Maharashtra Breaking News LIVE Updates: सांगली भाजपामध्ये बंडखोरीला सुरुवात

Mon, 21 Oct 2024-4:26 pm,

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्याच्या राजकारणापासून इतर सर्वच क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्यांच्या ताज्या अपडेट्स...

Maharashtra Breaking News LIVE Updates: विधानसभा निवडणुकीसाठी आता महिन्याभराचा कालावधी उरला असतानाच सत्ताकारण नवनवीन वळणांवर येताना दिसत आहे. काय आहेत राज्यातील महत्त्वाच्या आणि लक्ष देण्याजोग्या घडामोडी... पाहा एका क्लिकवर.... 


Latest Updates

  • सांगली भाजपामध्ये बंडखोरीला सुरुवात

    सांगली भाजपामध्ये बंडखोरीला सुरुवात झाली आहे. भाजपाचे इच्छुक उमेदवार माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी अपक्ष लढणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे. 
    विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही बंडखोरी उफळली. गेली 10 वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहूनही अन्याय केल्याचा आरोप  शिवाजी डोंगरे यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द देऊन उमेदवारी डावलल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान सुधीर गाडगीळ यांची उमेदवारी अमान्य करीत बंडखोरीचा निर्धार त्यांनी केलाय. 

  • राजवर्धन पाटील, अंकिता पाटील-ठाकरेंनी बारामतीत घेतली शर्मिला पवारांची भेट

    माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील आणि कन्या अंकिता पाटील ठाकरे यांनी आज बारामतीत शर्मिला पवार यांची भेट घेतलीय. शर्मिला पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे सखे बंधू श्रीनिवास पवार यांच्या पत्नी असून युगेंद्र पवार यांच्या त्या आई आहेत.शर्मिला पवार यांनी अजित पवारांच्या विरोधात बारामती लोकसभेला प्रचार केला होता आणि त्यांचा संपर्क इंदापुरात देखील मोठ्या प्रमाणावर आहे.आगामी इंदापूर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय.

  • रोहित पाटील 24 ऑक्टोबर रोजी दाखल करणार उमेदवारी अर्ज

    सांगलीच्या तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून रोहित आर आर पाटील हे 24 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.कवठेमहांकाळ मध्ये पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून अद्याप उमेदवारी जाहीर झाली नसली तरी रोहित पाटील यांना उमेदवारी मिळणार जवळपास निश्चित आहे.तासगाव मधल्या तहसील कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता रोहित पाटील शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

  • उदय सांगळे शरद पवारांच्या भेटीला 

    एकेकाळचे शिवसेना मंत्री दादा भुसेंचे कट्टर समर्थक असलेले उदय सांगळे थोड्याच वेळात वाय बी सेंटरला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. ते सिन्नर मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. 

  • ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस वादावर शरद पवार यांची मध्यस्थी

    महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे वादावर शरद पवार यांची मध्यस्थी. रविवारी आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांनी शरद पवार यांची भेट घेऊन जागावाटपातील काँग्रेसच्या आडमुठी भूमिकेबद्दल माहिती दिली. त्यानंतर शरद पवार यांनी काँग्रेस हायकमांडशी बोलून या वादावर मध्यस्थी केल्याची माहिती. 

  • महायुतीमधील अंधेरी पूर्व आणि दिंडोशी मतदारसंघातील तिढा कायम

    मुंबईतील अंधेरी पूर्व मतदार संघातून भाजपचे मुरजी पटेल हे इच्छुक आहेत. याच मतदार संघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून स्वीकृती प्रदीप शर्मा इच्छुक आहेत. महायुतीमध्ये स्वीकृती प्रदीप शर्मा यांना दिंडोशी मधून निवडणूक लढवावी अशी ऑफर दिली होती. मात्र स्वीकृती शर्माया दिंडोशी मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाहीत. दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून संजय निरुपम, दिंडोशी विभाग प्रमुख गणेश शिंदे आणि वैभव भराडकर इच्छुक आहेत. त्यामुळे महायुतीसाठी अंधेरी विधानसभा मतदारसंघत तिढा अजूनही कायम आहे . तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी पक्षांतर्गत अडचणी या दिंडोशी मतदारसंघात आहेत.

