Breaking News Live Updates: पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Fri, 19 Jul 2024-8:43 pm,

Breaking News Live Updates : राज्यात पावसानं जोर धरलेला असतानाच इतरही घडामोडी नागरिकांचं लक्ष वेधत आहेक. राज्यात नेमकं काय सुरुय? पाहा...

Breaking News Live Updates : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असून, हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकणात पुढील 3 दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर, रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


इथं पावसाचा जोर वाढत असतानाच तिथं राज्याच्या राजकीय वर्तुळामध्येही बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. देश पातळीवर घडणाऱ्या प्रत्येकत लहानमोठ्या घडामोडी आणि बातम्यांचा आढावा घ्या एका क्लिकवर.... 

Latest Updates

  • पंकजा मुंडे यांच्या बाईटमधील मुद्दे - 

    - गेले दोन दिवस विस्तृत बैठक झाली 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    - भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव यांच्यासह सर्व नेत्यांसोबतच विस्तृत चर्चा झाली 

    - घटकपक्षांसोबत जास्तीत जास्त जागा कशा येतील यासाठी व्ह्यूरचना पार पडली 

    - अधिवेशन 21 ला होत आहे 

    - अमित शाह या बैठकीला उपस्थित असतील 

    - अर्थसंकल्प सरकारकडून सादर झाला, त्यात अनेक चांगल्या योजना होत्या, त्यासंदर्भात चर्चा सुद्धा झाली 

    - या योजना 97 हजार बुथवर पोहोचवण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली 

    - आम्ही आता प्रतिक्षा करत आहोत राज्याच्या कार्यकारणीचं 

    - 21 जुलैला ही बैठक पार पडणार आहे

  • Breaking News Live Updates: दिलीप खेडकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर 

    - मनोरमा खेडकर यांनी हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्याचे प्रकरण 
    - दिलीप खेडकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर 
    - दिलीप खेडकर वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांचे वडील
    - पुणे सत्र न्यायालयाकडून 25 जुलै पर्यंत अंतरिम जामीन 

  • Breaking News Live Updates: महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीची बैठक

    महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या कोअर कमिटी बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. सलग दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीचा आज शेवटचा दिवस आहे. प्रभारी भूपेंद्र यादव सहप्रभारी अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडत आहे.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    कालच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील दीडशे जागांचा आढावा, महायुतीची विद्यमान स्थिती व इतर विषयांवर चर्चा झाली होती. 

    आज उत्तर महाराष्ट्र व इतर भागांमधील विधानसभेच्या जागांबाबत चर्चा होणार असून या दोन दिवसात झालेल्या चर्चेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना 21 जुलै रोजी पुण्यात होणाऱ्या संमेलनापूर्वी माहिती दिली जाईल.

     या दोन दिवसीय बैठकीनंतर काही महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा देखील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • Breaking News Live Updates: काँग्रेसची कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक 

    काँग्रेसची आज संध्याकाळी 8 वाजता कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    भाजपच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देण्यासाठी नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर होणार 

    विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानी होणार बैठक

    या बैठकीला नाना पटोले,विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात , पृथ्वीराज चव्हाण , सतेज पाटील ,यशोमती ठाकूर  असा इतर प्रमुख नेते उपस्थित राहणार

    या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनीतीही ठरवली जाणार

  • Breaking News Live Updates : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कसली कंबर 

    -केंद्रातील नेते महाराष्ट्रात ठाण मांडून 
    -विधानसभेसाठी भाजपामध्ये खलबत 
    -पुढच्या आठवड्यात पुन्हा बोलावली कोअर कमिटीची बैठक 
    -23 आणि 24 जुलै रोजी मुंबईत होणार कोअर कमिटीची बैठक 
    -या बैठकीत भूपेंद्र यादव यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर कोअर कमिटीचे नेते राहणार उपस्थित 
    -21 आणि 22 जुलै रोजी पुण्यात केंद्रिय मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली बैठक होणार आहे.

