Breaking News LIVE : संभाजीराजे छत्रपती मुंबईत, कार्यकर्ते-पोलिसांमध्ये धक्काबुक्की

नेहा चौधरी Sun, 06 Oct 2024-1:39 pm,

Maharashtra Breaking News LIVE: राज्याबरोबरच देशभरातील प्रमुख घडामोडींचे सर्व अपडेट्स अगदी संक्षिप्त स्वरुपात जाणून घ्या; दिवसभरातील ताज्या घडामोडींनी धावा आढावा...

Latest Updates

  • संभाजी राजे छत्रपतींना मुंबई पोलिसांनी अडवलं

    चला शिवस्मारक शोधायला घोषणा देत मुंबईत आलेल्या संभाजी राजे छत्रपतींना मुंबई पोलिसांनी अडवलं...गेट वे ऑफ इंडिया परिसरात पोलिसांकडून संभाजी राजे छत्रपतींच्या कार्यकर्त्यांची धरपकड...

  • शरद पवारांच्या भेटीसाठी इच्छुक उमेदवारांच्या रांगा

    पुण्यात आज राजकीय घडामोडींना वेग आलाय. शरद पवार आज विदर्भातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. मार्केट यार्डातील गुलटेकडीमध्ये 11 ते 5 दरम्यान मुलाखती होणार आहेत. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांसह अनेकांनी उमेदवारी मिळवण्यासाठी मोतीबाग कार्यालयासमोर गर्दी केलीय. वर्धातून निलेश कराळे गुरुजी, बीडच्या पूजा मोरे तर जुन्नरमधून सत्यशील शेरकर यांच्या उमेदवारी मागण्यासाठी अनेक कार्यकर्ते पवारांच्या भेटीला आलेत.

  • मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्रमात गोंधळ 

    धाराशिवमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्रमात गोंधळ घातला. तुळजापूरच्या सिंधफळ इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. काम अपूर्ण असतानाच उद्घाटन का करता? असा सवाल करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राणा जगजितसिंह पाटलांना जाब विचारला. यावेळी आमदार राणा आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. तर हा कार्यक्रम लोकर्पणाचा नाही, असं स्पष्टीकरण आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी दिलंय. हा राजकीय डाव असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

  • एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचा उद्या दिल्ली दौरा 

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या दिल्ली दौरावर असणार आहेत. अमित शहांनी बोलवलेल्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. नक्षलग्रस्त भागातील मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची दिल्लीत बैठक बोलवली आहे. मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

  • पुण्यातील सर्व टेकड्यांवर सर्च लाईट, सायरन बसवणार

    बोपदेव घाट बलात्कार प्रकरणानंतर पुण्यातील सर्व टेकड्यांवर सर्च लाईट, सायरन बसवणार, असा पोलिसांचा निर्णय घेतलाय. टेकड्यांवरील लुटमारीच्या घटना थांबवण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. या उपयामुळे आपत्कालीन परिस्थीतीत नागरिकांना मदत मिळणार आहे. 

     

  • सोमवारी राज्यातील सर्व बाजार समित्या बंद 

    उद्या राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली होती. यात पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी पदाधिकाऱ्यांचे ऐकून न घेतले नाही. याच्या निषेधार्थ सर्व बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय . 

     

  • उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे घेणार ठाण्यातील देवीचं दर्शन 

    उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे ठाण्यातील देवीचं दर्शन घेणार आहे..  आज संध्याकाळी 4 वाजता त्या टेंभी नाक्यावरील दुर्गेश्वरी देवीचं दर्शन घेतील. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा रश्मी ठाकरे टेंभी नाक्याला जाऊन, दुर्गेश्वरी देवीचं दर्शन घेऊन आरती करतील. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याही मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहेत. आनंद दिघे यांनी 1978मध्ये टेंभी नाक्यावरील या नवरात्रौत्सवाची सुरुवात केली होती. 

     

  • आमदार बच्चू कडू यांचा अडचणीत वाढ?

