Breaking News LIVE Updates: `राज ठाकरे महायुतीसोबत राहतील`, भरत गोगावले यांनी स्पष्ट सांगितलं, म्हणाले...

Swapnil Ghangale Fri, 26 Jul 2024-7:56 pm,

Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रातील आजच्या प्रमुख घडामोडींबरोबरच पावसाचे सर्व अपडेट्स आणि दिवसभरातील महत्त्वाच्या घटनांचा धावता आढावा या ब्लॉगच्या माध्यमातून...

Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रात आज पावसाबरोबरच राजकीय घडामोडींकडेही विशेष लक्ष असणार आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडतोय. प्रामुख्याने पुणे, मुंबई, कोल्हापूरसहीत घाटमाथ्यावर प्रचंड पाऊस झाला असून आजही महाराष्ट्रातील अनेक भागांना आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आज शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभेसाठीचं रणशिंग फुकलं असून याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींकडेही आज राज्यातील जनतेचं विशेष लक्ष असेल. दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींची अपडेट्स आपण या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत. ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी हे पेज रिफ्रेश करत राहा....

Latest Updates

  • 'राज ठाकरे महायुतीसोबत राहतील', भरत गोगावले यांनी स्पष्ट सांगितलं

    राज ठाकरे यांनी जे काही ठरवलं तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. पण मला असं वाटतं की ते महायुतीसोबत राहतील आणि जेव्हा जागावाटप होतील तेव्हा त्यातल्या काही जागा त्यांना थोड्या थोड्या दिल्या जातील असं मला वाटतं, असं भरत गोगावले म्हणाले आहेत. 

  • पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट

    पुणे कल्याणनगर पोर्श कार अपघात प्रकरणात चार्जशीट दाखल करण्यात आले आहे. पुणे पोलिसांकडून तपास करून चार्जशीट केले आहे. तर शिशिर हिरे यांची या प्रकरणात राज्य सरकारकडून विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

  • शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांची हायकोर्टात याचिका

    आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार अपात्रते प्रकरणी निर्णय घेऊन उबाठाच्या आमदारांना अपात्र करावे, अशी विनंती याचिका शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांनी केली आहे. व्हिप न पाळणाऱ्या उबाठा आमदारांविरोधात आम्ही अपत्रातेची याचिका दाखल केली होती. त्यावर लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती याचिका माननीय उच्च न्यायालयात केली असल्याचे आमदार भरत गोगावले यांनी म्हटले आहे. 

  • पूजा खेडकर प्रकरणानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग ॲक्शन मोडवर

    - 2022 मधील राज्यसेव परीक्षेतील दिव्यांगांच्या तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांची होणार चौकशी
    - तब्बल आठ जणांची होणार चौकशी
    - दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेऊन वर्ग दोनची नोकरी मिळवणाऱ्या उमेदवारांची 29 जुलैला होणार चौकशी
    - दिव्यांग प्रमाणपत्र प्रमाणित करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता
    - पूजा खेडकर प्रकरणानंतर दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन लाभ घेणाऱ्यांची चौकशी करण्यास सुरुवात

  • मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारात प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्यांना बंदी

    मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिक बॅग, प्लास्टिकचे उत्पादने वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. उच्च न्यायालयाचे रजिस्टर जनरल यांनी जारी केले पत्रक. मुख्य न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय यांच्या निर्देशानुसार जारी केले परिपत्रक.

  • अनिल देशमुखांसमोर 'भाजपचा विजय असो'ची घोषणाबाजी

    नागपूर जिल्ह्यातील मोवाड येथे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. देशमुख हे कार्यक्रम स्थळाकडे जात असताना भाजपा कार्यकर्त्यांनी देशमुखांविरोधात घोषणाबाजी केल्याची घटना घडली. गुरुवारी रात्री मोवाडमध्ये अनिल देशमुख विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी गेले होते.  तेव्हा भूमिपूजनसाठीच्या नियोजित स्थळी काही भाजप कार्यकर्तेही आधीच उपस्थित होते. अनिल देशमुख यांची गाडी कार्यक्रम स्थळाच्या आवरात येत असताना भाजप कार्यकर्त्यांनी भाजपचा विजय असो अशा घोषणा दिल्या. या घटनेवेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस उपस्थित होते. अनिल देशमुख यांची गाडी पोलिसांनी सुरक्षितरित्या कार्यक्रमस्थळी नेली.

