Maharashtra Election LIVE: - बीडमध्ये धक्कादायक निकाल! भाजपच्या पंकजा मुंडे पराभूत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे विजयी

Swapnil Ghangale Tue, 04 Jun 2024-10:17 pm,

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live Updates in Marathi: लोकांनी निवडून दिलेल्या सर्वोच्च सभागृहामध्ये म्हणजेच लोकसभेमध्ये पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व कोणते 48 खासदार करणार हे आज स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाचे सर्व अपडेट्स, आकडेवारी पाहा एकाच क्लिकवर...

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live Updates in Marathi: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील निकालांकडे केवळ राज्यातील जनतेचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेलं आहे. लोकसभेच्या एकूण 48 जागा असलेल्या महाराष्ट्रामध्ये 19 एप्रिल ते 20 मे दरम्यान पाच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडला. लोकांनी निवडून दिलेल्या सर्वोच्च सभागृहामध्ये पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व कोणते 48 खासदार करणार हे आज स्पष्ट होणार आहे. याच महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाचे सर्व अपडेट्स, आकडेवारी आज निकालाच्या दिवशी दिवसभर या लिंकवर पाहता येणार आहे. राज्यात कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर, कोणी उधळला विजयाचा गुलाल तर कोणाला पहावं लागलं पराभवाचं तोंड? या साऱ्या अपेड्ट या एकाच लिंकवर उपलब्ध असून लाइव्ह अपेड्टसाठी हे पेज रिफ्रेश करत राहा...

Latest Updates

  • बीडमधून धक्कादायक निकाल समोर आला आहे. भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांना पराभवाची चव चाखायला लागली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे विजयी झाले आहेत. 

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'सत्ता स्थापन...'

    लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे शिवसेना भवनात येऊन आपली पहिली प्रतिक्रिया दिली.  हा निकाल म्हणजे देशात सर्वसामान्य माणसाने ताकद दाखवून दिली आहे. सत्ता स्थापनेचा प्रयत्न केलाच पाहिजे असं ते म्हणाले. तर भाजपवर चिडलेले लोक आमच्यासोबत येतील. सुडाच्या राजकारणाला कंटाळलेले इंडिया आघाडीत येतील. उद्या संध्याकाळी दिल्ली जाईल असंही त्यांनी सांगितलं. 

  • फेरमतमोजणीत ठाकरे गटाचे अमोल किर्तिकर पराभूत घोषित. रविंद्र वायकर यांना 48 मतांनी विजयी.

     

  • Results 2024: खडसेंनी भाजपाचेच कान टोचले! महायुतीच्या अपयशावर म्हणाले, 'महाराष्ट्राच्या जनतेला फोडाफोडीचं..'

    रावेर मतदारसंघातून महायुतीच्या रक्षा खडसे विजयी होणार असं निश्चित मानलं जात आहे. मतमोजणीच्या सतराव्या फेरीनंतर रक्षा खडसेंनी 1 लाख 95 हजार 46 हजार मतांनी आघाडी मिळवली आहे. 17 व्या फेरीनंतर रक्षा खडसेंना 4 लाख 71 हजार 14 मतं होती. तर महाविकास आघाडीच्या श्रीराम पाटील यांना 2 लाख 75 हजार 968 मतं मिळाली. सुनेने आघाडी घेतल्यानंतर भाजपाच्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. महाविकास आघाडी सरकारला एवढं यश का मिळालं यासंदर्भात एकनाथ खडसेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त...

  • Maharashtra Lok Sabha Winner List: महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी; वाचा येथे क्लिक करुन

     

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: वर्षा गायकवाड विजयी! अमोल किर्तीकरांनीही बाजी मारली

    वर्षा गायकवाड उत्तर-मध्य मुंबईमधून जिंकल्या भाजपाचे उज्वल निकम पराभूत झाले आहेत. तसेच अमोल किर्तीकर उत्तर-पश्चिम मतदारसंघातून विजयी झाले आहेत. अमोल किर्तीकरांनी शिंदे गटाच्या रविंद्र वायकरांचा पराभव केला आहे. 

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: अकोल्यात 21 फेऱ्यांनंतरही प्रकाश आंबेडकर तिसऱ्या स्थानी

    अकोला मतदारसंघामध्ये 21 व्या फेरीमध्ये भाजपचे अनुप धोत्रे 23348 मतांनी आघाडीवर. काँग्रेसचे अभय पाटील दुसऱ्या क्रमांकावर तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: | पुणे लोकसभेतून महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा विजय, तर मविआचे रवींद्र धंगेकर, आणि वंचितचे वसंत मोरे यांचा पराभव

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: तब्बल 2 लाखांची आघाडी! काँग्रेसची महिला उमेदवार ठरणार 'जायंट किलर'

    चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर 19 व्या फेरीअखेर दोन लाखांनी आघाडीवर आहेत. त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. त्या भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करतील असं चित्र सध्या तरी दिसत आहे.

