि भाजपाचे मुंबईमधील प्रमुख आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. ही सदिच्छा भेट असल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची माहिती समोर आलेली नाही. मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश राज यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही भेट झाली आहे.

     

  • 20 महिन्यांपासून रिक्त असणारं 'ते' सरकारी पद भरणार; फडणवीसांचा निर्णय

    राज्यात गेल्या 20 महिन्यांपासून मुख्य माहिती आयुक्त आणि अन्य माहिती आयुक्तांची पदे रिक्त ठेवणाऱ्या राज्य सरकारने चौफेर टीका होऊ लागताच मोठा निर्णय घेतला आहे. मंगळवारी माहिती आयुक्तांच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुख्य माहिती आयुक्तांच्या शोधासाठी निवृत्त न्यायमूर्ती सुनिल शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती गठीत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही नियुक्ती केली आहे. मुख्य सचिव सुजाता सौनिक तसेच सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांची सदस्य म्हणून या समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

  • रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय; उद्यापासून...

    रत्नागिरीतील मीरकवाडा आणि साखरीनाटे समुद्रकिनाऱ्यासाठी 2 ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. ड्रोनद्वारे आता अवैध मासेमारीवर लक्ष ठेवणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या समुद्रक्षेत्रात होणारी परप्रांतीय नौकांची घुसखोरी आणि अवैध मासेमारी रोखण्यासाठी आता ड्रोनचा वापर केला जाणार आहे. राज्यातील 7 सागरी जिल्ह्यांसाठी 9 ड्रोन मिळणार असून आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील मीरकवाडा आणि साखरीनाटे किनाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन मिळणार आहेत. 9 जानेवारीपासून ड्रोनची गस्त सुरू होणार आहे.

  • धाराशिवचे उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांचे अखेर निलंबन, राज्य सरकारचा निर्णय

    शासकीय कामकाजात कसुर केल्याप्रकरणी व आदेशांचे पालन न केल्याप्रकरणी धाराशिवचे उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांचे राज्य सरकारने अखेर निलंबन केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी धाराशिव येथील उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांच्यावर प्रशासकीय कारवाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्त सह राज्य सरकारला दिला होता त्यावर सरकारने निर्णय घेतला आहे. डव्हळे यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी देखील काम बंद आंदोलन केले होते. भूसंपादन कामे प्रलंबित ठेवले, वकिलांना अपमानास्पद वागणूक देणे, कारणे दाखवा नोटीसला उत्तर न देणे अश्या अनेक प्रकरणात डव्हळे यांच्या विरोधात तक्रारी होत्या. धाराशिव जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. 

  • येवल्यात विठ्ठल नगर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

    गेल्या काही दिवसापासून चोरट्यांनी येवला शहरात धुमाकूळ घातला असून चोरटे बंद घरांना लक्ष करत आहेत. विठ्ठल नगर परिसरातील प्रदीप कृष्णदास सोमासे बाहेरगावी गेले असल्याने त्यांच्या बंद घराचा कडी-कोंडा तोडून घरातील ऐवज व पैशाची चोरी करण्यात आली. अशाचप्रकारे दोन ते तीन ठिकाणी घराचे कडी-कोंडे तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या ठिकाणी नागरिक जागे झाल्याने चोरट्यांनी पळ काढला.

  • उल्हासनगरात गॅस पाईपलाईन फुटली

    उल्हासनगरमधील शांतीनगर परिसरातील डॉल्फिन क्लब रोडवर मंगळवारी महानगर गॅसची पाईपलाईन फुटली होती. सीएनजी पंपासमोर ही घटना घडली. या  घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. उल्हासनगर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचत त्यांनी गॅस पसरू नये म्हणून त्यावर पाण्याचा मारा केला. त्यांनतर महानगर गॅस आपत्कालीन विभागाने तातडीने गॅस पाईपलाईन बंद केली आणि दुरुस्तीचे काम सुरू केलं. अखेर अर्ध्या तासात परिस्थिती नियंत्रणाखाली आली.

  • आज नवी मुंबईत पाणीपुरवठा बंद

    नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आल्याने आज बुधवारी दिनांक आठ जानेवारी रोजी नवी मुंबईमधील सर्व प्रभागात सकाळी 10 ते रात्री 8 पर्यत पाणी पुरवठा होणार नाही. तसेच गुरुवारी कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

  • तब्बल पाच महिन्यानंतर 'या' किल्ल्यावरील संचारबंदी पोलिसांनी उठवली

    विशाळगड आणि विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या हिंसाचारानंतर कोल्हापूर पोलिसांनी 14 जुलै पासून विशाळगडावर संचारबंदी लागू केली होती, तब्बल पाच महिन्यानंतर प्रशासनाने 31 जानेवारी पर्यत ही संचारबंदी सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यत उठवली आहे. त्यामुळे आजपासून विशाळगड पर्यटकासाठी काही वेळेसाठी का असेना खुला झाला आहे.

