Maharashtra Breaking News LIVE Updates: मंत्रालयात आलेली लँबॉर्गिनी कार कोणाची?

तेजश्री गायकवाड Thu, 09 Jan 2025-7:53 pm,

समाजकारण ते राजकारण... दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स एकाच क्लिकवर जाणून घ्या...

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: समाजकारण ते राजकारण... दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स एकाच क्लिकवर जाणून घ्या...


 

Latest Updates

  • मंत्रालयात आलेली लँबॉर्गिनी कार कोणाची? 

    बुधवारी मंत्रालयात अलिशान लँबॉर्गिनी कार आल्याने सर्वांच्या भुवया उंचवल्या. ही कार स्काय लाईन कमर्शियल ट्रस्टची असल्याची माहिती आहे. भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटण्यासाठी या कारमधून कोणी तरी आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे  सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश करायचा असेल तर तासंतास वाट बघावी लागते मात्र या अलिशान  कारला काल चेक न करताच मंत्रालयात थेट सोडण्यात आलं. विशेष म्हणजे या कारच्या काचा या काळ्या रंगाच्या होत्या. त्यामुळे कारमध्ये कोण होत याची माहिती मिळू शकली नाही. मात्र ही अलिशान कार मंत्र्यांचा ताफा ज्या ठिकाणी उभा राहतो त्या ठिकाणी थांबल्याने सर्वांच्या नजरा या अलिशान कारकडे होत्या.

  • आगामी निवडणुकीत 50 टक्के जागा महिलांना देणार : शरद पवार 

    आगामी निवडणुकीत 50 टक्के जागा महिलांना देण्यात येणार उर्वरित 50 टक्के जागांपैकी 60 ते 70 जागा ह्या तरुणांना देण्यात येणार आहेत. पुढील 8 दिवसांमध्ये बैठक घेऊन यावर चर्चा करण्यात येणार असं आश्वासन शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलं आहे. 

  • लातूरच्या जमिनीवर बीडमधून पीकविमा, झी २४ तासच्या बातमीनंतर कृषी विभागाला जाग

    लातूर जिल्ह्यातील रेणापूर, हणमंतवाडी आणि काळेगाव इथे जवळपास 1 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या गटावर दुसऱ्याच व्यक्तींनी पीकविमा भरल्याचा धक्कादायक प्रकार ZEE 24 TAAS ने समोर आणला होता. या बातमीनंतर जिल्हा कृषी विभागाने पिकविमा कंपनीला आदेश दिलेत. सात बारा एकाचा आणि  बँक खाते दुसऱ्याचेच असल्याने विम्याची प्रक्रिया रद्द करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आलीय. आत्तापर्यंत कृषी विभागाच्या चौकशीत 260 शेतकऱ्यांच्या नावावर परळी आणि गंगाखेड अशा बाहेरील जिल्ह्यातील लोकांनी बोगस पीकविमा भरल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळतेय. उर्वरित बोगस पीकविमा काढलेल्या लोकांचा कृषी विभागाकडून शोध घेतला जातोय. 

  • दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरु करावी, ठाकरे गटाची मागणी

    शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली आमदार सुनील शिंदे व आमदार महेश सावंत यांच्या सोबत रेल्वे कामगार सेनेचे सदस्य मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक धर्मवीर मिना यांच्या भेटीसाठी सीएसएमटी येथील कार्यालयात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी दादर ते रत्नागिरी दरम्यान धावणारी पॅसेंजर बंद केली असून ती पुन्हा सुरू करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे.

  •  Maharashtra Breaking News LIVE Updates:  दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत द्या, मुख्यमंत्र्यांचे आदेश 

    दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत द्या, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. महाराष्ट्र सदनाच्या संदर्भातील शासन आदेश जारी करा, अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रशासनाला दिलाय. साहित्यप्रेमींच्या निवासाकरिता जुने महाराष्ट्र सदन मिळावे असे विनंती पत्र आयोजनकांनी राज्य शासनाला चार महिन्यांआधी केलं होतं. 21,22 आणि 23 फेब्रुवारी रोजी दिल्लीत साहित्य संमेलन होत आहे. मात्र, सशुल्क असावे की नि:शुल्क यांत लालफितीत चार महिन्यांपासून हा निर्णय प्रलंबित होता. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहेत.

