Maharashtra Breaking News LIVE: मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर पेसा मुद्यावरून सुरू असलेले आदिवासींचे आंदोलन मागे

Thu, 29 Aug 2024-9:52 pm,

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील सर्व ठळक घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.

Maharashtra Breaking News LIVE: मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्यातील सर्व ठळक घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.

Latest Updates

  • मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर पेसा मुद्यावरून सुरू असलेले आदिवासींचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.  15 सप्टेंबरपर्यंत कोर्टात निर्णय व्हावा अशी आदिवासी शिष्टमंडळाची अपेक्षा आहे.  सरकार न्यायालयात आग्रही पध्दतीने बाजू मांडणार आहे.  एजी आणि सीनिअर कौन्सिलशी मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली. 

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत.  पालघरमध्ये सुमारे 76,000 कोटी रुपयांच्या वाढवण पोर्ट प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार आहे. वाढवण हे भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या बंदरांपैकी एक असेल. हे बंदर भारताच्या सागरी संपर्काला वाढवेल आणि जागतिक व्यापार केंद्र म्हणून भारताची भूमिका अधिक मजबूत करेल.  पंतप्रधान 1,560 कोटी रुपयांच्या 218 मत्स्य प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील करतील. 
    व्हेसल कम्युनिकेशन आणि सपोर्ट सिस्टीमच्या राष्ट्रीय विस्तारांतर्गत, 13 किनारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील यांत्रिक आणि मोटारीकृत मच्छीमार नौकांवर 1 लाख ट्रान्सपोंडर स्थापित केले जातील. पंतप्रधान मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 ला संबोधित करतील. 

  • छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली आहे. विरोधकांनाही त्यांनी राजकारण न करण्याचं आवाहन यावेळी केले. त्याचबरोबर सर्व परिस्थितीसह वातावरणाचा अभ्यास करून लवकरातलवकर भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

  •  Maharashtra Breaking News LIVE: राहुल गांधी 5 सप्टेंबर रोजी सांगलीत येणार

     पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे आणि स्मारकाच्या उद्घाटनाचा कार्यक्रमानिमित्त राहुल गांधी सांगलीत येणार आहेत. पलूस कडेगाव विधानसभा मतदार संघात कार्यक्रम ५ सप्टेंबरला पार पडणार आहे.

  •  Maharashtra Breaking News LIVE: स्वाभिमान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून ताफा अडविण्याचा प्रयत्न

    अजित पवार यांच्या सन्मानयात्रेत बीडमध्ये राडा. स्वाभिमान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून ताफा अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ठेवीदारांचे पैसे बुडवणाऱ्या बँकेवर कारवाई करण्याची मागणी. सचिन उबाळे यांना पोलिसांकडून केली अटक 

  • Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात दहशतवाद विरोध पथकाची मोठी कारवाई

    पुणे गणेश उत्सव पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकाची पुण्यात मोठे कारवाई पुण्यातील कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंज वर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा

  • Maharashtra Breaking News LIVE: शिवाजी महाराज पुतळा घटना दुर्दैवी, अजित पवार यांनी माफी मागितली. आदर दाखवण्यासाठी आम्ही मूक आंदोलन करत आहे, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

  •  Maharashtra Breaking News LIVE: गुजरातमध्ये पुरामुळे हाहाकार, आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू

    दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. तर,गुजरातमध्ये अतिवृष्टीमुळे आणखी १९ जणांचा मृत्यू झाला आहे.  त्यामुळे गेल्या तीन दिवसांतील मृतांची संख्या 30 झाली आहे.

  •  Maharashtra Breaking News LIVE: गुजरातमध्ये पुरामुळे हाहाकार, आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू

    दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. तर,गुजरातमध्ये अतिवृष्टीमुळे आणखी १९ जणांचा मृत्यू झाला आहे.  त्यामुळे गेल्या तीन दिवसांतील मृतांची संख्या 30 झाली आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: पूजा खेडकरला दिलासा, 5 सप्टेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण

    बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकरला न्यायालयाने दिलासा दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाकडून ५ सप्टेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे. पूजा खेडकर अटकपूर्व जामीनावर दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली

  •  Maharashtra Breaking News LIVE: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी फॉरेन्सिकची टीम राजकोट किल्ल्यावर

    सिंधुदुर्गातील फॉरेन्सिक टीम नंतर आता कोल्हापूर येथील फॉरेन्सिक टीम घटनास्थळाची पाहणी. गेल्या अर्ध्या तासापासून फॉरेन्सिक टीम राजकोट किल्ल्यावर

  • Maharashtra Breaking News LIVE: ऑनलाइन पासपोर्टची वेबसाइट 5 दिवसांसाठी बंद

    पासपोर्ट विभागाची वेबसाइट पुढील पाच दिवसांसाठी बंद असणार आहे. या काळात आधीच घेतलेल्या सर्व अपॉइंटमेंट पुन्हा शेड्युल करण्यात येणार आहेत. तांत्रिकी कारणांमुळं पाच दिवस वेबसाइट बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

  •  Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (AP) पक्षाचे आंदोलन

    शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा लवकरात लवकर उभारावा यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. तसंच, पुतळ्याच्या उभारणीमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई मागण्या राष्ट्रवादीने केल्या आहेत.

