Maharashtra Breaking News : राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार, रायबरेलीतून खासदार राहणार; प्रियंका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार

Mon, 17 Jun 2024-7:45 pm,

Maharashtra Breaking News : राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार, रायबरेलीतून खासदार राहणार; प्रियंका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार

Breaking News : राज्यात क्षणाक्षणाला घडणाऱ्या राजकीय आणि इतर प्रत्येक क्षेत्रातील घडामोडींचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर. गावखेड्याच्या बातम्या, हवामानाचा अंदाज, केंद्रातील निर्णय आणि बातमी तुमच्या फायद्याची... पाहा Live Blog मध्ये. 


 

Latest Updates

  •  प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.. वायनाडमधून प्रियंका गांधी निवडणूक लढवणार आहेत.. राहुल गांधी हे वायनाड तसंच रायबरेली या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते.. मात्र राहुल गांधींनी वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतलाय. आता राहुल गांधींऐवजी वायनाडमधून प्रियंका गांधी निवडणूक लढवणार आहेत.. 

  • छगन भुजबळांसंदर्भातली.. मंत्री छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार का याची चर्चा आता सुरु झालीय. कारण मुंबईत झालेल्या बैठकीत पदाधिका-यांनीच तसा सूर बोलून दाखवलाय.  
    सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.... मंत्री छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार? महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप 

  • Maharashtra Breaking News Live  -  'अमोल किर्तीकरांचा पराभव संशयास्पद'

    अमोल किर्तीकरांचा पराभव संशयास्पद आहे. आम्ही कोर्टात जात आहोतच. निवडणूक प्रक्रियेला हरताळ फासला गेलाय19 व्या फेरीनंतर पारदर्शकता बंद झाली. प्रत्येक फेरीनंतर मते सांगितली जातात. पण नंतर हे झाले नाही, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. निकाल एकतर्फी जाहीर केला गेला. RO यांना कुणाचे फोन येत होते. वारंवार बाथरूमला जावून त्या कुणाशी बोलत होत्या. सीसीटीव्हीची मागणी आम्ही केली. ते देतो म्हणून सांगूनही नाकारले आहे. जर पारदर्शकता आहे तर ते द्यायला काय हरकत आहे असंही ठाकरे गटाने केलीय.

  • Maharashtra Breaking News Live : मुंबईत रहिवासी इमारतीला आग 

    मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना सोमवारी घडली. इथं तीन मजली इमारतीला लागली आग लागल्याची माहिती असून, तातडीनं चार फायर इंजिन आणि तीन टँकर घटनास्थळी दाखल झाले आणि आज विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. 

  • Maharashtra Breaking News Live : त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांच्या दर्शन व्यवस्थेत होणार सुधारणा

    त्र्यंबकेश्वरमध्ये सुरक्षारक्षकांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा भाविकांचा आरोप केल्यानंतर, झी 24 चोवीस तासच्या बातमीनंतर प्रशासनानं सदर प्रकरणी दखल घेतली आहे. ज्या धर्तीवर आता  भाविकांच्या दर्शन व्यवस्थेत होणार सुधारणा होणार आहेत. पोलीस अधिकारी त्र्यंबकेश्वर मंदिरात मारहाणीसंदर्भात सीसीटीव्हीची पाहणी माहिती करुन घेत पुढील कारवाई केली. 

  • Maharashtra Breaking News Live : विलास पोतनीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल

    रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आत्ता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल. विलास पोतनीस आणि त्यांच्या सशस्त्र पोलीस सुरक्षा रक्षका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मतमोजणीच्या दिवशी नेस्को येथील मुंबई उत्तर पश्चिम मतमोजणी केंद्रात विनापरवाना प्रवेश केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. भारतीय दंडसंविधानाअन्वये 188 आणि 128 (2) लोकप्रतिनिधित्व अधिनियम सह 54 निवडणूक नियमांचे नियम अंतर्गत त्यांच्या नावे गुन्हा दाखल. 

  • Maharashtra Breaking News Live : आळंदी जवळील वडगाव घेणंद येथे पोर्श कार अपघात पुनरावृत्ती..?

    आळंदी जवळील वडगाव घेणंद येथे पोर्शे कार अपघात पुनरावृत्ती..? अल्पवयीन कार चालकाकडुन महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न. समोरील जमावाला चिरडण्यासाठी अल्पवयीन तरुणाने कार पाठीमागे घेऊन जात पुर्ण वेगाने चालवत महिलेसह नागरिकाना चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा थरार कँमेरात कैद झाला. हा अपघाताचा थरार झाल्यानंतर हा तरुण कारच्या छतावर बसुन शिवीगाळ करत होता. पुर्वीच्या भांडणाचा राग धरुन महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रकार केल्याबाबत आळंदी पोलीसांत फिर्याद देण्यात आली. 