  • राष्ट्रवादी SPमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चा 

    आताची मोठी बातमी, जयंत पाटलांसमोरच पदाधिकाऱ्याची प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी करण्यात आलीय. कार्यकर्त्यांना वेळ देणारा अध्यक्ष असावा; अशी पदाधिका-याची भूमिका आहे. मराठा सोडून इतर समाजाच्या नेत्याला संधी देण्याची मागणी करण्यात आलीय. मुंबईतील राष्ट्रवादी SPच्या बैठकीत अध्यक्ष बदलण्याची मागणी करण्यात येत आहे. मुंबईत शरद पवारांच्या उपस्थित सुरू असलेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केलीय. 

  • राष्ट्रवादी SPमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चा 

    आताची मोठी बातमी, जयंत पाटलांसमोरच पदाधिकाऱ्याची प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी करण्यात आलीय. कार्यकर्त्यांना वेळ देणारा अध्यक्ष असावा; अशी पदाधिका-याची भूमिका आहे. मराठा सोडून इतर समाजाच्या नेत्याला संधी देण्याची मागणी करण्यात आलीय. मुंबईतील राष्ट्रवादी SPच्या बैठकीत अध्यक्ष बदलण्याची मागणी करण्यात येत आहे. मुंबईत शरद पवारांच्या उपस्थित सुरू असलेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केलीय. 

  • राष्ट्रवादी SPमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चा 

    आताची मोठी बातमी, जयंत पाटलांसमोरच पदाधिकाऱ्याची प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी करण्यात आलीय. कार्यकर्त्यांना वेळ देणारा अध्यक्ष असावा; अशी पदाधिका-याची भूमिका आहे. मराठा सोडून इतर समाजाच्या नेत्याला संधी देण्याची मागणी करण्यात आलीय. मुंबईतील राष्ट्रवादी SPच्या बैठकीत अध्यक्ष बदलण्याची मागणी करण्यात येत आहे. मुंबईत शरद पवारांच्या उपस्थित सुरू असलेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केलीय. 

  • पद्मावती मातेच्या मंदिरात चोरी, चोरांनी पळवलं देवीच्या अंगावरील 18 तोळे सोनं

    सांगलीच्या मिरजमध्ये पद्मावती मातेच्या मंदिरात चोरी झाली आहे. चोरट्यानं देवीच्या अंगावरील 18 तोळे सोनं पळवल आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. 

  • आकाकडे कमिशन पोहोचलं पाहिजे अशी यंत्रणा; सुरेश धस यांची आरोप

    संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून पैठणीत भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला संबोधताना आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला. म्हणाले की, मी सोमनाथकडे परभणीला जाऊन आलो त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. परळी इराणी समाजाचे काही लोक आहेत ते गांजा चरस विकतात यांच्या जीवावर, त्यांच्याकडून हिस्सा मिळवायला आका ने पोलीस ठेवले होते आणि त्यांच्या आकाला ही जायचे, थर्मलमध्ये भंगारमध्ये यांचं वाटा होता, आका आणि आकाच्या आकाला सगळ्यांना हिस्सा मिळतो. करुणा असो की डॉ. देशमुख असो त्यांचं चारित्र्य हणन यांनी केले. 

