Maratha Reservation LIVE: नांदेडमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू;जिल्हाधिकाऱ्यांनी काढले जमाव बंदीचे आदेश

Tue, 31 Oct 2023-10:26 pm,

Maratha Reservation LIVE: राज्यात शांततेत सुरु असलेल्या मराठा आरक्षणाला काही ठिकाणी गालबोट लागले आहे.

Maratha Reservation LIVE: राज्यात शांततेत सुरु असलेल्या मराठा आरक्षणाला काही ठिकाणी गालबोट लागले आहे. संतप्त जमावाने राजकीय नेत्यांची घरे, गाड्या जाळण्याचा प्रयत्न केला. शांततेच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची बैठक झाली. या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली.

Latest Updates

  • नांदेड जिल्हयात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.  जिल्हाधिकाऱ्यांनी जमाव बंदीचे आदेश काढले आहे. नांदेड जिल्ह्यात उपोषण, आंदोलन, धरणे, मोर्चे, रॅली आयोजनावर पुढील आदेशापर्यंत हे निर्बंध लागू असणार आहे. नांदेड जिल्हात झालेल्या आक्रमक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी जमाव बंदी लागू करण्यात आली आहे. कलम 144 चे उल्लंघन करण्याऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. 

  • संपूर्ण जालना जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. जरांगेंची पत्रकार परिषद सुरू असताना नेट बंद झाले.  इंटरनेट बंद झाल्यानं जरांगे संतापले आहेत.  इंटरनेट बंद करा, टॉवर घरी घेऊन जा असा संताप जरांगे यांनी व्यक्त केला आहे. 

  • सोलापूर - मराठा समाजाच्या वतीने सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून निषेध

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    - सोलापुरात मराठा समाज आक्रमक

    - सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळत आरक्षणाची मागणी

    - सरकारचा तीव्र निषेध करत जोरदार घोषणाबाजी

    - सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बाळे पुलावर जाळण्यात आले टायर

    - मराठा समाजातील कार्यकर्ते चांगलेच आक्रमक

    - वाहनांच्या लांबच लांब रांगा

  • सुनिल तटकरे 

    - उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे 
    - आज संध्याकाळी मराठा आरक्षण विषयी बैठक होणार आहे
    - मराठा आरक्षण मिळाले पाहिजे ही सर्वांचीच भुमिका आहे 
    - एकीकडे लाखोंचे मुक मोर्चे, आणि कालची जाळपोळ हे दुर्दैव आहे
    - समाजात अस्वस्था निर्माण झाल्यावर त्याचा राजकीय फायदा घेणा-यांवर आणि बेलगाम बोलणा-यांवर मी काही बोलू इच्छित नाहीये 
    - परिस्थितीचे गांभीर्य सर्वांनी ओळखले पाहिजे

  • सांगली - मराठा आरक्षण मागणीसाठी जत जवळ कर्नाटक सीमेवर बसवर दगडफेक.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    कर्नाटक राज्याच्या एसटी बसवर करण्यात आली दगडफेक.

    दगडफेकीत काही प्रवासी किरकोळ जखमी.

    जत - विजयपुर मार्गावर दुचाकीवर आलेल्या आंदोलकांनी घोषणाबाजी करत केली दगडफेक.

    कर्नाटकच्या सातारा - विजयपूर बसवर करण्यात आली दगडफेक

  • मंत्रिमंडळातील निर्णय - 

    मराठवाड्यातील निझामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा - कुणबी, कुणबी - मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या न्या. संदीप शिंदे समितीचा प्रथम अहवाल स्वीकृत. 
    - कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू.
    - मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी मागासवर्ग आयोग इम्पेरिकल डेटा गोळा करणार.
    - न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली न्या. मारोती गायकवाड, न्या संदीप शिंदे यांचे सल्लागार मंडळ मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर प्रकरणांत शासनाला मार्गदर्शन करणार.

  • मनोज जरांगे पाटील यांचा मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीला इशारा

    बीड येथे झालेल्या उग्र आंदोलनानंतर संचारबंदी. दरम्यान पोलिसांनी काही साखळी उपोषण उठविले आहे. यानंतर मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीला फोन लावून केली नाराजी व्यक्त. जर तातडीने उपोषण उठवणे बंद झाले नाही तर मी स्वतः लाखो लोकांना घेऊन बीड जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण करेन असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मनोज जरांगे पाटील यांना पत्र...

