नांदेड : देशावर कोरोनाचे संकट गडद होत असल्याने लॉकडाऊन-२ जारी करण्यात आले. त्यामुळे आता ३ मेपर्यंत राज्यात संचारबंदी आणि लॉकडाऊन असल्याने अनेक लोक विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. या लॉकडाऊनमुळे नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात ३३० भाविक अडकले आहेत. त्यांना पंजाब आणि हरियाणा या राज्यात पाठविण्यात आले आहेत. तशी केंद्र आणि राज्य सरकारकडून परवानगी घेण्यात आली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या शिख भाविकांची घरवापसी सुरु होणार आहे. सचखंड गुरुद्वारात पंजाब आणि हरियाणा राज्यातील तीन हजाराहून अधिक भाविक अडकलेले होते. यापैकी बहुतांश भाविक हे शेतकरी आहेत. तसेच वयोवृद्ध आणि लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.


पंजाब आणि हरियाणामध्ये गहू कापनीचे दिवस असल्याने आम्हाला घरी परत पाठवावे, अशी विनंती या भाविकांनी केली होती. याबाबत 'झी २४ तास'ने वृत्तही प्रसिद्ध केले होते. केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी याबाबत पंतप्रधानांकडे विनंती केली होती. गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र सरकारशी बोलून हा प्रश्न मार्गी लावला. रात्री उशिरा १० गाड्यांमधून ३३० भाविकाना रवाना करण्यात आले. टप्याटप्याने या सर्व भाविकांची घरवापसी केली जाणार असल्याचे गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने सांगण्यात आले.