Breaking News LIVE Updates: बारामतीत गँग आहे, पण इथे...; पवारांचं जाहीर सभेत विधान

Mon, 07 Oct 2024-2:21 pm,

Maharashtra Breaking News LIVE Updates: राजकारणाबरोबरच दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा अगदी संक्षिप्त स्वरुपात जाणून घ्या, या एकाच ठिकाणी...

Latest Updates

  • सांगलीच्या तासगावमध्ये आजी-माजी खासदारांमध्ये भरसभेत जुंपली

    खासदार विशाल पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटलांमध्ये भर व्यासपीठावर जोरदार वादा-वादी

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    संजयकाका पाटील समर्थक खासदार विशाल पाटलांच्या अंगावर गेले धावून.

    कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत तासगाव नगरपालिका नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी घडला प्रकार

    तासगावच्या रिंग रोड मंजुरी प्रकरणावरून संजयकाका आणि विशाल पाटील एकमेकांना भिडले.

  • बारामतीत गँग आहे, पण इथे...; शरद पवारांचं जाहीर सभेत विधान

    अलीकडच्या काळात इंदापूरच्या राजकारणाला काही लोकांनी वेगळी दिशा दिली. बारामतीत गँग आहे, पण इथे सुद्धा मलिदा गँग असल्याचं आज कळलं. अशा लोकांना पायबंद घालायचा असेल तर ती क्षमता असलेला माणूस पाहिजे. हर्षवर्धन पाटील यांच्यात पोकळी भरून काढण्याची क्षमता आहे, असं शरद पवारांनी इंदापूरमध्ये हर्षवर्धन यांच्या पक्ष प्रवेशाच्या जाहीर सभेत म्हटलं आहे. 

  • दसऱ्याच्या मुहूर्तावर महायुतीची पहिली यादी - सूत्रांची माहिती

    दसऱ्याच्या मुहूर्तावर महायुतीची पहिली यादी जाहीर होणार असल्याचं वृत्त सूत्रांनी दिलं आहे. महायुतीच्या उमेदवारांची एकत्रित यादी जाहीर केली जाईल असं सांगितलं जात आहे. जास्तीत जास्त उमेदवारांचा पहिल्याच यादीत समावेश असण्याची शक्यता आहे. मतभेद आणि तिढा असलेल्या जागांचा तिढा दिल्लीत सुटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

  • मुंबईतील भाजपा आमदारांवर RSS नाराज?

    मुंबई भाजपतील काही नेत्यांच्या कार्यशैलीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या काही आमदारांच्या कामगिरीवरही संघ नाखूष असल्याचे समजते. मुंबईतील 4 ते 5 विद्यमान आमदारांवर संघ नाराज असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी 'झी 24 तास'ला दिली आहे. 

  • चंद्रपूर: 12 वर्षीय मुलीबरोबर अश्लील वर्तन; शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

    चंद्रपूरमधील कोरपना येथील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणातला आरोपी अमोल लोडे याच्याविरोधात नव्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने त्याच्या वर्गात शिकणाऱ्या एका 12 वर्षीय मुलीसोबत अश्लील वर्तन केले होते. उन्हाळ्यात अतीरिक्त शिकवणी घेण्याचे बहाण्याने आरोपी शिक्षकाने पीडित मुलीला शाळेत बोलावून विनयभंग केल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जिल्हा महिला आणि बालकल्याण विभागाच्या चौकशीदरम्यान पीडित मुलीने ही माहिती दिली असून त्यानुसार पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा केला दाखल

  • हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवारांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश

    इंदापूरमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्याच्याबरोबरच अंकिता पाटील - ठाकरे, राजवर्धन पाटील यांनीही पक्षप्रवेश केला. तालुक्यातील हर्षवर्धन पाटील समर्थक अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. 

  • नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासंदर्भात दिल्लीत महत्त्वाची बैठक

    नवी मुंबई विमानतळाचे दि. बा. पाटील नामकरण करण्यासाठी दिल्लीत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दि. बा. पाटील सर्वपक्षीय कृती समिती दिल्लीत दाखल झाली आहे. केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री राम मोहन नायडू, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीला रामशेठ ठाकूर, मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप खासदार धैर्यशील पाटील, संजीव नाईक, प्रशांत ठाकूर आणि दि. बा. पाटील यांचे सुपूत्र अतुल पाटील उपस्थित असणार आहेत.

  • बदलापूर अत्याचार प्रकरण : शिंदे गटाच्या 'त्या' पदाधिकाऱ्याला मोठा दिलासा

    शिंदे गटाचे बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. म्हात्रे यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. बदलापूरातील दोन चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचारानंतर उसळलेल्या जनक्षोभाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकार महिलेचा शिंदे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कल्याण न्यायालयाने म्हात्रे यांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला होता. त्यानंतर अटक टाळण्यासाठी म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती.

  • नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर दोन प्रवाशांची हत्या

    नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक सात वर दोघांची हत्या झाल्याचा विचित्र प्रकार घडला आहे. या हल्ल्यात दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. मनोरुग्ण व्यक्तीने डोक्यावर वार करून या दोन प्रवाशांची हत्या केली. आरोपी हा लोकांना मारत सुटला होता, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. रेल्वेच्या रुळवर वापरल्या जाणाऱ्या लाकडी राफटरने त्याने प्रवाशांना हणामारी सुरु केली. मरण पावलेल्या एका व्यक्तीचं नाव गणेश कुमार डी असं असून तो 54 वर्षांचा होता. गणेश कुमार डी हा तामिळनाडूमधील दिंडीगुल येथे वास्तव्यास होता. तर दुसऱ्या मयत प्रवाशाची ओळख पटलेली नाही. हल्ला केल्यावर आरोपी पळून जात होता. मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांनी रुळावरुन आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले. आरोपीचे नाव जयराम रामअवतार केवट असं असून तो 35 वर्षांचा आहे. 