  • अनिल देशमुखांसमोर 'भाजपचा विजय असो'ची घोषणाबाजी

    नागपूर जिल्ह्यातील मोवाड येथे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. देशमुख हे कार्यक्रम स्थळाकडे जात असताना भाजपा कार्यकर्त्यांनी देशमुखांविरोधात घोषणाबाजी केल्याची घटना घडली. गुरुवारी रात्री मोवाडमध्ये अनिल देशमुख विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी गेले होते.  तेव्हा भूमिपूजनसाठीच्या नियोजित स्थळी काही भाजप कार्यकर्तेही आधीच उपस्थित होते. अनिल देशमुख यांची गाडी कार्यक्रम स्थळाच्या आवरात येत असताना भाजप कार्यकर्त्यांनी भाजपचा विजय असो अशा घोषणा दिल्या. या घटनेवेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस उपस्थित होते. अनिल देशमुख यांची गाडी पोलिसांनी सुरक्षितरित्या कार्यक्रमस्थळी नेली.

  • मुंबईला पाणीपुरवठा करणारी तीन धरणं ओव्हर फ्लो

    मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये आतापर्यंत 71.02 टक्केपाणीसाठा. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा वाढला आहे. सगळ्यात कमी पाणीसाठा अप्पर वैतरणा धरणात आहे. तर तुळसी, विहार आणि मोदक सागर धरण ओसंडून वाहत आहे. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    सात धरणात किती टक्के पाणीसाठा?

    अप्पर वैतरणा - 39.41 टक्के 
    मोडक सागर  - 100 टक्के 
    तानसा          - 98.61 टक्के 
    मध्या वैतरणा - 69.40 टक्के 
    भातसा         - 69.20 टक्के
    विहार          - 100 टक्के 
    तुळसी        - 100

    एकूण टक्केवारी - 71.02

  • गुड न्यूज! सहा महिन्यानंतर उजनी 'प्लस'मध्ये

    दीर्घ प्रतीक्षेनंतर उजनी धरणातील पाणीसाठा उणेमधून अधिकमध्ये आला आहे. 21 जानेवारी 2024 ला उजनी धरणामधील पाणीसाठा उणेमध्ये गेला होता. आज शुक्रवारी 26 जुलै रोजी सव्वा नऊच्या सुमारास उजनी धरणातील साधा अधिकमध्ये गेला आहे. उजनी धरणात सध्या एकूण 63. 73 टीएमसी पाणीसाठा आहे. उजनी धरण 0.13% प्लस मध्ये आहे.

  • अलिबागच्या समुद्रात बचाव कार्य सुरु; 14 जणांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न

    अलिबाग समुद्रात भरकटलेल्या बार्जवरील खलाशांचे बचाव कार्य सुरू आहे.  तटरक्षक दलाच्या हेलीकॉप्टरने खलाशांना सुखरूप किनाऱ्यावर आणलं जाणार. बार्जवर एकूण 14 खलाशी अडकून पडले आहेत. जे एस डबल्यू कंपनीचे मालवाहू जहाज कालपासून भरकटले आहे. हे बार्ज अलिबागजवळ कुलाबा किल्ल्याच्या मागील बाजूस समुद्रात अडकून पडले आहे. जयगड इथून साळाव इथे निघालेलं हे जहाज भरकटलं.

