LIVE Updates : संतोष देशमुखांची हत्या व्यवहारातून : धनंजय मुंडे

Pooja Pawar Fri, 20 Dec 2024-8:29 pm,

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : राज्य-देशभरातील आजच्या दिवसभरात नेमकं काय घडतंय हे थोडक्यात एका क्लिकवर जाणून घ्या.

Maharashtra Breaking News Today LIVE Updates :  राज्यात मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. सोमवारपासून नागपूरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून त्याचा आज पाचवा दिवस आहे. तिथे आणि महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय त्याचा आढावा एका क्लिकवर घ्या...

Latest Updates

  • पाटणा आणि आझमगड जिल्ह्यात संशयितांच्या घरांची झडाझडती

    नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने आज उत्तर प्रादेशिक ब्युरो प्रदेशात प्रतिबंधित सीपीआय (माओवादी) या दहशतवादी संघटनेच्या पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांशी संबंधित खटल्याच्या संदर्भात पाच राज्यांमध्ये अनेक ठिकाणी शोध घेतला. पंजाबमधील पटियाला आणि श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यात 2 ठिकाणी, हरियाणातील मानेसर आणि गुडगाव जिल्ह्यात 4 ठिकाणी, नवी दिल्लीत 2 ठिकाणी आणि बिहारच्या पाटणा जिल्ह्यात आणि आझमगड जिल्ह्यात प्रत्येकी 1 ठिकाणी संशयितांच्या घरांची व्यापक झडती घेण्यात आली.

  • संतोष देशमुखांची हत्या व्यवहारातून : धनंजय मुंडे

    संतोष देशमुखांच्या हत्येचं कुणीही समर्थन करत नाही. 'दूध का दूध आणि पानी का पानी' होऊन जाईल. या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास व्हावा. त्यासोबत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी असं धनंजय मुंडे म्हणाले. 

  • परळीतील कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी चार जनाविरोधात गुन्हा दाखल

    परळीतील नगरपरिषदेमधील कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी चार जनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आणि जातीवाचक शिव्या देत धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • एक बिहारी सब पे भारी अशी धमकी देणाऱ्या अधिकाऱ्याला ठाकरे गटाचा दणका

    एका खाजगी  कंपनीत काम करणाऱ्या मराठी व्यक्तीला त्रास देणाऱ्या परप्रांतीय वरिष्ठ अधिकाऱ्याला ठाकरे गटाचा दणका. मॅनेजर नितीश कुमार हा महेश पवार यांना मागील सहा महिन्यांपासून त्रास देत होता. एक बिहारी सब पे भारी अशी धमकी देणाऱ्या अधिकाऱ्याची शिवसैनिकांनी कानउघडणी केली आहे. 

  • वाल्मिक कराड 4 दिवसांपासून नागपुरात : अंबादास दानवे

    विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषदेत मोठा दावा केला आहे. मस्साजोग घटनेतील वाल्मिक कराड हे गेल्या 4 दिवसांपासून नागपूरातील फार्म हाऊसवर आहे. तरी देखील पोलीस त्याला पकडत नाहीत असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. 

  • संजय राऊतांच्या जीवाला धोका : आदित्य ठाकरे

    शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली आहे. 

  • परळी पालिकेत किरकोळ कारणावरून कर्मचाऱ्याला मारहाण

    परळी नगरपालिकेत घरकुल विभाग पाहणाऱ्या कर्मचाऱ्याला किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

  • मराठी कुटुंब मारहाण प्रकरणी अखीलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात

    कल्याण मराठी कुटुंब मारहाण प्रकरणी अखीलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात. सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर पोलिसांना आत्मसमर्पण केल्याची माहिती.

  • नागपुरात युवक काँग्रेसचा विधीमंडळावर मोर्चा

    नागपुरात युवक काँग्रेस नेते बंटी शेळके यांच्या नेतृत्वात विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला आहे. नागपूर महापालिका सफाई कर्मचाऱ्यांचा मुद्दा, वाढत्या घरपट्टीमुळे त्रस्त झालेल्या नागपूरकरांचा मुद्दा, वाढलेले वीज बिल, दिव्यांग, तसेच बेरोजगार तरुणांचा प्रश्न घेऊन हा मोर्चा काढण्यात आला आहे. 
     

  • मराठी माणसाला मारहाण प्रकरणी राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

    कल्याणमध्ये मराठी माणसाला झालेल्या मारहाणीची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. फेसबुकवर पोस्ट करुन त्यांनी याप्रकरणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज ठाकरे म्हणाले की,  कल्याण प्रकरणात आरोपीना अटक करा, त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा. आणि जर सरकारला जमत नसेल, तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका. 

  • खासदार संजय राऊतांच्या घराची रेकी?