     

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: भाजपाला आणखी एक धक्का? बालेकिल्ल्यात शरद पवारांचा उमेदवार आघाडीवर

    भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अहमदनगर मतदारसंघातून 15 फेरीनंतर शरद पवार गटाचे निलेश लंकेंनी 14849 मतांची आघाडी मिळवली आहे. निलेश लंकेंना 3 लाख 61 हजार मतं मिळाली असून भाजपाच्या सुजय विखे पाटलांना 3 लाख 51 हजार 320 मतं मिळाली आहे.

     

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: 'याहून वेगळा...' बारामतीच्या निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

    याहून वेगळा निकाल लागेल असं मला वाटलं नव्हतं. बारामती हा गेल्या 60 वर्षांपासून मी मतदारसंघातून लढतोय. माझी सुरुवात तिथे झाली. तिथल्या मतदाराचे मूलभूत प्रश्न मी ओळखतो. ते योग्य निर्णय घेतात. 

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: राष्ट्रवादीच्या विजयाचं श्रेय पवारांनी काँग्रेस, ठाकरेंना दिलं

    या निवडणुकीत अनेक चांगल्या गोष्टी घडल्या. जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली मर्यादीत जागा लढवल्या. त्यापैकी आम्ही 7 जागेंवर आज आम्ही पुढे आहोत. 10 जागा लढून 7 विजय म्हणजे आमचा स्ट्रायकिंग रेट उत्तम आहे. हे यश मिळालं आहे. हे यश एकट्या राष्ट्रवादीचं यश आहे असं आम्ही मानत नाही. हे आघाडीचं यश आहे. काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं एकत्रित काम केलं. त्यामुळे हे यश आमच्याप्रमाणे काँग्रेसलाही मिळालं. हेच यश उद्धव ठाकरेंना मिळालं. परिवर्तनाचं वातावरण आहे. आम्ही तिघेही एकत्रित राहू. उद्याच्या काळात आमची धोरणं ठरवून महाराष्ट्राच्या जनतेची काळजी घेण्याची खबरदारी घेऊ. उद्याची बैठक संध्याकाळी ठरेल. त्यात माझी उपस्थिती असेल.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: '...म्हणून राज्यात महाविकास आघाडीचा विजय झाला'; सुनील तटकरेंची कबुली

    "यावेळी सर्व पक्ष नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकत्र आले होते तरी देशातील जनतेने त्यांना पुन्हा संधी दिली आहे. राज्यात आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही ही वस्तुस्थिती मान्य आहे. महविकास आघाडीने ज्या पद्धतीने ग्राम पातळीवर कार्यकर्त्यांची फळी अगदी सुरवातीपासून तयार केली. दुर्दैवाने तशी फळी तयार करण्यात आम्ही अपयशी ठरलो. यावेळी झालेल्या चुका आम्ही सुधारू. राष्ट्रवादी काँगेसने यावेळी 4 जागा लढवल्या त्यातील एकच जिंकलो. हे अपयश का मिळालं याचं आम्ही आत्मपरीक्षण करू," असं अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी म्हटलं आहे.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: मी सर्वांचा ऋणी आहे; सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया

    "महायुती मधील सर्व घटक पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, विकासाच्या मुद्द्यावर लढवलेली निवडणूक याला इथल्या जनतेने साथ दिली. मी रायगड, रत्नागिरी मधील जनतेचा ऋणी आहे. त्यांचे ऋण मी कधीच विसरणार नाही. महायुतीला कोकणात मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून यापुढे काम करणार आहे. केवळ लोकसभेपुरता नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत कोकणात सर्व जागा जिंकून आणण्याचा निर्धार करतो आहे," असं रायगडमधील अजित पवार गटाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: राज्यातील भाजपाचा पहिला विजय! 1.36 लाख मतांनी मविआच्या उमेदवाराला पाडलं

    जळगावमधून महायुतीच्या उमेदवार असलेल्या स्मिता वाघ विजयी झाल्या आहेत. भाजपच्या स्मिता वाघ जळगाव लोकसभेतून जिंकल्या असून त्यांनी 1 लाख 36 हजार 251 मतांनी विजय मिळवला आहे. स्मिता वाघ यांना 4 लाख 83 हजार 748 मतं मिळाली. तर महाविकास आघाडीच्या करण पवार यांना 2 लाख 95 हजार 782 मतं मिळाली. एकूण 17 फेऱ्यांमध्ये 11 लाख 65 हजार 968 मतांची मोजणी करण्यात आली.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: मुंबईतून ठाकरे गटाचा पहिला विजय