  • हिट अँड रन प्रकरणामुळे ठाणे पुन्हा हादरले

    हिट अँड रन प्रकरणामुळे ठाणे पुन्हा हादरले. ठाण्यात घराजवळ हिट अँड रन प्रकरण समोर आले असून, इथं धनदांडग्याने घेतला आणखी एका गरिबाचा बळी. आलिशान गाडीने चिरडली कोवळी स्वप्ने. एका भरधाव मर्सिडीज गाडीने 21 वर्षीय कोवळ्या निष्पाप मुलाला चिरडल्याने सर्वत्र संताप. दर्शन हेगडे या तरुणाचा जागेवर मृत्यू. 

  • शिवसेनेकडून पहिली यादी आजच जाहिर केली जाणार

    शिंदेंच्या शिवसेनेकडून 60 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर सोमवारी 60 उमेदवारांची नावं जाहिर केली जाणार आहेत. यामध्ये शिवसेनेत शिंदेंसह बंड करणाऱ्या 40 विद्यमान आमदारांचीही नावं असल्याचं म्हटलं जात आहे. तर शिंदेसोबत आलेले अनेक माजी आमदारही विधानसभा लढवण्यास इच्छुक. 

  • 'या' तारखेला मुख्यमंत्री शिंदे भरणार अर्ज 

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या 24 ॲाक्टोबर रोजी ठाणे शहरातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर, तिथे शरद पवार गटाचे कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे उमेदवार जितेंद्र आव्हाडही 24 तारखेला भरणार उमेदवारी अर्ज. 

  • निलेश राणे हाती घेणार धनुष्यबाण

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 23 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशून कुडाळ येथे सभा घेणार आहेत. या सभेत भाजपा नेते निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार आहेत. निलेश राणे यांच्या नावाची कुडाळ मालवण मतदार संघातील उमेदवार म्हणून घोषणा होण्याची शक्यता आहे. 

  • अमित ठाकरे लढणार विधानसभा निवडणूक? 

    मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सक्रिय असणारे अमित राज ठाकरे, अर्थात राज ठाकरे यांचे पुत्र आणि महाराष्ट्र  नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्षही निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईतील माहिम, भांडुप, दिंडोशी,कलिना, चांदीवली किंवा मागाठणे यापैकी एखाद्या मतदार संघातून अमित ठाकरेंनी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यातच आता एक वेगळं वळण मिळताना दिसत असून, मुंबईतील अत्यंत महत्वाच्या आणि ठाकरे गटाच्या बिलेकिल्ल्याजवळ असलेल्या मतदार संघातून अमित ठाकरे  निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. 

     

  • वरळीत हायप्रोफाईल लढत; आदित्य ठाकरे विरुद्ध शायना एन सी? 

    हायप्रोफाईल वरळी विधानसभा मतदारसंघातून शायना एन सी वसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणुक लढवणार असल्याची सूत्रांची माहिती. वरळी विधान सभेत आदित्य ठाकरे विरुद्ध शायना एन सी असा सामाना होणार असल्याची चिन्हं. वरळी विधानसभेत मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशीच होणार लढत. शिवसेनेचे बालेकिल्ले असलेल्या विधानसभा मतदारसंघात मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशीच लढत करण्याची महायुतीची रणनिती.

  • आमदार राजेश विटेकर यांच्या कुटुंबात जाणार उमेदवारी? 

    आमदार राजेश विटेकर यांच्या कुटुंबातील सदस्याला विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता. याच धर्तीवर अजित पवारांना भेटण्यासाठी विटेकर देवगिरी या त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. राजेश विटेकर यांच्या कुटुंबातील सदस्याला पाथरी मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता. पाथरी विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्याची तयारी. पाथरी मतदारसंघात शरद पवार गटाचे बाबा दुराणी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार.

  • मनसेच्या पहिल्या यादीत किती उमेदवारांना संधी? 

    राज ठाकरेंच्या मनसेकडून उमेदवारांती पहिली यादी सोमवारी जाहीर होणार असून, यामध्ये 33 ते 36 जणांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे. शिवाय दुसऱ्या यादीबाबत आजच चर्चा होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. 