    संजय राऊतांच्या भांडुपमधील घराची दुचाकीस्वारांनी रेकी केल्याचा आरोप. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी चौकशी सुरू केली आहे. रेकी करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर मास्क लावले होते. 

  • एकनाथ शिंदे यांची नाराज आमदारांशी चर्चा

    जास्त लोक निवडून आल्याने काहींनी संयम ठेवावा. मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही त्यांना पक्षसंघटनेत संधी मिळेल. बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेबांची शिकवण महत्वाची. आम्ही सर्वजण कुटुंब आहोत, नाराजी नाही. आमच्या कामाची पोचपावती आम्हाला जनतेनं दिली. असं एकनाथ शिंदे म्हणाले.

  • मुंबईत मंत्रालयाबाहेर भाजपविरोधात काँग्रेस आक्रमक

    मुंबईत मंत्रालयाबाहेर भाजपविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो हातात घेत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून 'जय भीम'च्या घोषणा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी राजीनामा देण्याची मागणी. 

  • मुख्यमंत्री कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत : सुनील प्रभू

    बीड, परभणीसंदर्भातील फडणवीसांची उत्तरं असमाधानकारक. ते गोलगोल फिरवत आहेत. मुख्यमंत्री कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही उद्या महाविकास आघाडीची भूमिका ठरवणार. सुनील प्रभू यांची माहिती.

  • कांद्यावरील निर्यात शुल्क काढावे मागणीसाठी खासदार निलेश लंकेंचे संसदेत आंदोलन 

    कांद्यावरील निर्यात शुल्क पूर्णपणे काढावे या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांनी संसदेत आंदोलन केले. तसेच वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन निवेदनही सादर केले आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क केंद्र सरकारने 20 टक्क्यांनी वाढवल्यामुळे कांदा निर्यात पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे कांद्याच्या किंमती घसरल्या आणि परिणामी शेतकऱ्याचे नुकसान झाले. कांद्यावरील निर्यात शुल्क सरकारने पूर्णपणे काढले पाहिजे यासाठी खासदार निलेश लंके यांनी महाविकास आघाडीच्या इतर खासदारांसोबत वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. गोयल यांना निवेदनाचे पत्र दिले. त्याचप्रमाणे लोकसभेच्या मकरद्वारावर उपोषण करण्यात आले.

  • माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही : देवेंद्र फडणवीस 

    मराठी माणसाला मारहाण, पोलीस कारवाई करतील. मुंबई मराठी माणसाचीच आहे आणि राहील. माजुरड्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

  • धनंजय मुंडेंना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न, विरोधकांचा आरोप

    विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण गंभीर असल्याचं
    म्हटलं आहे. मात्र, या प्रकरणामध्ये बीडचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय बीडचे माजी नगराध्यक्ष वाल्मिक कराड यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

  •  Live Updates  : कोम्बिंग ऑपरेशनचे आमच्याकडे फुटेज : नितीन राऊत

    परभणीत पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन केलं गेलंय. कोम्बिंग ऑपरेशनचे आमच्याकडे फुटेज आहेत. संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न. सोमनाथच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मल्टिपल इन्ज्युरीचा उल्लेख. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात चुकीची माहिती दिली. 

  • परभणी घटनेतील मुख्य आरोपी मनोरुग्ण, मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती 

    परभणीत 10 डिसेंबरला दत्तराव पोवार या व्यक्तीने प्रतिकात्मक संविधानाची विटंबना केली. त्यानंतर जमावाने आंदोलन करत तोडफोड सुरू केली. यावेळी पोलिसांनी जमावाला हटकण्याचा प्रयत्न केला मात्र  त्यातले 60 ते 70 लोक रेल्वे स्टेशनवर गेले आणि त्यांनी रेल रोको केला . दुसऱ्या दिवशी परभणी बंदची हाक दिली तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातही तोडफोड करण्यात आली. याघटनेविषयी माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत वैद्यकीय अहवाल वाचून दाखवला. संविधानाची विटंबना करणारा आरोपी हा मनोरूग्ण होता त्याच्यावर 2012 पासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती दिली. 

  • मराठी माणसाकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर तंगड्या तोडू - वरूण सरदेसाई 

    कल्याणमध्ये धूप लावण्याच्या कारणामुळे शेजारी राहणाऱ्या अमराठी आणि मराठी व्यक्तींमध्ये वाद झाला. यावादातून अमराठी व्यक्तीने मराठी कुटुंबाला मारहाण केली यात ते गंभीर जखमी झाले आहेत. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावरून विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक झाले आहेत. यावर ठाकरे शिवसेना आमदार वरूण सरदेसाई यांनी 'मराठी माणसाकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर त्यांच्या तंगड्या तोडू' अशी तीव्र प्रतिक्रिया दिली. 