    मुंबईतील दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाच्या अनिल देसाई विजयी झाले आहेत. त्यांनी शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे पराभूत झाले आहेत.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: अमरावतीमधून नवनीत राणा 31338 मतांनी पिछाडीवर

    अमरावती काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे 31338 मतांनी आघाडीवर आहेत. बळवंत वानखडे यांना आतापर्यंत 271246 मते मिळाली आहेत. तर नवनीत राणा यांना आतापर्यंत 239908 मतं मिळाली आहेत.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: शरद पवारांची 3 वाजता पत्रकार परिषद; उद्धव ठाकरे 4 वाजता साधणार संवाद

    राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांची दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. तर चार वाजता उद्धव ठाकरे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. पाच वाजता राहुल गांधींची पत्रकार परिषद होणार आहे.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: महाराष्ट्रातला पहिला निकाल हाती! BJP उमेदवार जिंकला! शरद पवार गटाच्या उमेदवार पराभूत

    उदयनराज भोसलेंनी सातारा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांनी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदेंचा पराभव केला आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पिछाडीवर असताना उदयनराजेंनी मोठी आघाडी घेत विजय मिळवला. विजयानंतर उदयनराजे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

     

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: मुंबईतून ठाकरे गटाचे चारही उमेदवार आघाडीवर; सेना भवनात उधळला गुलाल

    मुंबईमधून ठाकरे गटाचे चारही उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. यानिमित्ताने शिवसैनिकांनी सेना भवनात गुलाल उधळून आनंद साजरा केला.

     

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: सोलापूरमधून प्रणिती शिंदेंना 1 लाखांहून अधिकची आघाडी

    दहाव्या फेरीनंतर प्रणिती शिंदेंची 10705 मतांनी आघाडी. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना 270650  मते मिळाली असून भाजपच्या राम सातपुते यांना 259945 मतं मिळाली आहेत.

     

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: शिर्डीत ठाकरेंचा उमेदवार आघाडीवर

    शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरेंना एकूण 1 लाख 86 हजार 721 मते मिळाली आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांना एकूण 1 लाख 67 हजार 819 मते मिळाली आहेत. आठव्या फेरीनंतर भाऊसाहेब वाकचौरे 18902 मतांनी आघाडीवर आहेत. तर वचिंतच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांना नऊ फेऱ्यात एकूण 40420 मते मिळाली आहेत. हा निकाल हा राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासाठी हे कल धक्कादायक मानले जात आहेत.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: उदयनराजेंची आघाडी; 4 हजार मतांनी घेतलं लीड

    साताऱ्यामध्ये उदयराजे भोसलेंनी 4 हजारहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. शशिकांत शिंदेंची आघाडी मोडून काढत घेतली मुसंडी. चौदाव्या फेरीनंतर उदयनराजेंची आघाडी.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: भंडाऱ्यात काँग्रेसची आघाडी

    भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघात काँग्रेसची आघाडी

    काँग्रेस-  प्रशांत पडोळे - 149768
    भाजपा - सुनिल मेंढे 148303
    काँग्रेसने 1465 मतांनी आघाडी घेतली आहे.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: वर्ध्यातून अमर काळे आघाडीवर

    वर्ध्यातून अमर काळे यांना 31603 मतांची आघाडी घेतली आहे. अमर काळे यांना 204845 मते तर रामदास तडस यांना 173242 मते मिळाली आहेत. अमर काळे यांची आघाडी कायम आहे.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: रावेरमधून रक्षा खडसे आघाडीवर

    सातवी फेरीतील मतमोजणी पूर्ण झाली असून रावेर लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या रक्षा खडसेंना 183968 मतं मिळाली असून महाविकास आघाडीच्या श्रीराम पाटलांना 110283 मतं मिळाली आहेत. रक्षा खडसे 73 हजार 685 मतांनी आघाडीवर आहेत.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर

    माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील आठव्या फेरी अखेर 28 हजार 783 मतांनी आघाडीवर आहेत.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: भंडाऱ्यात काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर

    भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघात काँग्रेसने आघाडी घेतली काँग्रेसचे पडोळे 317 मतांनी आघाडीवर आहेत.

    काँग्रेस-  प्रशांत पडोळे - 141526 मतं
    भाजपा - सुनिल मेंढे - 141209 मतं

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: नवनीत राणा आघाडीवर; 9000+ आघाडी

    अमरावती भाजप उमेदवार नवनीत राणा 9442 मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांना आतापर्यंत मिळाले 130169 मते मिळाली आहेत. नवनीत राणा यांना आतापर्यंत मिळाले 139611 मतं मिळाली आहेत.

