समुद्राच्या लाटा थेट मंदिरात शिरतात! महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध गणपती मंदिर

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या गणपतीपुळे मंदिराला भाविक मोठ्या संख्येने भेट देत असतात. 

| Sep 15, 2024, 00:09 AM IST

Ratnagiri Ganpatipule: लाल माती, अथांग समुद्र किनारा आणि बरचं काही... अशी कोकणची ओळख. पर्यटनस्थळासह कोकण एक महत्वाचे तीर्थ क्षेत्र देखील आहे. याचे कारण आहे ते  मुंबई पासून 375 km दूर असलेल रत्नागिरीतील 400 वर्ष जुनं  रहस्यमयी गणपतीपुळे मंदिर. जाणून घेवूया या मंदिराचा इतिहास...

1/7

भारताच्या आठ दिशांत आठ द्वार देवता आहे. त्यापैकी गणपतीपुळ्यातील देवता ही पश्चिमद्वार देवता आहे. येथे येणाऱ्या भक्तांची इच्छापूर्ती होते असा समज आहे.

2/7

रत्नागिरी एसटी डेपोतून गणपतीपुळे साठी थेट एसटी बस आहे. 45 मिनीटांत ही बस मंदिराबाहेर सोडते. 

3/7

या मंदिरात असलेल्या मूषकराजाच्या कानात भक्त जे काही सांगेल ती इच्छा श्री गणेश पूर्ण करतातच अशी येथे येणाऱ्या भक्तांची श्रद्धा आहे .

4/7

गणपतीपुळे मंदिराच्या आजूबाजूला नारळाची झाडे आणि समोर अथांग समुद्रकिनारा आहे. समुद्राच्या लाटा थेट मंदिरापर्यंत पोहचतात. पावसाळ्यात तर लाटा गणपतीच्या मूर्तीला स्पर्श करतात.   

5/7

समुद्रापुढे पुळणीचे (वाळूचे) भव्य मैदानात गणपतीचे महास्थान असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे म्हटले जावू लागले.

6/7

गणपतीपुळे येथील श्रीगणेशाचे स्थान हे स्वयंभू आहे. 500 वर्षांपूर्वी बाळभटजी भिडे यांना या साकार रूपाचा दृष्टांत झाला.यानंतर येथे मूर्ती प्रकट झाल्याची अख्यायिका आहे. हेच या मंदिराचे रहस्य आहे.  

7/7

हे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. गणपतीपुळे येथील श्री गणेशाचे स्थान हे यापैकी एक आहे.