    ह्या पत्राद्वारे महाराष्ट्र शासनाकडे मागणी करतो की त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेचं “विशेष अधिवेशन” भरवावं. सगळ्यांना कळू दे की कुणाचं काय म्हणणं आहे ते. सगळ्यांना हे ही कळू दे की शासन कुठल्या कायद्यात, नियमांत बसवून हे आरक्षण देणार आहे. ह्या सगळ्यातून मग आपण अखिल महाराष्ट्रातून एक प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवावा आणि त्यांना मार्ग काढायला सांगावा
    - राज ठाकरे

  • नवले पुलाजवळ टायर जाळून आंदोलन 

    पुण्यामधील नवले पुलाजवळ आंदोलकांनी टायरची जाळपोळ केली आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. मराठा आंदोलकांनी मुंबई-सातारा रस्त्यावरही टायर जाळलेत. कात्रज-देहूरोड रस्त्यावरही टायर जाळण्यात आले आहेत.

  • मराठा आरक्षणासाठी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    भाजपा आमदार राजेश पवार यांची राज्यपालांकडे मागणी

    सत्ताधारी आमदारांमधूनही आता मराठा आरक्षणासाठी विशेष आधिवेशनाची मागणी

  • नेत्यांना मुंबईतही बंदी
    मराठा आऱक्षणाच्या मागणीसाठी नेत्यांना मुंबईतही बंदी करण्यात आली आहे. 
    मराठा आरक्षणाला आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या मुंबईतील ससून डॅाक बंद राहणार आहे. तसंच उद्या सकाळी ९ वाजता ससून डॅाक येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलनही केले जाणार आहे.

     

  • आरक्षणाच्या मुद्द्यावर अजुनही मार्ग निघत नाही. काल मुख्यमंत्र्यांनी मिटींग घेतली पण याला दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित नव्हते. एका मुख्यमंत्र्यांना डेंग्यु झाला तर दुसरे पक्षाच्या प्रचारासाठी रायपूरला गेले आहे. कृपा करुन तुम्ही टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन त्यांनी जरांगे पाटलांना केले आहे. 

  • अतंरवाली सराटी येथे छत्रपती शाहू महाराज आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा झाली. मी अर्धवट आरक्षण घेणार नाही. दोन दिवसात आरक्षण न दिल्यास पाणी प्यायचे सोडणार असे मनोज जरांगे यांनी छत्रपती शाहू महाराज यांना सांगितले. सरकारला मागणी मान्य करावीच लागेल असे छत्रपती शाहू महाराज म्हणाले.

  • मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाची उपसमितीसोबतची होणारी आजची बैठक रद्द होण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील याचं शिस्टमंडळ आले नसल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी बसलेल्या जरंगे पाटील यांच्या शिष्ठमंडळासोबत उपसमितीची बैठक मंत्रीमंडळाच्या बैठकिनंतर ठरली होती. मात्र सरकार सोबत होणारी बैठक रद्द होण्याची शक्यता आहे.

  • अकोल्यात आरक्षणासाठीचं मराठा आंदोलन चिघळलं. एक तरुण आंदोलकानं अंगावर काळे ऑइल टाकून आंदोलन केलं. यावेळी त्यानं सरकारच्या निषेध करत घोषणाबाजी केली. अनुचित प्रकार घडण्याअगोदर पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी आंदोलक तरुणाला ताब्यात घेतलं

  • गेल्या 3 ते 4 दिवसापासून मराठवाड्यातील परभणी, धाराशीव, लातूर, जालना, नांदेड या जिल्ह्यातील सर्व एसटी वाहतूक बंद आहे. तसेच बीड, छ. संभाजीनगर, सोलापूर जिल्ह्यातील एसटी वाहतूक अंशतः बंद आहे. या जिल्ह्यातील 36 आगाराची वाहतूक पुर्णतः बंद असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

    वाचा सविस्तर: मराठा आरक्षणाचा राग लालपरीवर! मराठवाड्यात 85 बसेसची मोडतोड-जाळपोळ; 4 कोटींचे नुकसान

  • छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यत मंत्री अब्दुल सत्तार यांची गाडी अडवून मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली...  निमखेड,  टाकळी जिवरग फाट्यावरती आमदार अब्दुल सत्तार ची गाडी वरील आमदार स्टिकर  काढून मराठा आंदोलकांनी  निषेध व्यक्त केला.. गाडीत अब्दुल सत्तार नव्हते मात्र त्यांचा मुलगा असल्याची प्राथमिक माहिती आहे...

  • मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन पेटल्यानंतर त्याची धग आता एसटीला बसलीय.. राज्यभरातले 36 एसटी डेपो बंद आहेत.. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलंय.. अनेक जिल्ह्यांमध्ये एसटी बसची जाळपोळ करण्यात आली तर काही ठिकाणी तोडफोडही करण्यात आलीय... मराठवाड्यातील जालना, लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यातील सर्व एसटी वाहतूक बंद आहे... मुंबई, नागपूर, कोकण, पुणे, अमरावती या विभागांमधली एसटीची सेवा सुरळीत सुरू आहे. एसटी बसच्या जाळपोळीत सुमारे एक कोटी रुपयांचं नुकसान झालंय. तर वाहतूक काही ठिकाणी पूर्ण बंद किंवा अंशत बंद असल्याने एसटीचा दररोजचा अडीच कोटी रुपयांचा महसूल बुडतोय..

  • मराठा आरक्षणासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली.

  • Maratha Reservation: कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे. पहिल्यांदा शेतीला कुणबी म्हणायचे. आता शेती शब्द आलाय. या शब्दाला मराठे कमी लेखणार नाहीत. आम्ही कुणबी प्रमाणपत्र घ्यायला तयार आहोत. यासाठी अभ्यासकांसोबत चर्चा करु असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. 

  • मराठा आंदोलकांनी आमदार प्रकाश सोळंकीचं घर पेटवल्यानंतर आता उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातल्या घरासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. सकल मराठा समाज आक्रमक झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर बंदोबस्त वाढवण्यात आलाय. 

  • मावळ मधील कातवी गावातील मराठा आंदोलक आक्रमक झालेत. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मावळ तालुक्यातील शासकीय कार्यालय बंद करावीत असं पत्र कातवीच्या सकल मराठा समाजाने मावळ तहसीलदारांना दिलंय.शासकीय कार्यालय उघडी दिसली तर होणाऱ्या परिणामाला मावळ प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी दिलाय. तसंच आमदार नितेश राणे यांना शांत बसण्याचा इशारा देत मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर फिरून देणार नाही असं वक्तव्यही त्यांनी केलंय. 

  • मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मालेगावच्या मुंगसे बाजार समितीच्या व्यापऱ्यांनी आज कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.सर्व जाती धर्माच्या व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन हा घेतला निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांनी कांदा लिलावसाठी आणू नये असे आवाहन व्यापाऱ्यांनी केले.

  • 'फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांतून जन्मलेल्या...'; मराठा आरक्षणासाठी मिटकरींचं शिंदेंना पत्र! केली 'ही' मागणी

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंगळवारपासून ज्यांची कुणबी म्हणून नोंद आढळून आली आहे त्यांना तात्काळप्रमाणपत्र वाटली जातील असं सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशीरा मुंबईतील सागर बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर मराठा आरक्षणाच्या विषयावर बैठक घेऊ चर्चा केली. राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यू झाल्याने ते सध्याच्या राजकीय घडामोडींपासून दूर आहेत. मात्र असं असलं तरी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मराठा आरक्षणासंदर्भात एक पत्र लिहिलं आहे. येथे क्लिक करुन वाचा अमोल मिटकरींनी मुख्यमंत्री शिंदेंना पाठवलेलं संपूर्ण पत्र.

  • मनोज जरांगे-पाटलांना सुप्रिया सुळेंची हात जोडून विनंती! म्हणाल्या, 'त्यांनी आपल्या...'

    मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाला सोमवारी गालबोट लागलं. राज्यातील अनेक भागांमधून हिंसाचाराच्या घटनांच्या बातम्या समोर आल्या. बीडमध्ये 2 आमदारांची घर आंदोलकांनी जाळली. याच पार्श्वभूमीवर रात्री उशीरा बीड आणि धाराशीवमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे. हिंसांचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांना अर्ल्ट देण्यात आला आहे. असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी राज्यातील नागरिकांना शांततेचं आव्हान केलं आहे. तसेच सुप्रिया सुळेंनी आमरण उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटलांनाही अगदी हात जोडून एक विनंती केली आहे. येथे क्लिक करुन वाचा सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या आहेत.