     

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराची मुसंडी

    अकराव्या फेरीत देखील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांची आघाडी कायम आहे. राजाभाऊ वाजे यांना आत्तापर्यंत 3 लाख 9 हजार 410 मतं मिळाली आहेत. राजाभाऊ वाजे यांनी 1 लाख 3673 मतांनी आघाडी घेतली आहे. 11 व्या फेरीनंतर राजाभाऊ वाजेंना 3 लाख 9410 मतं मिळाली आहेत. तर शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंना 2 लाख 5 हजार 734 मतं मिळाली आहेत.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: पुण्यात सहाव्या फेरीनंतर मोहोळ आघाडीवर

    पुण्यामध्ये सहाव्या फेरी अखेरीस महायुतीचे मुरलीधर मोहोळ 37693 मतांनी आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहेत. मोहोळ यांच्याविरोधात काँग्रेसचे रविंद्र धंगेकर निवडणूक लढवत आहेत.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: भिवंडीत टप्प्यात कार्यक्रम... शरद पवार गटाच्या उमेदवाराची तिसऱ्यावरुन थेट पहिल्या स्थानी उडी

    भिवंडी लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार बाळ्या मामा म्हात्रे 13393 मतांनी आघाडीवर आहेत. बाळ्या मामांविरोधात केंद्रीय ग्राम विकास मंत्री कपिल पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहे.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: सुप्रिया सुळे बारामती 25 हजार मतांनी आघाडीवर

    बारामतीमधून सुप्रिया सुळेंनी 25 हजार मतांनी आघाडीवर आहेत. अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: मुंबई उत्तर-पूर्व संजय दिना पाटील 8349 मतांनी आघाडीवर

    संजय दिना पाटलांना 1 लाख 26 हजार 612 मतं तर मिहीर कोटेचा यांना 1 लाख 18 हजार 264 मतं मिळाली आहेत.  संजय दिना पाटील 8349 मतांनी आघाडीवर आहेत.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: कोल्हापूरमधून शाहू महाराज 25 हजार मतांनी आघाडीवर

    कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून चौथ्या फेरीनंतर शाहू महाराज छत्रपती हे 25 हजार 740 मताने आघाडीवर आहेत.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: उदयनराजे भोसले 20 हजार मतांनी पिछाडीवर

    पाचव्या फेरी अखेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे 20 हजार मतांनी आघाडीवर आहेत. भाजपाचे उदयनराजे भोसले पिछाडीवर पडले आहेत.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: धुळ्यातून भाजपा उमेदवार 14 हजार मतांनी पुढे

    पाचव्या फेरी अखेर धुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे 14200 मतांनी आघाडीवर आहेत.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: मावळ लोकसभा मतदारसंघातील चौथ्या फेरीनंतरची मतं खालीलप्रमाणे:

    चौथी फेरीनंतर महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे 20,686 मतांनी आघाडीवर आहेत.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    श्रीरंग बारणे (महायुती) - 123711

    संजोग वाघेरे (महाविकास आघाडी) - 103025

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: तिसऱ्या फेरीनंतर संदीपन भूमरे आघाडीवर

    संभाजीनगरमध्ये तिसऱ्या फेरीनंतर संदीपन भूमरे 228 मतांनी आघाडीवर आहेत.
    संदिपान भुमरे (शिवसेना) - 50946
    इम्तियाज जलील (MIM) - 50718
    चंद्रकांत खैरे (शिवसेना UBT) - 35506

  • देशभरातील निकाल कुणाच्या बाजुनं?

    देशभरातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे लाइव्ह अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: धुळ्यात भाजपा काँग्रेसला पडली भारी

    धुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये तिसऱ्या फेरी अखेर काँग्रेसला 99994 मतं तर भाजपाला एक लाख 5272 मतं मिळाली आहेत. तिसऱ्या फेरीत भाजप 5288 मतांनी पुढे आहे. काँग्रेसचा 7000 चा लीड तोडत भाजपची आघाडी.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: महाविकास आघाडीची मुसंडी; महायुतीला मोठा धक्का

    महाविकास आघाडीने राज्यात मोठी मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडी 28 जागांवर आघाडीवर आहे. तर महायुती 20 जागांवर आघाडीवर आहे. ठाकरे गट 11 जागांवरील आघाडीसहीत दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरतोय तर भाजपा सध्या 13 जागांसहीत सर्वात मोठा पक्ष ठरत असल्याचं चित्र दिसत आहे. शिंदेग गट 6 जागांवर आघाडीवर आहे तर शरद पवार गटाने 5 जागांवर आघाडी मिळवली आहे. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     