  • Maharashtra Breaking News Live : कोकणातील जनतेचा अपमान कोण करत असेल तर 

    लोकांनी शिवसेनेला नाकारलं हे सत्य राणे साहेबांनी सांगितल त्यामुळे संजय राऊत, विनायक राऊत यांना मिरच्या झोंबल्या. कोकणातला सामान्य मतदार हा पैसा खातो असं राऊत आणि ठाकरेंना वाटतं का? आमचा कोकणी माणूस कधीही कोणाजवळ कर्ज मागत नाही. घेतलेले कर्ज त्वरित फेडतो. आमच्या कोकणातील जनतेचा अपमान कोण करत असेल तर आमची जनता त्यांना गाडून टाकेल, अशा शब्दांत सामनाच्या अग्रलेखावर आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. 

  • Maharashtra Breaking News Live : मुंबईत दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा लावली हजेरी 

    मुंबई शहर आणि उपनगरात दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा लावली हजेरी. उकाड्याने हैराण झालेले मुंबईकर अखेर तृप्त झाले आहेत. ढगाळ वातावरणासह शहरातील हवेत गारवा पसरला असून, सध्यातरी द्रुतगती मार्गासह रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाल्याचं पाहायला मिळत नाही. 

  • Maharashtra Breaking News Live : जुलै महिन्यात इंग्लंड येथून वाघनखं साताऱ्यात येणार

    शिवप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी. छत्रपतीं शिवाजीं महाराजांच्या पराक्रमाची ग्वाही देणारी वाघनख पुन्हा इंग्लंडमधून भारतात आणली जाणार आहेत. ही वाघनखं जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. तब्बल दहा महिने ही वाघनखं या संग्रहालयात ठेवली जाणार.  या वाघनखांच्या सुरक्षेसाठी विविध यंत्रणाही कामाला लागल्या आहेत.

  • Maharashtra Breaking News Live : नवी मुंबईत लाखो लिटर पाणी वाया 

    नवी मुंबई मध्ये एकिकडे पाणीकपात सुरू असून, दुसरीकडे पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी फुकट जात आहे. गोठवली गावात पाण्याची पाईपलाईन फुटून पाणी वाया जात आहे याकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. 

  • Breaking News Live : पश्चिम बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात 

    पश्चिम बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात झाला असून, दार्जिलिंगमधील कंचनजंगा एक्स्प्रेस ट्रेनला मालगाडीनं जोरदार धडक दिली आहे. या अपघातात अनेकजण जखमी झाले असून, बचावकार्यासाठी तातडीनं बचाव पथकं आणि यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. 

  • Maharashtra Breaking News Live : दंगलींबद्दल शिकवल्यास....

    राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच एनसीईआरटीने आपल्या अभ्यासक्रमामध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. नवीन बदलांमध्ये दंगलींबद्दलचे संदर्भ पाठ्यपुस्तकांमधून हटवण्यात आले आहेत. एनसीईआरटीचे संचालक दिनेस प्रसाद सकलानी यांनी या बदलांमागील भूमिका स्पष्ट करताना, 'दंगलींबद्दल शिकवल्यास हिंसक व वैफलग्रस्त नागरिक निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच आम्ही शालेय पाठ्यपुस्तकातील गुजरात दंगल, बाबरी मशीदीबद्दलचे संदर्भ सुधारले आहेत,' असं म्हटलं आहे.

  • Maharashtra Breaking News Live : नाशिकमध्ये भीषण दुर्घटना; नियंत्रण सुटल्याने कार थेट गोदापत्रात

    नाशिकच्या गोदाघाटावर चार चाकी वाहनांची वर्दळ नेहमीच असते.. सुटीचा दिवस असल्याने रविवारही मोठी गर्दी होती. गोदाघाटा परिसरात असलेल्या रोकडोबा पटांगणावर चारचाकी वाहनाचा ब्रेक न लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन थेट गोदापात्रेत गेले. यामुळे वाहनाचे प्रचंड नुकसान झाले. या वेळी बघ्यांची गर्दी झाली होती. यात जीवित हानी झाली नाहीये. गाडी पाण्यात असणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

  • Maharashtra Breaking News Live : पुण्यात पावसाचा ब्रेक 

    पुणे पुण्यात पावसाने मोठा ब्रेक दिला आहे 9 जूनला पुण्यात मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली होती. मात्र 8 दिवसानंतरही पुणे शहरात पाऊस बरसला नाही. पावसाची साधारण सरासरी अवकळी पावसानेच भरून काढल्याच म्हंटल जातंय कारण 4 ते 8 जूनपर्यंत 230 मिमी पावसाची नोंद झाली. मात्र मॉन्सून आगमनापासून पाऊस बंदच आहे. 
    मागच्या वर्षी शहरात मान्सून 25 जूनला दाखल झाला होता.