     

  • समीर भुजबळ नव्या पर्यायाच्या शोधात? 

    नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदार संघातून विधानसभेसाठी समीर भुजबळ सध्या तयारी करत आहेत समीर भुजबळ राष्ट्रवादी मुंबईचे अध्यक्ष असले तरी त्यांनी थेट शिंदे गटाच्या सुहास कांदे यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. महायुतीतून त्यांना तिकीट मिळणार नसल्याने सध्या ते आपल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह विविध पक्षांशी चाचपणी करत आहेत. आज ते मुंबई मध्ये रवाना झाल्याची चर्चा आहे काँग्रेस किंवा उद्धव सेनेचा बोट धरून ते विधानसभा निवडणूक लढवू शकतात

  • महाराष्ट्र कुणबी सेनेने भाजपाला दिलेला पाठिंबा काढून घेतल्याचे केले जाहीर

    महायुतीकडून महाराष्ट्र कुणबी सेनेला दिलेलं कोणतंही आश्वासन पाळण्यात आलं नाही त्याचबरोबर जरांगेंचं ऐकून त्यांना बेकायदा कुणबी दाखले देण्यात आले. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कुणबी सेनेची विधानसभा निवडणुकीबाबत बैठक विक्रमगड मध्ये पार पडली .या बैठकीत महायुतीतील भाजपाला दिलेला पाठिंबा कुणबी सेनेने स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी आज हा निर्णय जाहीर केला. 

  • राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाची पहिली संभाव्य यादी समोर 

    राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली संभाव्य यादी समोर आली आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरुन टोकाचे मतभेद असल्याने शरद पवार मध्यस्थी करत असतानाच दुसरीकडे त्यांच्या पक्षाची संभाव्य यादी समोर आली आहे. 

    (संपूर्ण यादी पाहण्यासाठी इथं क्लिक करा)

  • आंबेगावातून वळसे पाटील यांच ठरलं

    अखेर दिलीप वळसे पाटील यांचं ठरलं असून आंबेगाव विधानसभेतून दिलीप वळसे पाटील 24 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून मी माझ्या कामावरती लढत असतो त्यामुळे समोर कोण उमेदवार आहे याकडे लक्ष देत नाही अशा शब्दात वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. 

  • उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतून लढणार. 

    उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतून लढणार.  विधानसभा निवडणुकीसाठी 28 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार.  अजित पवार हे बारामतीतून निवडणूक न लढण्याचे संकेत देत होते मात्र अखेर ते बारामतीतूनच विधानसभेची निवडणूक लढणार हे स्पष्ट झाले असून सोमवारी 28 ऑक्टोबरला विधानसभेचा उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठीची तयारीही सुरू करण्यात आली आहे.

  • भाजपचे 17 आमदार वेटिंगवरच... 

    विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या 99 उमेदवारांची पहिली यादी आज (दि. 20) जाहीर झाली आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून ही यादी जाहीर करण्यात आली आहे. परंतु, या यादीत अकोट, अकोला पश्चिम, मूर्तिजापूर, कारंजा, वाशिम, आर्वी, नागपूर मध्य, गडचिरोली, आर्णी, नाशिक मध्य, उल्हासनगर, बोरिवली, वर्सोवा, घटकोपर पूर्व, पेण, पुणे छावणी, गेवराई, माळशिरस या मतदारसंघातील विद्यमान आमदारांना संधी देण्यात आलेली नाही, त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे.

  • भाजपच्या पहिल्या यादीत नाव नसल्याने आमदारांसह इच्छुकांत अस्वस्थता

     

    विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने काल राज्यातील 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील एकाही मतदारसंघातील उमेदवाराचा समावेश नसल्याने विद्यमान आमदारांसह इच्छुक उमेदवारांच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरल्याचे दिसून येते आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकीय हालचालींना चांगलाच वेग धरला आहे. 