  • वाल्मीक कराड यांना PMLA आणि ED ची कलमे का लावली नाही? - सुप्रिया सुळे 

    " जी घटना बीड आणि परभणीत झाली या विरोधात हे नेते पोटतिडकीने बोलत आहे.  सर्वात आधी सभागृहात संदीप क्षीरसागर यांनी सभागृहात हा मुद्दा मांडला संसदेत जर कोणी सर्वात आधी बोलले असेल तर बजरंग सोनवणे बोलले.  बजरंग अप्पा हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी देशमुख यांच्या मारेकरीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली. माणुसकीच्या नात्याने सगळं राजकारण सोडून नेते एकत्र आले. PMLA चा ॲक्ट काळा पैसा पकडण्यासाठी आला. कराड यांच्यावर PMLA चे अनेक केसेस झक्या आहेत. वाल्मीक कराड यांना PMLA आणि ED ची कलमे का लावली नाही? त्यांना ED ची नोटीस असताना, आणि खंडणीची नोटीस असताना मग त्यांच्यावर कारवाई का नाही? वाल्मीक कराड यांना स्पेशल ट्रीटमेंट का दिली जातेय? लाडकी बहिण योजना या योजनेचे परळीचे अध्यक्ष आजही वाल्मीक कराड आहेत. ज्या व्यक्तीवर खंडणीचा गुन्हा आहे त्याला तुम्ही या योजनेचा अध्यक्ष करता? एक काळ असा होता की रेल्वे अपघात झाला की नैतिकतेच्या आधारावर मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या या दोन्ही कुटुंबीयांना न्याय द्या. एवढं मोठं यश तुम्हाला मिळाले आहे. या कुटुंबीयांना न्याय द्या." 

  • वाल्मीक कराड यांना PMLA आणि ED ची कलमे का लावली नाही? - सुप्रिया सुळे 

    " जी घटना बीड आणि परभणीत झाली या विरोधात हे नेते पोटतिडकीने बोलत आहे.  सर्वात आधी सभागृहात संदीप क्षीरसागर यांनी सभागृहात हा मुद्दा मांडला संसदेत जर कोणी सर्वात आधी बोलले असेल तर बजरंग सोनवणे बोलले.  बजरंग अप्पा हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी देशमुख यांच्या मारेकरीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली. माणुसकीच्या नात्याने सगळं राजकारण सोडून नेते एकत्र आले. PMLA चा ॲक्ट काळा पैसा पकडण्यासाठी आला. कराड यांच्यावर PMLA चे अनेक केसेस झक्या आहेत. वाल्मीक कराड यांना PMLA आणि ED ची कलमे का लावली नाही? त्यांना ED ची नोटीस असताना, आणि खंडणीची नोटीस असताना मग त्यांच्यावर कारवाई का नाही? वाल्मीक कराड यांना स्पेशल ट्रीटमेंट का दिली जातेय? लाडकी बहिण योजना या योजनेचे परळीचे अध्यक्ष आजही वाल्मीक कराड आहेत. ज्या व्यक्तीवर खंडणीचा गुन्हा आहे त्याला तुम्ही या योजनेचा अध्यक्ष करता? एक काळ असा होता की रेल्वे अपघात झाला की नैतिकतेच्या आधारावर मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या या दोन्ही कुटुंबीयांना न्याय द्या. एवढं मोठं यश तुम्हाला मिळाले आहे. या कुटुंबीयांना न्याय द्या." 

  • महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवस पुणे दौऱ्यावर 

    - 9 व 10 जानेवारीला महसूलमंत्री पुण्यात येणार

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    - महसूलमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतरचा पहिलाच पुणे दौरा

    - महसूल मंत्री बावनकुळे पुण्यात घेणार पहिला जनता दरबार

    - 10 जानेवारीला दुपारी 2 ते 4 असा दोन तास जनता दरबार

    - जनता दरबाराला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी उपस्थित राहणार

  • संतोष देशमुख हत्या प्रकरणी पैठणमध्ये मराठा बांधवांचा मोर्चा सुरु 

    संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी पैठणमध्ये मराठा बांधवांनी मोर्चा सुरू झाला आहे. मोर्चात देशमुख कुटुंबीय सहभागी झालं आहे. तसेच या मोर्चात मनोज जरांगेही सहभागी झालेत. पैठणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हा मोर्चा निघाला आहे.   

