VidhanParishad Election Live Updates: जयंत पाटील यांच्या पराभवाचं आम्हालाही दु:ख - अंबादास दानवे

नेहा चौधरी Fri, 12 Jul 2024-8:56 pm,

Maharashtra Vidhan Parishad Nivadnuk Live Updates: महाराष्ट्रामध्ये आजचा दिवस विधानसभेच्या अधिवेशनामुळे गाजण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे देशभरातील वेगवेगळ्या घडामोडींसहीत परदेशातील घडामोडींवरही या ब्लॉगच्या माध्यमातून आपलं लक्ष राहणार आहे. जाणून घ्या क्षणोक्षणाच्या अपडेट्स...

Maharashtra Vidhan Parishad Nivadnuk Live Updates: महाराष्ट्रामध्ये आजचा दिवस विधानसभेच्या अधिवेशनामुळे गाजण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे देशभरातील वेगवेगळ्या घडामोडींसहीत परदेशातील घडामोडींवरही या ब्लॉगच्या माध्यमातून आपलं लक्ष राहणार आहे. जाणून घ्या क्षणोक्षणाच्या अपडेट्स...

Latest Updates

  • VidhanParishad Election Live Updates: जयंत पाटील यांच्या पराभवाचं दुख: - अंबादास दानवे

    - आज अधिवेशन संपलं. 
    - हे अधिवेशन फक्त घोषणांचं ठरलं. 
    - हे मुख्यमंत्री झाल्यापासून या राज्यात 6000 आत्महत्या शेतकऱ्यांच्या झाले आहेत. 
    - शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नाही. 
    - यांना कृषीचा कोणता भूषण मिळाला पुरस्कार. हे तपासले पाहिजे.
    - शेतकऱ्यांचे हित राज्यात साधलं जात नाही 
    - फक्त वैयक्तिक हेच साधलं जातं 
    - लाडकी बहीण योजना आणली. मात्र सर्वाधिक अत्याचार महाराष्ट्रात होत आहेत
    - हे रोज संविधानाची हत्या करतात. भाजप रोज संविधानाची हत्या करतं
    - आमची कोणती गणित चुकली नाहीत. 
    - आमची आम्हाला सर्व मतं मिळाली आहेत. 
    - जर गणित लावलं तर गणित अपेक्षा जास्त मतं आम्हाला मिळाली आहेत. 
    - जयंत पाटील महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे नेतृत्व त्यांच्या पराभवाचे दुःख आम्हाला आहे.

  • VidhanParishad Election Live Updates: ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर विजयी, शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव

     

  • VidhanParishad Election Live Updates: सदाभाऊ खोत विधान परिषदेत विजयी

     

  • VidhanParishad Election Live Updates: आतापर्यंत काय स्थिती?

    योगेश टिळेकर - २६ - टिळेकर विजयी

    भाजप
    प्रज्ञा सातव - २५ विजयी

    कॉंग्रेस
    अमित गोरखे - २६ - विजयी

    भाजप
    पंकजा मुंडे - २६ - विजयी

    भाजप
    कृपाल तुमाने - २५ विजयी

     

    मिलिंद नार्वेकर - २२ -
    परिणय फुके - २६ - विजयी

     

    भाजप
    शिवाजीराव गर्जें - २४ विजयी

     

    राष्ट्रवादी अजित पवार

    जयंत पाटील - १२
    भावना गवळी - २४ विजयी

     

    शिवसेना शिंदे गट

     

    राजेश विटेकर - २३
    सदाभाउ खोत -१४ 

  • VidhanParishad Election Live Updates: पंकजा मुंडे विधान परिषदेत विजयी

     

  • VidhanParishad Election Live Updates: आतापर्यंत काय स्थिती?

