Pune Bypoll Election Results 2023 LIVE Updates: चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप मोठ्या मताधिक्याने विजयी

Thu, 02 Mar 2023-6:23 pm,

Pune Bypoll Election Results 2023 LIVE Updates: कसबा पेठ पोटनिवडणुकीत मविआचे रवीेंद्र धंगेकर विजयी. तर चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे (Kasba Chinchwad By Election Results)

Pune Kasba Chinchwad Bypoll Election Results 2023 Live Updates : पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यात कसबा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर पाहिला मिळाला असून भाजपला बालेकिल्ल्यातच धक्का बसला आहे. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे रवीेंद्र धंगेकर मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. तर भाजपचे हेमंत रासने यांना पराभवाचा धक्का बसला आहे. दुसरीकडे चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपने आपला बालेकिल्ला कायम ठेवला असून अश्विनी जगताप यांचा मोठा विजय झाला आहे. अश्विनी जगताप यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा दारुण पराभव केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


 

Latest Updates

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : चिंचवड पोटनिवडणूक,भाजपच्या अश्विनी जगताप विजयाच्या उंबरठ्यावर. अश्विनी जगताप यांना 84388 मतं, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना 74452 मतं, अपक्ष म्हणून उभे राहिलेले राहुल कलाटे यांनाही 25449 मतं.

  • आतापर्यंत भाजपा शिवसेनेच्या पाठिंब्यावर कसब्यामध्ये जिंकत आली. आता दिल्ली आणि फडणवीसांना खरी शिवसेना कुठे आहे हेकळलं असेल असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी धंगेकरांच्या विजयानंतर भाजपाला लगावला आहे.

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबामध्ये झालेला विजय बोलका असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.  महाराष्ट्रात जे काही सुरू आहे ते जनतेला मान्य नाही. वाढती महागाई , महाराष्ट्रातले निघून चाललेले उद्योग यामुळे जनता त्रस्त झाल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. कसबा मध्ये आमचा विजय झाला आहे.

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबापेठ पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचा मोठा विजय. रवींद्र धंगेकर यांच्या विजयावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रवींद्र धांगेकर यांना उमेदवारी देऊन आम्ही अर्धी लढाई जिंकलो होतो. तळागाळात काम करणारा कार्यकर्ता. आम्ही सर्व मित्र पक्षांची एकजूट बांधण्यात यशस्वी ठरलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री तिथे होते. सर्व गोष्टींचा वापर सत्ताधाऱ्यांनी तिथे केला. तेथील मतदाराने सुद्धा सांगितले की तिथे काय परिस्थिती होती. पण जनतेला आम्हाला कौल दिला असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसब्यात 28 वर्षानंतर भाजपचा पराभव, कॉंग्रेसचे धंगेकर 10950 मतांनी विजयी

     

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबापेठ पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचा मोठा विजय. तब्बल 28 वर्षांनंतर कसब्यात भाजपाला जागा गमवावी लागली आहे. भाजपचे हेमंत रासने यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पराभवानंतर हेमंत रासने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उमेदवार म्हणून मी कमी पडलो, पक्षाने मला संधी दिली पण मी कमी पडलो, पराभव मला मान्य असून पराभवाची कारणं शोधणार असल्याचं हेमंत रासने यांनी म्हटलंय.

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबापेठ पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचा मोठा विजय. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर तब्बल 10950 मतांनी विजयी. रवींद्र धंगेकर यांना 73 हजार 194 मतं. तर भाजपच्या हेममंत रासने यांना 62 हजार 244 मतांवर समाधान मानावं लागलं. धंगेकर यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा गुलाल उधळून, फटाक्यांची आतषबाजी करत विजयाचा जल्लोष.