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल; अमित शाहांबरोबर महत्त्वाची बैठक

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलग्रस्त भागातील मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची बैठक बोलविली आहे. या बैठकीत ते उपस्थित राहणार आहेत. राज्यातील राजकीय सद्यस्थितीवरही चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. नक्षलग्रस्त राज्यांसंदर्भातील बैठक सकाळी 10 वाजता विज्ञान भवनात होणार आहे. 10 राज्यातील मुख्यमंत्री बैठकीत सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातून मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकही बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

  • 'त्या' 12 आमदारांसंदर्भातील याचिकेवर आज सुनावणी

    राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्ती विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना यादी देण्यात आली होती. कोश्यारी यांनी या नियुक्त्या अडवून धरल्या होत्या. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

  • पोलीस महासंचालक मुख्यमंत्र्याच्या भेटीला

    पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी रश्मी शुक्ला महाराष्ट्र सदनात पोहोचल्या आहेत.

  • रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून पुण्यातील 12 वर्षीय मुलीची आत्महत्या

    पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरीमध्ये 12 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुलीच्या वडीलाच्या तक्रारीवरून क्षितिज लक्ष्मण पराड आणि तेजस पांडुरंग पठारे या दोन आरोपींना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती काल पालकांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 12 मुंबईकरांनी डेंग्यूमुळे गमावला प्राण; राज्यातील मृतांची संख्या 31 वर

    राज्यात गेल्या नऊ महिन्यांत डेंग्यूने 31 जणांचा बळी घेतला आहे. हा आजार 13 हजार 594 रुग्णांना झाला. हा आजार डासांमुळे होणारा असून, आपल्या आजूबाजूच्या परिसरात डासांची उत्पत्तीस्थळे असतील तर ती नष्ट केली पाहिजेत, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. विशेष म्हणजे, राज्याच्या रुग्णांच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक 3435 रुग्ण आणि 12 मृत्यू हे एकट्या मुंबईतील आहेत.

  • एसटीच्या ताफ्यात दाखल होणार 25000 नव्या बस

    राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ताफ्यात 25000 नव्या डिझेल लालपरी बस पुढच्या वर्षी दाखल होतील, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव कुसेकर यांनी दिली. तसेच, एसटीला सतत नफ्यात ठेवण्यासाठी एनएफबीआरसारख्या इतर पर्यायी माध्यमांतून महसूल मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

  • माहीममधील रहिवासी इमारतीला आग

    माहीम परिसरात रहिवासी इमारतीला आग लागली आहे. मोईन हाइट्स नावाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग लागली असून इमारतीत काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी हजर झाल्यानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.

  • साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

    दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण आज पुण्यात राज ठाकरे यांच्या हस्ते आज होणार आहे

  • राज ठाकरे आज पुण्यात; मॅरेथॉन बैठका

    आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांच्या नेतृत्वात पुण्यात अनेक बैठका होणार आहेत. मनसेच्या पश्चिम विभागाची बैठक  सकाळी 10 पासून सुरू होणार आहे. पश्चिम विभागात असणाऱ्या सर्व जिल्ह्यातील मुख्य नेते, पदाधिकारी, उपस्थितीत राहणार आहेत.  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची आजची महत्त्वाची बैठक असणार आहे.

  • बुधवारपासून राज्यभरात परतीचा पाऊस?

    राज्यातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे राज्यात येत आहेत. त्यामुळे बुधवारपासून (9 ऑक्टोबर) ते शनिवारपर्यंत (12 ऑक्टोबर) राज्यभरात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

  • मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोचा आज श्रीगणेशा

    कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-3 मार्गिकेतील आरे ते बीकेसी टप्प्याचे लोकार्पण शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्यानंतर सोमवारपासून हा टप्पा प्रवाशांसाठी खुला होणार आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता बीकेसी मेट्रो स्थानक आणि आरे जेव्हीएलआर मेट्रो स्थानकावरून पहिली भुयारी मेट्रो गाडी सुटणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचे भुयारी मेट्रो प्रवासाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे.

  • अजित पवार आज बारामतीत; बिल्डरांना करणार मार्गदर्शन

    उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. सायंकाळी साडेसहा वाजता राजमाता जिजाऊ सभागृहात व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं असून रात्री आठ वाजता बारामती क्लबमध्ये बिल्डर असोसिएशनचा मेळाव्यास उपमुख्यमंत्री उपस्थीत राहून मार्गदर्शन करणार आहेत. 

  • आज हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

    इंदापुरात आज शरद पवार यांचा दौरा आहे. सकाळी 11 वाजता हर्षवर्धन पाटील यांच्या पक्ष प्रवेशाला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते -पाटील, उपस्थित राहणार असल्याचे समजते.

  • महाविकास आघाडीच्या जागावाटपावर होणार शिक्कामोर्तब?

    महाविकास आघाडीची आज जागावाटपसंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. दुपारी 2 वाजता ट्रायडंट हॉटेलमध्ये ही बैठक होईल.

  • अजित पवार शिरूरमधून विधानसभा लढणार?

     

    Ajit Pawar : अजित पवार शिरूरमधून विधानसभा लढणार?...बारामतीतून न लढण्याचे दिले होते संकेत

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link