Maharashtra Breaking News LIVE: जरांगेंना काहीही झाल्यास रस्त्यावर उतरणारः संभाजीराजे

Mon, 23 Sep 2024-1:42 pm,

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील व देश-विदेशातील ताज्या घडामोडींचा आढावा आजच्या या लाइव्ह ब्लॉगमधून घेऊयात

Maharashtra Breaking News LIVE: आज राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढणार आहे. तर, एकीकडे मराठा आरक्षणावरुन राज्यात पुन्हा वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. तर, राज्यात विधानसभा निवडणूकांपूर्वीच घडामोडींना वेग आले आहेत. राज्यातील व देश-विदेशातील ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Latest Updates

  •  Maharashtra Breaking News LIVE: राज ठाकरे अमरावती आणि नाशिक दौऱ्यावर जाणार

    राज ठाकरे करणार अमरावती आणि नाशिक दौरा करणार आहेत. 26,27 आणि 28 सप्टेंबरला दौरा नियोजित करण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर घेणार पदाधिकारी बैठका आणि विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार

  •  Maharashtra Breaking News LIVE: 'मी जरांगे यांच्यासोबत होतो आजही आहे आणि उद्याही राहील'

    हे आंदोलन स्वतःसाठी नाही जरांगे यांचा लढा प्रामाणिक असतो मी सरकारला। सांगू इच्छितो शाहू मजाराजांनी मराठ्यांना सुद्धा आरक्षण दिल होत आधीही मी जरांगे यांच्या सोबत होतो आजही आहे आणि उद्याही राहील. जरांगे यांची तब्बेत बरी असती तर अधिक बोललो असतो. जरांगे यांची प्रकृती चिंताजनक आहे. विरोधक आणि सत्ताधारी कुठेय. निवडणूक आली म्हणून तुम्हाला जरांगे आणि बहुजन समाज नको आहे का? असा सवाल संभाजीराजे यांनी केला आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: जरांगेंना काहीही झाल्यास रस्त्यावर उतरणारः संभाजीराजे

    जरांगे यांनी सलाईन घएणे बंद केले आहे. जरांगेंना काहीही झाल्यास रस्त्यावर उतरणार. मी जरांगेंच्या पाठीशी आहे. छत्रपती घरण्यातील व्यक्ती म्हणून त्यांची तब्बेत पाहायला आलेलो.तब्बेत खराब झालेली असताना सरकार एअर कंडिशन मध्ये बसले.विरोधक बघ्याची भूमिका घेत आहे हे चालणार नाही.

  • Maharashtra Breaking News LIVE: संभाजीराजे आज मनोज जरांगेंच्या भेटीला

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. संभाजीराजे यांनी आज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. जरांगे पाटील हे या वर्षात 6 व्यांदा आमरण उपोषण करत आहे ही राज्यात शरमेची बाब आहे की एक व्यक्ती आरक्षणासाठी जीवाची बाजी लावत आहे आणि त्यावर सरकारने निर्णय घेतला नाही. डॉक्टर कडून मि सगळे रिपोर्ट घेतले. रायगडवर  असताना त्यांची तब्बेत बिघडल्याची माहिती मिळाली

     

  • Maharashtra Breaking News LIVE:  सोलापुरात धनगर समाज आक्रमक, सोलापूर तुळजापूर महामार्गावर केले रास्ता रोको

    आरक्षणाच्या मागणीवरून सोलापुरात धनगर समाज आक्रमक झाला आहे. सोलापूर तुळजापूर महामार्गावरील तुळजापूर नाका या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे. सोलापूर जिल्ह्यात हजारो धनगर समाज बांधव रस्त्यावर

  • Maharashtra Breaking News LIVE: इम्तियाज जलील यांची आज संभाजीनगर ते मुंबई तिरंगा रॅली

    रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांच्यावर कारवाई करत तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी इम्तियाज जलील यांची संभाजीनगर ते मुंबई रॅली निघणार आहे. संभाजीनगरमधून मुंबईकडे समृध्दी मार्गाने निघणार असून शिर्डी, नाशिकमार्गे पुढे रॅली मुंबईकडे येणार आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदे -राज ठाकरे यांची भेट

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांच्या निवास्थानी शिवतीर्थ येथे महत्त्वाची बैठक बोलावली होती. त्यानंतर लगेचच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. या भेटीचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: महायुतीमध्ये अंधेरी पूर्व आणि दिंडोशी मतदार संघांची होणार आदलाबदली