  • आमदार आदित्य ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला 

    आमदार आदित्य ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भेटीसाठी मंत्रालयात दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत.  मुंबईतील विविध समस्या, मतदारसंघातील कामं आणि टोरेस प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंमधली ही तिसरी भेट आहे. 

  • बांद्रयातील भारतनगर येथे SRA कडून अनधिकृत बांधकाम पाडण्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन

    - अनधिकृत बांधका पाडण्यासाठी ठाकरे गट आक्रमक

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    - मात्र आंदोलन सुरु करण्यापूर्वीच प्रशासनाकडून अनधिकृत बांधकामावर कारवाईला सुरुवात करण्यात आलीय

    - जेसीबी, बुलडोझर लावून बांधकाम हटवण्याचं काम सुरू

    - वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात आंदोलन होणार होते

  • शिवसेना ठाकरे गटाचं मुंबईतल्या वांद्रे भागात आंदोलन

    शिवसेना ठाकरे गटाचं मुंबईतल्या वांद्रे भागात आंदोलन केले जात आहे. भारतनगर इथे SRA कडून अनधिकृत बांधकाम पाडण्याविरोधात शिवसेना UBT पक्ष आक्रमक झाली आहे. 

  • मुंबई विमानतळाला 5व्या श्रेणीचं मानांकन, ठरलं उल्लेखनीय टप्पा गाठणारं पहिलं विमानतळ

    मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला आंतरराष्ट्रीय परिषदेनं पाचव्या श्रेणीचं मानांकन दिलंय. हा उल्लेखनीय टप्पा गाठणारं मुंबई विमानतळ भारतातलं पहिलं आणि जगातलं तिसरं विमानतळ ठरलंय. 

  • मालेगावातील बालरुग्णालयं हाऊसफुल्ल

    मालेगावातली बाल रुग्णालयांमध्ये रूग्णांची गर्दी झाली आहे. वातावरणातल्या बदलामुळे सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. दूषित पाण्यामुळेही मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. HMP व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढली आहे. दरम्यान, यासाठी यंत्रणा सज्ज आहे, असं आरोग्य अधिका-यांनी सांगितल आहे. मात्र लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असा सल्लाही वैद्यकीय अधिका-यांनी दिला आहे.  

     

  • 'बापलेकीला सोडून आमच्याकडे या' ही अमानुष भाषा, खासदार संजय राऊतांनी केला जोरदार हल्लाबोल 

    राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांना ऑफर मिळल्याच्या चर्चेवर, खासदार संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलाय. 'बापलेकीला सोडून आमच्याकडे या' ही अमानुष भाषा आहे, अशी टीका राऊतांनी केलीय. तसंच जर खासदारांना ऑफर आली आणि ते सोडून गेले तर ते रावणाचे आणि कंसाचे वंशज ठरतील, असंही राऊत म्हणालेत.

  • संतोष देशमुख हत्येप्रकरणी, अंबादास दानवेंनी केली सरकारवर टीका

    Santosh Deshmukh Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी, अंबादास दानवेंनी सरकारवर टीका केलीये. या हत्येला महिना उलटला तरी सहावा आरोपी फरार आहे. यावरुन दानवेंनी सरकारला धारेवर धरलंय. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना उलटला तरी केवळ २३ वर्षे वयाचा एक पोऱ्या, कृष्णा आंधळे हा सहावा आरोपी पोलिसांच्या हाती तुरी देतोय.

     

  • राष्ट्रवादी SP पक्षाची आजही बैठक, आढावा बैठकीचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस

    राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आजही आढावा बैठक होणार आहे. आजही शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. आढावा बैठकीला बुधवारपासून सुरुवात झाली. काल युवक, महिला पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांची बैठक शरद पवार यांच्या नेतृत्वात पार पडली. या बैठकीत लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत आणि पक्षासमोरच्या आव्हांनाबाबत पवारांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. आगामी काळात पक्षात संघटनात्मक बदल होतील, असे संकेतही पवारांनी दिलेत. 

