Maharashtra Breaking News LIVE: जालन्यात काळी पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळली, 5 जणांचा मृत्यू

Thu, 18 Jul 2024-6:22 pm,

Maharashtra Breaking News Today LIVE Updates July 18: राज्यासह देशविदेशातील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या

Maharashtra Breaking News LIVE: मराठा आरक्षणावरुन राज्यातील वातावरण तापले आहे. त्यामुळं राजकीय घडामोडींनादेखील वेग आला आहे. त्याचबरोबर, मुंबईसह महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे. पहाटेपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस होत आहेत. राज्यासह देशविदेशातील ताज्या घडामोडींचा आढावा घेऊया या ब्लॉगच्या माध्यमातून

Latest Updates

  • प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी टॅक्सी विहीरीत कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आलीये. जालना -राजूर महामार्गावरील तुपेवाडी फाट्याजवळची घटना घडली. टॅक्सीतील 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

  • मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांना उद्देशून शिवीगाळ

    तुला फडणवीस यांच्याबद्दल एवढं प्रेम आहे तर तू फडणवीससोबत लग्न कर, असं म्हणत जरांगे यांनी लाड यांच्यावर टीका केली आहे. तू माझ्या नादाला लागू नको तू फडणवीस यांचे पाय चाट, तुम्ही नालायक निघाले, तू ढवळा ढवळ करू नको, तू माझं डोकं गरम करायचे काम करू नको, असं म्हणत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आहे.

  • मनोरमा खेडकर यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी

    मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आहे. महाडमधून अटक केली गेली. शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकावल्या प्रकरणी पौड पोलिसांकडून ही अटक करण्यात आली आहे. आरोपीला 2 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. 20 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश आहेत.

  • Maharashtra Breaking News LIVE:  विजय वडेट्टीवारांच्या सी ६ प्रचीतगड निवासस्थानच्या छपराला गळती

    सार्वजनिक बांधकाम विभागाचे निकृष्ट दर्जाचे काम समोर आले आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या सी ६ प्रचीतगड निवासस्थानच्या छपराला गळती.बंगला मिळून अवघ्या काही महिन्यात बंगल्यात पाणी गळत असल्याचे चित्र आहे. जागोजागी छत गळत असल्याने खाली बादल्या ठेवण्याची वेळ

  • Maharashtra Breaking News LIVE:  समृध्दी महामार्गाचा शेवटचा टप्पा सप्टेंबर महिन्यात सुरू होणार

     समृध्दी महामार्गाचा शेवटचा टप्पा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू करणार,विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधी वाहतुकीस सुरू होणार आहे.७६ किलोमिटरचा हा टप्पा इगतपुरी ते ठाणे आमना पर्यंत सुरू करणार ९८ टक्के काम पूर्ण झालं आहे.१२० किलोमीटर प्रतीतास वेगाने धावणार वाहने,६ तासात नागपूर मुंबई अंतर पूर्ण होणार

  • Maharashtra Breaking News LIVE: मनोरमा खेडकर यांची वैद्यकीय तपासणी होणार

    पुणे - मनोरमा खेडकर यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात येत आहे.  पौढच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी सुरू होत आहे. त्यांनतर पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये नेणार. त्यानंतर कोर्टात हजर करणार.

  • Maharashtra Breaking News LIVE: तुळजाभवानी मंदिरातील गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्यासाठी नियमावली तयार

    महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करणाऱ्या पुजारी, भाविक व अन्य व्यक्तींची आता लेखी नोंद घेतली जाणार असुन. सुरक्षेच्या कारणाने पोलिसांनी याबाबत सुचना केल्याने मंदीर संस्थानने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे गाभाऱ्यात होणाऱ्या मनमानी प्रवेशाला आळा बसणार असुन चोख व्यवस्था बाळगण्यात येणार आहे. सिंहासन पुजा व अभिषेक वेळ वगळता इतर वेळी मंदीर प्रवेश करणाऱ्याच्याही नोंदी घेतल्या जाणार आहेत. शिवाय तुळजाभवानी देवीचा पुरातन व नियमित दागिने, खजिना उघडताना पोलीसांना कळविणे सक्तीचे आसणार आहे. याबाबतचे पत्रक मंदीर संस्थानचे तहसीलदार तथा व्यवस्थापक सोमनाथ माळी - वाडकर यांनी काढले आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले.

    गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल मुसळधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे धापेवाडा बेरिकचा पाण्याचं विसर्ग वाढवण्यात आला असून गोसेखुर्द धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले.