    योगेश टिळेकर - २३ - टिळेकर विजयी

    प्रज्ञा सातव - १९
    अमित गोरखे - २२
    पंकजा मुंडे - १८
    कृपाल तुमाने - १६
    मिलिंद नार्वेकर - १७
    परिणय फुके - २०
    शिवाजीराव गर्जें - २०
    जयंत पाटील - ६
    भावना गवळी - १०
    राजेश विटेकर - २१
    सदाभाऊ खोत -१०

     

  • VidhanParishad Election Live Updates: पहिला निकाल हाती, भाजपाचे योगेश टिळेकर विजयी

  • VidhanParishad Election Live Updates: कोणाला किती मतं?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    योगेश टिळेकर - 11
    प्रज्ञा सातव - १०
    अमित गोरखे - १
    पंकजा मुंडे - ६
    कृपाल तुमाने ३ मतं
    मिलिंद नार्वेकर - ८
    परिणय फुके - ३
    शिवाजीराव गर्जेंना -
    जयंत पाटील - १

    भावना गवळी - ४
    राजेश विटेकर - ४
    सदाभाउ खोत - १ मत

  • VidhanParishad Election Live Updates: कोणाला किती मतं?

    पहिलं मत भाजपच्या योगेश टिळेकरांना
    दुसरं मत राष्ट्रवादीच्या शिवाजीराव गर्जेंना
    तिसरं मत काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना
    चार मतं घेऊन मिलिंद नार्वेकर आघाडीवर

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    प्रज्ञा सातव यांना 7 मतं

     

  • विधान परिषदेसाठी मतमोजणी सुरु; 11 जागांसाठी 12 उमेदवार

     

  • मला माझ्या मताची किंमत कळली आहे  - हितेंद्र ठाकूर 

    - मी काही ठिकाणी अडकलो होतो त्यामुळे आता उशीर आलो. पण मी मतदान केलं आहे.  

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    - बहुजन विकास आघाडीचे भवितव्य म्हणजे मला माझ्या मताची किंमत कळली आहे 

     - तशी आता मतं मी माझ्या पक्षात वाढवणार 

     - सर्व पक्ष आमच्यावर लक्ष ठेवतात 

     - विधान परिषदेच्या निवडणुकीत माझा जिल्हा माझी ताकद माझा तालुका हे माझ्यासोबत आहे 

     - धक्का कोणाला बसेल हे मला माहित नाही मी तेवढा मोठा नाही 

     - निवडणुकीत एकमेकांवर चिखल फेकला, फक्त त्याचा दर्जा ठेवावा एवढीच माझी मागणी

  • VidhanParishad Election Live Updates: सर्व आमदारांचं मतदान पूर्ण, मनसेचे राजू पाटील आणि तर बविआचे हितेंद्र ठाकूरांचे 3 आमदार शिल्लक होते

  • VidhanParishad Election Live Updates  : 4 आमदारांचं मतदान बाकी

    मनसेचे राजू पाटील, तर बविआचे हितेंद्र ठाकूरांचे 3 आमदार असे 4 आमदारांचे मतदान बाकी आहे

     

  • VidhanParishad Election Live Updates  : मोठी बातमी! अजित पवार आणि जयंत पाटलांची भेट 

    विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटलांची भेट झाली. यावेळी दोन्ही नेता हसत एकमेकांशी संवाद साधताना दिसून आलेत. तरदुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत आणि अजित पवार यांचीही भेट लक्षवेधी ठरली. 

  • VidhanParishad Election Live Updates  : झिशान सिद्दीकी आणि आमदार कैलास गोरंट्याल यांची गळाभेट 

    काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी आणि आमदार कैलास गोरंट्याल यांनी गळाभेट घेतलीय. झिशान सिद्दीकी यांनी मतदान केल्यानंतर गोरंट्याल यांना मिठी मारली. कालच गोरंट्याल यांनी झिशान सिद्दीकींचं नाव न घेता आरोप केला होता. काही आमदारांची मतं फुटू शकतात असा दावा गोरंट्याल यांनी केला होता. मात्र, झिशान सिद्दीकींनी या आरोपांनंतरही विधान भवनात येऊन मतदान केलंय. पक्षश्रेष्ठी सांगतील त्याला मतदान करणार असं म्हटलं.

