Maharashtra Breaking News LIVE: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, मविआचं उद्या आंदोलन

Tue, 27 Aug 2024-10:14 pm,

Maharashtra Breaking News LIVE: आज राज्यभरामध्ये दहीहंडीचा उत्साह दिसून येत आहे. मुंबईसहीत महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये दहीहंडी साजरी केली जात आहे. याचसंदर्भातील सर्व घडामोडींबरोबर महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घ्या एकाच ठिकाणी

Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स

Latest Updates

  • सिंधुदुर्गमधल्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यावरुन महाविकास आघाडी बुधवारी मालवमध्ये आंदोलन करणार आहे. आदित्य ठाकरे हे सुद्धा मालवणला जाणार असून आंदोलनात सहभागी होणार आहेत. 

     

  • सिंधुदुर्गमधल्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. यावरुन विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरलं आहे. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक ट्विट केलं असून हे ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे. आपल्या पोस्टमध्ये अनिल देशमुख यांनी म्हटलंय 'ताशी 45 कि.मी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कोकणात नारळाच्या झाडावरून नारळही लवकर पडत नाहीत, पण भ्रष्टाचार मात्र उघडा पडला'

     

  • दहीहंडी उत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभी नाक्यावरील दहीहंडीला भेट दिली.. यंदा विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार असल्याचं विधान मुख्यमंत्र्यांनी केलंय... तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही वरळीतील परिवर्तन दहीहंडी उत्सवाला भेट दिली. यावेळी गोविंदा पथकानं अफजलखानाच्या वधाचा अप्रतिम प्रसंग साकारला होता. त्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया देत अफझलरुपी शक्तीचा कोथळा बाहेर काढू, असं वक्तव्य केलं..

  • अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार पक्ष आणि अधिकृत प्रवक्ते सूरज चव्हाण यांना Defamation Notice बजावली आहे. ‘सुपारीबाज बाई’ ‘रीचार्ज वर चालणारी बाई’ त्या ब्लॅकमेलर आहेत का असे आरोप अंजली दमानिया यांच्यावर करण्यात आले होते.  हे अतिशय गंभीर, बेछूट, गलिच्छ आणि खालच्या दर्ज्याचे आरोप एका सुसंस्कृत, सिध्दांतवादी व्यक्ती बद्दल केलेत ह्याची अद्दल तुम्हाला भोगावी लागेल, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. 

     

  • बदलापूर प्रकरणात सुमोटो याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन सप्टेंबरला प्रतीज्ञापत्र सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. आढाव्यासाठी समिती नेमण्याच्या सूचनाही हायकोर्टाने राज्य सरकारला केल्या आहेत. 

  • बदलापूर प्रकरणात सुमोटो याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन सप्टेंबरला प्रतीज्ञापत्र सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. आढाव्यासाठी समिती नेमण्याच्या सूचनाही हायकोर्टाने राज्य सरकारला केल्या आहेत. 

  • बदलापूर प्रकरणात सुमोटो याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन सप्टेंबरला प्रतीज्ञापत्र सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. आढाव्यासाठी समिती नेमण्याच्या सूचनाही हायकोर्टाने राज्य सरकारला केल्या आहेत. 

  • जय जवान दहीहंडी पथकानंतर नऊ थर लावण्याचा विक्रम ठाण्यातील खोपटचा राजा पथकाने केला आहे. कॅसल  मिल सर्कल येथील शारदा प्रतिष्ठानमार्फत आयोजित दहीहंडी उत्सवात हा विक्रम करून खोपटचा राजा गोविंदा पथक 9 थर लावणार ठाण्यातील पहिला गोविंदा पथक ठरला आहे. तर हा विक्रम मुख्यमंत्री यांच्या समोर झालाय ....

  • धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात नदीच्या पुरात चार जण वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. साक्री तालुक्यातल्या आष्टाने गावातील ही घटना आहे. दोन महिलांसह दोन पुरुष कान नदीच्या पुरात वाहून गेले. यापैकी तिघांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. एक महिला मात्र बेपत्ता असून आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस बेपत्ता महिलेचा शोध घेत आहेत.

  • शिवरायांचा पुतळा कोसळला : फॉरेन्सिकची टीम मालवणमध्ये दाखल

    मालवण राजकोट येथे फॉरेन्सिक इन्वेस्टीगेशनची टीम दाखल झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची करणार पाहणी. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी,नौदलाचे अधिकारी व सिंधुदुर्ग फॉरेन्सिक इनव्हेस्टीगेशन टीम, पोलीस एकत्र पाहणी करणार आहेत.

  • मुंबईत 15 गोविंदा जखमी

    मुंबईमध्ये दहीहंडीच्या सेलिब्रेशनदरम्यान दुपारी 12 वाजेपर्यंतच्या आकेडवारीनुसार 15 गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी, महानगरपालिकेच्या आणि खासगी रुग्णालयातील रुग्णांची ही संख्या आहे. सर्वाधिक जखमी गोविंदा पोतदार रुग्णालय आणि नायर रुग्णालयामध्ये आहेत. या ठिकाणी प्रत्येकी 4 गोविंदा दाखल आहेत. तसेच सायन रुग्णालयात दोन आणि सेंट जॉर्ज, केईएम, राजावाडी, एमटी अग्रवाल आणि कुर्ला भाभा रुग्णालयामध्ये प्रत्येकी एक जखमी गोविंदा आहे.