  • 'वर्षा' बंगल्यावर रात्री उशीरापर्यंत मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर खलबतं

    गुरुवारी रात्री 'वर्षा' बंगल्यावर जवळपास दीड ते दोन तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली. यामध्ये नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रासाठी काय काय मागायचे यावर महत्वाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.  तर युतीमधील नेते मंडळी ज्याप्रकारे युतीमध्ये खडा पडेल असे भाष्य करतात ते पाहता युतीमधील नेत्यांनी युतीमधील पक्षांबद्दल बोलताना वादग्रस्त भाषा टाळावी असे या बैठकीत ठरले. आपल्या अशा नेत्यांना चांगलाच समज द्यावा असे ही ठरल्याचे समजते. तर राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर विधानसभाला कशाप्रकारे सामोरे जपायचे या विषयी ही चर्चा झाल्याचं सूत्रांनी दिली माहिती.

  • महाराष्ट्रात पावसाचा जोर कधी ओसरणार? आज 26 जुलै रोजी 'या' जिल्ह्यांना अलर्ट

    महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलं आहे. पुणे, कोल्हापूर, रायगड या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर कधी ओसरणार? क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी

  • मुंबई, नवी मुंबई, कल्याणमध्ये पावसाची विश्रांती

    नवी मुंबई, कल्याणमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशीराने सुरु आहे.

     

  • कोयना धरणातून 32100 क्युसेक पाण्याचा विसर्ग म्हणजे किती लिटर पाणी सोडलं? 'क्युसेक'चा अर्थ काय?

    दरवर्षी, पावसाळा आला की आपल्या कानावर पडणारे किंवा वाचनात येणारे शब्द म्हणजे अमुक 'क्युसेक' पाण्याचा विसर्ग किंवा इतकं 'टीएमसी' पाणी सोडलं. पण एक क्युसेक म्हणजे किती किंवा टीएमसी पाण्याचा अर्थ काय? तुम्हाला ठाऊक आहे का? येथे क्लिक करुन वाचा सविस्तर

  • कोयनामधून पाण्याचा विसर्ग वाढला

    कोयना धरणातून विसर्ग वाढवला. एकूण 32100 क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे. सातारा जिल्ह्याला आज रेड अलर्ट

  • साताऱ्यात रेड अलर्ट! कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढणार

    सातारा जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढणार आहे. काही वेळात कोयना धरणातून 30 हजार क्युसेक विसर्ग केला जाणार काल संध्याकाळी 20 हजार क्युसेक विसर्ग सुरु होता. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने विसर्ग वाढवला आहे.

  • रायगड जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट

    रायगड जिल्ह्यातील परिस्थितीमध्ये कालपेक्षा आज सुधारणा अशली तरी दाट ढग, अधून मधून पावसाच्या जोरदार सरी बसत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आज जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे.

  • रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागातील पूर ओसरला

    महाड, नागोठणे, रोहा, पाली येथील पूर ओसरला आहे. सावित्री, अंबा, कुंडलिका नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. सावित्री इशारा पातळीच्या खाली असून अंबा, कुंडलिका अजूनही इशारा पातळीवर आहे. रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी पातळीत घट झाली आहे. अंबा नदीच्या पाणी पातळीत घट झाल्याने वाकण - खोपोली महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

  • मुसळधार पावसामुळे आज डेक्कन क्वीन, प्रगती, इंटरसिटी एक्सप्रेस रद्द 

    पुणे आणि मुंबई शहरात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या तीन रेल्वे आज (शुक्रवारी) रद्द केल्या आहेत.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    रद्द केलेल्या रेल्वे ट्रेन्स खालीलप्रमाणे (Train Cancelled)

    1) ट्रेन नंबर 12124 - पुणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
    2) ट्रेन नंबर 12126 - पुणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
    3) ट्रेन नंबर 12127 - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पुणे इंटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

  • रेड अलर्टच्या कालावधीमध्ये गरज असेल तरच घराबाहेर पडा; मुंबई पोलिसांचं आवाहन

    मुंबई पोलिसांनी हवामान खात्याकडून 26 जुलै रोजी सकाळी 8.30 पर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती दिली असून या कालावधीमध्ये गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे. काहीही मदत लागल्यास 100 किंवा 112 क्रमांकावर कॉल करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

  • पुण्यात गुरुवारी 4 पाऊस बळी; आजही पावसाची शक्यता

    पुण्यामध्ये गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणं जलमय झाली. पुण्यातील डेक्कन जिमखान्याजवळ तीन तरुणांचा शॉक लागून मृत्यू झाला. तर दुसरीकडे ताम्हणी घाटामध्ये दरड कोसळल्याच्या घटनेत एकाने प्राण गमावले.