     

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: अमोल किर्तीकर आघाडीवर

    उत्तर पश्चिम मुंबईमधून अमोल किर्तीकर 1152 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरुद्ध शिंदे गटाचे रविंद्र वायकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: मुंबईतून ठाकरे गटाच्या 'या' उमेदवाराला 10000+ ची आघाडी

    ईशान्य मुंबईमधून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे संजय दिना पाटील 10 हजार मतांनी आघाडीवर आहेत. संजय दिना पाटील यांनी 10 हजार 304 मतांनी पुढे आहेत.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: उत्तर मध्य मुंबईमधून गोयल आघाडीवर

    उत्तर मध्य मुंबईमधून भाजपाचे पियुष गोयल आघाडीवर आहेत. त्यांना 23370 मतं मिळाली असून ते 12 हजार 352 मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या भूषण पाटलांना 11 हजार 18 मतं मिळाली आहेत.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: छत्रपती संभाजीनगर ठाकरे गटाचे खैरे तिसऱ्या क्रमांकावर

    छत्रपती संभाजीनगरमधून एमआयएमचे इम्तियाज जलील हे 19745 मतांनी आघाडीवर आहेत. ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरेंना 11439 मतं मिळाली असून ते तिसऱ्या स्थानी आहेत. शिंदे गटाचे संदीपान भूमरे 16460 मतांसहीत दुसऱ्या स्थानी आहेत.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates:  माढ्यात मोहिते पाटील आघाडीवर; तर बुलढाण्यात शिंदे गटाची आघाडी

    माढा लोकसभा मतदारसंघातून मोहिते पाटील 9 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर बुलढाण्यामध्ये दुसऱ्या फेरीत शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव 286 मतांनी आघाडीवर आहेत.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: भिवंडीत शरद पवार गटाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर

    भिवंडी मतदारसंघात कपिल पाटील 2653 मतांनी आघाडीवर असून दुसऱ्या क्रमांकावर निलेश सांबरे असून शरद पवार गटाचे बाळ्यामामा तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: उज्वल निकम आघाडीवर

    उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून उज्वल निकम पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत. 2697 मतांनी निकम आघाडीवर आहेत.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: राहुल शेवाळे आघाडीवर

    दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातून राहुल शेवाळे आघाडीवर आहेत. राहुल शेवाळे यांना 10162 मतं मिळाली असून अनिल देसाईंना 3746 मतं मिळाली आहेत.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: दुसऱ्या फेरीअखेरीस सुनील तटकरे आघाडीवर

    रायगड - दुसऱ्या फेरीअखेरीस सुनील तटकरे 5 हजार 400 मतांनी आघाडीवर आहेत.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: नगरमध्ये सुजय विखे पाटील आघाडीवर

    अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे पाटील आघाडीवर आहेत. 190 मतांनी सुजय विखे आघाडीवर असून शरद पवार गटाच्या निलेश लंकेंना 18254 मतं पडली आहेत. सुजय विखे पाटील यांना 18444 मतं मिळाली आहेत.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: शिर्डीमधून महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर

    शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर आहेत. तिसऱ्या फेरीनंतर भाऊसाहेब वाकचौरे 5500 मतांनी आघाडीवर आहेत. संगमनेर, अकोले आणि कोपरगावमध्ये वाकचौरे यांना आघाडी मिळाली आहे.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: प्रकाश आंबेडकर पिछाडीवर; काँग्रेस उमेदवार आघाडीवर

    अकोल्यातून प्रकाश आंबेडकर पिछाडीवर. दुसऱ्या फेरीत काँग्रेसचे अभय पाटील आघाडीवर आहेत.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: नागपूरमधून नितीन गडकरी 11 हजार मतांनी आघाडीवर

    नागपूरमधून नितीन गडकरींना पहिल्या काही फेऱ्यांमध्ये 40,644 मतं पडली असून विकास ठाकरेंना 29625 मतं मिळाली आहेत. नितीन गडकरी 11 हजार मतांनी आघाडीवर आहेत.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: सुप्रिया सुळे 6941  मतांनी आघाडीवर; सुनेत्रा पवार पिछाडीवर

    बारामतीमधून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे 6941 मतांनी आघाडीवर आहेत. अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत. 

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: शरद पवार गटाचे अमोल कोल्हे 9553 मतांनी आघाडीवर

    शिरुर मतदारसंघातून दुसऱ्या फेरीच्या अखेर अमोल कोल्हेंना 9553 मतांची आघाडी मिळाली आहे. या मतदारसंघातून अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर पडले आहेत.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: रायगडमधून सुनील तटकरे आघाडीवर

    रायगडमधून सुनील तटकरेंनी आघाडी घेतली आहे. ठाकरे गटाचे अनंत गिते पिछाडीवर पडल्याचं चित्र दिसत आहे.