  • Maharashtra Breaking News LIVE: लोटे खेड एमआयडीसी मधील पुष्कर पेट्रो केमिकल युनिट नंबर 1 मध्ये आग

    रत्नागिरी - लोटे खेड एमआयडीसी मधील पुष्कर पेट्रो केमिकल युनिट नंबर 1 मध्ये आग लागली आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. आगीवर नियंत्रण आणण्यात यश

  • Maharashtra Breaking News LIVE: अजित पवार पुण्यातून थेट विशाळगडाकडे रवाना 

    उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील सगळे कार्यक्रम सोडून तात्काळ विशाळगडाकडे निघाले आहेत. ताफ्यासह विशाळगडाकडे रवाना झाले आहेत

  • Maharashtra Breaking News LIVE: छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्याची दहशत, मॉलमध्ये आढळला बिबट्या

    संभाजीनगर मध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे त्याला पकडण्यासाठी वनविभागाने उल्कानगरीत पिंजरे लावले आहेत  मात्र बिबट्या तिथून तब्बल सहा ते सात किलोमीटर दूर एका मॉल बाहेर आढळून आला

  • Maharashtra Breaking News LIVE: पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर पोलिसांच्या ताब्यात

    वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शेतकऱ्यांना पिस्तुल दाखवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: बीड: माजी मंत्री सुरेश नवले यांच्या पीए वर कोयत्याने वार

    नऊच्या सुमारास सुरेश नवले यांच्या पीए वर हल्ला करण्यात आला. दोघाजणांनी गाडीवरून दुकानात घुसून केला कोयत्याने वार. हल्ल्यामध्ये नवले यांचे पीए जखमी

  • Maharashtra Breaking News LIVE: पिंपरी- चिंचवडच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसोबत अजित पवारांची बैठक सुरू 

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यात बैठका सुरू आहे. काल पिंपरी चिंचवड मधील आजी-माजी 20 नगरसेवकांनी अजित पवार पक्षाला सोडचिट्टी देत शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला त्या अनुंगाने पिंपरी चिंचवड मधील आजी माजी नगरसेक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली

  • Maharashtra Breaking News LIVE: पुणे शहरात झिका आजाराच्या आणखी ३ रुग्णांची नोंद

    पुणे शहरात झिका आजाराच्या आणखी ३ रुग्णांची नोंद; शहरातील झिकाच्या रुग्णसंख्या २४ वर. लोहगावमधील ४९ वर्षीय पुरुष, सहकारनगरमधील १४ वर्षीय मुलगी आणि कोथरूडमधील २७ वर्षीय महिलेचा समावेश

  • Maharashtra Breaking News LIVE: मुंबईत पावसामुळे डेंगी, लेप्टो, एच-१ एन-१ फोफावतोय

    मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग सुरू असून आता डेंगी, लेप्टो आणि एच१एन१ म्हणजेच स्वाईन फ्लू या पावसाळी आजारांनी डोके वर काढले आहे. चिकनगुनियाचे रुग्णही सापडू लागले असून पालिकेच्या केईएम रुग्णालयात ओपीडीला तापाचे रुग्ण येत आहेत. 

  • Maharashtra Breaking News LIVE: वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी

    सकाळपासून होणाऱ्या पावसामुळं गोरेगाव ते अंधेरी दरम्यान मोठी वाहतूक कोंडी 

  • Maharashtra Breaking News LIVE: मुंबईत पावसाचा जोर; पुढील 3-4 तास महत्त्वाचे 

    मध्यरात्रीपासून मुंबईत ठिकठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. मुंबईत पुढील ३-४ तास पावसाची संततधार कायम राहणार, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. सकाळी ५.३० वाजे पर्यंत दक्षिण मुंबईत ५१.८ मिमी पावसाची नोंद तर पश्चिम उपनगरात २७ मिमी पाऊस. रेल्वे वाहतूक दहा ते पंधरा मिनिटे उशिराने तर रस्ते वाहतूक सुरळीत आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: मुंबई, उपनगरात पावसाचा जोर वाढला

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     

     

     

  • Maharashtra Breaking News LIVE: मुंबई, उपनगरात पावसाचा जोर वाढला

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     

     

     

  • Maharashtra Breaking News LIVE: पुणे पोलिसांकडून पूजा खेडकरांना नोटीस

    पुणे पोलिसांनी पुजा खेडकर यांना त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी बोलावले आहे. पुजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात छळवणुकीची तक्रार वाशीम पोलिसांकडे दाखल केलीय. ती तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आलीय. त्यानंतर पुणे पोलिसांनी पुजा खेडकर यांचा नव्याने जबाब नोंदवायच ठरवलंय. त्यासाठी पुजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी उद्या जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितलय. पुणे पोलिस दलातील महिला अधिकारी पुजा खेडकर यांचा जबाब नोंदवणार आहेत. त्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारीबाबत काय करायचं याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: भाजप कोअर कमिटीची मुंबईत सलग दोन दिवसीय बैठक होणार

    महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव सह प्रभारी अश्विनी वैष्णव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेश भाजपचे महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहे. उद्या आणि परवा या बैठकीत होणार विधानसभा निवडणुकीच्या तयारीची चर्चा होणार

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link