Shiv Sena Symbol LIVE Updates : सत्तासंघर्षाची सुनावणी संपली, सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला

Thu, 16 Feb 2023-2:30 pm,

Shiv Sena Symbol Hearing Updates : महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्षाची ( Maharashtra political crisis) सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. शिवसेना (Shiv Sena) पक्ष शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण (Dhanushyaban) आणि 16 आमदारांच्या पात्रतेचा मुद्द्याबाबत सुप्रीम कोर्टात फैसला काय होणार याची उत्सुकता आहे.

Shiv Sena Symbol Row Hearing Updates : महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्षाची  ( Maharashtra political crisis) सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे.  ( Maharashtra political News) शिवसेना (Shiv Sena) पक्ष  शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण (Dhanushyaban)आणि 16 आमदारांच्या पात्रतेचा मुद्द्याबाबत सुप्रीम कोर्टात फैसला काय होणार याची उत्सुकता आहे.  (Shiv Sena Symbol)  

Latest Updates

  • Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates :  शिंदे आणि ठाकरे गटाचे युक्तीवाद संपले. सुप्रीम कोर्टानं निर्णय राखीव ठेवला.

  • Shiv Sena Symbol Row Hearing Updates : आजची सुनावणी संपली, सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला 

  • Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates :  नबाम रेबिया प्रकरण या खटल्याला लागू होऊ शकत नाही, कपिल सिब्बल यांचा कोर्टात दावा. आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ नये म्हणून अविश्वास प्रस्ताव आणला, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. विधानसभा अध्यक्षांचे अधिकार मोडीत काढण्याचा प्रकार

  • Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates :  सरकार आणि विरोधकांमध्ये बुद्धिबळाचा खेळ सुरू होता. दोघांनाही एकमेकांच्या चाली माहिती होत्या, कोर्टाने काढला चिमटा. 
     

  • Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates :  आमदार विलीन झाले, तरी मूळ पक्ष तसाच राहतो, कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. राजस्थानच्या केसचा दिला दाखला.
    - सुनील प्रभू यांनी जारी केलेल्या व्हीपचे आमदारांकडून उल्लंघन. त्यांनी भाजप उमेदवाराला मतदान केले, सिब्बल यांचा युक्तिवाद.
    - दहाव्या सूचीचा वापर सरकार पाडण्यासाठी होऊ नये, सिब्बल यांचा कोर्टात युक्तिवाद.
    - दहाव्या सूचीत बहुमताला महत्त्व असा काही नियम नाही, कपिल सिब्बल यांचा न्यायालयात युक्तिवाद.
    - शिंदे गटाचे आमदार 34 असले, तरी त्यांच्यासमोर विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही. सिब्बल यांचा दावा.
    - महाराष्ट्राच्या केसचा परिणाम भविष्यावर होणार, कपिल सिब्बल यांचा न्यायालयात युक्तिवाद.

  • Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates :  ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून लोकसभेच्या नियमाचे सर्वोच्च न्यायालयात वाचन सुरु. लोकांना विकत घेऊन महाराष्ट्रातले महाविकास आघाडी सरकार पाडले, कपिल सिब्बल यांचा न्यायालयात युक्तिवाद. 
    - गुवाहटीत बसून महाराष्ट्र सरकारसंदर्भात निर्णय होऊ शकत नाही, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद.
    - आमदार विलीन झाले, तरी मूळ पक्ष तसाच राहतो, कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. राजस्थानच्या केसचा दिला दाखला.

  • Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates :  आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ नये म्हणून अविश्वास प्रस्ताव आणला. नबाम राबिया प्रकरण लागू होऊ शकत नाही.  शिंदे गटाचे आमदार 34 असले तरी त्यांच्याकडे विलीकरणा शिवाय पर्याय नाहीत, असा जोरदार युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला. कपिल सिब्बल यांच्याकडून लोकसभेच्या नियंमांचे वाचन सुरु झाले.

  • Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates : नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षांचे अधिकार उपाध्यक्षांकडे गेले  - ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल

  • Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates : महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारने बहुमत चाचणीला सामोरं जायला हवं होतं, शिंदे गटाकडून जेठमलानींचा युक्तिवाद. मध्यप्रदेशातील सत्तासंघर्षाचाही दाखला

  • Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates : CJI : नबाम रेबियाचा संदर्भ का घेऊ नये असे तुम्हाला वाटते? जेठमलानी - 28 जून रोजी राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट करण्याचे आदेश दिले. स्पीकर पूर्वग्रह दूषित होते, अधिकाराचा  अपात्रतेच्या वापर केला गेला.

  • Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates : महेश जेठमलानी - विधीमंडळाचे सदस्याचं सदस्यत्व कसं रद्द होतं याबाबत महेश जेठमलानी यांचा युक्तीवाद. आमदारांचं सदस्यत्व रद्द करताना त्यांना 7 दिवसांचा वेळ द्यायला हवा होता. सर्वोच्च न्यायालय - आम्ही तो वेळ दिला होता.

  • Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates :  अ‍ॅड ​जेठमलानी - शिंदे यांच्या मुलांचे कार्यालय जाळण्यात आले आणि आम्हाला सांगण्यात आले की आम्ही मुंबईत आलो तर आमचे मृतदेह स्मशानभूमीत पाठवले जातील.  म्हणूनच आम्ही गुवाहाटीला गेलो.

  • Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates : जस्टीस शाह -  घटनाक्रम आता सांगू नका. ते आम्हाला सगळे माहिती आहे. थेट नबाम राबियाबद्दल आणि ती केस कशी लागू आहे हे केवळ सांगा असे जस्टीस शाह यांनी एका मिनिटात थांबवून अ‍ॅड जेठमलानी यांना सांगितले. दरम्यान,  शिंदे गटाचे वकील हरिश साळवे आणि नीरज किशन कौल यांचे युक्तिवाद फेटाळून लावत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेनेत फूटच पडली नसल्याचा दावा केला आहे.  फूट शिवसेनेत नव्हे, सभागृहात पडलीय; नबाम राबिया प्रकरण कसं लागू होईल?; ठाकरे गटाचा जोरदार युक्तिवाद

  • Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates : आमची भूमिका कोर्टात आम्ही मांडली. पाच न्यायमूर्ती की सात न्यायमुर्ती व्हावी याचा न्यायालय निर्णय धेतील ते मान्य असेल. कोर्टाचा विषय आज काय होतो हे पाहावे लागेल. त्यावर अधिक भाष्य करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाने नेते अनिल देसाई यांनी दिली आहे.  

  • सत्तासंघर्षाच्या निकालासाठी आणखी वाट पाहावी लागणार

    Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates : राज्यातल्या सत्तासंघर्षाची सुनावणी 7 जजेसच्या बेंचकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तासंघर्षाच्या निकालासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. ठाकरे गटानं हे प्रकरण 7 जजेसच्या बेंचकडे पाठवण्याची विनंती केली होती. 7 जजेसच्या बेंचकडे आधी नबम रेबिया प्रकरणावर समीक्षा होईल. नंतर अपात्र आमदारांचा मुद्दा घेतला जाईल. या प्रक्रियेला 8 महिने लागण्याची शक्यता आहे. 

  • Shiv Sena Symbol Row SC Hearing Updates : राज्यातल्या सत्तासंघर्षाची सुनावणी 7 जजेसच्या बेंचकडे जाण्याची शक्यता. निर्णय प्रक्रियेला 8 महिने लागण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

  • Shiv Sena Symbol Row SC Hearing LIVE Updates :   राज्यातल्या सत्तासंघर्षावर (Shiv Sena Symbol)  काल दुसऱ्या दिवशीचा (Shiv Sena) युक्तीवाद संपला होता. शिंदे गटाकडून कील हरिश साळवे आणि नीरज कौल यांनी युक्तीवाद केला. आज मनिंदर सिंग बाजू मांडणार आहेत.  

  • Shiv Sena Symbol Row LIVE Updates :  राज्यातल्या सत्तासंघर्षावर (Shiv Sena Symbol)  आज तिसऱ्या नियमित सुनावणी (Shiv Sena) सुरु झाली आहे. काल दुसऱ्या दिवशी शिंदे गटाचे वकील हरिश साळवे (Harish Salve) युक्तिवाद केला. अविश्वास ठराव असताना (Maharashtra Political Crisis) विधानसभा अध्यक्षांना आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार (Shiv Sena symbol Supreme Court) नसल्याचं महत्त्वाचं विधान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी यावेळी केले. (Shiv Sena Symbol Row SC Hearing LIVE Updates Shiv Sena Symbol Row Hearing Today 15 February Supreme Court to hear Shinde vs Thackeray dispute Harish Salve Kapil Sibbal) आज ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल युक्तीवाद करणार आहे. सात जणांच्या घटनापिठाकडे सुनावणी द्या, अशी ठाकरे गटाची मागणी आहे.

  • Maharashtra political crisis : सत्तासंघर्षावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सूचक ट्विट केले आहे.महाराष्ट्रात राजकीय भूकंप येणार? अशा आशयाचं ट्विट पवारांनी केलंय...मुंबईत काही सहकारी आमदारांची भेट घेतली असता शिंदे गटाच्या आमदारांच्या चेह-यावर अस्वस्थता आणि बॉडी लँग्वेज दिसून आली...सत्ताधारी असूनही काही आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटता येत नसल्याचं समजल्याचं ट्विटमध्ये म्हटले आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link