  • Breaking News : मोठी बातमी! लोकसभा अनिश्चित काळापर्यंत तहकूब 

    लोकसभा हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खासदारांनी सभागृहात गदारोळ केल्यामुळे लोकसभा अनिश्चित काळापर्यंत तहकूब  करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 

  •  Live Updates  : माणगाव पुणे मार्गावर ताम्हीणी घाटात खासगी बसला भीषण अपघात, चौघांचा मृत्यू 

    माणगाव ते पुणे मार्गादरम्यान ताम्हिणी घाटात शुक्रवारी एका खासगी प्रवासी बसला अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटून बस डाव्या बाजूला उलटली. 
    अपघातात  एकूण 4 जणांचा मृत्यू झाला असून यात तब्बल 25 जण जखमी झाले आहेत. जखमी पैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. पुणे येथून महाड तालुक्यातील बिरवाडीकडे ही बस निघाली होती 
    लग्न समारंभासाठी वऱ्हाड बस मधून प्रवास करत होते. माणगाव पोलीस अपघातस्थळी दाखल झाले असून स्थानिक यंत्रणेकडून मदत कार्य सुरू आहे. 

  • Breaking News : माणगाव ते पुणे मार्गादरम्यान ताम्हिणी घाटात भयंकर अपघात

    माणगाव ते पुणे मार्गादरम्यान ताम्हिणी घाटात एका खासगी प्रवासी बसला अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटून बस डाव्या बाजूला उलटली. यात दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून काही प्रवासी गंभीर जखमी आहेत. 

  • काँग्रेस विरोधात भाजप आमदार आज पुन्हा आक्रमक, विधीमंडळ पायऱ्यांवर आंदोलन

    सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस असून शुक्रवारी पुन्हा एकदा काँग्रेस विरोधात भाजप आमदार आक्रमक झाले आहेत. राहुल गांधींविरोधात भाजपने हे आंदोलन केले असून विधीमंडळ पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे. काल भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांनी मुंबईतील काँग्रेसचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला तर आज आमदार देखील विधीमंडळ परिसरात हे आंदोलन करत आहेत. 

  • राज्यसभेचे सभापती धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस उपसभापतींनी फेटाळली

    राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस उपसभापतींनी फेटाळली आहे. राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात INDIA आघाडीने अविश्वास प्रस्तावाची नोटीस पाठवली होती. सभापती विरोधी पक्षांना बोलू देत नसून पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप विरोधी पक्षातील खासदारांनी केला होता INDIA आघाडीच्या 60 हून अधिक खासदारांनी प्रस्तावावर सह्या देखील केल्या होत्या. काँग्रेस, TMC, आप, समाजवादी पक्षाच्या खासदारांच्याही प्रस्तावावर सह्या केल्या होत्या. 

  • Breaking News : संसदेतील धक्काबुक्की प्रकरणी राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल

    संसदेत धक्काबुक्की झाल्यानंतर कांग्रेस आणि भाजपच्या खासदारांनी एकमेकांविरोधात संसद मार्ग पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. दरम्यान रात्री दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल केला. धमकी देणे, जाणीवपूर्वक दुखापत पोहोचवणे यांसह इतर कलमे लावण्यात आली आहेत. संसदेत आणि संसद बाहेर गदारोळ घालणाऱ्या खासदार विरोधात लोकसभा अध्यक्ष कारवाईचा बडगा उगारण्याची शक्यता आहे. अध्यक्षांच्या खुर्ची जवळ गेलेल्या आणि संसदेच्या मकर द्वार गेटजवळ धक्काबुक्की करणा-या खासदारांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते. दरम्यान लोकसभा अध्यक्षांनी संसदेत आणि प्रवेशद्वारावर कोणतंही निदर्शने करण्यासाठी मनाई केलीय.

  • रोहित पाटील अजित पवारांच्या भेटीसाठी विजयगड बंगल्यावर 

    दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांचे चिरंजीव आणि आमदार रोहित पाटील हे शुक्रवारी सकाळी अजित पवारांच्या भेटीसाठी विजयगड बंगल्यावर पोहोचले. नागपुरात सध्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु असून दरम्यान मतदारसंघातील  कामासाठी रोहित पाटील उपमुख्यमंत्र्यांना भेटले असल्याची माहिती मिळत आहे. 

  • मुंबई काँग्रेस कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल 

    गुरुवारी मुंबई काँग्रेस कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. आझाद मैदान पोलिसांनी कलम 74, 118(1), 189 (1)(c), (2), (3) , 190, 191(2),192, 324(3),333, अंतर्गत गुन्हा दाखल केला. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर तिवना यांच्यासह 30-40 भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 14 भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link