  • नॅशनल टास्क फोर्सची आज पहिली बैठक

    सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नॅशनल टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून त्यात कॅबिनेट सचिवांसह सर्व बड्या डॉक्टरांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये वैद्यकीय संस्थांच्या लोकांनाही विनंती करण्यात आली होती की, हे असे व्यासपीठ आहे की ते येऊन त्यांचे मत मांडू शकतात. डॉक्टरांच्या संपानंतर सुप्रीम कोर्टाने रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी एक समिती स्थापन केली असून त्यामध्ये कॅबिनेट सचिव, गृह सचिव, आरोग्य सचिवांसह 14 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. या टास्क फोर्सची आज पहिली बैठक होत आहे.

  • नेहरुंनी उभारलेला शिवरायांचा पुतळा अजूनही सुस्थितीत: राऊत

    शिवरायांचा सिंधुदुर्गमधील पुतळा कोसळल्याच्या मुद्द्यावरुन बोलताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी, "1933 मधील टिळकांचा पुतळा अजूनही शाबूत आहे. नेहरुंनी बनवलेला शिवरायांचा पुतळाही सुस्थितीत आहे," असं सांगितलं. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घेतला पाहिजे, असंही राऊत म्हणाले.

  • शिवरायांचा असा अपमान मुघलांनीही केला नाही; पुतळा पडल्याच्या मुद्दावरुन राऊत सरकारवर बरसले

    सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्याच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. शिवरायांचा असा अपमान मुघलांनीही केला नाही, असं म्हणत राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. शिंदेंच्या मर्जीजल्या ठेकेदारांना काम देण्यात आल्याचंही राऊत म्हणाले. ठेकेदार, शिल्पकार सगळेच ठाण्याचे आहेत, असंही राऊत म्हणाले. सरकारच्या चेहऱ्यावर एकही वेदना मला दिसत नाही. समुद्रावर वारा असणारच, वाऱ्याची कारणं कसली देता? असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला आहे. मर्जीतल्या ठेकेदारांना कंत्राट देऊन घाईघाईत मोदींच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं, असा आरोप राऊतांनी केला आहे.

     

  • कोयना काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणामध्ये पाण्याची आवक देखील वाढली आहे. त्यामुळे आज सकाळी 11:00 वाजल्या पासून कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू करून 2100 क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.सध्या धरणात 98.89 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे.

  • शिवरायांचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण: दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

    सिंधुदुर्गमधील किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेप्रकरणी मालवण पोलीस स्टेशनमध्ये दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेसर्स आर्टिस्टरी कंपनीचे मालक जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सलटंट चेतन पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक इंजिनिअरने ही तक्रार दाखल केली आहे. कलम 109।110, 125, 318 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • विमानाची तिकीटं महागली; 15 ते 30 टक्के दरवाढ

    सणासुदीचे दिवस, तसेच देशात विमानांची घटलेली संख्या आणि वाढत्या प्रवासी संख्येमुळे विमान तिकिटांचे दर गगनास भिडण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळीला अजून वेळ असला तरी आताच देशातील विविध पर्यटनस्थळांच्या विमान तिकिटांच्या दरात किमान 15 ते कमाल 30 टक्के वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

  • मुसळधार पावसात गोविंदाचे थर

    आज दहीहंडीच्या दिवशीही मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे आता गोविंदांना दहीहंडीचा थरार भरपावसात भिजत दाखवावा लागणार. 

  • पश्चिम रेल्वेवर आजपासून 35 दिवसांचा मेगा ब्लॉक

    पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव-कांदिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे 35 दिवसांचा मोठा वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे. 27-28 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 5-6 ऑक्टोबरपर्यंत हा ब्लॉक सुरू राहील. त्यामुळे पश्चिम रेल्वे प्रवाशांना काही प्रमाणात विस्कळीत झालेल्या वेळापत्रकाला सामोरे जावे लागणार आहे.

  • वसंत चव्हाण यांच्यावर सकाळी 11 वाजता सरकारी इतमामात होणार अंत्यसंस्कार

    खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिवावर सकाळी 11 वाजता नायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह आदी काँग्रेस नेते उपस्थित असणार आहेत.

  • सतेज पाटील आज मालवणमध्ये

    मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आज सकाळी 9 वाजता सतेज पाटील या ठिकाणी पहाणी करण्यासाठी पोहचत आहेत.

     

  • नौदल अधिकारी करणार राजकोट किल्ल्याची पहाणी

    सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळल्यानंतर आज नौदल अधिकारी राजकोट किल्ल्याची पाहणी करणार आहेत. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link