Maharashtra Breaking News LIVE : राज्यातील भाजप कुचकामी - संजय राऊत

दक्षता ठसाळे-घोसाळकर Tue, 01 Oct 2024-12:21 pm,

Breaking News LIVE: महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत आज बैठक... जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होणार का?

Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Latest Updates

  • धनंजय जाधव यांची हाकेंवर टीका 

    हाके तुम्ही सुर्यावर थुंकण्याचा प्रकार करत आहात, स्वतःला वेळीच सावरा, तुमची लायकी नाही - धनंजय जाधव

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    काल दारू पिऊन टुल्ल असणाऱ्या हाकेने मग्रुरीत पुन्हा एकदा छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टिका केली. त्यांची कृती म्हणजे सुर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे.

    काल हाके दारू प्यायले होते हे कॅमेरामार्फत सर्वांसमोर आलं. ते ससूनला जाऊन स्वतःचा चेकअप करतील परंतु ससून रुग्णालयाचा फेरफारीचा इतिहास महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

    आजचा दिवस आमच्यासाठी आनंदाचा आहे, त्यामुळे हाके सारख्या दारुड्या लोकांना उत्तर देण्यात आम्हांला रस नाही. आमचा पक्ष नोंदणीकृत झाला आम्हाला पक्ष चिन्ह मिळाले. हाके सारख्या चिल्लर गोष्टींसाठी आम्हाला वेळ नाही.

  • संजय राऊतांची महाविकास आघाडीवर टीका

    तीन पक्षांचा जागावाटप अत्यंत सुरळीत सुरू आहे. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाही, एकेका जागेसाठी कदाचित जास्त वेळ लागतोय ते ठीक आहे. कारण अशा काही जागा आहेत तिथे दोन किंवा तीन पक्षांचा दावा आहे अशा वेळेला आम्ही एकत्र बसून निर्णय घेतो. कालही आम्ही सहा ते सात तास बसलो होतो आजही बसणार आहोत, दसऱ्याच्या खूप अगोदर आम्ही जागा वाटपाचा निकाल लावू, असं संजय राऊत म्हणाले. 

  • संजय राऊतांची अमित शाह यांच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया 

    अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत, गृहमंत्री देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा विषय बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या शाखा शाखांना भेटी देत आहेत ही अत्यंत गंभीर बाब आहे. देशाच्या सुरक्षेविषयी गृहमंत्री किती गंभीर आहेत हे यातून दिसतं, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. 

    खरं म्हणजे ते मणिपूरला जाऊन थांबायला पाहिजे, कश्मीरमध्ये जे अतिरिके हल्ले सुरू आहेत तिथे जाऊन थांबायला पाहिजे, असं देखील संजय राऊत म्हणाले. 

  • राज्यातील भाजप कुचकामी - संजय राऊत 

    मोदींनी पुण्याच्या मेट्रोचं उद्घाटन 6 वेळा केलं 
    संजय राऊतांची राज्यातील भाजपवर टीका

  • काँग्रेसकडून राज्यभरात सरकारचा निषेध; `लापता लेडीज´ पोस्टर्स 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    काँग्रेसकडून राज्यभरात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. 'लापता लेडीज' पोस्टर्स राज्यभरात लावण्यात आले आहेत. पोस्टर्समधून महिला सुरक्षेच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारण्यात आला आहे. एका वर्षात 64 हजार महिला बेपत्ता झाल्याच्या आशयाचे बॅनर आहेत. शिंदे, फडणवीस, अजित पवारांचे चेहरे या पोस्टरवर दाखवत सरकारवर टीका करण्यात आली आहे. राज्याला भ्रष्टयुतीची नजर लागली असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 

    महाराष्ट्र राज्य हे महिलांचा सन्मान करणारं राज्य आहे, पण राज्याला भ्रष्टयुतीची नजर लागली असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसकडून राज्यभरात सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी `लापता लेडीज´ पोस्टर्स लावण्यात आलेत. पोस्टर्समधून बेपत्ता महिलांच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारण्यात आला आहे. पोस्टर्समधून कलात्मकरित्या शिंदे, फडणवीस, अजित पवारांचे चेहरे दाखवत सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रातील महिलांची सुरक्षा धोक्यात आली असून राज्याची कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचं काँग्रेसने दर्शवलं आहे.

  • भाजपकडून 150 जागांवर लढण्याची तयारी सुरु असल्याची सूत्रांची माहिती. संभाव्य बंडखोरीचा आढावा घेत उमेदवारांच्या आढाव्यासाठी निरीक्षक पाठवण्याची शक्यता आहे. 

  • अमित शाह यांचा मुंबई दौरा

    अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबई, ठाणे आणि कोकण मतदारसंघाचा घेणार आढावा घेणार.

     

  • निवडणुकीच्या सर्व्हेवर भावना गवळींची प्रतिक्रिया 

    निवडणुकीतील चुकीच्या सर्व्हेमुळे  बळी गेल्याची खदखद स्वत:भावना गवळींनी व्यक्त केली आहे. उमेदवारी सर्वे तुमच्या बाजूनं नाही असं कारण देत महायुतीकडून लोकसभेचं तिकीट कापण्यात आलं अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. वाशिमच्या नंधाना येथील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.  यावेळी त्यांच्या सोबत माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे देखील होते. आता कुणाचा बळी जाऊ देऊ नका. मतदारसंघाची खरी परिस्थिती वरिष्ठांना कळवा अशी विनंती यावेळी त्यांनी सदाभाऊ खोत यांना केली. 

  • मुंबई-गोवा महामार्गावर तिहेरी अपघात 

    मुंबई-गोवा महामार्गावरील कोलेटीजवळ तिहेरी अपघातात झाला आहे. मात्र या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रेलरच्या कॉइलचं लॉक तुटून ट्रकवर आदळल्याने, वाहनाचं ही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय..

  • इंदापुरात गोळीबार 

    इंदापुरात जुन्या वादातून आरोपीने तरुणावर गोळीबार  केला आहे. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. इंदापूर पोलिसांनी संपूर्ण शहरात नाकाबंदी करून अवघ्या 2 तासात आरोपीला ताब्यात घेतलं आहे. 

  • बदलापूर अत्याचार प्रकरणाबाबत मुंबई हायकोर्टात सुनावणी

    बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेचे अध्यक्ष आणि सचिवनांच्या अटक पूर्व जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. शाळा प्रशासनाने हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अध्यक्ष कोतवाल आणि सचिव आपटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 10 सप्टेंबरला कल्याण सत्र न्यायालयानं दोघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर दोघेही फरार झाले असून दोघांनी अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर हायकोर्ट आज काय निर्णय घेतं याकडे सा-यांचं लक्ष लागलं आहे. 

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link