     

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: साताऱ्यात उदयराजे पिछाडीवर; शरद पवार गटाचा उमेदवार आघाडीवर

    साताऱ्यामध्ये भाजपाचे उदयनराजे भोसले पिछाडीवर पडले असून शरद पवार गाटचे उमेदवार शशिकांत शिंदे आघाडीवर आहेत.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: बीडमधून पंकजा मुंडे पिछाडीवर

    बीडमधून शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे आघाडीवर असून पंकजा मुंडे पिछाडीवर पडल्या आहेत.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: 44 ठिकाणाचे प्राथमिक कल हाती

    44 ठिकाणाचे प्राथमिक कल हाती आले आहेत. महाविकास आघाडी 22 जागांवर आघाडीवर दिसत आहे. दुसरीकडे महायुतीच्या उमेदवारांनाही 22 जागांवर आघाडी मिळाल्याचं दिसत आहे.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: सांगलीमध्ये विशाल पाटील आघाडीवर

    सांगलीमधून अपक्ष उमेदवार असलेले विशाल पाटील आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. 

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: नारायण राणे 700 मतांनी आघाडीवर

    रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नारायण राणे 700 मतांनी आघाडीवर आहेत. ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत पिछाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: पंकजा मुंडे आघाडीवर; रावेरमधून रक्षा खडसेंची आघाडी

    बीडमधून पंकजा मुंडेंनी प्राथमिक कलामध्ये आघाडी घेतल्याचं चित्र दिसत आहे तर दुसरीकडे रावेरमधून रक्षा खडसे आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. 

     

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: दिंडोरीमधून केंद्रीय मंत्री भारती पवार पिछाडीवर

    दिंडोरीमधून भास्कर भगरे आघाडीवर असून केंद्रीय मंत्री भारती पवार पिछाडीवर पडल्याचं चित्र दिसत आहे.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: गिते आघाडीवर; तटकरे पिछाडीवर

    रायगडमधून ठाकरे गटाचे अनंत गिते आघाडीवर असून अजित पवार गटाचे सुनील तटकरे प्राथमिक कलामध्ये पिछाडीवर दिसत आहेत. 

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: सोलापूरमधून प्रणिती शिंदे आघाडीवर

    सोलापूरमधून प्रणिती शिंदे आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. महायुतीचे राम सातपुते पिछाडीवर पडले आहेत.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: मुंबईचे प्राथमिक कल - अरविंद सावंत, संजय दिना पाटील आघाडीवर

    दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. उत्तर-पूर्व मुंबई संजय दिना पाटील आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. दक्षिण-मध्य मुंबईतून राहुल शेवाळे आघाडीवर असल्याचं प्राथमिक कल सांगतात. 

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: कोल्हापूरातून शाहू महाराज तर रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नारायण राणे आघाडीवर

    माढामधून धैर्यशिल मोहिते पाटील आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोल्हापूरमधून शाहू महाराज आघाडीवर आहेत. सिंधूदूर्ग-रत्नागिरीमधून नारायण राणे आघाडीवर असल्यांचं चित्र पाहायला मिळत आहे.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: पुण्यात भाजपाचे उमेदवार आघाडीवर; CM शिंदेंचे पुत्रही आघाडीवर

    पुण्यातून भाजपाचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर असल्याचं चित्र प्राथमिक कलांमध्ये दिसत आहे. कल्याणमध्येही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: मावळ, जालन्यातून महायुतीचे उमेदवार आघाडीवर

    मावळ मतदारसंघातील पोस्टल मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. तसेच जालन्यामधून महायुतीचे रावसाहेब दानवे आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: चंद्रकांत खैरे आघाडीवर तर मुनगंटीवार पिछाडीवर

    छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे टपाली मतांमध्ये आघाडीवर आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर आहेत.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: बारामतीमधून पहिला कल हाती; सुप्रिया सुळे आघाडीवर

    बारामतीमधून पाहिला कल हाती आला असून पोस्टल मतदानामध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

  • Mumbai Lok Sabha Election 2024 Result Live Updates: मुंबईतील पहिले कल हाती

    उत्तर मुंबई मतदारसंघातून पियूष गोयल आघाडीवर असल्याचे प्राथमिक कल समोर आले आहेत.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: महाराष्ट्रातील पहिले कल हाती; भाजपा आघाडीवर

    राज्यातल्या पहिल्या दोन जागांचे कल हाती आले आहेत. महाराष्ट्रामध्ये दोन जागांवर भाजपा आघाडीवर असल्याचं प्राथमिक कल दर्शवत आहे.