  • महाराष्ट्र सरकार कर्नाटक सरकारच्या संपर्कात : फडणवीस

    "महाराष्ट्र सरकार सातत्याने कर्नाटक सरकारशी संपर्कात आहे. कर्नाटकचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि अलमट्टी धरणाचे मुख्य अभियंता यांच्याशी सातत्याने संवाद होतो आहे. 517.5 मीटर इतकी पाणीपातळी (एफआरएल) कायम ठेवण्यास सांगण्यात आले आहे आणि ते कर्नाटक सरकारने मान्य केले आहे," असं फडणवीस यांनी गुरुवारी रात्री दिलेल्या माहितीत म्हटलं. 

  • कोयनेतून पाण्याचा विसर्ग वाढणार; फडणवीसांची माहिती

    "कोयनेतून सध्या 20,000 क्युसेक इतका विसर्ग सुरु असून, तो पहाटे 3 वाजता 30,000 क्युसेक इतका होईल. सकाळी 9 वाजता तो 40,000 क्युसेक इतका होण्याची शक्यता आहे. सिंचन विभागात सातत्याने जिल्हाधिकार्‍यांशी संपर्कात आहे," असं फडणवीस यांनी गुरुवारी रात्री दिलेल्या माहितीत म्हटलं. 

  • खडकवासलामधून किती पाणी सोडायचं यासंदर्भात घेणार निर्णय: फडणवीस

    "खडकवासलातून 35,300 क्युसेक इतका विसर्ग होत होता. तो आता 40,000 क्युसेक इतका विसर्ग होत आहे. उद्या सकाळी पावसाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यास सांगण्यात आले आहे. याची संपूर्ण माहिती पुणे महापालिकेला सातत्याने देण्यात येत आहे," असं फडणवीस यांनी गुरुवारी रात्री दिलेल्या माहितीत म्हटलं.

  • धरणांमधून पाण्याचा विसर्ग; फडणवीस सिंचन अधिकाऱ्यांच्या संपर्कात

    राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरुन राज्यातील प्रमुख धरणांमधून किती पाण्याचा विसर्ग होत आहे आणि तो किती होणार आहे यासंदर्भातील माहिती. "राज्यात अनेक भागात मोठा पाऊस असल्याने काही धरणांतून पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. याबाबतीत मी सातत्याने सिंचन विभागाशी संपर्कात असून, सिंचन अधिकार्‍यांना स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवण्यास सांगण्यात आले आहे," असं फडणवीस म्हणाले.

  • अफवांवर विश्वास ठेऊ नका; मुंबई महानगरपालिकेचं पालकांना आवाहन

    "कृपया, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकृत माहितीशिवाय पालकांनी शाळा, महाविद्यालयांच्या सुटीसंदर्भातील अन्य कोणत्याही माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, ही नम्र विनंती आहे. अधिक माहितीसाठी शाळा व महाविद्यालये व्यवस्थापनाच्या संपर्कात रहावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे," असंही मुंबई महानगरपालिकेने म्हटलं आहे.

     

  • मुंबईत आज शाळा-महाविद्यालये सुरु: महानगरपालिकेची माहिती

    पावसाच्या इशाऱ्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील शाळा-कॉलेजला आज सुट्टी असली तरी मुंबईतील शाळा सुरु आहेत. यासंदर्भातील माहिती मुंबई महानगरपालिकेने आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन दिली आहे. "मुंबई महानगरातील हवामान आणि पावसाची स्थिती सद्यस्थितीत सामान्य आहे. त्यामुळे, मुंबईतील जनजीवन सुरळीत सुरू आहे.  ही बाब लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा व महाविद्यालये उद्या शुक्रवार, दिनांक 26 जुलै 2024 रोजी नियमितपणे सुरू राहतील," असं महापालिकेने सांगितलं आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link