Maharashtra Breaking News LIVE : नागपुरात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या

Wed, 02 Oct 2024-12:57 pm,

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर राजकीय घडामोडीसह राज्यातील इतर बातम्या एका क्लिकवर तुम्ही पाहू शकता.

Latest Updates

  • Maharashtra Breaking News LIVE : नागपुरात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या

    नागपूरच्या मोवाडमध्ये एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय...  निवृत्त शिक्षकाने, त्याच्या पत्नी आणि 2 मुलासह सामूहिक आत्महत्या केली..मात्र आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.. 

     

  • Maharashtra Breaking News LIVE : तुळजाभवानी मंदिर 22 तास खुले राहणार

    महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीचा शारदीय नवरात्रोत्सव उद्यापासून सुरू होणार आहे... त्यामुळे तुळजाभवानी मंदिर संस्थानने भाविकांसाठी मंदिर 22 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतलाय.... नवरात्रोत्सव कालावधीत भाविकांसाठी मंदिर रात्री 1 ते रात्री 11 पर्यंत उघडे  असणार आहे...

     

  • Maharashtra Breaking News LIVE : 12 वर्षीय विद्यार्थीनीवर शिक्षकाकडून बलात्कार

    चंद्रपुरातील कोरपनामध्ये 12 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीवर शिक्षकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय....  याप्रकरणी  आरोपीला  अकोल्यातुन अटक करण्यात आलीय... तर आरोपीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत   गुन्हा दाखल करण्यात आलाय... आरोपी कॉन्व्हेंट शाळेत शिक्षक असून,  युवक काँग्रेसचा कोरपना शहर अध्यक्षही आहे..

     

  • Maharashtra Breaking News LIVE : 2024 साली मविआचं सरकार येणार- चेन्नीथला

    बातमी आहे काँग्रेसनं केलेल्या दाव्याची..2024 साली मविआचं सरकार येणार असल्याचा विश्वास काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केलाय.. अमित शाहांनीही मविआचं सरकार येणार असल्याचं मान्य केल्याचंही चेन्नीथला म्हणालेत... तर मविआचं जागावाटप जवळपास ठरलं असल्याचं नाना पटोले म्हणालेत.. 

     

  • Maharashtra Breaking News LIVE : भाजप आणि राष्ट्रवादीतील विधानसभेच्या जागांचा तिढा कायम

    भाजप आणि राष्ट्रवादीतील विधानसभेच्या जागांचा तिढा अजूनही कायम असल्याचं दिसतंय.. कारण अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात लढत झालेल्या जागांवर अजूनही स्पष्टता नसल्याची माहिती सूत्रांनी झी 24 तासला दिलीय.. अमित शाहांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर अजित पवार यांच्यासोबत बैठक झालीय..  या बैठकीला देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर नेते उपस्थित होते.. ज्या जागांवर राष्ट्रवादीचा उमेदवार आणि आणि तिथे भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे त्या जागांबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.. 

     

  • Maharashtra Breaking News LIVE : रिफायनरी आंदोलकांवर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया

    कोकणातील रिफायनरी विरोधी आंदोलकांना विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा दिलासा मिळणार आहे. कारण रिफायनरी विरोधी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास सुरूवात झालीय. पोलिसांच्यावतीनं याबाबतची कागदपत्रे न्यायालयात सादर केली गेलीत. त्यामुळे अगदी मोजक्याच दिवसांमध्ये हे गुन्हे मागे घेतले जाणारेत.. रिफायनरी विरोधी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी सरकारच्यावतीनं उदय सामंत यांनी बैठकीत शब्द दिला होता. त्यानुसार हि प्रक्रिया आता केली गेलीय. रिफायनरी आंदोलकांवर एकूण 10 गुन्हे आहेत. त्यामुळे गुन्हे मागे घेतल्यानंतर शेकडो आंदोलकांना मोठा दिलासा मिळणारेय. 

     

  • Maharashtra Breaking News LIVE : अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून संभाजीराजेंनी आक्रमक 

    अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून संभाजीराजेंनी आक्रमक भूमिका घेत शिवप्रेमींना आवाहन केलंय . येत्या 6 तारखेला सकाळी 11 वाजता मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ येण्याचं आवाहन संभाजीराजेंनी केलंय.   24 डिसेंबर 2016 रोजी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात शिवस्मारकाचे जलपूजन करण्यात आलं होतं.  या स्मारकासाठी कोट्यवधी रुपये खर्च देखील केल्याचं सरकारी दफ्तरी नोंद आहे. मात्र,स्मारकाच्या कामाला अद्याप सुरूवात देखील न झाल्यानं शिवप्रेमी नाराज आहेत.

     

  • Maharashtra Breaking News LIVE : 'तुतारी चिन्हावरच लढणार'

    यवतमाळमध्ये उमेदवारी मिळणार आणि तुतारी चिन्हावरच लढणार, असा दावा संदीप बाजोरिया यांनी केलाय...  मविआमध्ये तिकीट वाटपाआधीच बाजोरियांनी जाहीरनामा प्रकाशित करून प्रचार सुरू केलाय.... भाजप आमदार मदन येरावार यांनी गुंडगिरीला खतपाणी घातलं, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला, असा आरोप ही यावेळी बाजोरियांनी केलाय.. त्यामुळे गुन्हेगारीचा बिमोड करून,  भयमुक्त वातावरण देऊ असं वचन बाजोरियांनी जनतेला दिलं... 