     

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: मतमोजणीला सुरुवात! राज्यातील पहिला कल लवकरच हाती येणार

    महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांमधील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्यांदा पोस्टल व्होट्सची मोजणी करण्यात येणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

  • Kalyan Lok Sabha Election 2024 Result Live Updates: कल्याण मतदारसंघात मतदान वाढल्याने तर्क-वितर्कांना उधाण

    कल्याण लोकसभा मतदारसंघात 20 लाख 18 हजार 958 मतदार होते त्यामध्ये 50.12 टक्के मतदान झालं. म्हणजेच 10 लाख 43 हजार 610 मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला. मतदानाची टक्केवारी वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून या लोकसभा मतदारसंघातील निकालाबाबत विविध तर्क-वितर्क लढवले जात असले तरी ही लढत एकतर्फी किंवा चुरशीची होते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होणार असून त्यानंतर विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. या मतदानसंघातून मुख्यमंत्री सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात असून त्यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर उभ्या आहेत.

  • Kalyan Lok Sabha Election 2024 Result Live Updates: कल्याणमध्ये मतमोजणीच्या 29 फेऱ्या, 84 टेबल अन् 600 अधिकारी

    कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदानाची मोजणी 29 फेऱ्यामध्ये होणार असून यासाठी 84 टेबलवर एकाच वेळी मोजणी सुरु केली जाणार आहे. मतमोजणीसाठी 600 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून पोलीस यंत्रणा देखील सज्ज ठेवण्यात आली आहे. मुख्यमंत्री सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे आहे. श्रीकांत शिंदे यांच्यासमोर ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचं आवाहन आहे.

  • Yavatmal Washim Lok Sabha Election 2024 Result Live Updates: यवतमाळ-वाशिममध्ये मतमोजणीसाठी 800 कर्मचारी; विशेष सुरक्षा

    यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. 800 कर्मचारी यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील केंद्रांवर मतमोजणीचं काम करणार आहे. मतदानकेंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला असून मतमोजणी असलेल्या शासकीय धान्य गोदाम मार्गावरील वाहतूक देखील एकेरी करण्यात आलेली आहे. 

  • Chandrapur Lok Sabha Election 2024 Result Live Updates: चंद्रपूरमध्ये 400 कर्मचारी करणार मतमोजणी; केंद्राला ट्रीपल लेअर सिक्युरिटी

    देशातील लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. सकाळी सातपासून पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली असून मुख्य मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून सुरु होणार आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील मतमोजणीसाठी 84 टेबल वर ईव्हीममधील मतमोजणी होईल तर 20 टेबलवर पोस्टल बलेटची मतमोजणी होणार आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात मतमोजणीच्या एकूण 31 फेऱ्या होणार आहेत. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात काँग्रेस विरूद्ध भाजपा अशी थेट लढत पहायला मिळणार आहे.

  • Bhandara-Gondiya Lok Sabha Election 2024 Result Live Updates:

    देशातील लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. सकाळी सातपासून पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली असून मुख्य मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून सुरु होणार आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील मतमोजणीसाठी 84 टेबल वर ईव्हीममधील मतमोजणी होईल तर 20 टेबलवर पोस्टल बलेटची मतमोजणी होणार आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण 31 फेऱ्या होणार आहेत. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात काँग्रेस विरूद्ध भाजपा अशी थेट लढत पहायला मिळणार आहे.

  • Kalyan Lok Sabha Election 2024 Result Live Updates: कल्याणमधून मशालच लोकसभेत जाणार; वैशाली दरेकर

    कल्याण मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदेंविरोधात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ठाकरे गटाच्या उमदेवार वैशाली दरेकर यांनी मतमोजणी केंद्रात सकाळीच दाखल झाल्या आहेत. 'जनतेनं पेपर लिहिला असल्याने धाकधूक नाही मात्र उत्सुकता कायम आहे. या मतदारसंघातून मशाल लोकसभेत जाणार,' अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी  सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नोंदवली.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates: अमरावतीमध्ये नवनीत राणा साईचरणी; सकाळीच घेतलं देवदर्शन

    अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी आज सकाळी साई मंदिरात जाऊन देवदर्शन घेतलं. नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखेडे असा थेट सामना आहे. या मतदारसंघातून प्रहार संघटनेचे दिनेश बूब तसेच वंचितकडून आनंदराज आंबेडकर निवडणूक लढवत आहे.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates: निकालाआधीच विनायक राऊतांच्या विजयाची पोस्टर

    कोकणामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरुद्ध रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडणूक लढवणारे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या विजयाचे पोस्टर्स त्यांच्या दिल्लीतील घराबाहेर झळकले आहेत. विशेष म्हणजे निकाल लागण्याआधीच कार्यकर्त्यांना विनायक राऊत यांचं अभिनंदन करणारे हे पोस्टर्स झळकावले आहेत.

