Maharashtra Lok Sabha Winner List: कोण आहेत महाराष्ट्राचे नवे 48 खासदार? वाचा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

Maharashtra Lok Sabha Winner List: महाराष्ट्रातील 48 जागांवर नेमका काय निकाल लागला आहे याची संपूर्ण यादी एका क्लिकवर जाणून घ्या.   

शिवराज यादव | Updated: Jun 5, 2024, 04:19 PM IST
Maharashtra Lok Sabha Winner List: कोण आहेत महाराष्ट्राचे नवे 48 खासदार? वाचा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी title=

Maharashtra Lok Sabha Winning Candidates List: लोकसभा निवडणुकीत देशात अनपेक्षित निकाल लागले आहेत. एनडीएला 300 जागांचा आकडा पार करणंही कठीण झालं आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीने मोठी मजल मारली आहे. महाराष्ट्रातही अनेक अनपेक्षित आणि आश्चर्यचकित करणारे निकाल लागले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीमधील फुटीनंतर महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोप आणि भावनिक राजकारण करण्यात आलं असून या सर्व घडामोडींनंतर महाराष्ट्र नेमका कोणाच्या पाठीशी उभा राहतो याची सर्वांना उत्सुकता होती. दरम्यान महाराष्ट्रातील 48 जागांवर नेमका काय निकाल लागला आहे याची संपूर्ण यादी एका क्लिकवर जाणून घ्या. 

ठाकरे गटाने महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक 21 जागा लढवल्या. तर काँग्रेसने 17 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने 10 जागा लढवल्या. महायुतीमध्ये भाजपाने सर्वाधिक 23 जागा लढवल्या. शिंदे गट 15 आणि अजित पवार 4 जागांवर लढला आहे. 

 