  • मिरजेत बेकायदेशीर गॅस रिफ्लिंग अड्ड्यावर छापा; दोघांना अटक 

    सांगलीच्या मिरज शहरामध्ये बेकायदेशीर सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग सेंटरवर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे. शहरातल्या मालगाव रस्त्यावरील दिंडी बेस्ट या ठिकाणी भरवस्तीमध्ये वाहनांमध्ये बेकायदेशीररित्या गॅस रिफिलिंग अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर मिरज पोलिसांनी छापा टाकत दोघांना अटक केली आहे. त्याचबरोबर सहा गॅस सिलेंडरच्या टाक्या, गॅस रिफिलिंग साहित्य आणि एक रिक्षा असा 1 लाख 36 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिरज शहरामध्ये घरगुती आणि कमर्शियल गॅस सिलेंडरचा वापर बेकायदेशीररित्या वाहनांच्या गॅस रिफिलिंगसाठी करण्याचा उद्योग सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मिरज शहर पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे.

  • नायलॉन मांजा वापरणाऱ्या टवाळखोरांवर ड्रोनद्वारे नजर; पालकांवर दाखल होणार गुन्हे

    बंदी असलेला नायलॉन मांजा येवला शहरात चोरीछुपे विकला जात असून पोलीस त्यावर कारवाई करत आहेत. तरी देखील काही टवळखोर नायलॉन मांज्याद्वारे पतंग उडवीत आहेत. या नायलॉन माणसाने माणसासह पक्षांना हानी होत असून पतंग उडवणाऱ्या टवाळखोरांवर येवला शहर पोलीस ड्रोनद्वारे नजर ठेवत असून मुलांच्या पालकांवर आता गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

  • बदलापुरातील ग्रामीण रुग्णालयाला राष्ट्रवादीने दिलं कुलूप भेट

    बदलापुरातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या रुग्णालयातील एका डॉक्टर रुग्णाशी अतिशय उद्धटपणे बोलला त्यामुळे राष्ट्रवादी सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी रुग्णालयातील अधीक्षकांना कुलूप,चावी भेट देत हे रुग्णालय बंद करून दाखवा असा इशारा दिलाय. 

  • जतच्या माडग्याळजवळ तिहेरी अपघातात चार जण जखमी

    सांगलीच्या जत तालुक्यातल्या माडग्याळ म्हणजे तिहेरी अपघात झाला यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. माडग्याळ गावापासून काही अंतरावरील उमदी रोडवर छोटा हत्ती टेम्पो आणि दोन चार चाकीच्या मध्ये हा विचित्र अपघात झाला आहे. तिन्ही गाड्यांच्या चालकासह चौघेजण जखमी झाले त्यांना उपचारासाठी तुम्ही शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. अपघातामध्ये तिन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.

  • हिंगोलीतही जरांगेवर गुन्हा दाखल

    परळी, नांदेडनंतर आता हिंगोलीत ही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणी येथे सर्वधर्मीयांकडून मोर्चा आयोजित करण्यात आला होता, या मोर्चाचे नेतृत्व करीत असतांना मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडे यांच नाव घेऊन धनंजय देशमुख यांना यापुढे तुम्ही धमकावलात महाराष्ट्रात फिरू देणार नाही असे म्हणत टीका केली होती. त्यानंतर मुंडे समर्थकांनी दोन दिवसांपूर्वी हिंगोली पोलिस ठाण्यात जाऊन मनोज जरांगे पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. महेश गणपत बांगर यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • संभाजीनगर: रामगिरी महाराजांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

    एक चित्रपटाच्या टीजर लाँच कार्यक्रमामध्ये बोलताना रामगिरी महाराजांनी हे विधान केलं आहे. "आपण चित्रपटच्या आगोदर राष्ट्रगीतासाठी उभे राहत आहोत परंतु हे गीत रविंद्रनाथ टागोर यांनी पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी 1911 मध्ये लिहले होते. अशा गीताला आपले राष्ट्रगीत मानणे योग्य नाही यात बदल व्हायला हवा. वंदेमातरम हेच आपले राष्ट्रगीत व्हावे," असे विधान महंत रामगिरी महाराज यांनी केले. दरम्यान, यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर, "मी राष्ट्रगीताचा अपमान केला नाही," असं रामगिरी महाराजांचे म्हणणं आहे. "मी फक्त सत्य सांगितलं आणि सत्य सांगायला घाबरण्याची गरज नाही," असं सांगत रामगिरी महाराज यांनी राष्ट्रगीताबाबत केलेल्या विधानचे समर्थनही केलं.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link