  • VidhanParishad Election Live Updates  : मतदानावेळी ठाकरे गटाकडून खबरदारी 

    विधान परिषदेच्या मतदानावेळी ठाकरे गटाकडून खबरदारी घेण्यात आलीय. ठाकरे गटाच्या 5-5 आमदारांचा गट करून मतदान केलं जातंय. पहिल्या टप्प्यात भास्कर जाधव, प्रकाश फातर्पेकर, राजन साळवी, ऋतुजा लटके, विनोद निकोले हे मतदानासाठी गेलेत. त्यानंतर दुसरा गट मतदान करणार आहे. मतदानावेळी गोंधळ उडू नये यासाठी ठाकरे गटाकडून छोटे छोटे गट करून मतदान केलं जातंय.

  • VidhanParishad Election Live Updates  : आतापर्यंत 222आमदारांनी मतदान केले

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. भाजप आणि समर्थक असे 100 आमदारांनी मतदान केलंय. तर शिवसेना ठाकरे गटातील आमदारांचे मतदान बाकी आहे. त्यामुळे आतापर्यंत 222 आमदारांनी मतदान केलंय. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    आत्तापर्यंत झालेलं मतदान
    भाजप-100
    अपक्ष-9
    अजित पवार गट-39 + अपक्ष2= 41
    शिंदे गट-30
    काँग्रेस-30
    शरद पवार गट-12

     

  • VidhanParishad Election Live Updates  : आम्ही दोन वर्षांपासून शिंदेंसोबतच आहोत - कडू 

    आम्ही दोन वर्षांपासून शिंदेंसोबतच आहोत. त्यामुळे आमची 2 मतं शिंदेंच्या उमेदवाराला जातील अशी प्रतिक्रिया कडूंनी दिलीय. शिंदेंच्या एकाही आमदारांचं मत फुटणार नाही असा विश्वास कडूंनी व्यक्त केलाय.

     

  • VidhanParishad Election Live Updates  : विधान भवनाच्या गेटवरच नार्वेकर ठाण मांडून

    मिलिंद नार्वेकरांकडून आमदारांच्या गाठीभेटी आजही सुरू आहेत. विधान भवनाच्या गेटवरच नार्वेकर ठाण मांडून आहेत. आज त्यांनी बावनकुळे, चंद्रकांत पाटलांची भेट घेतली. मतांसाठी मिलिंद नार्वेकरांची आजही मोर्चेबांधणी सुरू आहे.

  • VidhanParishad Election Live Updates  : सत्तेचा गैरवापर, गायकवाडांच्या मतदानावर बोट ठेवत राऊतांची टीका

    गणपत गायवाड यांच्या मतदानावरून संजय राऊतांनी टीका केलीय. गणपत गायकवाड मतदानासाठी जेलमधून येऊ शकतात. मात्र, अनिल देशमुखांना मतदानासाठी येऊ दिलं नाही...यालाच सत्तेचा गैरवापर म्हणतात असं म्हणत राऊतांनी गायकवाडांच्या मतदानावर बोट ठेवलंय...

     

  • VidhanParishad Election Live Updates  : शिंदे गटाच्या आमदारांना वाहतूक कोंडीचा फटका

    एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना वाहतूक कोंडीचा फटका बसलाय. शिंदे गटाच्या आमदारांची बस वाहतूक कोंडीत अडकलीय. वरळी सी लिंकजवळ शिंदे गटाच्या आमदारांची बस अडकली असून पावसामुळे मुंबईत वाहतूक कोंडी झालीय. 

     

  • VidhanParishad Election Live Updates  : पोलीस बंदोबस्तात गणपत गायकवाड तळोजा जेलमधून विधानभवनात

    कडक पोलीस बंदोबस्तात आमदार गणपत गायकवाड यांना विधानपरिषद मतदानासाठी तळोजा जेलमधून विधानभवनात आणण्यात आलं. मात्र  गणपत गायकवाड यांच्या मतदानाला काँग्रेसने विरोध केलाय. राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोगाचा सल्ला घेणार आहेत. 