  •  Maharashtra Breaking News LIVE: तुळजाभवानी सोने चांदी अपहार प्रकरणी सीआयडीचा अहवाल प्राप्त

    सोन्यातुळजाभवानी सोने चांदी अपहार प्रकरणी सीआयडीचा अहवाल अखेर जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालाय. त्यामुळे आरोपींवर आता गुन्हे दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाने आदेश देऊनही गुन्हे दाखल न झाल्याने हिंदू जनजागृति समितीने उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस काढत गुन्हे दाखल करण्याविषयी विचारणा केली होती.

  •  Maharashtra Breaking News LIVE:  पुणे शहरातील तब्बल एक हजार सीसीटीव्ही बंद

    ऐन गणेशोत्सव तोंडावर असताना, पुण्यातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून महापालिकेने पुण्यात २ हजार ९०९ सीसीटीव्ही बसविले मात्र, यातील १ हजार ५४ सीसीटीव्ही बंद आहेत. महापालिकेच्या विद्युत विभागाने लावण्यात आलेल्या २ हजार ९०९ सीसीटीव्ही पैकी १ हजार ८५५ सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत. 

  •  Maharashtra Breaking News LIVE: UPSC उमेदवारांची आता आधारशी पडताळणी केली जाणार

    केंद्र सरकारने  केंद्रीय लोकसेवा आयोगाला (UPSC) नोंदणी, परीक्षा आणि भरतीच्या विविध टप्प्यांच्या वेळी ऐच्छिक आधारावर उमेदवारांची ओळख पडताळण्यासाठी आधार प्रमाणीकरण वापरण्याची परवानगी दिली.  

  •  Maharashtra Breaking News LIVE: आचरेकर सरांचे स्मारक शिवाजी पार्कवर उभं राहणार

    फलंदाज सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सर यांच्या स्मारकाच्या प्रस्तावाला महाराष्ट्राच्या नगरविकास विभागाने बुधवारी मंजुरी दिली. राज्य सरकारने  जाहीर केलेल्या GR मध्ये शिवाजी पार्कच्या गेट ५ जवळ १.८ मीटर क्यूब स्ट्रक्चर उभारण्याची योजना आहे. या स्मारकाच्या देखभालीची जबाबदारी बी. व्ही. कामत मेमोरियल क्रिकेट क्लबकडे देण्यात आली आहे आणि त्यासाठी सरकारकडून कोणतेही आर्थिक योगदान दिले जाणार नाही.

  •  Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात गुंडांची दहशत, अरण्येश्वर भागात वाहनांची तोडफोड

    पुण्यातील अरण्येश्वर भागात गुंडाकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. सात ते आठ चार चाकी गाड्यांची तोडफोड केली आहे. रात्रीच्या वेळी तोडफोड झाल्याची माहिती असून दहशत निर्माण करण्याच्या हेतूने तोडफोड केल्याची माहिती आहे. पोलिसांकडून अरण्येश्वर भागातील अनेक सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू आहे

  • Maharashtra Breaking News LIVE: सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना हायकोर्टाचा दिलासा

    मुंबईसह राज्यभरातील गणेशोत्सव मंडळांना उच्च न्यायालयाने बुधवारी मोठा दिलासा दिला. मोकळ्या जागेवर मंडप उभारणीला परवानगी देण्यास विरोध करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली. मंडप उभारणीला मनाई करणारी तरतूद कुठल्या कायद्यात आहे? तसा कायदाच नाही. असे असताना तात्पुरत्या मंडप उभारणीला कुठल्या हक्काने विरोध करताय, असा सवाल करीत न्यायालयाने याचिकाकर्त्याला फैलावर घेतले.

  •  Maharashtra Breaking News LIVE: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जन सन्मान यात्रा आज बीड जिल्ह्यात

    बीड जिल्ह्यातील बीड विधानसभा मतदारसंघ आणि आष्टी विधानसभा मतदारसंघामधून ही यात्रा जाणार आहे बीड शहर आणि आष्टी शहरांमध्ये दोन ठिकाणी उद्या या यात्रेदरम्यान जाहीर सभा ही होणार आहेत.

  •  Maharashtra Breaking News LIVE: यंदा गणेश विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव

    यंदा गणेश विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव; गेल्या ११ वर्षांत कृत्रिम तलावातील गणेशमूर्ती विसर्जनात ३७१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

  •  Maharashtra Breaking News LIVE: एच पश्चिम विभागात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद

    महानगरपालिकेच्या एच पश्चिम विभागातील पाली हिल जलाशय १ ची जुन्या, जीर्ण झालेल्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. परिणामी, एच पश्चिम विभाग कार्यालयाच्या हद्दीतील काही परिसराचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

  •  Maharashtra Breaking News LIVE: आनंदाचा शिधा संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी

    सणासुदीला आनंदाचा शिधा देण्यासाठी राज्य सरकारने निविदा काढल्या होत्या. मात्र यातून एकाच ठेकेदारांचे उकळ पांढरे करण्यासाठी अटी शर्थी बदलण्यात आल्याचा आरोप करीत इंडो अलाईड आणि जस्ट युनिव्हर्सल या दोन ठेकेदार कंपन्यांनी मुंबई उच्च न्यायालयात या निविदेला आव्हान दिले होते. त्यासंदर्भात आज सुनावणी होणार आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link