     

  • Maharashtra Breaking News LIVE : 'नवरात्रीत अधिकाधिक जागांची घोषणा होणार'

    जागावाटपात आम्ही खूप पुढे गेलोय. नवरात्रीत अधिकाधिक जागा आम्ही घोषित करू, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी दिलीये. तर यासंदर्भात  8,9,10 ऑक्टोबरला सलग बैठक होणार असल्याची माहिती वडेट्टीवारांनी दिलीय

     

  • Maharashtra Breaking News LIVE : पुण्यातील बावधनमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात

    पुण्यातील बावधनमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात झाला असून दुर्घटनेत 2 पायलट आणि एका इंजिनियरचा मृत्यू झालाय. दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची शक्यता वर्तविण्यात येतेय. 

  • Maharashtra Breaking News LIVE : सांगलीत आजी-माजी खासदारांची चांगलीच जुपली

    सांगलीत आजी-माजी खासदारांची चांगलीच जुपली. विशाल पाटील रंग बदलणारा सरडा आहे, अशी टीका माजी खासदार संजयकाका पाटलांनी केलीय. विशाल पाटील अपघाताने झालेला खासदार असल्याचं संजयकाकांनी म्हटलं. तर दुसरीकडे विद्यमान खासदार विशाल पाटलांनीही संजयकाकांवर पलटवार केलाय. लोकसभेत पराभूत झाल्यानं ते वैफल्यग्रस्त काका बनलेत, अशी टीका विशाल पाटलांनी केलीय.

     

  • Maharashtra Breaking News LIVE : अमित शाह आणि फडणवीसांमध्ये दीड तास चर्चा

    सागर बंगल्यावर काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. दोघांमध्ये जवळपास दीड तासाहून अधिक काळ चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री फडवणीस आणि अजित पवार यांच्यात जागा वाटपासंदर्भात ज्या काही बैठका झाल्या ,त्याचा आढावा अमित शहा यांनी यावेळी घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. भाजप अंदाजे किती जागा लढवू शकते या विषयी दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा झाल्याची माहितीही सूत्रांकडून मिळतेय. 

     

  • Breaking News LIVE : इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध पेटलंय

    आता बातमी आंतरराष्ट्रीय इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध पेटलंय..इराणनं इस्त्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केलाय. क्षेपणास्त्र  हल्ल्यात इस्त्रायलचं मोठं नुकसान झालंय. तसेच हल्ल्यात इस्त्रायलचं मोठं नुकसान झालंय.. तसेच अनेक इमारतींना आग लागलीय.. इराणच्या हल्ल्यात इस्त्रायलचे सैन्य ठिकाणं नष्ट झालीय..इस्त्रायलचं नेवातिम एअरबेस पूर्णपणे उद्धवस्त झालंय.. 

    बातमी सविस्तर वाचा - इराणचा इस्रायलवर एकामागून एक 100 क्षेपणास्त्रांचा मारा; देशभरात हाय अलर्ट... सध्या काय स्थिती?

     

  • Maharashtra Breaking News LIVE : मुंबई, नाशिकमध्ये धुक्याची चादर

    मुंबईवर धुक्याची चादर पसरलीये. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसानं विश्रांती घेतल्यानं वातावरणात बदल झालाय. यामुळे सकाळी धुकं तर दुपारी कडक उन्हाचा तडाखा असल्याचं पाहायला मिळतंय. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झालीये. 

     

  • Maharashtra Breaking News LIVE : महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक 

    महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक होणारेय. विधानसभा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्यानं मविआचं बैठकीचं सत्र अजूनही सुरूच आहे. त्यामुळे आज दुपारी 2 वाजता शिवालयात पुन्हा महत्त्वाची बैठक पार पडणारेय. बैठकीत जागावाटपाचा मुद्दा विदर्भावर येऊन थांबलाय. यावर तोडगा काढण्यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक होणारेय. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्ष दोघांनी दावा केलेल्या जागांवरचा तिढा अजून सुटलेला नाही. विदर्भातील जास्तीत जास्त जागा लढण्यावर काँग्रेस ठाम आहे. तर ठाकरे गटानंही विदर्भातील काही जागांवर दावा केलाय. त्यामुळे चर्चेचं गु-हाळ विदर्भाच्या मुद्द्यावर अडकलंय. 

  • Gandhi Jayanti Live Updates : पंतप्रधान मोदी राजघाटावर जाऊन वाहिली आंदराजली

    पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघाटावर जाऊन त्यांनी बापूंना पुष्पांजली अर्पण केली .सत्य, समरसता आणि समतेवर आधारित त्यांचं जीवन आणि आदर्श देशवासीयांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहतील. दरम्यान पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. ज्यांनी देशाचे सैनिक, शेतकरी आणि स्वाभिमानासाठी आपले जीवन समर्पित केलं. 

  • Gandhi Jayanti Live Updates : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बापूंना वाहिली पुष्पांजली

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजघाट येथे त्यांना आदरांजली वाहिली.

  • Gandhi Jayanti Live Updates : महात्मा गांधी यांची 155 जयंती 

    गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी पोरबंदरमध्ये महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कीर्ती मंदिरात जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. कीर्ती मंदिर हे पोरबंदरमध्ये महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या स्मरणार्थ बांधलेले स्मारक आहे. येथे गांधीजी कुटुंबाचे वडिलोपार्जित घर आहे. जिथे महात्मा गांधी यांचा जन्म झाला. जे कीर्ती मंदिराला लागून आहे.

  • Live Updates : माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची आज जयंती

    उपाध्यक्ष जगदीप धनखर यांनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विजय घाटावर आदरांजली वाहिली.

  • Gandhi Jayanti Live Updates : आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 155 वी जयंती आहे. यावेळी पंतप्रधान मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधींपासून ते केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांनी बापूंची आठवण काढली. अनेक दिग्गजांनी राजघाट जाऊन बापूंना आदरांजली वाहिली.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link