  • Breaking News Live Updates : पूजा खेडकर वाशिमच्या विश्रामगृहाबाहेर पडल्या, नागपूरकडे रवाना

     

  • कल्याणमध्ये भीषण अपघात चार जणांचा जागीच मृत्यू

    कल्याण नगर महामार्गावरील जुन्नर तालुक्यातील गुळुंचवाडी येथे झालेल्या भीषण अपघात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दहा ते पंधरा जण गंभीर जखमी आहेत, भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने अंत्यविधी वरून माघारी परतणाऱ्या नागरिकांना अक्षरशः किड्या मुंग्यांसारखं ५०० फुटांपर्यंत चिरडत नेल्याने यीत निष्पाप नागरिकांना आपल्या जीव गमवावा लागला असून यात अनेक दुचाकी आणि फोरव्हिलर यांना हि चिरडल्याने संताप्त नागरिकांनी गेली तीन तासापासून कल्याण नगर महामार्ग रोखून धरल्याने महामार्गा वरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालीय ,याचाच घटनास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी.

  • वर्ध्यात पावसाच्या अनुषंगाने प्रशासन अलर्ट

    - जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांच्या कडून वेगवेगळया भागात भेट

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    - पाच तालुक्यांत ऑरेंज अलर्ट होता, पाच तालुक्यांतील शाळांना सुट्टी

    - जोरदार पावसाने नगरपालिकेच्या कामाची पोलखोल

    वर्ध्यात सकाळपासून जोरदार पाऊस झालाय..या पावसाने समुद्रपूर तालुक्यातील नदी नाल्याना पूर आला आहेय..जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांच्या कडून वेगवेगळया भागात भेट असून पाहणी करत परिस्थितीचा घेतला आढावा घेतला गेलाय..पाच तालुक्यांत ऑरेंज अलर्ट होता, पाच तालुक्यांतील शाळांना सुट्टी देण्यात आली होतीय..पाण्यात गाडी टाकू नये याबाबत एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना  पावसाच्या अनुषंगाने प्रशासन अलर्ट असून परिस्थीती नियंत्रणात असून वर्धा शहराच्या शिवाजी चौक येथे रस्त्याला तलावाचे स्वरूप आले होतेय..तर आर्वी नाका या भागात नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरलेय..पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे नगरपालिकेच्या कामाची पोलखोल झाल्याचे दिसून आले..

  •         मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर ठप्प

    जगभरात सायबर सेवा ठप्प झाल्याने मोठा फटका बसला आहे. मायक्रोसॉफ्टसह अनेक कंपन्याना याचा फटका बसला आहे. ऑस्ट्रेलिया, जर्मनी, अमेरिका, युकेसह भारतालाही याचा फटका बसला आहे. याचा अनेक महत्त्वाच्या सेवांवर परिणाम झाला आहे. विमानसेवा, बँका, स्टॉक एक्स्चेंज, पेमेंट सिस्टम, दूरसंचार आणि आपत्कालीन सेवा, आरोग्य यंत्रणा आणि ब्रॉडकास्टर सेवा ठप्प पडल्या आहेत. सायबर सुरक्षा प्लॅटफॉर्म CrowdStrike मधील समस्यांमुळे सेवा प्रभावित झाल्या आहेत. हा सायबर हल्ला असल्याची भिती व्यक्त होत आहे. 

  • पूजा खेडकरांचा पाय आणखी खोलात 

    - पूजा खेडकरांविरोधात यूपीएससीकडून तक्रार दाखल
    - पूजा खेडकरांचा पाय आणखी खोलात 
    - गैरप्रकार केल्याचं प्राथमिक तपासात उघड
    - बनावट कागदपत्रं, ओळखपत्रानं फसवणूक केल्याचा आरोप

  • इंग्लडंहून आणलेल्या शिवकालीन वाघनखांच उद्घाटन
    साताऱ्यात शिवशस्त्र शौर्यगाथा कार्यक्रम

  • चंद्रपूरहून ताडोबाला जाणाऱ्या मार्गावर नाल्याला पूर आल्याने मार्ग ठप्प, विद्यार्थ्यांची अडचण

    चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा मार्गावरील मोरघट नाल्याला पूर आल्यामुळे चंद्रपूरहून ताडोबाला जाणारा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे पर्यटक व या मार्गावरुन शाळेला ये जा जाणारे विद्यार्थी अडकले. रात्री आलेल्या पावसाने हा नाला दुथडी भरून वाहू लागला. पहाटेपासूनच हा मार्ग पूर्णतः बंद झाला. पर्यटक पर्यायी मार्गाने ताडोबाला रवाना झाले. तर विद्यार्थ्यांना नाईलाजाने घरी परतावे लागले

  • - मुंबई एअरपोर्टवर प्रवाशांचा खोळंबा
    - तांत्रिक बिघाडामुळे चेक इन करण्यास अडचण
    - बुकिंग एयर फ्लाइट आपरेशन प्रणालीवर परिणाम
    - मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर ठप्प, प्रवाशांचा खोळंबा 

  • Breaking News Live Updates : मोठी बातमी, विशाळगडावरून 

    मोठी बातमी विशाळगडाहून. विशाळगडावरील कारवाईला स्थगिती देत भर पावसात विशाळगडावरील बांधकामावर हातोडा कशासाठी? असा सवाल उपस्थित केला आहे. हायकोर्टानं राज्य सरकारला हा सवाल केला आहे. 

  • Breaking News Live Updates : सोलापूर जिल्ह्यात एसटी चालकाला फिट आल्यामुळे एसटीचा अपघात

    सोलापूर जिल्ह्यात एसटी चालकाला फिट आल्यामुळे एसटीचा अपघात. टेंभुर्णी कुर्डूवाडी महामार्गावर पिंपळनेर गावाजवळ झाला एसटीला अपघात झाल्याची माहिती. एसटी चालकाला फिट येऊन तोल गेल्यामुळे एसटीचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज. एसटीमध्ये 35 ते 40 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती. एसटी पलटी झाल्यानंतर प्रवाशांना बाहेर काढून शेतात बसवण्यात आले. कुर्डूवाडी शासकीय रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आलं. 

  • Breaking News Live Updates : आज काँग्रेस आखणार विधानसभा निवडणुकीसाठीची रणनिती 

    काँग्रेस प्रदेशच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये आज विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगांने चर्चा होणार आणि रणनिती आखली जाणार आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केली आहे त्या 7 आमदारांवर काय कारवाई  करायची या संदर्भात चर्चा होणार असून, आजच कारवाई न होता मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानंतर ही कारवाई केली जाणार असल्याचं कळत आहे. 

  • Breaking News Live Updates : एक व्यक्ती आहे या देशात जी स्वतःला विष्णूचा तेरावा अवतार समजते...; असं कोणाला म्हणाले राऊत? 

    एक व्यक्ती आहे या देशात जी स्वतःला विष्णूचा तेरावा अवतार समजते एक व्यक्ती आहे देशात तिला असं वाटतं प्रभू श्रीराम यांचे बोट धरून मीच त्यांना अयोध्येच्या राम मंदिरात घेऊन गेलो ते नसते तर अयोध्येत राम भगवान राम यांची प्राणप्रतिष्ठा झाली नसती एक व्यक्ती आहे या देशात ती स्वतःला सुपरमॅन समजते एक व्यक्ती आहे या देशात जी स्वतःला नॉन बायोलॉजिक पद्धतीने अजैविक पद्धतीने जन्माला आलो म्हणजे मला वरून देवाने जन्माला घातलं अशा प्रकारे लोकांना भयमित करत आहे एक व्यक्ती आहे या देशात जी सांगते रशिया आणि युक्रेंचा युद्ध मिस थांबवला पण ती व्यक्ती मणिपूर आणि जम्मू-काश्मीरमधील हिंसाचार थांबू शकत नाही, अशा शब्दांत संजय राऊत यांनी केलेल्या परखड वक्तव्यानं साऱ्यांच्या नजरा वळवल्या. 

