Uddhav Thackeray vs Eknath Shinde LIVE Updates : `पक्षांतर बंदीचा कायदा बदलण्याची गरज`

Tue, 21 Feb 2023-1:42 pm,

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Updates : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षांवर सुप्रीम कोर्टात आजपासून सलग 3 दिवस सुनावणी होणार आहे. (Maharashtra Political Crisis)

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde LIVE Updates : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षांवर सुप्रीम कोर्टात आजपासून सलग 3 दिवस सुनावणी होणार आहे. (Maharashtra Political Crisis) हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवायचं की 5 न्यायाधीशांकडेच ठेवायचं याचा निर्णयही मेरिटनुसार घेतला जाणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केले आहे. (Political News) आता 3 दिवसांच्या सुनावणीत ते ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. (Maharashtra Political News)

Latest Updates

  • सतासांघर्षावर सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद

    Thackeray vs Shinde LIVE Updates : सतासांघर्षावर सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद सुरु । 10 व्या सूचीतील तरतुदींचा वापर सरकार पाडण्यासाठी केला गेला, असा युक्तिवाद केला. त्यानंतर  आता शिंदे गटाचे गविक कौल आणि महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद आता सुरु झाला आहे. शिंदे गटाला वगळलं तरी नार्वेकर बहुमतात निवडून आले आहेत. यावर राहुल नार्वेकर यांच्या निवडीवर चर्चाच नको, असे सिब्बल म्हणाले. नार्वेकरांना बहुमतापेक्षा एक मत कमी पडले, असे सिब्बल यांनी निदर्शनास आणून दिले.

  • संसदेतील शिवसेना कार्यालय शिंदे गटाला  

    Maharashtra Political Crisis Updates : निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंना दिल्यानंतर संसदेतील शिवसेना कार्यालय मिळावं, यासाठी गटनेते राहुल शेवाळे यांनी लोकसभा सचिवालयाला पत्र दिले होते. लोकसभा सचिवालयानं राहुल शेवाळेंना पत्र पाठवून शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा दिला. 

  • Thackeray vs Shinde LIVE Updates :  ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांचे 3 महत्त्वाचे मुद्दे 

    - अपात्र आमदारांवर कारवाई करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे अधिकार
    - सभागृहाबाहेरील वर्तन पक्ष शिस्तीत येतं. त्यामुळे कारवाई करण्याचा अधिकार पक्षाचा आहे.
    - राज्यपालांनी अधिवेशन बोलवण्याची घाई का केली ? राज्यपालांचा तो अधिकार नाही.

  • 'पक्षांतर बंदीचा कायदा बदलण्याची गरज' 
     Thackeray vs Shinde LIVE Updates : पक्षांतर बंदीचा कायदा बदलण्याची गरज आहे. बंडखोरीमुळे लोकशाहीला मोठा धोका आहे, असा युक्तीवाद ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी केला.

  • कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Thackeray vs Shinde LIVE Updates :  राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली आहे. कपिल सिब्बल युक्तिवाद करत आहेत.

    - बहुमताने प्रतोद बदलता येतो का?  
    - आधी सदस्यांच्या अपात्रेबाबत निर्णय व्हावा. 
    - 'पक्षचिन्हावर निवडून आलेले आमदार पक्षापेक्षा वेगळे कसं? 
    - पक्षात फूट पडल्याने दोन गट निर्माण झाले आहेत.

  •  Thackeray vs Shinde LIVE Updates : पक्षात कोणतेही विभाजन झाले नाही. पक्षात फूट पडली, असं मानायचे का?विधीमंडळ पक्ष ठरवणार की राजकीय पक्ष? विधीमंडळाच्या बाहेर असलेला व्यक्ती म्हणतो तुम्ही व्हिप असू शकत नाही हे कसं चालेल. व्हिप कोणाचा असावा हे पक्ष ठरवतो. व्हिप हा ब्रीज असतो. सुनावणीच्यावेळी दहाव्या अनुसूचीचा संदर्भ दिला गेलाय. कोर्टाच्या भूमिकेमुळे विधानसभा उपाध्यक्ष काही करु शकले नाही, असा जोरदार युक्तीवाद ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी केला आहे.