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: 'शरद पवार गटाला 8 तर महाविकास आघाडीला 31 ते 32  जागा मिळतील'

    'शिरुर मतदारसंघात नक्कीच तुतारी वाजेल. शरद पवार गटाने लढवलेल्या 10 जागांपैकी किमान आठ जागा तरी निवडून येतील असा विश्वास आम्हाला आहे,' असं शिरुरमधून निवडणूक लढवणारे शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. तसेच या जागा वाढूही शकतील असंही अमोल कोल्हे म्हणाले आहेत. तसेच महाविकास आघाडीला किमान 31 ते 32 जागा मिळतील, असा विश्वासही कोल्हे यांनी व्यक्त केला आहे. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     

  • Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates: 2019 मध्ये कसा लागलेला लोकसभा निवडणुकीचा निकाल?

    2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने लढवलेल्या 25 जागांपैकी 23 जागांवर विजय मिळवला होता. दरम्यान, भाजपाचा पूर्वीचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने 23 पैकी 18 जागा जिंकल्या होत्या. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी आघाडीतील घटकपक्ष म्हणून 19 जागा लढवून 4 विजय मिळवले. 2019 च्या लोकसभा निकालाने लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील भाजपचे वर्चस्व अधोरेखित केले होते.

  • Mumbai Election Result Live Updates: मुंबईच्या प्रवेशद्वारांवर पोलिसांचा जागता पहारा

    लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत प्रवेश करणाऱ्या वेगवेगळ्या मार्गांवर नाकाबंदी आणि वाहनांची तपासणी रात्रीपासूनच सुरु आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारांवर सुरक्षेत मोठ्याप्रमाणात वाढ करण्यात आली आहे. ही दृष्यं इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील आहेत.

  • Mumbai Election Result Live Updates: मतमोजणी केंद्रांवर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त

    मुंबईसहीत राज्यातील सर्वच मतमोजणी केंद्रांवर सोमवार रात्रीपासूनच कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. या ठिकाणी मोठ्याप्रमाणात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. विक्रोळीमधील मतदान केंद्रावरील ही दुष्यं...

  • पाचवा टप्पा ठरला मतदानाचा सर्वात मोठा टप्पा

    महाराष्ट्रातील मतदानाचा पाचवा टप्पा हा सर्वात जास्त मतदारसंघ असलेला टप्पा ठरला. 20 मे रोजी झालेल्या मतदानामध्ये या टप्प्यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाण्यासहीत मुंबईतील सहा मतदारसंघांचा समावेश होता. मुंबईतील उत्तर मुंबई , उत्तर-पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर – मध्य मुंबई, दक्षिण – मध्य मुंबई, दक्षिण मुंबई या सहा मतदारसंघांमध्ये शेवटच्या टप्प्यात मतदान झालं.

  • चौथ्या टप्प्यात पुण्यासहीत 11 मतदारसंघांमध्ये झालं मतदान

    चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडलं होतं. या टप्प्यात एकूण 11 मतदारसंघांचा समावेश होता. ज्यामध्ये नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी तसेच बीड मतदारसंघाचा समावेश होता.

  • 7 मे रोजी 11 मतदारसंघांत पार पडलेलं तिसऱ्या टप्प्यातील मतदान

    तिसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 11 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं होतं. या टप्प्यामध्ये 7 मे रोजी रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगलेमध्ये मतदान झालं होतं.

  • दुसऱ्या टप्प्यात 8 मतदारसंघांमध्ये मतदान

    राज्यातील दुसऱ्या टप्प्यात एकूण 8 मतदारसंघांमध्ये 26 एप्रिल रोजी मतदान झालं होतं. या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी मतदारसंघांमध्ये मतदान झालं.

  • पहिल्या टप्प्यात 5 मतदारसंघांमध्ये 55.29 टक्के मतदान

    महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी पार पडलं होतं. या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं होतं. 55.29 टक्के मतदान या पाच मतदारसंघांमध्ये झालं होतं.

  • नमस्कार वाचकांनो, महाराष्ट्रामध्ये 19 एप्रिल ते 20 मे अशा जवळपास महिन्याभराहून अधिक काळ पार पडलेल्या पाच टप्प्यांमधील मतदानानंतर आज निकाल जाहीर होत आहेत. महाराष्ट्रातील या निकालांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. याच निकालाचे सर्व अपेट्स आपण या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link