  लोकसभा मतदारसंघ विजयी उमेदवार पराभूत उमेदवार
       
1 सातारा उदयनराजे भोसले (भाजपा) शशिकांत शिंदे (ठाकरे गट)
2 दक्षिण मुंबई अरविंद सावंत (ठाकरे गट) यामिनी जाधव (शिंदे गट)
3 दक्षिण मध्य मुंबई अनिल देसाई (ठाकरे गट) राहुल शेवाळे (शिंदे गट)
4 जळगाव स्मिता वाघ (भाजपा) करण पवार (महाविकास आघाडी)
5 शिर्डी भाऊसाहेब वाकचौरे (ठाकरे गट) सदाशिव लोखंडे (शिंदे गट)
6 उत्तर मध्य मुंबई पियूष गोयल (भाजपा) भूषण पाटील (काँग्रेस)
7 रायगड सुनील तटकरे (राष्ट्रवादी अजित पवार) अनंत गीते (महाविकास आघाडी)
8 सांगली विशाल पाटील (अपक्ष) चंद्रहार पाटील, संजयकाका पाटील
9 नागपूर नितीन गडकरी (भाजपा) विकास ठाकरे (काँग्रेस)
10 पुणे मुरलीधर मोहोळ (भाजप) रवींद्र धंगेकर, वसंत मोरे
11 रत्नागिरी-सिंधुदुर्ग नारायण राणे (भाजप) विनायक राऊत (महाविकास आघाडी)
12 बुलढाणा प्रतापराव जाधव (महायुती) नरेंद्र खेडेकर (महाविकास आघाडी)
13 नंदुरबार गोवाल पाडवी (महाविकास आघाडी) हिना गावित (महायुती)
14 धुळे शोभा बच्छाव (महाविकास आघाडी) सुभाष भामरे (महायुती)
15 रावेर रक्षा खडसे (महायुती) रवींद्र पाटील (महाविकास आघाडी)
16 अकोला अतुल धोत्रे (महायुती)  अभय पाटील (महाविकास आघाडी)
17 अमरावती बळवंत वानखेडे (काँग्रेस) नवनीत राणा (भाजप) 
18 वर्धा  अमर काळे (राष्ट्रवादी शरद पवार गट) रामदास तडस (भाजप)
19 रामटेक रश्मी बर्वे (काँग्रेस) राजू पारवे (महायुती)
20 भंडारा-गोंदिया डॉ. प्रशांत पडोले (काँग्रेस) सुनील मेंढे (महायुती)
21 गडचिरोली-चिमूर डॉक्टर नामदेव किरसान (काँग्रेस) अशोक नेते (महायुती)
22 चंद्रपूर प्रतिभा धानोरकर (काँग्रेस) सुधीर मुनगंटीवार (भाजप)
23 यवतमाळ - वाशिम संजय देशमुख (शिवसेना उद्धव ठाकरे गट) राजश्री पाटील (महायुती)
24 हिंगोली नागेश आष्टीकर  (शिवसेना उद्धव ठाकरे गट) बाबूराव कदम (महायुती)
25 नांदेड बाबूराव कदम (काँग्रेस) प्रताप पाटील चिखलीकर (महायुती)
26 परभणी संजय जाधव (महायुती)  महादेव जानकर (महाविकास आघाडी
27 जालना कल्याण काळे (काँग्रेस) रावसाहेब दानवे (महायुती)
28 औरंगाबाद संदीपान भुमरे (शिंदे गट) इम्तियाज जलील, चंद्रकांत खैरे
29 दिंडोरी भास्कर भगरे (राष्ट्रवादी शरद पवार) डॉ. भारती पवार (महायुती)
30 नाशिक राजाभाऊ वाजे (शिवसेना उद्धव गट) हेमंत गोडसे (शिंदे गट)
31 पालघर  हेमंत सावरा (महायुती)  भारती कामडी (महाविकास आघाडी)
32 भिवंडी सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे (राष्ट्रवादी शरद पवार) कपिल पाटील (महायुती)
33 कल्याण  श्रीकांत शिंदे (शिंदे गट) वैशाली दरेकर (ठाकरे गट)
34 ठाणे नरेश म्हस्के (महायुती) राजन विचारे (महाविकास आघाडी)
35 मुंबई-उत्तर पश्चिम रवींद्र वायकर (महायुती)  अमोल किर्तीकर (महाविकास आघाडी)
36 मुंबई ईशान्य संजय दिना पाटील (महाविकास आघाडी) मिहीर कोटेचा (महायुती)
37 मुंबई उत्तर मध्य  वर्षा गायकवाड (काँग्रेस) उज्ज्वल निकम (महायुती)
38 मावळ श्रीरंग बारणे (महायुती) संजोग वाघेरे (महाविकास आघाडी)
39 बारामती सुप्रिया सुळे (महाविकास आघाडी) सूनेत्रा पवार (महायुती)
40 शिरुर अमोल कोल्हे (राष्ट्रवादी शरद पवार) शिवाजी आढळराव पाटील (महायुती)
41 अहमदनगर निलेश लंके (राष्ट्रवादी शरद पवार) निलेश लंके (महायुती)
42 बीड बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी शरद पवार) पंकजा मुंडे (भाजप)
43 धाराशीव ओमराजे निंबाळकर (महाविकास आघाडी) अर्चना पाटील (महायुती)
44 लातूर  शिवाजीराव काळगे (महाविकास आघाडी) सुधाकर श्रृंगारे (महायुती)
45 सोलापूर प्रणिती शिंदे (काँग्रेस) राम सातपुते (भाजपा)
46 माढा धैर्यशील मोहिते पाटील (राष्ट्रवादी शरद पवार) धैर्यशील मोहिते पाटील (महायुती)
47 कोल्हापूर शाहू महाराज छत्रपती (काँग्रेस) संजय मंडलिक (शिंदे)
48 हातकणंगले धैर्यशील माने (शिवसेना शिंदे गट) सत्यजीत पाटील (महाविकास आघाडी)

 

महाराष्ट्रात कोणाला किती जागा?

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 आणि महायुतीला 17 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसला सर्वाधिक 13 जागा मिळाल्या. उद्धव ठाकरेंच्या पक्षाने 9 तर शरद पवार यांच्या पक्षाने 8 जागांवर विजय मिळवला. भाजपाला 9, शिंदे गटाला 7 आणि अजित पवार गटाला एका जागेवर विजय मिळाला. सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी बाजी मारली.