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबा मतदार संघात ऐतिहासिक निकाल, कसब्यातून कॉंग्रेसचे धंगेकर 10950 मतांनी विजयी

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     

    चिंचवड पोटनिवडणूक निकाल  मतं 
    अश्विनी जगताप (भाजप)   52555
    नाना काटे (राष्ट्रवादी)  43557
    राहुल कलाटे (अपक्ष)  17090

     

    कसबा पोटनिवडणूक निकाल मतं 
    हेमंत रासने (भाजप) 62244
    रवींद्र धंगेकर  (महाविकास आघाडी) 73194
  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबापेठ पोटनिवडणूक मतमोजणी. महा विकास आघिडचे उमेदवार रवींद्र धंगेकर तब्बल 11 हजार मतांनी विजयी, भाजपाला दाखवला कात्रजचा घाट. कसबा पोटनिवडणुकीत ऐतिहासिक निकाल, भाजपाच्या हेमंत रासने यांचा पराभव

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबापेठ पोटनिवडणूक मतमोजणी. महा विकास आघिडचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याकडे मोठी आघाडी. सतराव्या फेरीअखेर धंगेकर यांना 8371 मतांची आघाडी, धंगेकर यांना 60657 मतं.

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबापेठ पोटनिवडणूक मतमोजणी. महा विकास आघिडचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याकडे मोठी आघाडी. सोळाव्या फेरीअखेर धंगेकर यांना 56497 मतांची आघाडी, तर भाजपचे हेमंत रासने यांना 50490 मतं. धंगेकर 6957 मतांनी आघाडीवर,रवींद्र धंगेकर यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी, गुलाल उधळत विजयाच्या आधीच कार्यकर्त्यांचा जल्लोष

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी, भाजपच्या अश्विनी जगताप यांची आघाडी कायम. भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पिंपरी-चिंचवडवर कुणा एका व्यक्तीच प्रभाव राहिलेला नाही, हे स्पष्ट होतंय. भाजपाने केलेल्या कामांचा हा विजय असेल. राहुल कलाटेंना थांबवण्याचा बराच प्रयत्न झाल, जर ते उभे राहिले नसते तर त्यांची मतंही भाजपालाच मिळआली असतं असं आमदार महेश लांडगे यांनी म्हटलं आहे. 

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : 11  व्या फेरीअखेर धंगेकरांना 3122 मतांची आघाडी

    चिंचवड पोटनिवडणूक निकाल  मतं 
    अश्विनी जगताप (भाजप)   32088
    नाना काटे (राष्ट्रवादी)  35832
    राहुल कलाटे (अपक्ष)  10961

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     

    कसबा पोटनिवडणूक निकाल मतं 
    हेमंत रासने (भाजप) 37784
    रवींद्र धंगेकर  (महाविकास आघाडी) 41771

     

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबापेठ पोटनिवडणूक मतमोजणी. महा विकास आघिडचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पेठेतील नागरिकांनी दिला भरघोस प्रतिसाद. पुण्यातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या पेठेतील अनेक परिसरातून धंगेकर आघाडीवर. कसबा, शनिवार, सदाशिव, नवी पेठ काही भाग, अल्पना टॉकीज, बुधवार पेठ, रविवार पेठ, गणेश पेठ, डोके तालीम, बोहरी आळी, रामेश्वर चौक, शुक्रवार पेठ, टिळक रस्ता या ठिकाणाहून धंगेकर यांना आघाडी

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी, भाजपच्या अश्विनी जगताप यांची आघाडी कायम. नवव्या फेरीअखेर जगताप 6356 मतांनी आघाडीवर. राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे दुसऱ्या तर अपक्ष राहुल कलाटे तिसऱ्या स्थानावर

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबापेठ पोटनिवडणूक मतमोजणी. भाजपचे प्राबल्य असलेल्या पेठांमध्ये काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना आघाडी. अनेक ठिकाणी धंगेकरांचं मताधिक्य अधिक, भाजपचे हेमंत रासने पिछाडीवर
    नारायण पेठेतील एका बुथवर चक्क धंगेकरांना आघाडी
    614 मतांपैकी
    470 धंगेकर 
    141 रासणे

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी, भाजपच्या अश्विनी जगताप आघाडीवर. पुणे शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांची प्रतिक्रिया. राहुल कलाटेंच्या बंडखोरीच्या परिणामाची भीती होती, म्हणूनच आम्ही शेवटपर्यंत त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होतो, दोन्ही उमेदवारांची मतं एकत्र केल्यास विजय सोपा झाला असता. आदित्य ठाकरेंची सभा, रॅल यामुळे कडवी टक्कर देता येत आहे.