  • Breaking News Live Updates : गँगस्टर अबू सालेमला नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात हलवलं 

    नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात गँगस्टर अबू सालेमला हलवण्यात आलंय. अबू सालेमचा तळोजा तुरुंगातील कारावास हा असुरक्षित असल्यामुळे नाशिक मध्यवर्ती कारागृहात त्याला हलवण्यात आलंय. ATS आणि SRPF यांच्या ताफ्यात अतिशय गोपनीय पद्धतीने सालेमला नाशिक कारागृहात आणण्यात आलंय.

  • Breaking News Live Updates : पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांना जवाब नोंदीसाठी दुसरी नोटीस

    वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरांना पुणे पोलिसांनी दुस-यांदा नोटीस बजावलीय. उद्या पुणे आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर आरोप केला होता. वाशिम पोलिसांनी ही तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग केली होती. याच चौकशीसाठी पूजा खेडकर यांना हजर राहण्याची नोटीस पुणे पोलिसांनी बजावलीय.

     

  • Breaking News Live Updates : सिंधुदुर्गात गड नदिने ओलांडली इशारा पातळी

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल सायंकाळ पासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीनाले ओसंडून वाहत आहेत. गडनदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीचे पाणी पात्राच्या बाहेर आल्याने आचरा मार्गांवरील वाहतूक बंद झालीय. त्यासोबत वेंगुर्ला येथील होडावडा मार्ग दुसऱ्या दिवशी बंद झालाय. जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. 

  • Breaking News Live Updates : मावळ मधील कुंडमळा पर्यटन स्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात

    मावळ तालुक्यात मुसळधार पावसाने कुंडमळा या धबधब्यावरील इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती..त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून पर्यटकांना येथे पर्यटन न करण्याचा सूचना फलक लावण्यात आला होता, लोणावळ्याच्या दुर्घटनेनंतर पर्यटकांनी अजूनही बोध घेतला नाही मात्र तरीही पर्यटक याकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र दिसून येत होतं.. परंतु आत्ता दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून, आंबी एमआयडीसी पोलिसांनी आता थेट जिथं धोकादायक पर्यटन करण्यात येत तिथेच थेट सुरक्षित पट्ट्या बांधण्यात आल्या असून.. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयातील तळेगांव दाभाडे पोलीस आणि आंबी एमआयडीसी पोलीस येथे पहारा देत आहे..सर्व कुंडमळा परिसरावर पोलिसांची तीक्ष्ण नजर असून, धोक्याचा इशारा असलेला फलक ही येथे लावण्यात आला.

  • Breaking News Live Updates : पुण्यात झिकाचा धोका वाढला

    पुणे शहरात गुरुवारी आणखी तीन रुग्णांना झिकाची लागण झाली असून, झिकाच्या एकूण रुग्णांची संख्या 27 वर पोहोचला आहे. कर्वेनगरमधील ३३ वर्षीय गर्भवती महिला, कोथरूडमधील 78 वर्षीय पुरुष आणि औंधमधील 84 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. पुणेकरांच्या घरातच आढळत आहेत डासांची अंडी. अनेक परिसरात फवारणी सुरु मात्र नागरिकांनी परिसरत स्वच्छ ठेवण्याची गरज असल्याचं आवाहन पालिकेनं केलं आहे. 

  • Breaking News Live Updates : पवारांचा अकोले दौराच गद्दारांचा नव्हे तर निष्ठावंतांचा तालुका, फ्लेक्स बाजीने वेधले सर्वांचे लक्ष

    ज्येष्ठ नेते शरद पवार आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका दौऱ्यावर येत आहेत. मधुकर पिचड यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या या मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीत डॉक्टर किरण लहामटे यांनी विजय मिळवला होता. विधानसभा निवडणुकीनंतर आणि राष्ट्रवादीच्या फुटी नंतर प्रथमच शरद पवार अकोलेत येत असल्याने त्यांच्या स्वागताची मोठी तयारी करण्यात आली आहे. अकोले तालुक्यातील मुख्य असलेल्या महात्मा फुले चौकात त्यांच आगमन होणार आहे आणि या चौकात लागलेल्या फ्लेक्सन सर्वांचं लक्ष वेधल आहे. मधुकर पिचड यांचा प्रवेश होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी लागलेले फ्लेक्स हे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. गद्दारांचा नव्हे तर निष्ठावंतांचा तालुका अशा आशयाचे फ्लेक्सबाजी केल्यानं भांगरे समर्थकांनी गद्दारांना स्थान देऊ नये असा संदेश यातून देण्यात आला आहे. 