  • एकनाथ शिंदेंची इच्छा नसताना काही गोष्टी चुकीच्या घडल्या'- मंत्री गणेश नाईक

    महायुती सरकारचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, त्यांची इच्छा नसताना काही गोष्टी चुकीच्या घडल्या, असं नाईक म्हणाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोरच गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंबाबत हे विधान केलं आहे. त्यावेळी चुकीच्या गोष्टी शिंदेंनाही सांगितल्या पण काही गोष्टी नजरेला चांगल्या दिसत नसतानाही सोडून द्याव्या लागतात, असंही नाईक म्हणाले. मात्र आता परिस्थिती बदलली आहे, असं नाईकांनी सांगितलं. नाईकांच्या या विधानावर आता शिवसेनेचे नेते काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

  • राज्यातील कोणत्याही नागरिकांना कुठूनही दस्त नोंदणी करता येणार..एक राज्य, एक नोंदणी संकल्पना राबवणार.. 

    आता तुम्हाला कोणत्याही कार्यालयातून दस्त नोंदणी करता येणार आहे. राज्यातील कोणत्याही भागातील नागरिकांना कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयातून दस्त नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी एक राज्य एक नोंदणी संकल्पाना राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.  घरबसल्या नागरिकांना दस्त नोंदणी करण्यासाठी महसूल विषयक काही दस्त नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबविण्यात येणार आहे. पासपोर्ट कार्यालयाप्रमाणे भूमी अभिलेख विभागातील सर्व सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रथम टप्प्यात ३० कार्यालयांमध्ये भू प्रमाण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. 

  • वाल्मिक कराड खंडणी प्रकरणात एक मोठी अपडेट 

    • खंडणी प्रकरणात पोलिसांनी आरोपी विष्णू चाटे याचे काही व्हॉईस सॅम्पल पोलिसांनी तपास करण्यासाठी घेतले आहेत. 

    • COMMERCIAL BREAK
      SCROLL TO CONTINUE READING

      विष्णू चाटेचा मोबाईल पोलिसांना सापडला नाहीये. त्याचा तपास सध्या सुरू आहे. 

    • तपास प्रक्रियेत मदत होण्यासाठी आता विष्णू चाटेचे काही व्हॉईस सॅम्पल घेण्यात आले आहेत. 

    • आज उशिरा  आता वाल्मीक कराडचे सुद्धा व्हॉईस सॅम्पल घेतले जाणार आहेत. 

    • पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्यास दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी विष्णू चाटेचे हे व्हॉईस सॅम्पल सीआयडीकडून घेण्यात आले आहेत. 

    • यातून आता कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून किती खंडणी मागितली, त्यांच्यात नेमके काय बोलणे झाले, याचा उलगडा या सगळ्यातून होऊ शकतो.

  • देशमुख हत्येप्रकरणी न्यायासाठी संभाजीगरच्या पैठणमध्ये मराठा समाजाचा आज मोर्चा

    Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आज पैठणमध्ये मोर्चा काढण्यात येणारेय. या मोर्चात मनोज जरांगेही सहभागी होणारेत . पैठणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हा मोर्चा निघणार आहे. 

  • 13 जानेवारीपासून सुरू होणार देशातील सर्वात मोठं महाकुंभ

    Maha Kumbh 2025: महाकुंभमेळ्याच्या तयारीसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज शेवटची बैठक घेणार आहेत.  सर्व 13 आखाड्यांना योगी भेटही देणार आहेत. 13 जानेवारीपासून देशातील सर्वात मोठं महाकुंभ सुरू होणार आहे.  महाकुंभमेळ्यानिमित्त प्रयागराजमध्ये पोलिसांचं मॉकड्रील, गर्दी नियंत्रणासंदर्भात प्रात्यक्षिक, उत्तर प्रदेश पोलीस आणि नागरिकांनाही केलं. 