     

  • Maharashtra Breaking News Today Updates : जरांगेंची मराठा आरक्षण जनजागृती रॅली आज जालन्यात 

    जरांगेंची मराठा आरक्षण जनजागृती रॅली आज जालन्यात होणाराय...या रॅलीच्या पार्श्वभूमीवर 6 आयोजकांना उपविभागीय पोलीस अधिका-यांकडून नोटीस पाठवण्यात आलीय...कायदा सुव्यवस्था बिघडल्यास आयोजकांना जबाबदार धरणार असं या नोटीस उल्लेख करण्यात आलाय...

     

  • Maharashtra Breaking News Today Updates : शनिवारी मनोज जरांगे पाटील यांची आरक्षण जनजागृती रॅली

    मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची आरक्षण जनजागृती रॅली उद्या संभाजीनगरमध्ये दाखल होणारेय. लाखोंचा जनसमुदाय लक्षात घेता शहरातील जालना रस्ता 7 तास बंद ठेवण्यात येणारेय. या मार्गावरील 200 पेक्षा अधिक दुकानांसह हॉटेल, बार बंद ठेवली जाणार आहेत. तर शहरातील 600 शाळा आणि 50 पेक्षा जास्त कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आलीय.

  • Mumbai Rain Live Updates  : चांदिवली नाका परिरसातही पावसामुळे रस्ते जलमय झालेत. त्यामुळे वाहनधारकांवर पाण्यातून मार्ग काढण्याची वेळ आलीये. रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूकही मंदावलीये.

  • Mumbai Rain Live Updates  : वडाळाच्या आरटीओ ऑफिस परिसरात पावसाचं पाणी साचलंय...ट्रॅफिकही जॅम झाल्याने मुंबईकरांना ऑफिसला पोहोचायला उशीर होतोय...

  • Mumbai Rain Live Updates  : मुंबईच्या पश्चिम उपनगरातही पावसाने हजेरी लावलीये...वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, बोरिवलीतही पाहाटेपासूनच पावसाची बॅटिंग सुरूये...

  • Mumbai Rain Live Updates  :  कल्याण आणि डोंबिवलीतही पहाटेपासून पावसाचा जोर वाढलाय.. यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलंय... 

  • Mumbai Rain Live Updates  : पावसामुळे याठिकाणचे रस्ते जलमय

    मुंबईत संततधार पाऊस सुरूये. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचं दिसून येतंय. चांदिवली नाका या भागातही अशीच काहीशी परिस्थिती उद्धभवलीये. पावसामुळे याठिकाणचे रस्ते जलमय झालेत. त्यामुळे वाहनधारकांवर पाण्यातून मार्ग काढण्याची वेळ आलीये. रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूकही मंदावलीये.

     

  • Mumbai Rain Live Updates : महायुतीचे 9 उमेदवार निवडून येतील - पंकजा मुंडे

    महायुतीचे 9 उमेदवार निवडून येतील असा विश्वास भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी व्यक्त केलाय. बाकी चर्चांना उत्तर देण्याची आवश्यकता नाही, 9 उमेदवार हे निश्चित निवडून येतील असं मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केलंय. पंकजा मुंडेंसह महायुतीचे 9 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे विधान भवनात दाखल झाल्यायत.

  • Mumbai Rain Live Updates : सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे ट्रॅफिक जॅम

    मुंबईत सकाळपासूनच पावसाने जोर धरलाय...वडाळाच्या आरटीओ ऑफिस परिसरात पावसाचं पाणी साचलंय...तर किंग्ज सर्कल परिसरात पाणी साचल्याने स्थानिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागतेय...दुसरीकडे ट्रॅफिकही जॅम झाल्याने मुंबईकरांना ऑफिसला पोहोचायला उशीर होतोय...

     

  • VidhanParishad Election Live Updates : मतांची व्यवस्थित जुळवाजुळव केलंय - अनिल देसाई

    मविआचे तिन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाईंनी व्यक्त केलाय...तिन्ही उमेदवारांसाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्तृत्वाने मतांची व्यवस्थित जुळवाजुळव केलीय...त्यामुळे मविआचे तिघेही उमेदवार निवडून येतील...तसंच मुंबईत पाऊस असल्याने मतदानासाठी 1 तास वाढवून द्यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आलीय...