     

  • चिंचवड पोटनिवडणूक निकाल  मतं 
    अश्विनी जगताप (भाजप)   24925
    नाना काटे (राष्ट्रवादी)  20945
    राहुल कलाटे (अपक्ष)  9255

     

    कसबा पोटनिवडणूक निकाल मतं 
    हेमंत रासने (भाजप) 27708
    रवींद्र धंगेकर  (महाविकास आघाडी) 30144
  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबापेठ पोटनिवडणूक मतमोजणी. नवव्या फेरीनंतर काँग्रेसचे रविंद्र धंगेकर आघाडीवर, नवव्या फेरीनंतर धंगेकर 3300 मतांची आघाडी. धंगेकर यांना आतापर्यंत 30000 मतं तर हेमंत रासने यांना 27175 मतं. आनंद देव यांना 75 मतं. अभिजीत बिचुकले यांना 4 मतं. 

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी, भाजपच्या अश्विनी जगताप 24,925 मतांनी आघाडीवर, मविआच्या नाना काटे 20,945 मतांनी आघाडीवर. अपक्ष राहुल कलाटे 9,255 मतांनी आघाडीवर. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप, राष्ट्रवादीची नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबापेठ पोटनिवडणूक मतमोजणी. सातव्या फेरीनंतर रविंद्र धंगेकर यांची आघाडी कमी, सातव्या फेरीनंतर धंगेकर 1577 मतांनी आघाडीवर. धंगेकर यांना आतापर्यंत 23000 मतं तर हेमंत रासने यांना 20353 मतं

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबापेठ पोटनिवडणूक मतमोजणी. सातव्या फेरीनंतर रविंद्र धंगेकर आघाडीवर ,सातव्या फेरीअखेर धंगेकर 3192 मतांनी आघाडीवर. धंगेकर यांना आतापर्यंत 23000 मतं तर हेमंत रासने यांना 20353 मतं

  • चिंचवड पोटनिवडणूक निकाल  मतं 
    अश्विनी जगताप (भाजप)   13880
    नाना काटे (राष्ट्रवादी)  11351
    राहुल कलाटे (अपक्ष)  4899

     

    कसबा पोटनिवडणूक निकाल मतं 
    हेमंत रासने (भाजप) 16423
    रवींद्र धंगेकर  (महाविकास आघाडी) 18933

     

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी, भाजपच्या अश्विनी जगताप 13,880 मतांनी आघाडीवर, मविआच्या नाना काटे 11,351 मतांनी आघाडीवर. अपक्ष राहुल कलाटे 4,599 मतांनी आघाडीवर. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप, राष्ट्रवादीची नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबा पोटनिवडणूक मतमोजणी. पाचव्या फेरीनंतर रविंद्र धंगेकर आघाडीवर ,पाचव्या फेरीत धंगेकर 3000 मतांनी आघाडीवर. आनंद दवे यांना 12 मतं, अभिजीत बिचुकले यांना 4 मतं, नोटा - 86 मतं

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबा पोटनिवडणूक मतमोजणी. रविंद्र धंगेकर यांची आघाडी कमी झाली, चौथ्या फेरीत धंगेकर 1400 मतांनी आघाडीवर. आनंद दवे यांना 12 मतं, अभिजीत बिचुकले यांना 4 मतं, नोटा - 86 मतं, कसब्यात धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यात चुरस

  •  

    चिंचवड पोटनिवडणूक निकाल  मतं 
    अश्विनी जगताप (भाजप)   11222
    नाना काटे (राष्ट्रवादी)  9435
    राहुल कलाटे (अपक्ष)  3942

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     

    कसबा पोटनिवडणूक निकाल मतं 
    हेमंत रासने (भाजप) 2863
    रवींद्र धंगेकर  (महाविकास आघाडी) 5844  

     

     

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी, तिसऱ्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 7,996 मतांनी आघाडीवर, मविआच्या नाना काटे 7,349 मतांनी आघाडीवर. अपक्ष राहुल कलाटे 3,046 मतांनी आघाडीवर. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप, राष्ट्रवादीची नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबा पोटनिवडणुकीत मतमोजणी सुरु. पहिल्या टप्प्यात मविआचे रवींद्र धंगेकर आघाडीवर. धंगेकर 5,844 मतांनी आघाडीवर. तर भाजपचे 2,863 मतांनी आघाडीवर. लाल महालात रुद्रांश कानडे या लहान मुलांने ऑल द बेस्ट म्हणत  धंगेकर यांना दिलं कॅडबरी चॉकलेट. कसब्यात भाजपचे हेमंत रासने आणि मविआचे रवींद्र धंगेकर यांच्यात जोरदार चुरस