    अंधेरी पूर्व मतदारसंघातून भाजपचे मुरजी पटेल इच्छुक आहेत. तर याच मतदार संघातून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या स्वीकृती प्रदीप शर्मा इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे.या वादावर तोडगा निघाल्याची माहिती देखील समोर येतेय. एकनाथ शिंदे अंधेरी पूर्व भाजपासाठी सोडणार त्या बदल्यात स्वीकृती प्रदीप शर्मा यांना दिंडोशी मतदार संघातून उमेदवारी देणार. दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये हा समझोता झाल्याची माहिती

  • Maharashtra Breaking News LIVE:   जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ नांदेड बंदची हाक, शाळा बंद

    मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ आज नांदेड बंदची हाक देण्यात आली आहे. याबाबत काल सकल मराठा समाजाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. सरकारने तात्काळ जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून उपोषण सोडवावे या मागणीसाठी नांदेड बंदची हाक देण्यात आली आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE:  काँग्रेस चेहरा देत असेल तर समर्थन देऊः संजय राऊत

  • Maharashtra Breaking News LIVE:  अजित पवारांनी शरद पवारांना धोका दिलाः संजय राऊत

  • Maharashtra Breaking News LIVE:  भाजपच्या चिंचवड जागेवरून पक्षात अंतर्गत कलह शिगेला

    पिंपरी चिंचवड शहरात येणाऱ्या चिंचवड विधानसभा मतदारसंघावरून भाजपमध्ये अंतर्गत कलह चांगलाच वाढला आहे. एकीकडे जगताप कुटुंबीयांना विरोध वाढत असताना माजी स्थायी समिती सदस्य आणि माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनीही विधानसभेसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली. पक्षश्रेष्ठी यावेळी मला डावलणार नाही असा विश्वास ते व्यक्त करत आहे. पण त्याच वेळी उमेदवारी दिली नाही तर कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असा इशारा त्यांनी दिलाय

  • Maharashtra Breaking News LIVE:  अमरावती शहरासह जिल्ह्यात विजेच्या कडाक्यासह जोरदार पाऊस

    अमरावती जिल्हासह विदर्भात 27 सप्टेंबर पर्यंत विजेच्या कडकडासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार अमरावती शहरासह ग्रामीण भागात काल सायंकाळी विजेच्या कडाक्यासह जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे या पावसाने सोयाबीन पावसात भिजले आहे सोयाबीन आता कापणीला येणार आहे त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला जाण्याची शक्यता आहे 

  • Maharashtra Breaking News LIVE:  अवैध गर्भपात केंद्राचा पर्दाफाश; उदगीरमध्ये सुरू होता धक्कादायक प्रकार

    महाराष्ट्राला हादरावुन टाकणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गरोदर महिलांच्या आरोग्याची कसा खेळ सुरू आहे याचा प्रकार लातूर च्या उदगीर मध्ये समोर आला आहे. आरोग्य विभागाच्या पथकाला आलेल्या एका निनावी फोन मुळे गर्भपात करत असलेल्या एका मुन्ना भाई डॉक्टराला आणि एका नर्स ला गर्भपात करतानाच पोलीस आणि आरोग्य पथकाला रंगेहाथ पकडून त्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे

  • Maharashtra Breaking News LIVE:  संभाजीराजे छत्रपती 11 वाजता जरांगे यांच्या भेटीसाठी जाणार

    नोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सातवा,ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्या उपोषणाचा सहावा तर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे.हाके आणि ससाणे हे ओबीसी आरक्षण वाचवण्याच्या तर जरांगे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत.जरांगे यांची प्रकृती खालावत चालली असून आज संभाजीराजे छत्रपती जरांगे यांची भेट घेणार असून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहेत.

  • Maharashtra Breaking News LIVE:  'नाना पटोले यांना मुख्यमंत्री पद मिळाले नाही तर हिसकावून घेऊ'

    एकीकडे महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री पदाचा निर्णय निवडणुकीनंतर घेऊ असे सांगत असले तरी नागपुरात मात्र काँग्रेस नेते चांगलेचं आक्रमक झालेय आहे. नाना पटोले यांनी मेहनत घेतली त्यांना बक्षीस मिळाल पाहिजे. नाही मिळालं तर ते हिसकावून घेऊ असा इशारा देत नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी नाना पटोले यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार आक्रमक भूमिका घेतली.

  • Maharashtra Breaking News LIVE: २०१२ च्या पुणे साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी मुनीब इक्बाल मेमन याला जामीन

    २०१२ च्या पुणे साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी मुनीब इक्बाल मेमन याला जामीन देण्यात आला आहे. मुंबईउच्च न्यायालयाने शुक्रवारी जामिनावर सुटका केली असून मुनीब गेली १२ वर्षे तुरुंगात होता
    उच्च न्यायालयाने त्याला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष न्यायालयाने मेमन याची जामिनावर सुटका करण्यास नकार दिल्यानंतर मेमन याने उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने त्याला दिलासा दिला

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link