  • रक्तदान करुन आमदार बच्चू कडू मराठा आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत.. 6 नोव्हेंबरला सिंदखेडराजामध्ये बच्चू कडू रक्तदान करतील... मराठा आंदोलन टोकावर गेलंय, मात्र हे आंदोलन हिंसक न होण्याची काळजी घेण्याचं आवाहनही बच्चू कडू यांनी केलंय. तसंच सरकारने आंदोलनाची गंभीर दखल घेण्याची मागणीही बच्चू कडूंनी केलीय..

  • धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने संचारबंदी लागू करण्यात आलीय.. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश लागू केले आहे.. धाराशिवमध्ये मराठा आंदोलन पेटल्याचं दिसतंय.. रास्ता रोको तसंच जाळपोळीच्या घटनाही घडल्या आहेत.. अनेक ठिकाणी एसटी पेटवून देण्यात आल्यात. तेव्हा सार्वजनिक मालमत्तांचं नुकसान होत असल्यानं धाराशिवमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलीय. संचारबंदीत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आलीय.

  • 'खरंतर बोलू नये पण परिस्थिती अशी आहे म्हणून...'; उपोषण करणाऱ्या जरांगे पाटलांच्या प्रकृतीसंदर्भात डॉक्टरची पोस्ट

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणावर बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली आहे. रविवारी सायंकाळी उपस्थितांबरोबर संवाद साधण्यासाठी मनोज जरांगे-पाटील स्टेजवर उभे राहण्याचा प्रयत्न करत असतानाच अशक्तपणामुळे ते कोसळले. त्यानंतर उपस्थितांच्या आग्रहानंतर त्यांनी थोडं पाणी प्यायलं. आज म्हणजेच मंगळवारी (31 ऑक्टोबर 2023 रोजी) मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा सातवा दिवस आहे. मनोज जरांगेंच्या शरीरावर या आमरण उपोषणाचा नेमका काय परिणाम होत आहे यासंदर्भातील एका डॉक्टरांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही संपूर्ण पोस्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना आमदार आणि खासदारांची तातडीची बैठक बोलावलीय. आज संध्याकाळी 6 वाजता वर्षा बंगल्यावर ही बैठक होणारेय. त्यात मराठा आरक्षणाबाबत बैठकीत चर्चा होणारेय. या बैठकीत आरक्षणाबाबत तोडगा निघेल असा विश्वास मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांसह सर्व नेत्यांनी शांततेचं आवाहन केल्याचंही गुलाबराव पाटलानी सांगितलं. 

  • मराठा आरक्षणाबाबत आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज बोलावण्यात आली आहे.. या बैठकीत कुणबी जात प्रमाणपत्रासाठी नेमलेल्या शिंदे समितीचा अहवाल ठेवला जाईल.. तसंच मनोज जरांगे यांनी केलेल्या विशेष अधिवेशनाच्या मागणीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. मविआच्या नेत्यांनीही काल विशेष अधिवेशनाची मागणी केलीय. तेव्हा आजच्या बैठकीत विशेष अधिवेशनावर निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.. बीडसह अनेक भागांत जाळपोळीच्या घटनाही घडल्या आहे.. राष्ट्रवादीच्या आमदाराचंच घर पेटवण्यात आल्याने त्याचे पडसादही बैठकीत उमटण्याची शक्यता आहे.

  • बीडमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आलीये.. बीडमधील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आलीये.. ठिकठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्यानं संचारबंदी लागू करण्याचा निर्णय बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी घेतलाय..

  • संतप्त आंदोलकांनी आमदार प्रकाश सोळंकीचं घर पेटवल्यानंतर छगन भुजबळांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आलीय. त्यांच्या सिद्धगड निवासस्थानाला छावणीचं स्वरूप आलंय. तसंच त्यांच्या नाशिकच्या घराला तसंच येवल्यातील संपर्क कार्यालयाबाहेर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगेंनी केलीय. तर ओबीसीतून आरक्षण देऊ नये असं छगन भुजबळांनी म्हंटलं होतं.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link