महाराष्ट्रातलं एक असं गाव जिथे कुणाच्याच घरी बाप्पा विराजमान होत नाही, पण गावकरी एकत्र येऊन करतात आरती

महाराष्ट्रात विविधतेत एकता आहे. सध्या सगळीकडेच गणेशोत्सवाचं मंगलमय वातावरण आहे. पण महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथे कोणाच्याच घरी बाप्पाचं आगमन होत नाही. महाराष्ट्रातलं असं कोणतं गाव आहे? 

| Sep 15, 2024, 13:48 PM IST

असं असताना महाराष्ट्रातलं एक असं गाव आहे जिथे कुणाच्याच घरी बाप्पा विराजमान होत नाही. इथे तब्बल ४५० हून अधिक वर्षांपासूनच एकाच गणपतीची परंपरा. 

 

1/8

सध्या सगळीकडेच गणेशोत्सवाचं धामधूम आहे. गौरी-गणपतीची विसर्जन झाल्यांतर ११ दिवसांच्या बाप्पाची लगबग पाहायला मिळते. महाराष्ट्रातील प्रत्येक प्रांतात गणेशोत्सवाची एक वेगळीच परंपरा आहे. अगदी मैलामैलावर गणरायाच्या प्राणप्रतिष्ठापनेपासून गौरी ते लक्ष्मीपर्यंत सगळ्याच गोष्टीच्या चालीरिती वेगळ्या आहेत. 

2/8

एक गाव एक गणपती

साडे चारशेहून अधिक वर्षांपासून या गावात 'एक गाव एक गणपती' ही परंपरा आहे. ४५० हून अधिक घरं या गावात आहेत. यापैकी कोणत्याही घरात बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली जात नाही. तर या गावातील स्वयंभू अशा सुप्रसिद्ध मंदिरात गणरायाची आराधना केली जाते.   

3/8

स्पर्श दर्शन

या गावात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असं गणपतीचं मंदिर आहे. महाराष्ट्रात आठ दिशांत आठ द्वार देवता आहेत. त्यातील पश्चिमद्वारातील हे मंदिर आहेत. या गावात गणेश चतुर्थीच्या दिवशी गाभाऱ्यात जाऊन गणरायाच्या स्पर्श दर्शन गावकऱ्यांना अनुभवता येते. मंदिरातील तिर्थ आणि निर्माल्य गावातील लोकं घरी घेऊन जातात आणि त्याची गणरायाप्रमाणे पूजा करतात. 

4/8

पाच दिवस गणेशोत्सव

गणेश चतुर्थीपासून प्रतिपदा ते पंचमीपर्यंत असा पाच दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. चतुर्थीला पालखीची देवळाभोवती प्रतिक्रमा केली जाते. आरती मंत्र आणि किर्तन अशी गणरायाची आराधना केली जाते. सकाळी 5 ते 12.30 या वेळेत गावकऱ्यांना स्पर्श दर्शन अनुभवता येते. वर्षातून एकदाच गाभाऱ्यातून दर्शन घेतलं जातं. 

5/8

गौरीची अशी होती स्थापना

एक गाव एक गणपती अशी परंपरा असली तरीही या गावात गौरी मात्र घरोघरी येते. प्रथेप्रमाणे येथे गौरी आणली जाते. तांब्यामधून गौरीची विशिष्ट वनस्पती आणली जाते. तसेच येथे खड्यांच्या गौरीची परंपरा आहे. 

6/8

या गावात एकच बाप्पा

गणपतीपुळे, मालगुंड, भंडारपुळे, वरवडे, नेवरे, निवेंडी, भगवतीनगर या सात गावांत ही परंपरा सुरु आहे.   

7/8

हे गाव कोणते?

महाराष्ट्रातील हे गाव म्हणजे गणपतीपुळे. गणपतीपुळ्यातील देवता ही पश्चिमद्वार देवता म्हणून ओळखली जाते. मोगलाईच्या काळातील ही स्वयंभू गणेश मंदिराचे संदर्भ येथे आढळतात. 

8/8

काय आहे आख्यायिका

त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी केवड्याचे बन होते. त्या ठिकाणी बाळंभटजी भिडे हे ब्राह्मण रहात होते. ते गावचे खोत होते. मोगलाईच्या काळात भिडेंवर संकट कोसळले. भिडे हे दृढनिश्चयी होते. "आलेले संकट निवारण झाले तरच अन्नग्रहण करीन", असा निश्चय करुन त्यांनी आराघ्य दैवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या बनात तपस्या करण्यासाठी मुक्काम केला.