     

  • आज पवार काका- पुतण्यांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता

    शरद पवार गटाची आज पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता. आज महा विकास आघाडीच्या काही जागा जाहीर होतील अशी माहिती आमदार अनिल देशमुख यांनी दिली होती. शरद पवार यांच्या पक्षाच्या पहिल्या यादीत 50 उमेदवारांच्या नावांची होणार घोषणा. अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता तर दादांच्या मंत्रांच्या विरोधात शरद पवार कोणाला रिंगणात उतरवणार हे आज पहिल्या यादीतून होणार स्पष्ट होईल. 

    सोबतच, अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. काल रात्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात बैठक पार पडली या बैठकीत यादी जाहीर करण्यात संदर्भात झाली चर्चा. पहिल्या यादीत जवळपास 30 ते 40 उमेदवारांच्या नावांची होणार घोषणा. या यादीत वाद नसलेल्या जागा आणि विद्यमान आमदारांचा असणार समावेश. 

  • नागपूर जिल्ह्यात काँग्रेसची नवी रणनिती 

    नागपूर जिल्ह्यात काँग्रेसनं नवी रणनिती आखली. नागपूर जिल्ह्यातील 6 पैकी 3 मतदारसंघात काँग्रेस महिला उमेदवार देण्याची शक्यता आहे. खास करून ग्रामीण भागात काँग्रेसचा नेतृत्व करणा-या सुनील केदारांनी त्यांच्या अनेक महिला कार्यकर्त्यांना यंदा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केलीये. कामठी मतदारसंघातून अवंतिका लेकुरवाळे, हिंगणा मतदारसंघ काँग्रेसला सुटल्यास कुंदा राऊत आणि उमरेड किंवा इतर एका मतदारसंघातून रश्मी बर्वे या उमेदवार असू शकतील अशी चर्चा आहे.

  • दक्षिण मुंबईत भाजपला मोठा धक्का

    विधानसभा निवडणुकीआधी दक्षिण मुंबईत भाजपला मोठा धक्का बसला आहे. विधानसभेची यादी जाहीर होताच भाजपात पहिली बंडखोरी झाली असून, माजी मंत्री राज पुरोहित महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी झी 24 तासला दिली आहे. पुरोहित कुलाबा मतदारसंघातून इच्छूक असून, त्यांनी उमेदवारीसाठी भाजप नेतृत्वाकडे मागणीही केली होती. राज पुरोहित मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष तसेच ज्येष्ठ नेते असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राज पुरोहित कुलाबा विधानसभा निवडणुक लढवण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. 

  • निलेश राणे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश?

    माजी खासदार निलेश राणे हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांनी कुडाळ-मालवण मतदारसंघातून तयारीही सुरू केलीये. मात्र, महायुतीत ही जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहे. त्यामुळे निलेश राणेंची मोठी कोंडी झाली आहे. निलेश राणेंना भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी राणे पिता पुत्रांनी भाजप नेत्यांकडे आग्रह धरलाय.

     

  • मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

    विधानसभा निवडणुकीत विद्यार्थ्यांना मतदान करता यावे यासाठी मुंबई विद्यापीठाने नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १९ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबरला होणारे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मात्र, या दिवशी मुंबई विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या परीक्षा घेण्यात येणार होत्या. परिणामी, विद्यार्थ्यांना मतदानापासूनच वंचित राहावे लागले असते. तसेच मुंबई वगळता अन्य जिल्ह्यांतील बहुतांश विद्यार्थ्यांचे मतदान गावी असल्याने त्यांना या कालावधीत प्रवास करून गावी जाणे शक्य नव्हते. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती.

     

  • विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर 

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आपली पहिली यादी जाहीर झालीय. भाजपच्या पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलीय. यामध्ये 13 महिला उमेदवारांना संधी देण्यात आलीये. भाजपच्या पहिल्या यादीत अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलीये. तर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काही नेत्यांच्या घरातही उमेदवारी देण्यात आलीय. यामध्ये अनेक नवख्या उमेदवारांनाही संधी देण्यात आलीये. 

  • पुण्यातील मंडई मेट्रो स्टेशनच्या तळमजल्यावर आग

    पुण्यातील मंडई मेट्रो स्टेशनच्या तळमजल्यावर आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. तूर्तास मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम नाही. वेल्डिंगच्या कामामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link