     

  • VidhanParishad Election Live Updates : महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार जिंकतील - खोसकर

    महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार निवडून येतील असा विश्वास काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी व्यक्त केलाय. खोसकरांकडून दगाफटका होऊ शकतो असा नाव न घेता कैलास गोरंट्याल यांनी आरोप केला होता. 

     

  • Mumbai Rain Live Updates : मुंबईसह उपनगरांमध्ये पहाटेपासून जोरदार पाऊस

    मुंबईसह उपनगरांमध्ये पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु आहे. दादर, सायन, कुर्ला परिसरात पावसाची संततधार सुरु असून सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, बोरिवलीतही पावसाची बॅटिंग सुरु असल्याने तिन्ही रेल्वे मार्गांना पावसाचा फटका बसलाय. 

     

  • VidhanParishad Election Live Updates : भाजपचे उमेदवार अमित गोरखे सिद्धिविनायक मंदिरात 

    भाजपा विधान परिषद उमेदवार अमित गोरखे यांनी सिद्धीविनायक मंदिर इथं दर्शन घेऊन आजच्या होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी आशीर्वाद घेतले. 

     

  • VidhanParishad Election Live Updates : मतदानासाठी 1 तासाचा वेळ वाढवून द्यावा - नार्वेकर

    मुंबईसह उपनगरांत पावसाचा जोर वाढलाय.. त्यामुळे मतदानासाठी 1 तासाचा वेळ वाढवून द्यावा अशी मागणी मिलिंद नार्वेकरांनी केलीये.

  • VidhanParishad Election Live Updates : ठाकरे गटाचे 15 आमदार आणि एक अपक्ष आमदार एकत्र जाणार 

    परेलच्या आयटीसी हॉटेलमध्ये ठाकरे गटाचे 15 आमदार आणि एक अपक्ष आमदार आहे...मतं फुटू नये यासाठी ठाकरे गटाकडून खबरदारी घेण्यात आलीय... सगळे आमदार एकत्र मतदानासाठी जाणारेत. सकाळी साडेदहाच्या सुमारास आमदार एकत्रित बसनं विधानभवनासाठी रवाना होतील. 

     

  • Maharashtra Breaking News Live Updates : काँग्रेसचे 3 ते 4 आमदार फुटू शकतात, आमदार कैलास गोरंट्याल यांचा खळबळजनक गौप्यस्फोट 

    काँग्रेसचे 3-4 आमदार फुटू शकतात अशी शक्यता काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केलीये. तर जे डाऊटफूल आहेत त्यांचा बंदोबस्त केला जाईल असंही ते म्हणालेत. आंध्र आणि नांदेड बॉर्डरसह टोपीवाला आमदार फुटण्याची शक्यता गोरंट्याल यांनी व्यक्त केलीये. हॉटेल पॉलिटिक्स मध्ये आमच्या काँग्रेसच्या आमदारांचे फक्त जेवण आहे. आमचे चेन्नीथला येणार आहेत. ते मार्गदर्शन करणार आहेत. जे 3-4 डाऊटफूल आहेत त्यांची व्यवस्था केली जाईल असंही ते म्हणाले.

  • VidhanParishad Election Live Updates : 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात

    विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होणाराय...11 जागांसाठी 12 उमेदवार रिँगणात आहेत... प्रतिष्ठेच्या निवडणुकीत सर्वंच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलीय...त्यामुळे एका जागेवर कुणाचा गेम होणार,  आणि कोण बाजी मागणार याकडे लक्ष लागलंय...निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता असल्याने राजकीय पक्ष सतर्क झालेयत...रात्रभर दिग्गज नेते आमदार ठेवलेल्या हॉटेलमध्ये ठाण मांडून बसलेत...विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 23 मतांचा कोटा आहे...त्यामुळे मविआ किंवा महायुतीच्या एका उमेदवाराचा गेम होणाराय...हा उमेदवार कोण आहे ते आजच स्पष्ट होणाराय...

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link