अबू धाबीमध्ये बाप्पासाठी साकारले पंढरपूर, तुमचा लाडका बाप्पा झी 24 तासवर

गणपतीच्या या दिवसात सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. घरोघरी बाप्पाच्या सेवेत सगळे मग्न आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाची आरास ही बघण्यासारखी आहे.

Sep 15, 2024, 12:42 PM IST
1/8

1. संकेत कांबळे, कोल्हापूर

कांबळे यांना या सजावटीची कल्पना खेलेगाव, आठणी येथील बसवेश्वर मंदिरातून मिळाली आहे. हे खूप जुने दगडी मंदिर आहे आणि त्याला समृद्ध इतिहास लाभला आहे.

2/8

2. तुषार सदाफळे, खार

सदाफळे यांनी आपल्या घरच्या बाप्पाचा देखावा म्हणून वंदे भारत एक्सप्रेस तयार केली आहे. 

3/8

3. वैष्णवी पाटकर, चिपळूण

वैष्णवी पाटकर यांनी गणपती बाप्पासाठी कागद आणि कापडापासून पर्यावरणपूरक किल्ला साकारला आहे. या देखाव्यातून त्यांनी महाराजांच्या गड किल्ल्यांचे संवर्धन करा असा संदेशही दिला आहे.

4/8

4. कुणाल पोतदार, कर्जत

पोतदार कुटुंबियांनी गणेशाची आरास करताना कंबोडिया थायलंडचे अंगरकोरवाट मंदिर साकरले आहे. 

5/8

5. मनमीत सिंग सहानी

सहानी  कुटुंबियांकडे दीड दिवसाचा गणपती असतो. यावर्षी त्यांनी बालगणपतीची स्थापना करून गावातील मातीचे घरचा सुंदर देखावा उभारला होता.  

6/8

6. श्वेता शानभाग, अबू धाबी

शानभाग कुटुंब गेल्या काही वर्षांपासून अबू धाबीमध्ये गणेशोत्सव साजरा करत आहेत. तिकडे राहत असूनही ते आपली संस्कृती जपत आहेत. यावर्षी त्यांनी वारकरी आणि चंद्रभागा असलेला पंढरपूर देखावा तयार केला आहे. 

7/8

7. सचिन अल्हात, पुणे

सचिन अल्हात यांनी आपल्या बाप्पाच्या देखाव्यासाठी अयोध्येचे राम मंदिर हुबेहूब साकारले आहे. 

8/8

8. गौरव घुले, पुणे

घुले परिवाराने यावेळी दुर्गराज रायगड साकारत आकर्षक असा देखावा तयार केला आहे.