  • सत्ता संघर्षांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

     Thackeray Vs Shinde LIVE Updates : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली आहे. (Maharashtra Political Crisis)  21 जून रोजी पहिली बैठक झाली, आम्ही एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना बैठकीसाठी बोलावली. शिंदे गटाचे आमदार गैरहजर होते, असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी केला आहे.

  • ठाकरे गटाच्या निवडणूक आयोगाविरोधातील याचिकेवर उद्या सुनावणी होणार

    Thackeray Vs Shinde LIVE Updates : निवडणूक आयोगाविरोधात दाखल करण्यात आलेल्या ठाकरे गटाच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. तातडीने सुनावणी घ्या, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. आता निवडणूक आयोगाच्या सुनावणीवर उद्या दुपारी 3.30 वाजता वेगळ्या बेंचसमोर सुनावणी होणार आहे.

  •  Thackeray Vs Shinde LIVE Updates :आजपासून सलग सुनावणी होणार आहे. कोर्टाला काय अधिक मुद्दे हवेत. आमचा आग्रह हाच आहे की 21 जून पासूनच्या घटनाक्रम पाहा. यातून कायद्यात्मकरित्या कारवाई कशी होते पाहावे. संविधानाच्या तरतूदी धरून या कारवाई पाहाव्यात. पक्षविरोधी त्यांनी काम केलंय का हे पाहावं. प्राथमिक सदस्यत्व सोडलंय का व्हीप कसा काढला. अधिवेशन बोलवणे राज्यपालांच्या अधिकारात होते का मोठा पेच निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाचा निकाल धक्कादायक होता. सुनावणी दरम्यान हा मुद्दा येऊ नये. याचा वेगळा परिणाम होऊ शकतो. जे प्रतिज्ञापत्र होते तर खटाटोप का करायला लावला, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी केला आहे.

  • Maharashtra Political Crisis Updates : राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आली आहे. उद्या दुपारी बारा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. आजची बैठक कोणतंही कारण न देता रद्द करण्यात आली आहे. 

  • शिंदे गट अ‍ॅक्शनमोडमध्ये, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची बैठक

    Uddhav Thackeray Vs Eknath Shinde LIVE Updates :  शिवसेना नाव आणि चिन्ह धनुष्यबाण मिळाल्यानंतर आता शिंदे गट अ‍ॅक्शनमोडमध्ये आलाय.  शिंदे गटाची आज राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची बैठक होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता ताज हॉटेलमध्ये बैठक बोलवण्यात आलीय. या बैठकीला अनेक राज्यातून शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. याआधी ठाकरे गटाने शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी स्थापन केली होती. मात्र, आता शिवसेना पक्ष शिंदेंच्या ताब्यात आल्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणीवर त्यांनी दावा केला आहे. नवीन राष्ट्रीय कार्यकारणी कशी पाहिजे ? त्यात कोण कोण असतील यावर चर्चा होणार असून पहिल्या सारखी शिवसेनेची एक राष्ट्रीय कार्यकारणी असावी यासाठी ही महत्वपूर्ण बैठक असणार आहे.

  • Uddhav Thackeray Vs Eknath Shinde LIVE Updates : निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात काल आव्हान दिलं. ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी काल ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टाने फटकारले.  अर्ज मेन्शन न करताच ठाकरे गटाने सुनावणीची विनंती केली होती. मात्र तातडीने सुनावणीची विनंती सुप्रीम कोर्टाने फेटाळलीय. मेन्शनिंग लिस्टमध्ये अर्ज दाखल करायला पाहिजे, लिस्टेड नसताना कोणतीही तारीख कोर्ट देऊ शकत नाही, असं कोर्टाने ठाकरे गटाला सुनावले. त्यानुसार आज सकाळी साडे दहा वाजता ठाकरे गट आपली केस दाखल करणार आहे. त्यावर आजच सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

  • ठाकरे विरुद्ध शिंदे सेना वाद, सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी 
    Uddhav Thackeray Vs Eknath Shinde LIVE Updates : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षांवर सुप्रीम कोर्टात आजपासून सलग 3 दिवस सुनावणी होणार आहे. (Maharashtra Political Crisis) हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवायचं की 5 न्यायाधीशांकडेच ठेवायचं याचा निर्णयही मेरिटनुसार घेतला जाणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केले आहे. (Political News) आता 3 दिवसांच्या सुनावणीत ते ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. (Maharashtra Political News)

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link