    आता बातमी अमरावतीच्या राजकारणातून...प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांचा एकुलता एक आमदार कडूंची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल उद्या धारणीमध्ये कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी जोरदार बॅनरबाजी केलीय. या बॅनरवरून प्रहार संघटनेचं चिन्ह आणि बच्चू कडूंचा फोट गायब आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो छापण्यात आलाय. त्यामुळे राजकुमार पटेल एकनाथ शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगतेय.

     

  • मुंबईकर सध्या उकाड्यापासून हैराण

    मुंबईकर सध्या उकाड्यापासून हैराण झाले. सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत उन्हाच्या झळा बसत आहेत.  उकाड्यातून सुटका होणे दूरच, उलट तो वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. मुंबईत पुढील 3 – 4 दिवस कमाल तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यताये. तसेच पावसाच्या हलक्या सरीदेखील कोसळण्याची शक्यताये.

     

  • चला अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला...

    चला अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला! अशी घोषणा देत संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्वात अरबी समुद्रात शोध घेतला जाणारे. संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्त्वात शिवभक्तांच्या उपस्थितीत पुण्यातून ही रॅली निघालीये. चेंबूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला संभाजीराजे पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर गेट वे ऑफ इंडिया येथे ही रॅली पोहोचेल. त्यानंतर अरबी समुद्रात जावून शिवस्मारकाचा शोध घेण्यात येणार असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलंय.

     

  • ST च्या 5 हजार इलेक्ट्रिक बसेस होणार दाखल

    ST च्या ताफ्यात लवकरच 5 हजार इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. या बसेस टप्प्या टप्प्याने येणार आहेत. यातील 100 बसेस दाखलही झाल्यात. ST महामंडळाचे अध्यक्ष आमदार भरत गोगावले यांनी याबाबत माहिती दिलीय. तसेच महामंडळ 2 हजार 200 डिझेल बसेसही खरेदी करणार आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळणारेय. तर राज्यातील बस स्थानकांच्या सुधारणेसाठी 110 कोटींची निविदा देण्यात आलीय. पुढील 4 दिवसात प्रसिद्ध होईल,  असं गोगावलेंनी यावेळी म्हटलंय.

     

  • शासकीय मुलींच्या वस्तीगृहातील 30 ते 35 विद्यार्थिनींना विषबाधा

    लातूर शहरातील औसा रोडवर असलेल्या पुरणमल लाहोटी शासकीय मुलींच्या वस्तीगृहातील 30 ते 35 विद्यार्थिनींना विषबाधा झालीय. या वस्तीगृहात साडेतीनशेपेक्षा अधिक मुली राहतात. त्यातील जवळपास 170 मुलींना शासकीय रुग्णालयात हालवण्यात आलं. रात्री मुलींनी जेवण केल्यानंतर काही वेळातच मुलींना त्रास सुरू झाला. त्यानंतर तातडीने ही माहिती वस्तीगृह प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर शासकीय रुग्णालयाच्या 7 रुग्णवाहिका बोलावून जवळपास 170 मुलींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हालण्यात आले आहे. त्यातील 30 ते 35 जणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उर्वरित विद्यार्थ्यांना उपचार करून वस्तीगृहात परत पाठवण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून तीन रुग्णवाहिका वस्तीगृहा बाहेर स्टँड बाय ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी रुग्णालयात जात उपचारासाठी दाखल झालेल्या विद्यार्थिनींची विचारपूस केली.

  • मुंबईकरांचा भुयारी मेट्रो प्रवास सोमवारपासून सुरू

    मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) हा टप्पा प्रवाशांसाठी सोमवारपासून खुला करण्याचा निर्णय  घेतला आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता आरे – बीकेसी टप्पा प्रवाशांसाठी खुला होणार आहे. सोमवारी सकाळी 11 ते रात्री 11.30 या वेळेत भुयारी मेट्रोची सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना भुयारी मेट्रो प्रवासासाठी सोमवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link