LIC कर्मचारी ते ठाकरेंची सून.. उद्धव यांचा वांद्रे ते डोंबिवली प्रवास.. रश्मी ठाकरेंची हटके Love Story

Rashmi Thackeray Birthday Love Story With Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे वांद्रे येथे राहायचे तर रश्मी ठाकरे डोंबिवलीत. मग या दोघांची भेट कशी आणि कुठे झाली? हे दोघे एकमेकांना कसे आणि कोणाच्या माध्यमातून भेटले? या दोघांची हटके लव्ह स्टोरी कशी आकार घेत गेली? पाहूयात...

| Sep 23, 2024, 13:01 PM IST
1/13

 rashmithackeraybirthday

उद्धव ठाकरे वांद्र्याचे तर रश्मी ठाकरे डोंबिवलीच्या... मग या दोघांची पहिली भेट कशी आणि कुठे झाली? कोणी ही भेट घडवून आणली? एलआयसीमध्ये काम करणाऱ्या रश्मी पाटणकर या राज्यातील सर्वात शक्तीशाली कुटुंबाच्या सूनबाई कशा झाल्या? रश्मी ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल....

2/13

 rashmithackeraybirthday

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरेंचा आज वाढदिवस आहे. रश्मी ठाकरेंचा वाढदिवस चर्चेत असण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे 'मातोश्री' परिसरात लागलेले शुभेच्छांचे बॅनर्स! या बॅनर्सवर रश्मी ठाकरेंचा थेट 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख आहे. ‘पुढचा मुख्यमंत्री, आपल्या परिवाराचाच, त्याचे प्रतिबिंब तुमच्यात ही दिसते’, असा उल्लेख बॅनर्सवर दिसून येत आहे. रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे फोटोही या बॅनर्सवर आहेत.  

3/13

 rashmithackeraybirthday

रश्मी ठाकरे या मागील काही दिवसांपूर्वीही महाराष्ट्रातील पहिल्या मुख्यमंत्री या विषयासंदर्भातील चर्चेमुळे बातम्यांमध्ये झळकलेल्या. माजी मुख्यमंत्र्यांची पत्नीचा आता मुख्यमंत्री म्हणून उल्लेख होताना दिसत असला तरी त्या सक्रीय राजकारणापासून दूर आहेत. थेट सक्रीय राजकारणामध्ये रश्मी ठाकरे दिसून येत नसल्या तरी उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये त्यांच्या शब्दाला वजन असून पडद्या मागील प्रमुख व्यक्तींमध्ये रश्मी ठाकरेंचं नाव आवर्जून घेतलं जात. रश्मी ठाकरे अनेक कार्यक्रमांना उद्धव ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरेंबरोबर दिसून येतात.

4/13

 rashmithackeraybirthday

अगदी गणपती दर्शन असो किंवा अनंत अंबानींचं लग्न असो रश्मी ठाकरे प्रसारमाध्यमांचं लक्ष वेधून घेतात. रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची लव्ह स्टोरी फारच फिल्मी आहे. उद्धव ठाकरेंची त्यांची पत्नी रश्मी ठाकरेंबरोबर पहिली भेट कशी झाली? ती कोणी घडवून आणली? या दोघांचं लग्न कधी झालं? यासंदर्भात आज रश्मी ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेणार आहोत.   

5/13

 rashmithackeraybirthday

रश्मी ठाकरे या एलआयसीमध्ये काम करायच्या. असं असताना त्या थेट महाराष्ट्रातील सर्वात प्रभावशाली व्यक्तीमत्व असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सुनबाई कशा झाल्या? उद्धव ठाकरे हे वांद्र्यात राहून डोंबिवलीचे जावई कसे झाले? याच वांद्रे टू डोंबिवली कनेक्शनची गोष्ट फारच रंजक आहे.