  • Breaking News Live Updates : अंधेरी सबवेमध्ये पाणी... 

    मुंबईत आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे पश्चिम उपनगरामध्ये पावसाचा जोर जास्त दिसतो त्यामुळे पश्चिम उपनगरातल्या अंधेरी येथील सभेमध्ये पाणी भरला आहे त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी वाहतूक बंद केलेली आहे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी हे वाहतूक बंद केली असून गोखले पुलावरून वाहनांना जाण्यास सांगण्यात येत आहे. 

  • Breaking News Live Updates : मुलुंड टोल नाक्यावर प्रचंड वाहतूक कोंडी 

    सतत पडणार पाऊस, सिंग्णल यंत्रणेतील बिघाड ,खड्डे आणि टोल नाक्यामुळे मुलुंड टोल नाका परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. इथं सध्या साधारण 2 ते 3 किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, त्यामुळं चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहेत. 

  • Breaking News Live Updates : भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत नेत्यांच्या तक्रारींचा पाढा.... 

    भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत महायुतीतील घटक पक्षांच्या तक्रारींचा पाढा. भाजपच्या बैठकीत काही नेत्यांकडून अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या गटाबाबत तक्रारी केल्याची सूत्रांची माहिती. 
    अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून लोकसभेला मदत झाल्या नसल्याच्या भाजपच्या काही नेत्यांच्या तक्रारी. 

  • Breaking News Live Updates : मुंबई- गोवा महामार्गाची पाहणी 

    रायगड - खासदार सुनील तटकरे आज मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करून आढावा घेणार आहेत. खारपाडा टोलनाका ते लोणेरे पर्यंत हा दौरा असेल, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा आहे.

  • Breaking News Live Updates : रेल्वे सेवांवर पावसाचा परिणाम

    मुंबईत जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळं पश्चिम मध्य आणि हार्बर लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरु आहे. रस्ते वाहतूक सुरळीत असून शहरात पुढचे काही तास जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

     

  • Breaking News Live Updates : मध्य रेल्वेवर शनिवारी मेगा ब्लॉक 

    मध्य रेल्वेवर शनिवारी म्हणजेच उद्या रात्री मेगाब्लॉक घेण्यात येणारेय.. मध्य रेल्वेवरील कर्नाक बंदर उड्डाणपुलाच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. उद्या रात्री 12.30 ते रविवार पहाटे 4.30 पर्यंत हा ब्लॉक असेल.

     

  • Breaking News Live Updates : महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात 

    इंग्लंडवरून आणलेली वाघनखं आणि शिवकालीन शस्त्र संग्रहालयाचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन. साताऱ्यात शिवशस्त्र शौर्यगाथा कार्यक्रमही होणार.

  • Breaking News Live Updates : नाशिक-मुंबई महामार्ग गेला 'खड्ड्यात'

    नाशिक-मुंबई महामार्ग अक्षरश खड्ड्यात गेलाय. या महामार्गाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालीय. संपूर्ण महामार्ग खड्ड्यांच्या विळख्यात सापडलाय. खड्डे आणि रस्ते बांधकामामुळे प्रवासाचा वेळ दुप्पट लागतोय. चार तासांच्या प्रवासाला तब्बल 10 तासांचा वेळ लागतोय. त्यामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागतंय. झी २४ तासनं नाशिक-मुंबई महामार्गाचा रिऍलिटी चेक केलाय. प्रवासाचा त्रास कधी संपणार? महामार्गाच्या प्रश्नाकडे सरकार कधी लक्ष देणार? असा सवाल चालक तसंच प्रवासी उपस्थित करतायत.

  • Maharashtra Breaking News LIVE: मुंबई ठाण्यात मुसळधार... 

    शुक्रवारी (आज) सकाळपासूनच मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे सकल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. तर सातारा, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link