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु, पहिल्या टप्प्यात भाजपच्या अश्विनी जगताप 7,882 मतांनी आघाडीवर, मविआच्या नाना काटे 7,249 मतांनी आघाडीवर. अपक्ष राहुल कलाटे 3,046 मतांनी आघाडीवर. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप, राष्ट्रवादीची नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबा पोटनिवडणुकीत पहिला कल हाती. पहिल्या टप्प्यात मविआचे रवींद्र धंगेकर आघाडीवर. धंगेकर 2200 मतांनी आघाडीवर. कसब्यात भाजपचे हेमंत रासने आणि मविआचे रवींद्र धंगेकर यांच्यात जोरदार चुरस

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबा पोटनिवडणुकीत पहिल्या टप्प्यात मविआचे रवींद्र धंगेकर आघाडीवर. कसबा गणपतीचा आशिर्वाद मला मिळणार मी कार्यकर्ता आहे , गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मी आलोय माझा विजय निश्चित, धंगेकरांनी व्यक्त केला विश्वास,  रविंद्र धंगेकरांनी केली गणपतीची आरती. कसब्यात भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात चुरशीची लढत

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु, पहिल्या टप्प्यात भाजपच्या अश्विनी जगताप 4,053 मतांनी आघाडीवर, मविआच्या नाना काटे 3,604 मतांनी आघाडीवर. अपक्ष राहुल कलाटे 1,273 मतांनी आघाडीवर. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप, राष्ट्रवादीची नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबा पोटनिवडणुकीत पहिला कल हाती, टपाली मतमोजणीत मविआचे रवींद्र धंगेकर आघाडीवर. कसब्यात भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात चुरशीची लढत

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : चिंचवड पोटनिवडणुकीचा पहिला कल हाती, टपाली मतमोजणीत चिंचवडकरांचा कल भाजपाच्या अश्विनी जगताप यांना, अश्विनी जगताप मतांनी 452 मतांनी आघाडीवर. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप, राष्ट्रवादीची नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : चिंचवड पोटनिवडणुकीचा पहिला कल हाती, टपाली मतमोजणीत चिंचवडकरांचा कल भाजपाच्या अश्विनी जगताप यांना

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : भाजपच्या अश्विनी जगतापना मविआचं आव्हान 

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : टपाली मतमोजणीत चिंचवडकरांचा कल जगतापांना

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Update : कसबा-चिंचवडच्या मतमोजणीला सुरूवात

  • Pune Kasaba Chinchwad Bypoll Election 2023 Live Updates : कसब्याची मतमोजणी कोरेगाव पार्क येथे सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होईल, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

  • Pune Bye Poll Election Results LIVE Update : कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकालामुळे कोणताही अनुचित प्रकार होवू नये यासाठी कोरेगाव पार्क भागातील अन्न धान्य महामंडळाचे गोदाम तसेच शहरातील मध्यभागात पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच निकालानंतर विजयी मिरवणूक काढण्यास पोलिसांकडून मनाई केली आहे.

     

  • Pune Bye Poll Election Results Live Updates : कसब्याची मतमोजणी अन्न महामंडळाच्या गोदामात होणार आहे. इथं मतमोजणीच्या 20 फे-या होतील. तर चिंचवडची मतमोजणी थेरगाव इथल्या शंकर आण्णा गावडे कामगार भवन इथं होणार आहे. मतमोजणीच्या एकूण 37 फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रत्येकी 14 टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी एक टेबल असे एकूण 15 टेबल असणार आहेत. 

  • Pune Bye Poll Election Results LIVE Update :  चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे. मतमोजणीसाठी चिंचवड आणि कसब्यात जय्यत तयारी करण्यात आलीय. कसब्याची मतमोजणी अन्न महामंडळाच्या गोदामात होणार आहे. तर चिंचवडच्या  मतमोजणीसाठी प्रत्येकी 14 टेबल आणि टपाली मतपत्रिकांसाठी एक असे एकूण 15 टेबल असणार आहेत. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link