6/13

 rashmithackeraybirthday

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या राजकारणाचा वारसा पुढे चालवताना वडीलांच्या निधनानंतर पक्ष संभाळताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास उद्धव ठाकरेंनी केला. या प्रवासामध्ये त्यांना साथ मिळाली ती रश्मी ठाकरेंची! साधारणपणे अडीच वर्षापूर्वी शिवसेनेत पडलेली फूट असो किंवा वर्षा बंगला सोडताना प्रसारमाध्यमांसमोरुन मातोश्रीवर जाणं असो रश्मी ठाकरे कायमच उद्धव ठाकरेंसोबत दिसल्या. (सर्व फोटो - आदित्य ठाकरेंच्या इन्स्टाग्रामवरुन साभार)    

7/13

 rashmithackeraybirthday

राजकीय घडामोडी असो किंवा आजारपण असो रश्मी ठाकरेंनी पतीचा साथ कधीच सोडली नाही. अगदी राज्याच्या फर्स्ट लेडी असताना सरकारी कार्यक्रमांपासून ते गणेशोत्सवादरम्यान जोडीने दर्शनाला जाण्यापर्यंत रश्मी ठाकरेंची साथ कायमच उद्धव ठाकरेंना मिळाली. मात्र या दोघांच्या वर्तमानाप्रमाणे त्यांच्या नात्याचा इतिहासही फार रंजक आहे. 

8/13

 rashmithackeraybirthday

उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंचं लग्न हे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर लव्ह मॅरेज आहे. त्यांची लव्ह स्टोरी फारच रंजक आहे. विशेष म्हणजे या दोघांची भेट घडवून आणणाऱ्या मागील व्यक्तीचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं खास कनेक्शन आहे. रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची पहिली भेट राज ठाकरेंच्या फार जवळच्या व्यक्तीने घडवून आणली हे अनेकांना ठाऊक नाही. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रश्मी पाटणकर राज्यातील सर्वात पॉवरफूल घराण्याच्या सुनबाई कशा झाल्या?

9/13

 rashmithackeraybirthday

रश्मी ठाकरे या मुळच्या डोंबिवलीच्या असून त्यांचं माहेरचं अडनावर पाटणकर आहे. मुलुंडमधील वझे-केळकर कॉलेजमधून रश्मी ठाकरेंनी आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर 1987 साली त्या एलआयसीमध्ये नोकरीवर रुजू झाल्या. त्या इथे कंत्राटी स्वरुपात नोकरी करत होत्या. म्हणजेच रश्मी ठाकरे या कॉन्ट्रॅक्टवर कामाला होत्या.

10/13

 rashmithackeraybirthday

रश्मी ठाकरेंची ‘एलआयसी’च्या ऑफिसमध्येच सोबत काम करणाऱ्या जयवंती ठाकरे यांच्याबरोबर मैत्री झाली. याच जयवंती ठाकरेंबरोबची मैत्री पुढे रश्मी ठाकरेंचं आयुष्याला कायमची कलाटणी देण्यासाठी कारणीभूत ठरली. अल्पावधीत एकाच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या रश्मी ठाकरे आणि जयवंती ठाकरे या एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी झाल्या. जयवंती या राज ठाकरे यांची बहीण आहेत.   

11/13

 rashmithackeraybirthday

जयवंती यांनीच रश्मी आणि उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणली. ज्या वेळेस या दोघांची भेट झाली त्यावेळी उद्धव ठाकरे सक्रीय राजकारणामध्ये नव्हते. ते फोटोग्राफीसाठी ओळखले जायचे. त्यांनी एक जाहिरात कंपनी सुद्धा सुरु केलेली.   

12/13

 rashmithackeraybirthday

उद्धव आणि रश्मी ठाकरेंच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. उद्धव ठाकरे केवळ रश्मी ठाकरेंना भेटण्यासाठी डोंबिवलीला जायचे. या दोघांनी घरच्यांच्या संमतीने 13 डिसेंबर 1989 रोजी लग्न केलं. उद्धव आणि रश्मी यांना आदित्य आणि तेजस ही दोन मुलं आहेत.   

13/13

 rashmithackeraybirthday

रश्मी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'मातोश्री'वर जाणारा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी प्रेमाने रश्मी ठाकरेंना 'वहिनी साहेब' म्हणून हाक मारतात.