  • Maharashtra Breaking News Live : बार - पब मध्ये दाखवावा लागणार वयाचा पुरावा 

    पुणे पोर्श कार अपघात प्रकारानंतर आता बार - पब मध्ये वयाचा पुरावा म्हणून मागितले जाणार सरकारी ओळखपत्र. अल्पवयीन मुलांना प्रवेश मिळू नये यासाठीए आता प्रवेश द्वारावरच ओळखपत्र तपासला जाणार आहे. वाईन बियर पिण्यासाठी 21 वर्ष वय तर दारू पिण्यासाठी 28 वर्ष वय असणे बंधनकारक आहे. त्यासाठी आता अनेक दुकानांनी ओळखपत्र दाखवल्याशिवाय दारू न देण्याचा निर्णय घेतला आहे. 

  • Maharashtra Breaking News Live : बकरी ईदनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल 

    बकरी ईदनिमित्त पुण्यातील गोळीबार चौक परिसरात वाहतुकीत आज बदल करण्यात आले आहेत. गोळीबार मैदान येथील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून गोळीबार मैदान चौक, मम्मादेवी चौक ,ढोले पाटील चौक या मार्गावरून वाहतूक पर्याय मार्गाने वळवण्यात आली आहे. 

  • Maharashtra Breaking News Live : पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या करणारे आरोपी किती निगरगट्ट

    अपघाताच्या माध्यमातून पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या करणारे आरोपी किती निगरगट्ट आणि असंवेदनशील होते,हत्या केल्यानंतर त्यांनी पार्टी केल्याचे फोटो समोर आले. पुरुषोत्तम पुट्टेवार यांना कारची धडक देऊन त्यांचा जीव घेणारा नीरज निमजे आणि त्याच वेळेस दुचाकीने पाठलाग करत संपूर्ण घटनेवर नजर ठेवणारा सचिन धार्मिक हे दोघेही पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या केल्यानंतर नागपूरच्या एका हॉटेलमध्ये पार्टी करायला गेले होते... त्या ठिकाणी दोघांनी मद्यप्राशन केले. 

  • Maharashtra Breaking News Live : मुंबईत ढगाळ वातावरण 

    मुंबईत आज पहाटेपासून ढगाळ वातावरण असून पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईतल्या काही ठिकाणी पहाटे हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. शहरात मान्सून दाखल झाल्यानंतर दोन दिवस पाऊस पडला आणि त्यानंतर पुन्हा पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. मराठवाडा, कोकण विभागात मध्या महाराष्ट्र्र तुरळक पावसाची शक्यता शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 19-20 जून रोजी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये तुरळक पाऊस तर 18-20 जून रोजी काही भागात येलो अलर्ट दिला आहे. 

     

  • छगन भुजबळांनी बोलावली समता परिषद बैठक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Chagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळांनी राज्यस्तरीय समता परिषद बैठक बोलावलीय...आज सकाळी 11 वाजता वांद्रेतल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट इथे ही बैठक होणार आहे...भुजबळांच्या पक्षांतर्गत तसंच महायुतीमधल्या नाराजीची चर्चा सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर भुजबळ आजच्या बैठकीत कोणती राजकीय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.. तसंच जरांगे, मराठा, ओबीसी आरक्षण या विषयांवरही महत्त्वपूर्ण चर्चा या बैठकीत होणार असल्याची माहिती आहे...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Aaditya Thackeray : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज पत्रकार परिषद घेणारेत. दुपारी 2 वाजता आदित्य ठाकरे पत्रकारांशी संवाद साधतील. यावेळी ते ईव्हीएमबाबत बोलण्याची शक्यताय. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात मतमोजणीवेळी ईव्हीएममध्ये गडबड केल्याचा आरोप ठाकरे पक्षानं केलाय. मात्र त्याचं सीसीटीव्ही फुटेज देण्यास निवडणूक आयोगानं नकार दिलाय. आता याप्रकरणी ठाकरे पक्ष कोर्टाचे दरवाजे ठोठावणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • Maharashtra Breaking News Live : शिवसैनिकांकडून घंटानाद आंदोलन.

    कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मियांची प्रार्थनास्थळे आहेत. बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांकडून इथे नमाज पठण केली जाते, मात्र यावेळी हिंदू बांधव भगिनींना मंदिर परिसरात प्रवेश दिला जात नाही. त्याच्या निषेधार्थ शिवसैनिक हे घंटानाद आंदोलन करत आहेत. शिंदे आणि ठाकरे दोन्ही गट एकत्र येणार असल्याने मोठा पोलिस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link