    हे ही वाचा: Maha Kumbh 2025: नागा साधूंना थंडी का लागत नाही? जाणून घ्या मनोरंजक उत्तर

  • वही हरवली म्हणून तिसरीतल्या विद्यार्थ्याला शिक्षकाकडून जबर मारहाण  

    Nashik: क्षुल्लक कारणावरून शिक्षकाने विद्यार्थ्याला जबर मारहाण केल्याची घटना समोर येतेय. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यातील टाकेहर्ष जिल्हा परिषद शाळेत ही घटना घडली. इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याला वही हरवली म्हणून शिक्षकाने मारहाण केली. शिक्षकावर तात्काळ गुन्हा दाखल करत निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागमी एल्गार कष्टकरी संघटनेने केलीय. 

  • मुंबई उपनगरात महिलांसाठी चालते-फिरते स्नानगृह 

    मुंबई उपनगरात महिलांसाठी भारतातील पहिल्या चालत्या फिरत्या स्नानगृहाचं उदघाटन झालं. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते याचं उद्घघाटन करण्यात आलं आहे.  महिलांनी यांचा वापर करावा असं आवाहन मंगल प्रभात लोढा यांनी केलं आहे. 

  • शिवसेना UBT पक्षाची आजही मातोश्रीवर बैठक, आज बैठकीचा तीसरा दिवस

    आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेत आहेत.  7 तारखेपासून या बैठकांचं सत्र सुरू आहे. आज या बैठकीचा तिसरा दिवस असून आज वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा इथल्या मतदार संघाचा उद्धव ठाकरे आढावा घेणार आहेत. 

  • कागदी आणि प्लास्टिक कपच्या वापरावर बंदी येणार

    चहाच्या टपरीवरील पेपर कप लवकरच बंद होणार आहे. कागदी आणि प्लास्टिक कपचा वापर बंद करण्याचं आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केल आहे. आधीपासूनच यावर बंदी आहे मात्र कोणी जर त्याचा वापर करत असेल आरोग्य, पर्यावरण विभाग त्याबाबत जनजागृती करेल असंही आरोग्य मंत्र्यांनी सांगितल आहे. 

  • दिल्ली विधानसभेसाठी 'आप'ला मित्रांचा पाठिंबा; अखिलेश यादव, ममता बॅनर्जींचा सपोर्ट 

    दिल्ली विधानसभेसाठी इंडिया आघाडीत काँग्रेस एकाकी पडल्याचं चित्र आहे. कारण दिल्ली विधानसभेसाठी आपला ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांनी पाठिंबा दिलाय.. त्यामुळे काँग्रेसला दिल्ली विधानसभेसाठी मित्र पक्षाची साथ मिळणार नाही.  दिल्ली विधानसभा निवडणूक आप आणि काँग्रेसनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मित्र पक्षानं आपला पाठिंबा दिल आहे. त्यातच इंडिया आघाडी लोकसभेसाठी होती असं अखिलेश यादव यांनी म्हटल्यानं चर्चांना उधाण आल आहे. 

  • तिरुपती मंदिरात टोकन काढताना चेंगराचेंगरी

    Tirupati Temple Stampede: आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरातील विष्णू निवासमजवळ दर्शन तिकीट विक्रीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत सात भाविकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमीही झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिरुपती चेंगराचेंगरी: "आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. एका मृतदेहाची ओळख पटली आहे," असे तिरुमाला तिरुपती देवस्थानमचे अध्यक्ष बीआर नायडू यांनी माहिती दिली. 

    Tirupati Stampede: तिरुपती मंदिरात टोकन काढताना चेंगराचेंगरी, सात भाविकांचा मृत्यू; अनेकजण जखमी < येथे वाचा सविस्तर 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link